(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून सोन्याची अंगठी खरेदी केली. ही अंगठी बनविण्यात दोष असून, बिलात नमूद केलेल्या कॅरेट नुसार नसल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांना अंगठी बदलून देण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांनी ती नाकारल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी दि.17.07.2009 रोजी गैरअर्जदार यांच्याकडून 6.70 ग्रॅम वजनाची 22 कॅरेटची अंगठी विकत घेतली. गैरअर्जदार यांनी अर्जदारास 791 क्रमांकाचे बिल दिले असून, या बिलावर अंगठीची किंमत (2) त.क्र.434/10 10,691.86 रुपये नमूद केली आहे. गैरअर्जदार यांनी सदरील अंगठीचे डिझाईन नाविन्यपूर्ण असल्याचे सांगितले. दि.15.04.2010 रोजी अर्जदार आपल्या कार्यालयात काम करीत असताना अंगठी आपोआप तुटून पडली. अर्जदाराने गैरअर्जदार यांना तुटलेली अंगठी दाखवून ती बदलून देण्याची विनंती केली. गैरअर्जदार यांनी अंगठी बदलून देण्यास नकार दिला. अर्जदाराने जेंव्हा सदरील अंगठी मोड म्हणून विकण्याची इच्छा प्रदर्शित केली, तेव्हा गैरअर्जदार यांनी 18 कॅरेटच्या भावात ती घेण्याची तयारी दर्शविली. गैरअर्जदार यांच्या या कृती विरुध्द अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी 22 कॅरेट ऐजवी 18 कॅरेटची अंगठी त्यांना दिली असून, ती बनविण्यात दोष असल्यामुळे अंगठी तुटली असे अर्जदाराचे म्हणणे आहे. 22 कॅरेटच्या भावाने गैरअर्जदार यांनी अंगठी परत घेण्याची व नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी अर्जदारास अंगठी विकल्याचे मान्य केले आहे. सदरील अंगठीमध्ये अर्जदाराने केलेल्या मागणी नुसार कृत्रिम खडे लावण्यात आले असून, अंगठीचे वजन व सोन्याची शुध्दता योग्य व अचूक असल्याचे म्हटले आहे. दि.15.04.2010 रोजी अंगठी आपोआप तुटून पडली हे अर्जदाराचे म्हणणे त्यांना मान्य नाही. अर्जदाराने निष्काळजीपणे अंगठी वापरल्यामुळे ती तुटली असल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. अर्जदाराने अंगठीची शुध्दता तपासून घेतल्याचा अहवाल मंचात दाखल केलेला नाही. अर्जदाराने अंगठी बदलून देण्याबाबत त्यांच्याकडे आग्रह केला होता, पण अंगठीची मोड करुन रक्कम परत देण्याबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारची मागणी केलेली नाही. बिलावर नमूद केलेल्या अटी व शर्ती प्रमाणे व असलेल्या दराप्रमाणे ते अंगठी विकत घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. खडयाची अंगठी डाग दिल्याशिवाय तयार होत नाही, म्हणूनच बिलावर 22/18 कॅरेट असे स्पष्टपणे नमूद केले आहे. अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून दि.17.07.2009 रोजी कृत्रिम खडे जडविलेली अंगठी खरेदी केली. अंगठीची एकूण किंमत 10,691.86 रुपये असून त्यात वॅट कराची रक्कम समाविष्ट आहे. सदरील बिलाची पाहणी केली असता, त्यावर नमूद केलेला बिल क्रमांक 591 व तारीख 17.07.2009 अशी आहे. सदरील अंगठी विकताना गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या बिलामध्ये नियम व अटी यातील क्रमांक 6 मध्ये, “दागिने नाजूक असतात जपून वापरणे आवश्यक आहे. त्याची (3) त.क्र.434/10 मोडतोड झाल्यास ते रिपेअरींग करुन मिळेल, बदलून मिळणार नाही” असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे अट नंबर 9 व 10 मध्ये, “मालाचे मोडते वेळी चालू भावाच्या फरकाने व सांगितलेल्या तुटी प्रमाणे रक्कम देण्यात येईल व मोडीसाठी अथवा बदल करण्यासाठी खडे, मोती, मीना, मजूरी व सर्व प्रकारच्या करांचे पैसे परत मिळणार नाही” असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी बिलाच्या पाठीमागे नमूद केलेल्या अटी व नियमावरुन दागिन्याची मोड करताना खडे, मोती, मजूरी, कर इत्यादी रक्कम वजा करुन व सोन्याचा त्या दिवसाचा असलेला भाव यावरुन मोडीची रक्कम ठरविण्यात येईल असे स्पष्ट होते. अर्जदाराने, गैरअर्जदार यांच्याकडून विकत घेतलेली अंगठी मोडसाठी दिली, तसेच गैरअर्जदार यांनी त्याची किती किंमत होईल याबाबत पुरावा म्हणून कोणतीही कागदपत्रे मंचात दाखल केलेली नाहीत. यावरुन गैरअर्जदार यांनी अंगठीच्या मोडी ची चुकीची किंवा कमी किंमत सांगितली हे अर्जदार यांचे म्हणणे मंच मान्य करीत नाही. गैरअर्जदार यांनी सदरील अंगठी दुरुस्त करुन देण्याची तयारी दर्शविली असून, अंगठीच्या मोड ची किंमत देखील ते अर्जदारास देण्यास तयार आहेत. यावरुन गैरअर्जदारातर्फे अर्जदारास देण्यात येणा-या सेवेत त्रुटी नसल्याचे दिसून येते. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |