(मंचाचा निर्णय : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //-
(पारित दिनांक – 21/11/2013) 1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे... 1. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष बिल्डरकडून मौजाः वानाडोंगरी येथील स.क्र.178 व 179 आराजी 127 हे.आर. प.ह.नं. 46, त. हिंगणा (ग्रामीण) जिल्हा नागपूर येथील ‘मॅट्रीक रॉयल रेसिडेन्सी’, मधे दुस-या माळयावरील गाळा क्र. R-2-B-206 क्षेत्रफळ 756 चौ.फूट 13,57,000/- मधे विकत घेण्याचा करार केला व त्यापोटी दि.29.03.2011 पासुन दि.30.07.2011 प र्यंत वेळोवेळी रु.3,27,000/- विरुध्द पक्षाकडे जमा केले. विरुध्द पक्षाने दि.05.05.2011 रोजी त्याबाबत करारनामा लिहून दिला.
2. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे गैरकृषी परवानगी, प्रस्तावित फ्लॅटस्किमचा मंजूर नकाशा, नागपूर सुधार प्रन्यासची मंजूरी, बिल्डींग परमीट इ. आवश्यक कागदपत्रांची तपासणीसाठी केली असता सदर कागदपत्रे दाखविण्यांस टाळाटाळ केली. दि.24.02.2012 रोजी तक्रारकर्त्याने पुन्हा कागदपत्रांची मागणी केली तेव्हा विरुध्द पक्षाने वरील कागदपत्रांची पुर्तता करताच फ्लॅट विक्रीची रक्कम स्विकारुन तक्रारकर्त्याची फसवणूक केल्याची जाणीव झाली. तसेच तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्षास बुकींगपोटी घेतलेली रक्कम परत मागितली असता विरुध्द पक्षाने डिड ऑफ कॅन्सलेशन वर तक्रारकर्त्याची सही घेऊन त्यास एकूण रु.3,27,452/- चे 3 धनादेश दिले. त्यापैकी धनादेश क्र.499101 दि.15.03.2012 रोजी वसुलीसाठी बँकेत दिला असता निधी अभावी तो पटला नाही. त्याबाबत विरुध्द पक्षास माहिती दिल्यावर तिनही धनादेश परत घेऊन त्याऐवजी इंउसइंड बँकेचे रु.3,02,000/- दोन धनादेश व रु.25,000/- नगदी दिले. परंतु हे दोनही धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे न वटता परत आले. 3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास कराराप्रमाणे फ्लॅट बांधून विक्री करुन घ्यावयाचा होता परंतु ते करु न शकला नाही म्हणून करारापोटी घेतलेली फ्लॅटची रक्कम परत करावयास पाहीजे होती. मात्र विरुध्द पक्षाने कराराप्रमाणे फ्लॅटतर दिला नाहीच परंतु सदरी करार रद्द करुन परत करावयाची रक्कमही दिलेली नाही, ही फ्लॅट खरेदी करार करणा-या ग्राहकाप्रती सेवेतील न्यूनता आहे. म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे जमा केलेल्या रकमेपैकी परत न केलेली रक्कम रु.3,02,452/- द.सा.द.शे. 18% व्याजासह परत मिळावी. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाबाबत रु.30,000/-, तक्रार खर्चाबद्दल रु.25,000/- आणि अप्रामाणिक व्यवहार व सेवेतील त्रुटीबाबत रु.50,000/- नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केलेली आहे. 4. विरुध्द पक्षाला नोटीस मिळूनही गैरहजर राहील्याने प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्यांत आले. तक्रारकर्त्याने तक्रारीच्या पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या यादीसोबत एकूण 27 दस्तावेज दाखल केले आहेत. 5. सदर तक्रार मंचासमक्ष युक्तीवादाकरीता आल्यानंतर मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले यावरुन खालिल मुद्दे निर्णयासाठी घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व कारणमिमांसा पुढील प्रमाणे... मुद्दे निष्कर्ष 1) तक्रारकर्ता ग्राहक हक्क संरक्षण अधिनियमाचे तरतुदींप्रमाणे विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? आणि मंचास सदर तक्रार चालविण्याचा अधिकार आहे काय ? होय. 2) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास न्यूनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? होय.
3) तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे काय ? अंशतः पात्र आहे.
4) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे तक्रार खारीज. - // कारणमिमांसा // - 4. मुद्दा क्र. 1 व 2 बाबतः- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे फ्लॅट बुकींगच्या रकमा वेळोवेळी भरल्या त्याच्या पावत्या दस्तावेज यादीसोबत दस्त क्र. 11, 11-A, 12, 12-A, 13, 13-A प्रमाणे जोडल्या असुन सदर पावत्यांप्रमाणे खालिल रकमा दिल्या आहेत. अ.क्र. | पावती क्र. | दिनांक | धनादेश क्र. | रक्कम | 1. | 825 | 13.04.2011 | 012418,
012419 | 50,000/- 50,000/- | 2. | 757 | 29.03.2011 | नगदी | 11,000/- | 3. | 855 | 04.05.2011 | 012417 | 31,452/- | 4. | 854 | 04.05.2011 | सेल्फ धनादश | 1,35,000/- | 5. | 1117 | 30.07.2011 | नगदी | 40,000/- | 6. | 1117 | 30.07.2011 | 012421 | 10,000/- | | | | एकूण रु. | 3,27,452/- |
5. विरुध्द पक्षाने दि.05.05.2011 रोजी तक्रारकर्त्यास लिहून दिलेला फ्लॅट क्र. R-2-B-206 क्षेत्रफळ 756 चौ.फूटचा करारनामा देखिल यादीसोबत दस्त क्र.6 वर दाखल आहे. वरील फ्लॅट तयार न झाल्यामुळे विक्रीचा करारनामा रद्द करुन बुकींग रक्कम रु.3,27,000/- परत करण्यासाठी गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याकडून लिहून घेतलेला करारनामा यादी सोबत दस्त क्र. 8 वर दाखल असुन त्यात करार रद्द झाल्यामुळे तक्रारकर्त्याकडून फ्लॅट बुंकींगपोटी घेतलेली रक्कम रु.3,27,452/- परत करण्यासाठी गैरअर्जदाराने खालिल प्रमाणे धनादेश दिल्याचे नमुद केले आहे. अ.क्र. | रक्कम | धनादेश क्र. | दिनांक | बँक | 1. | 1,10,000/- | 499101 | 15.03.2012 | Induslnd Bank, Nagpur. | 2. | 1,07,452/- | 499102 | 15.04.2012 | Induslnd Bank, Nagpur. | 3. | 1,10,000/- | 499103 | 15.05.2012 | Induslnd Bank, Nagpur. |
वरील पैकी धनादेश क्र.499101 दिनांक 15.03.2012 खात्यात पैसे नसल्यामुळे वटला नाही हे दर्शविण्यासाठी तक्रारकर्त्याने यादीसोबत दस्त क्र.10 प्रमाणे Induslnd बँकेचा दि.17.03.2012 चा चेक रिटर्न मेमो दाखल केला आहे.
6. वरील तीनही धनादेश परत घेऊन त्याबदल्यात नगदी रु.25,000/- आणि धनादेश क्र.466423 दि.25.05.2012 आणि धनादेश क्र.466424 दि.28.05.2012 प्रत्येकी रु.1,51,226/- चे देण्यांत आले. त्याबाबत लिखीत स्वरुपातील दस्त आणि ते धनादेश तसेच वरील दोन्ही धनादेश अनादरीत झाल्याबाबत चेक रिटर्न मेमो तक्रारकर्त्याने दस्त क्र.11 ते 17 वर दाखल केले आहेत.
7. सदर धनादेश अनादरीत झाल्यावर तक्रारकर्त्याने धनादेशाची रक्कम द्यावी म्हणून विरुध्द पक्षास अधिवक्ता श्री. बागडदेव यांचेमार्फत दि.07.06.2012 आणि दि.27.06.2012 रोजी पाठविलेली नोटीस आणि नोटीस पाठविल्याबाबत रजिस्ट्रशन पावती, तसेच नोटीस गैरअर्जदारास वितरीत झाल्याबाबत Tracking Report दस्त क्र.19 ते 27 वर दाखल केले आहेत.
8. विरुध्द पक्षाने नोटीस मिळूनही मंचासमोर गैरहजर राहीला व संधी देऊनही तक्रारकर्त्याचे म्हणणे खोडून काढलेले नाही. वरील प्रमाणे तक्रारकर्त्याची शपथेवरील तक्रार व त्याचे पृठयर्थ दाखल दस्तावेजांवरुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून फ्लॅट बुंकींगपोटी रु.3,27,452/- घेतले, परंतु फ्लॅटचे बांधकाम केले नाही आणि सदर करार रद्द करुन त्यापोटी तक्रारकर्त्यास धनादेशाव्दारे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले, परंतु खात्यात रक्कम न ठेवता सदर धनादेश अनादरीत होऊ दिले व रक्कम परत केली नाही ही बाब निर्वीवाद सिध्द होते. गैरअर्जदाराची सदर कृती ही फ्लॅट बुक करण्या-या ग्राहकाप्रती सेवेतील न्यूनतापूर्ण व्यवहार आहे.
9. विरुध्द पक्षाने बुकींगची बाकी राहीलेली रक्कम रु.3,02,452/- परत करण्यासाठी जे दोन धनादेश दिले होते ते अनादरीत झाल्याने ज्या दिवशी विरुध्द पक्षाने प्रथमतः सदर रक्कम फेडीसाठी धनादेश दिले होते, त्या दिवशीपासून म्हणजे दि.15.03.2012 पासून तक्रारकर्त्यास द.सा.द.शे. 12 टक्के प्रमाणे व्याज मंजूर करणे न्यायोचित ठरेल. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.3,000/- मंजूर करणे न्याय्य होईल असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.1 व 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले असुन मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. - // आदेश //-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास बुकींगची परत करावयाची शिल्ल राहीलेली रक्कम रु.3,02,452/- दि.15.03.2013 पासुन पूर्ण रक्कम तक्रारकर्त्याचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.12% व्याजासह अदा करावी. 3) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासाबाबत रु.10,000/- आणि या तक्रारीच्या खर्चाबाबत रु.3,000/- द्यावे. 4) वरील आदेशाची पूर्तता आदेशाचे तारखेपासून 1 महिन्याचे आंत करावी. 5) उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी. 6) तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी. |