Maharashtra

Additional DCF, Nagpur

EA/13/48

Sau.Asha Madhukar Barve - Complainant(s)

Versus

M/S Matrix Florentiya through Suchitkumar Divan Ramteke - Opp.Party(s)

Surendra R. Chichbankar

11 Nov 2021

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Execution Application No. EA/13/48
( Date of Filing : 29 Aug 2013 )
In
Complaint Case No. CC/12/141
 
1. Sau.Asha Madhukar Barve
R/O Type 4/5 F 01 B.S.N.L. Staff Quarter ,Malviya Nagar Indraprasth Mangal Karyalya,Pande Lay-Out Khamla,Nagpur - 025
Nagpur
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. M/S Matrix Florentiya through Suchitkumar Divan Ramteke
R/O 1 st Floor Asha Tower near Kali Mandir Rahate Colony Road,Dhantoli,Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE MEMBER
 
PRESENT:Surendra R. Chichbankar, Advocate for the Appellant 1
 
Dated : 11 Nov 2021
Final Order / Judgement

आयोगाच्या दि.30.03.2013 रोजीच्या आदेशानुसार गैरअर्जदारांस (आरोपी) 30 दिवसाच्या मुदतीत आदेशाचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश होते आयोगाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत गैरअर्जदारांने केलेला 104  महिन्यांचा विलंब लक्षात घेता गैरअर्जदारांस त्याच्या लहरीनुसार व सोयीनुसार (whims & fancies) आदेशाची पूर्तता करण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ शकत नाही कारण तसे झाल्यास आयोगाने दिलेल्या आदेशाचे व आदेशातील निर्देशित मुदतीचे महत्व / गांभीर्य संपेल व समाजात चुकीचा संदेश जाऊन ग्राहकाचे हक्क नाकारून आदेशाचे पुन्हा उल्लंघन अथवा मर्जीनुसार विलंबासह आदेशाची पूर्तता करण्याची आरोपीची वृत्ती वाढण्याची शक्यता आहे.

गैरअर्जदाराने अत्यंत उर्मटपणे कोणत्याही वैध कारणाशिवाय जवळपास 104 महीने न्यायिक आदेशाची अवमानना केल्याचे व  दरखास्त दाखल झाल्यानंतर न्यायिक प्रक्रियेची पुर्णपणे चेष्टा (Mockery) केल्याचे स्पष्ट होते. आयोगाच्या मते न्यायिक आदेशाची अवमानना करण्याची हिम्मत (daring) / वृत्ती (attitude) बंद होण्यासाठी कठोर कारवाई करणे आवश्यक ठरते.

उभय पक्षात समझौता झाला असला तरी प्रस्तुत दरखास्त प्रकरणी गैरअर्जदाराने आयोगाचा आणि पर्यायाने इतर गरजू ग्राहकांचा बहुमूल्य वेळ विनाकारण वाया घालविल्याचे स्पष्ट होते. सबब, गैरअर्जदाराने दरखास्‍त प्रकरणी खर्चापोटी (costs) रु.10,000/- ग्राहक कल्याण निधीमध्ये जमा करणे बाबतचा आदेश करणे आवश्यक असल्याचे आयोगाचे मत आहे.

सबब, गैरअर्जदाराने (आरोपी) रु.10,000/- आयोगाच्या ‘ग्राहक कल्याण निधीमध्ये’ ताबडतोब जमा करावी.

  • आ दे श -
  1. अर्जदाराचा सदरहु अर्जात समझौता झाला असल्‍याने अर्ज  मागे घेण्‍याच्‍या कारणाने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येतो आणि गैरअर्जदाराला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी दरखास्‍त प्रकरणी खर्चापोटी (costs) रु.10,000/- ही रक्‍कम आयोगाच्या ‘ग्राहक कल्याण निधीमध्ये’ ताबडतोब जमा करावी.
  2. आरोपीला ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 27 च्‍या गुन्‍हयातून दोषमुक्‍त करण्‍यात येते
  3. आरोपीने दिलेले बेल बॉण्‍ड्स रद्द करण्‍यात येतात.     
  4. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा .
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. अंमलबाजवणी अर्जाची  व  प्रत अर्जदारास परत करण्‍यात यावी.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

  

 

 

 

 

 
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.