ग्राहक तक्रार क्रमांकः-209/2009 तक्रार दाखल दिनांकः-18/06/2009 निकाल तारीखः-17/04/2010 कालावधीः-0वर्ष10महिने03दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.राजेंद्र एस.सोमय्या रा-9/सी/504,नीलम नगर, फेझ 2,मुलूंड (पू),मुंबई.400 081 ...तक्रारकर्ता विरुध्द 1)दी डायरेक्टर, हुंडाई मोटर्स इंडिया लिमिटेड(एचएमआयएल), ए-30,मोहन को.ऑप.इंडस्ट्रियल इस्टेट, मथूरा रोड, न्यु दिल्ली,(इंडिया) ...वि.प.नं.1(एकतर्फा) 2)दी मॅनेजर, मेसर्स.मोदी मोटर्स एजन्सीज प्रा.लि., मोदी हाऊस,एल.आय.सी.बिल्डींग समोर, नौपाडा, off इस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे.400 602 ... वि.प.नं.2(एकतर्फा) उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः- श्री.ए.ए.बर्वे विरुध्दपक्षः-गैरहजर(एकतर्फा) गणपूर्तीः- 1.सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या 2.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -एकतर्फा निकालपत्र - (पारित दिनांक-20/04/2010) सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या यांचेद्वारे आदेशः- 1)सदरहू तक्रार श्री.राजेंद्र सोमय्या यांनी डायरेक्टर हुंडाई मोटर्स इंडिया लि., एचएमआयएल व इतर यांचेविरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्दपक्षकार यांचेकडे कबूल केलेली बोनसची रक्कम रुपये 10,000/- मागितली आहे. 2)विरुध्दपक्षकार नं.1 हे अलॉय व टूल्सचा धंदा कंपनीच्या कायद्यानुसार 2/- करतात. विरुध्दपक्षकार नं.2 हे वितरक आहेत. विरुध्दपक्षकार नं.1 यांचे ऑफिस मुंबईत व शोरुम ठाणे येथे आहे. तिथे विरुध्दपक्षकार नं.1 यांनी गाडयाची एक्सचेंज ऑफर अशी स्कीम काढली होती. त्यामध्ये गाडी एक्सचेंज केल्यावर रुपये10,000/- अधिक बोनसची रक्कम खरेदीदारास मिळेल अशीही जाहीरात केली होती. विरुध्दपक्षकार यांनी काढलेल्या स्कीम व त्यातील नियम,अटी यांना ते नक्कीच बांधील आहेत. 3)तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार नं.2 वितरक यांचेकडे दिनांक22/10/2007 रोजी रुपये 2,050/- रक्कम भरुन नवीन गाडी हुंडाई सँट्रो जीएलएस गाडीचे बुकींग केले व एक्सचेंज ऑफर बदल्यात त्यांची जुनी मारुती एस्टीम गाडी नं.एमएच.01-टी.8543 दिनांक24/10/2007 रोजी जरुरी कागदपत्रासह दिली व त्याची केलेली किंमत रुपये 50,000/- नवीन गाडीच्या किंमतीमध्ये समायोजीत करण्याबद्दलची माहीती विरुध्दपक्षकार यांच्याकडून मिळाली. उरलेली सर्व किंमत तक्रारदार यांनी आयसीआयसीआय बँकेच्या कार लोन स्कीमव्दारे दिनांक02/11/2007 रोजी फेडून नवीन विकत घेतलेल्या सँट्रो जीएलएस गाडीचा ताबा दिनांक06/11/2007 रोजी तक्रारदार यांनी घेतला. परंतु विरुध्दपक्षकार यांनी त्यांच्या स्कीमव्दारे जाहीर केलेली रुपये 10,000/- बोनसची रक्कम मात्र तक्रारदार यांना मिळाली नाही. म्हणून वेळोवेळी नोटीस,फोन व पत्राव्दारे त्याबद्दल विरुध्दपक्षकार यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, विरुध्दपक्षकार नं.1 यांच्याकडून जानेवारी 2009 मध्ये उत्तर मिळाले की, तक्रारदार यांचा बोनसचा क्लेम नाकारण्यात आला आहे. कारण विरुध्दपक्षकार नं.2 यांनी दिल्ली कार्यालयात सदर व्यवहाराचे आवश्यक कागदपत्रे वेळेवर पाठविली नाहीत. या परिस्थितीत विरुध्दपक्षकार नं.1व 2 यांच्या सेवेत त्रुटी व निष्काळजीपणा आढळतो. म्हणून सदर तक्रार दाखल केली आहे. 4)मंचाच्या मते विरुध्दपक्षकारातर्फे ऑक्टोबर2007 मध्ये एक्सचेंज कार स्कीम जाहीर झाली होती,पुरावा मंचासमोर दाखल आहे. व त्यामध्ये रुपये 10,000/- बोनस रक्कम खरेदीदारास मिळेल असे जाहीर झाले होते. त्यामुळे विरुध्दपक्षकार यांनी काढलेल्या स्कीममधील व सर्व नियमांना विरुध्दपक्षकार स्वतः जबाबदार आहेत. त्यामुळे सदर व्यवहारात रु.10,000/- बोनस रक्कम तक्रारदार यांस मिळण्यास हरकत दिसत नाही. 5)मंचाने विरुध्दपक्षकार नं.1व 2 यांना नोटीस बजावणी करुनही ते मंचासमोर हजर राहीले नाहीत व त्यांनी त्यांची लेखी कैफियत दाखल केली नाही. म्हणून मंचाने दिनांक15/09/2009 रोजी नो डब्लू एस आदेश करुन 3/- एकतर्फा चौकशी केली व हे मंच पुढील अंतिम आदेश देत आहे. -आदेश - 1)तक्रार क्रमांक 209/2009 ही अंशतः मंजूर करण्यात येत असून या तक्रारीचा खर्च रुपये 500/-(रुपये पाचशे फक्त)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांस द्यावा. 2)विरुध्दपक्षकार नं.1व 2 यांनी स्वतंत्रपणे किवा संयुक्तीकरित्या त्यांच्या एक्सचेंज कार स्कीमखाली तक्रारदार यांनी विकत घेतलेल्या गाडीसंबंधी जाहीर केलेली जादा बोनस रक्कम रुपये.10,000/-(रुपये दहा हजार फक्त) तक्रारदार यांस द्यावी. या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासून दोन महिन्याच्या आत करावे. अन्यथा तदनंतर वरील रकमेवर सात टक्के व्याज द्यावे लागेल. 3)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांस मानसिक त्रासाचे व नुकसान भरपाईपोटी रुपये500/-(रुपये पाचशे फक्त)द्यावेत. 4)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. दिनांकः-20/04/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) सदस्य सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|