::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा सदस्या, किर्ती वैद्य (गाडगिळ.)
1. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२.. अर्जदार हा चंद्रपूर येथील रहिवासी असून गैरअर्जदार क्र. १ ही मेसर्स मटरीक्स इन्फ्रा केअर इंडिया प्रा. ली. या नावाने चंद्रपूर जिल्ह्यात प्लॉट व त्यावर घर बांधून देण्याचा व्यवसाय करतात. गैरअर्जदार ह्यांनी मोजा दाताला खसरा क्र. १६८, आरजी ०.७४ आणि खसरा क्र. १६९ अर्जी ०.१९ आरजी ओ.९३ जागेचे प्लॉट पडून त्यावर घर/flat बांधाण्याची योजना मार्च एप्रिल २०१२ मध्ये सुरु केली. अर्जदाराने त्यावर विश्वास ठेऊन बंगला क्रमाक-१ हा बुक केला व गैरअर्जदाराला दि ०५.०६.२०१२ रोजी रु. ४,७०,०००/-गैरअर्जदार क्र. २ ने लेखी करार रु. १००/- स्टंप पेपरवर दि.०५.०६.२०१२ रोजी करुन करारापासून २ वर्षाच्या आत flat बांधून व विक्री करुन देतो असे सांगितले. परंतु त्यानंतर गैरअर्जदाराकडून काहीही प्रतिसाद दिसला नाही. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराला दिलेली अग्रिम रक्कम रु. ४,७०,०००/-/- परत देण्याची मागणी नोटीस द्वारे केली. परंतु गैरअर्जदाराने त्यावर काहीही उत्तर दिले नाही. सबब, अर्जदाराने सदर तक्रार मंचासमोर दाखल केली आहे.
३ . अर्जदाराने तक्रारीत मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्र. १ ते ७ ह्यांनी अर्जदारासोबत अनुचित पद्धतीचा व्यवहार केला आहे असे घोषित करावे तसेच १ ते ७ ह्यांनी स्वतंत्र व संयुक्तपणे अर्जदाराकडून घेतलेली रक्कम रु. ४,७०,०००/-/-अर्जदाराला द्यावी. तसेच त्यावर दि. १४.०३.२०१२पासून १२ टक्के व्याज दराने व्याजासह अर्जदाराला द्यावे. शारीरिक मानसिक त्रासापोटी रु २५,०००/-व तक्रारीचा खर्च रु. १०,०००/- देण्यात यावे.
४ . वि.प.क्र. १ व २ यांनी रोजी लेखी म्हणणे दाखल करुन प्राथमिक आक्षेप घेतला कि, अर्जदाराने शेतमालक यांना पक्ष केलेले नाही. जमीन मालक श्रीमती शोभा शालिग्राम सदाफळे व शिरीष सदाफळे हे वरील स्कीम मधील २५ टक्के भागीदार असून त्यांच्या स्वमालकीच्या जमिनीवर बहुमजली इमारत उभारून ग्राहकांना विकण्याकरिता गैरअर्जदार क्र. २ यांना अधिकृत अधिकार व परवानगी दिली होती. त्याप्रकारचा मौखिक करारनामा दि ०८.०१.२०११ ला झाला होता त्या करारानुसार जमिनीची किमत रु. १,७८,००,०००/- ठरविण्यात आली होती व जमीन मालक यांना २५ टक्के नफ्यातील भागीदारी देण्याचे ठरले. परतू त्यानंतर जमीन मालक ह्यांनी संपूर्ण प्रोजेक्ट स्वतः करण्याची इच्छा जाहीर केल्यामुळे डेव्हलपर्स, गैरअर्जदार क्र. २ आणि जमीन मालक याच्यात संपूर्ण ग्राहकांच्या साक्षीने सिटी पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे तडजोड होऊन जमीन मालक ह्यांना संपूर्ण प्रोजेक्ट देण्याचे अटी व शर्तीनुसार ठरले. जमीन मालकाने कराराप्रमाणे सुखसुविधा व अतिरिक्त रक्कम न घेता प्रोजेक्ट पूर्ण करणे, जे ग्राहक flat वा दुकान घेण्यास समर्थ नसतील त्यांना रक्कम परत करणे, ह्या अटी व शर्ती होत्या त्या प्रमाणे जमीन मालक्काने रक्कम परत न केल्यामुळे