Maharashtra

Aurangabad

CC/10/375

Vishram Indrarao Jagtap - Complainant(s)

Versus

M/s National Electronics,Through its Proprietor, - Opp.Party(s)

Anand Mamidwar

29 Sep 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM AURANGABAD - 431001 2nd FLOOR , COLLECTOR OFFICE BUILDING , AURANGABAD - 431001
Complaint Case No. CC/10/375
1. Vishram Indrarao JagtapR/o "Tulja" Sai Vrundawan Colony,Paithan Road AurangabadAurangabadMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. M/s National Electronics,Through its Proprietor,Opp Zilla Parishad Office,Aurangpura,AurangabadAurangabadMaharastra2. Godrej and Boyce Manufacturing Company Ltd229/230,Saraswati Sadan M.G.Road Pune 411 001PuneMaharastra3. Godrej and Boyce Manufacturing,Co.Ltd.(Appliance Division)Mansi Enterprises,101,Panchsil Vishal Complex Sector,5,Airoli New MumbaiMumbaiMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
Smt. Anjali L. Deshmukh ,PRESIDENT Rekha Kapadiya ,Member
PRESENT :

Dated : 29 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

द्वारा घोषित – श्रीमती अंजली देशमुख, अध्‍यक्ष –

 
      तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार खालीलप्रमाणे आहे.
     
     तक्रारदारानी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍याकडून दिनांक 10/11/2007 रोजी रक्‍कम रु 20,000/- देऊन गोदरेज कंपनीचा फ्रिज खरेदी केला. त्‍यानंतर एक वर्षाच्‍या आत फ्रिज व्‍यवस्थित चालत नसल्‍यामुळे त्‍यामध्‍ये ठेवलेल्‍या भाज्‍या व फळे नासून खराब होत होत्‍या.   म्‍हणून तक्रारदारानी जून 2008 व जुलै 2008 मध्‍ये गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍याकडे याबद्दल तक्रार दिली. त्‍यांचा टेक्निशियने घरी येऊन फ्रिजची पाहणी केली. त्‍यांना फ्रिजमधील दोष सापडला नाही. बहुतेक कॉम्‍प्रेसरमध्‍ये बिघाड झाला असावा  तज्ञ व्‍यक्‍तीला बोलावून घेतो असे टेक्निशीयनने तक्रारदारास सांगितले. त्‍यानंतर दिनांक 23/9/2008, 6/10/2008, 14/10/2008, 19/1/2009 रोजी गैरअर्जदारास पत्र पाठवून फ्रिजबाबत तक्रार केली. दिनांक 23/9/2008 रोजी त्‍यांचा टेक्निशियन पुन्‍हा एकदा तक्रारदाराकडे येऊन गेले. परंतु याही वेळेस फ्रिजमधील दोष त्‍यांना दूर करता आला नाही आणि त्‍यांनी तज्ञ व्‍यक्‍तीस बोलावले नाही म्‍हणून सदरील तक्रार.   तक्रारदार गैरअर्जदाराने फ्रिजमधील दोष दूर करुन द्यावा किंवा नविन फ्रिज बदलून द्यावा तसेच मानसिक त्रासापोटी रु 5000/- आणि तक्रारीचा खर्च द्यावा अशी मागणी करतात.
 
      तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
     
     गैरअर्जदाराने लेखी जवाब दाखल केला. तक्रारदार तक्रार दाखल केल्‍यापासून दोन्‍हीही तारखेस मंचात गैरहजर. परंतु तक्रारदाराने शपथपत्रासहीत तक्रार दाखल केलेली असल्‍यामुळे मंच सदरील तक्रार मेरीटवर निकाली काढीत आहे. गैरअर्जदाराच्‍या प्रतिनिधीने दिनांक 9/9/2010 चे पत्र मंचात दाखल केले. त्‍यामध्‍ये तक्रारदाराने जुन्‍या फ्रिजच्‍या बदल्‍यात नविन फ्रिज मिळाल्‍याचे नमूद करुन सही केलेली आहे. तक्रारदारानी त्‍यांच्‍या फ्रिजध्‍ये काय दोष होता हे तज्ञाच्‍या अहवालासहीत सिध्‍द केले नाही केवळ त्‍यांनी पत्र पाठविल्‍याचा पुरावा दाखल केला आहे. फ्रिजच्‍या पाहणीसाठी प्रत्‍येक वेळेस टेक्निशिअन येऊन गेल्‍याचे म्‍हणतात. त्‍यांनी त्‍यावेळेस फ्रिजची पाहणी केल्‍याबद्दलचे पत्र तक्रारदारास दिलेले असेलच परंतु तेही पत्र तक्रारदारानी मंचात दाखल केले नाही. यावरुन गैरअर्जदारानी त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी ठेवली नाही असे दिसून येते. फ्रिज सदोष असल्‍यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास झाला व त्‍यापोटी तक्रारदार रु 5000/- ची मागणी करतात. परंतु त्‍यांचाही पुरावा तक्रारदारानी दिलेला नाही. गैरअर्जदाराने तक्रारदारास फ्रिज बदलून दिला आहे म्‍हणून मंच या सर्व बाबींचा विचार करुन गैरअर्जदाराने कुठलीही सेवेत त्रुटी ठेवली नाही किंवा सदोष माल दिला याबद्दल दोषी ठरवित नाही कारण गैरअर्जदाराने वेळेवर सेवा दिलेली आहे तसेच फ्रिज सुध्‍दा बदलून दिलेला आहे. म्‍हणून मंच सदरील प्रकरण निकाली काढीत आहे. खर्चाबद्दल कुठलाही आदेश नाही.
 
                                आदेश
  1. तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्‍यात येत आहे.
  2. खर्चाबद्दल आदेश नाही. 
 
 
 
(श्रीमती रेखा कापडिया)                          (श्रीमती अंजली देशमुख)
     सदस्‍य                                                          अध्‍यक्ष

[ Rekha Kapadiya] Member[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT