::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये मा. अध्यक्ष श्री उमेश वि. जावळीकर,)
(पारीत दिनांक :-28.02.2018 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
१. अर्जदार हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे.. गैरअर्जदार मे. मॅट्रिक्स इन्फ्राकेअर (इं) प्रा.लि., मे. मॅट्रिक्स कंस्ट्रक्शन कं. तसेच मे.मॅट्रिक्स इन्फ्रास्टेट प्रा.लि. या कंपनीद्वारा सदनिका व बंगले बांधून विकण्याचा व्यवसाय करतात. गैरअर्जदाराने मौजा दाताळा, तालुका व जि.चंद्रपूर येथील खसरा क्र.168 आणि 169 आराजी 0.19 हे.आर. पैकी काही जागा रहिवासी प्रयोजनाकरीता विकसीत करून त्यावर सदनिका आणि बंगले बांधून विकणार आहेत आणि त्यासाठी आगावू बुकिंग सुरू आहे अशा जाहिराती केल्या.. त्यामुळे आकर्षीत होऊन अर्जदाराने गैरअर्जदाराचा खसरा क्र.169 मधील प्रस्तावीत सदनिकेतील पहिल्या माळयावर सदनिका क्र.टी-२ -१०२ रू.१३,७१,७५०/- या किमतीत बुक केला. त्यानुसार अर्जदाराने गैरअर्जदाराला चंद्रपूर येथे किमतीपोटी रू.२,७०,०००/- (रूपये तिन लक्ष आठ हजार फक्त) खालीलप्रमाणे दिले असून त्यानुसार पावत्या गैरअर्जदारांने अर्जदारांस दिल्या.
रू.५०,०००/- /- २४.१२.२०१२
रू.२५,००० /- -‘- २३.०१.२०१३
रू.५०,०००/- /- -‘- ०१.०२.२०१३
रु७०,०००/- ०१.०२.२०१३
रु.२५,०००/- २०.०२.२०१३
रु.५०,०००/- १८.०३.२०१३
एकूण रु २,७०,०००/-
उपरोक्त सदनिका गैरअर्जदाराने अर्जदाराला विकण्याचा लेखी करार दि.०४.०४.२०१३ रोजी केला. उर्वरीत विक्री किंमत करारनाम्यानुसार बांधकामाच्या प्रगतीनुसार देण्याचे ठरले व दोन वर्षाच्याआत बांधकाम पूर्ण करून ताबा देण्याचे ठरले.परंतु दोन वर्षे उलटून गेली तरीही मोक्यावर कोणतेच बांधकाम गैरअर्जदाराने केले नाही तरी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे गुंतविलेली रक्कम परत मागीतली .परंतु गैरअर्जदारांनी तसे काहीही केले नाही किंवा बांधकाम करण्याचा गैरअर्जदाराचा कोणताही हेतू नव्हता. सबब अर्जदाराने वकीलामार्फत दि.०८.०५.२०१५ रोजी रक्कम व्याजासह परत करण्याबाबत गैरअर्जदाराला नोटीस पाठविली.. पात्र आहे. आहे. र्अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराकडून अर्जदाराला मुळ रक्कम रू.२,७०,०००/- व त्यावर व्याज. मिळावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रू/-२५,०००/- आणि तक्रारीचा खर्च रू.१०,००० /- गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
अर्जदाराने सदर प्रकरणात नि.क्र.४ वर १२ दस्तावेज दाखल केलेले आहेत.
२. .अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. परंतु नोटीसची बजावणी होऊनही गैरअर्जदार २ ते ७प्रकरणात हजार न झाल्यामुळे गैरअर्जदार क्र. २ ते ७ विरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत दि.२४.०७.२०१७ रोजी पारीत केला.
अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
(2) गैरअर्जदार क्र.१ ते ७ ने अर्जदाराप्रती न्युनतापूर्ण सेवा व
अनुचित व्यापार पध्दती अवलंबिली आहे काय ?
होय
(3) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? अंतीम
आदेशानुसार
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
३. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दि.15/3/2012 रोजी मौजा दाताळा, तालुका व जि.चंद्रपूर येथील खसरा क्र.१६९ मधील प्रस्तावीत सदनिकेतील पहिल्या माळयावर सदनिका क्र.टी-२ -१०२ रू.१३,७१,७५०/- या किमतीत बुक केली. त्यानुसार अर्जदाराने गैरअर्जदाराला रोजी नगदी र २,७०,०००/-दिनांक व त्यानुसार पावत्या अर्जदारांने प्रकरणात नि.क्र४ वर दाखल आहेत व त्यावर गैरअर्जदाराची सही आहे. तसेच नि.क्र.5 वरील दस्त क्र.4 वर सदर सदनिका क्र.101 बाबत गैरअर्जदाराने अर्जदाराला दि.०४.०४.२०१३ रोजी करून दिलेला करारनामा दाखल आहे व यावरही अर्जदार व गैरअर्जदार हयांची सही आहे. हयावरून असे सिध्द होत आहे की, अर्जदार व गैरअर्जदार हयांच्यातउपरोक्त सदनिकेबद्दल करार झाला व त्याप्रमाणे रक्कम ही द्यायला अर्जदाराने सुरूवात केलेली होती. आणि ती रक्कम गैरअर्जदाराने स्विकारलेली आहे हे सिध्द झाल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. म्हणून मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
४. अर्जदाराने गैरअर्जदाराकडील मौजा दाताळा, तालुका व जि.चंद्रपूर येथील खसरा क्र.169 मधील प्रस्तावीत सदनिकेतील पहिल्या माळयावर सदनिका क्र.टी-२ -१०२ रू.१३,७१,७५०/- या किमतीत बुक केली. त्यानुसार अर्जदाराने गैरअर्जदाराला सदनिकेच्या विक्रीच्या किमतीपोटी एकूण रू.२,७०,०००/- अर्जदाराने गैरअर्जदारांस दिले. सदर सदनिका क्र.१०२ बाबत गैरअर्जदाराने अर्जदाराशी लेखी करार दि.४.४.२०१३ रोजी केला. सदर करारनामा नि.क्र४ वरील वर दाखल आहे. या करारनाम्यातसुध्दा अर्जदाराने गैरअर्जदाराला रू.२,७०,०००/- /- दिल्याचे नमूद आहे. तसेच त्या करारनाम्यात अर्जदार गैरअर्जदाराला पुढील रक्कम बांधकामाचे प्रगतीप्रमाणे देणार व सदर सदनिकेचा ताबा गैरअर्जदार करारापासून दोन वर्षांचे आत देणार असे नमूद केलेले असून करारावर गैरअर्जदाराची स्वाक्षरी आहे. असे असूनसुध्दा गैरअर्जदाराने दोन वर्षे उलटूनसुध्दा नमूद जागेवर काम सुरू केले नाही किंवा त्याबद्दल काहीही सुचना अर्जदाराला दिली नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराला नोटीस पाठवूनही गैरअर्जदाराने त्याची दखल घेतली नाही. यावरून गैरअर्जदाराने अर्जदाराला दिलेली न्युनतापूर्ण सेवा सिध्द होत आहे तसेच अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केल्यानंतर गैरअर्जदाराला नोटीस तामील होऊनसुध्दा गैरअर्जदाराने मंचासमक्ष उपस्थीत राहून अर्जदाराचे तक्रारीतील कथन खोडून काढलेले नाही. म्हणून अर्जदाराला गैरअर्जदाराने सेवेत न्यूनता तसेच अर्जदाराप्रति अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंब केलेला आहे हे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. २ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
५. मुद्दा क्रं. 3 बाबत ः- मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार क्र.१ ते ७ ह्यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या हयांनी अर्जदाराला प्रस्तावित सदनिका बांधण्याकरिता घेतलेली रक्कम रू.२,७०,०००/- व त्यावर तक्रार दाखल झाल्याचे दिनांकापासून अदा करेपर्यंत द.सा.द.शे.९% व्याजासह अदा करावी.
(3) अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी व तक्रारीचा खर्च रू.3०,०००/- गैरअर्जदार २ ते ७ ह्यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत अर्जदाराला दयावे.
(4) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती वैद्य(गाडगीळ) श्री.उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)