ग्राहकांनी मंचात तक्रारी दाखल केल्या. गैरअर्जदार ह्यांनी मोखिक करारनुसार रु. ५५,००,०००/- किमतीच्या मोबदल्यात ग्राहकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन व्यक्तिना ८० लाख रु. किमतीचे मोबदल्यात येथील जमीन नोंदणीकृत विक्रीपत्रान्वये सुपूर्द केली आहे. अर्जदार यांनी सौ शोभा शालीकराम सदफले जमीन मालक २०१४ रोजी संदर्भीय flat करता केलेल्या खरेदीचा करार हा ग्राहक संघटना जमीन मालक व डेवलपर्स यांच्यात झालेल्या कराराची पुर्तता म्हणूनच करून दिलेला करारनामा हा अर्जदार व जमीन मालक यांच्यातील नवीन करार हे सिद्ध करण्यास पुरेसा आहे की ग्राहक संघटना जमीन मालक व डेवलपर्स यांच्यात तडजोड झाली होती गैरअर्जदार 1 ने आपल्या मार्केटिंग प्रमोशन करता मिळालेल्या ५० लाखापैकी १५ लाख रुपये जमीन मालकाला अतिरिक्त दिली जेणेकरून ग्राहकांना आधीच्या ठरलेल्या दरात बंगलो प्लाट मिळावेत यासाठी गैरअर्जदार क्रमांक २ ने आर्थिक भुर्दंड सहन केला सबब अर्जदाराला गैरअर्जदार मुळे शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागला हे म्हणणे अनुचित व न्यायसंगत असल्यामुळे अर्ज नामंजूर करण्यात यावा
५.. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, तक्रारदारांचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद तसेच तसेच तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकालकामी खालील मुद्दे तयार करण्यांत येतात.
मुद्दे निष्कर्ष
(१ ) प्रस्तुत तक्रार मंचाच्या आर्थिक अधिकारात येत आहे काय नाही
(३ ) आदेश ? आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
६ . अर्जदाराने गैरअर्जदाराकडे मौजा दाताळा तालुका व जिल्हा चंद्रपूर येथील खसरा क्रमांक १६८,१६९ मधील प्रस्तावित सदनिकेतील बंगला क्र.१हा रुपये २३,५०,०००/ किमतीत बुक केला हि बाब अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेल्या नि. क्रमाक ४ वरील दस्त क्रमाक.८ वरील अर्जदार व गैरअर्जदार याच्यात झालेल्या करार दि. ०५.०६.२०१२ वरून दिसून येत आहे. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम ११(१) अन्वये कोणत्याही वस्तूचे व सेवेचे मूल्य २०,००,०००/-पर्यंत असल्यास जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करता येते. परंतु प्रस्तुत तक्रारीत अर्जदाराने दाखल केलेल्या दस्त करार्नाम्यावरून बंगल्याची किमत २०,००,०००/- पेक्षा जास्त असल्यमुळे सदर तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार नसल्यामुळे सदर तक्रार योग्य मंचात दाखल करण्याची परवानगी देऊन तक्रार खारीज करण्यात येते.
मुद्दा क्रं. 5 बाबत ः-
७. मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रार क्र. २७/२०१५ योग्य मंचात तक्रार दाखल करण्याच्या परवानगीसह अमान्य करण्यात येते.
.(२) तक्रारीची मुळ प्रत सोडून बाकी प्रती अर्जदारास परत करावे
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
अधि. कल्पना जांगडे (कुटे) अधि. किर्ती वैदय (गाडगिळ) श्री. उमेश वि. जावळीकर
मा.सदस्या मा.सदस्या मा. अध्यक्ष