Maharashtra

Nagpur

CC/738/2019

MANGESH PANDURANG JAGTAP - Complainant(s)

Versus

M/S LUXORIFY - Opp.Party(s)

ADV CHAITANYA KULKARNI

11 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/738/2019
( Date of Filing : 31 Dec 2019 )
 
1. MANGESH PANDURANG JAGTAP
HOUSE NO 46, MAYUR NAGAR, NARI ROAD NAGPUR 440026
NAGPUR 440026
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S LUXORIFY
NEW DELHI 110030 SECOND ADDRESS H- 501, OPP CD COLONY PANCHAVATI CROSSROADS OFF. C G ROAD AHEMDABAD 380006
AHEMADABAD
GUJRATH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV CHAITANYA KULKARNI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 11 Mar 2022
Final Order / Judgement

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये –

  1. तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 नुसार  अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, वि.प. हे वेगवेगळया वस्‍तूंचा ऑनलाईन व्‍यापार करतात व त्‍यांचा पत्‍ता हा न्‍यू दिल्‍ली व अहमदाबाद येथील दिलेला आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाद्वारे Swiss मध्‍ये बनलेल्‍या imported 2  घडयाळी Rolex Day Date 40 SKU-4131 आणि Tagheuer Grand Carrera Calibre 17 Silver SKU-4317 हया एकूण किंमत रुपये 30,790/- मध्‍ये दि. 26.12.2017 ला खरेदी केल्‍या होत्‍या व ही रक्‍कम विरुध्‍द पक्षास ऑर्डर नं. 1573610040213 व इनव्‍हाईस नं. 3609 करिता नगदी स्‍वरुपात दिले. तक्रारकर्त्‍याला सदरच्‍या वस्‍तू दि. 01.01.2018 रोजी सील बंद पॅकेट मध्‍ये प्राप्‍त झाले असून त्‍याच्‍या कॅश मेमोची प्रत दि. 26.12.2017 रोजी प्राप्‍त झालेली होती. तक्रारकर्त्‍याने जेव्‍हा सदरच्‍या दोन्‍ही घडयाळी सीलबंद पॅकेट मधून बाहेर काढल्‍या तेव्‍हा सदरच्‍या दोन्‍ही घडयाळी हया ओरिजनल नसून डुप्‍लीकेट असल्‍याचे आढळून आले. तसेच सदरच्‍या घडयाळीचे मॉडेल वेगळे असून त्‍या खराब असून तक्रारकर्त्‍याने मागितलेल्‍या रंगापेक्षा वेगळा रंग होता व त्‍याचे वजन जास्‍त होते. अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या सोबत फसवणूक झाली असल्‍याचे निदर्शनास आले. याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे ई-मेल द्वारे तक्रार केली. परंतु तक्रारकर्त्‍याच्या तक्रारीची वि.प.ने कुठलीही दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही वि.प.ने त्‍यांची ही दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला असल्‍याचे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये 2,20,569/-, द.सा.द.शे.18 टक्‍के दराने परत मिळावे.
  2.      विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविण्‍यात आली असता वि.प. नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 13.08.2021 रोजी पारित करण्‍यात आला.
  3. तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात आले.

मुद्दे                                   उत्तरे

  1.  तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                            होय
  2.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?            होय
  3.  विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला काय ?     होय
  4.  काय आदेश ?                                             अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

4.      मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत - तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष द्वारे Swiss मध्‍ये बनलेल्‍या imported 2  घडयाळी Rolex Day Date 40 SKU-4131 आणि Tagheuer Grand Carrera Calibre 17 Silver SKU-4317 हया एकूण किंमत रुपये 30,790/- मध्‍ये दि. 26.12.2017 ला खरेदी केल्‍या होत्‍या व ही रक्‍कम विरुध्‍द पक्षास ऑर्डर नं. 1573610040213 व इनव्‍हाईस नं. 3609 करिता नगदी स्‍वरुपात दिले होते हे नि.क्रं. 2(1) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते.  तक्रारकर्त्‍याला सदरच्‍या वस्‍तू दि. 01.01.2018 रोजी सील बंद पॅकेट मध्‍ये प्राप्‍त झाले असून त्‍याच्‍या कॅश मेमोची प्रत दि. 26.12.2017 रोजी प्राप्‍त झालेली होती. तक्रारकर्त्‍याने जेव्‍हा सदरच्‍या दोन्‍ही घडयाळी सीलबंद पॅकेट मधून बाहेर काढल्‍या तेव्‍हा सदरच्‍या दोन्‍ही घडयाळी हया ओरिजनल नसून डुप्‍लीकेट असल्‍याचे आढळून आले. तसेच सदरच्‍या घडयाळीचे मॉडेल वेगळे असून त्‍या डॅमेज असून तक्रारकर्त्‍याने मागितलेल्‍या रंगा पेक्षा वेगळा रंग होता व त्‍याचे वजन जास्‍त होते. याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे ई-मेल द्वारे तक्रार केली असल्‍याचे नि.क्रं. 2(2) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्त्‍याने ऑनलाईन द्वारे मागणी केलेल्‍या वस्‍तूंची संपूर्ण रक्‍कम अदा करुन देखील त्‍याला त्‍याच्‍या मागणीप्रमाणे वस्‍तू मिळालेल्‍या नाहीत व याबाबत विरुध्‍द पक्षाकडे तक्रार करुन सुध्दा वि.प.ने त्‍याची दखल घेतलेली नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्याचे दिसुन येते. तसेच वि.प.ने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

                              अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या दोन्‍ही घडयाळयांची एकूण किंमत रुपये 30,790/- व त्‍यावर दि. 01.01.2018 पासून रक्कमेच्या  प्रत्‍यक्ष अदायगी पर्यत द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह येणारी रक्कम तक्रारदारास परत करावी.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.
  4. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.