तक्रार दाखल दिनांक – 14/05/2009 निकालपञ दिनांक – 20/03/2010 कालावधी - 0 वर्ष 09महिने 06 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर तक्रार क्रमांक – 255/2009 श्रीमती. शैला संजय कर्डीले राः- रु. नं.2975, बिल्डिंग नं. 61, पोलीस लाईन, वर्तक नगर, ठाणे - पश्चिम. तक्रार क्रमांक – 256/2009 श्री. अशोक शिवराम गायकवाड मुच्छाला पोलीटेक्नीक साईबाबा विहार कॅम्प्लेक्स घोडबंदर रोड, ठाणे(पश्चिम) 400 601. तक्रार क्रमांक – 388/2009 श्री. अमोल विजय यादव रा. सोपरा बिल्डींगनं..1 मुस्लीम मस्जीद च्या मागे, धोबी अली, टेंभी नाका, ठाणे(पश्चिम) 400 001. .. तक्रारदार विरूध्द 1. मे. कुलस्वामीनी डेव्हलपर्स 104, नवीन आनंद पार्क, रघुनाथ नगर, ठाणे- पश्चिम. 2. श्री. नरेश कालीया पाटील मे. कुलस्वामीनी डेव्हलपर्स 104, नवीन आनंद पार्क, रघुनाथ नगर, ठाणे - पश्चिम. 3. श्री. गणेश वाघ मे. कुलस्वामीनी डेव्हलपर्स रा. आनंद व्हीयु बिल्डींग, बाबुभाई पेटोल पंपच्या जवळ, खोपट, ठाणे- पश्चिम. .. विरुध्दपक्ष समक्ष - सौ. भावना पिसाळ - सदस्या श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकील पुनम माखिजानी वि.प तर्फे वकील हेमांगी भोईर
.. 2 .. एकत्रीत आदेश (पारित दिः 20/03/2010) मा. प्र. अध्यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार क्र. 255/2009ए 256/2009 व 388/2009 या अनुक्रमे श्रीमती. शैला कर्डीले, श्री.अशोक गायकवाड व श्री.अमोल यादव यांनी मे. कुलस्वामीनी डेव्हलपर्स व इतर यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्द पक्षकार यांचे कडुन करारनामा करुन खरेदी केलेल्या सदनिकेचा ताबा व करारनाम्यांतील कबुल केलेल्या अमेनीटीज तसेच इतर जबाबदा-या पुर्ण करुन देण्याची मागणी केलेली आहे. 2. विरुध्द पक्षकार हे पेशाने बिल्डर व डेव्हलपर्स व्यवसायातील असुन त्यांनी भागीदारीत सदर व्यवहार तक्रारकर्ता बरोबर केलेला आहे त्यांनी मौजे बोरीवडे गावात सर्व्हे नं. 35(p) सुमारे 4850 चौ.मीटरचा फ्लॉट डेव्हलप करण्यास घेतला होता व सदर प्रॉजेक्टचे नाव 'सिध्दीविनायक पार्क' असे ठेवले होते. विरुध्द पक्षकार नं. 2 व 3 हे विरुध्द पक्षकार नं. 1 चे भागीदार आहेत. 3. तक्रार क्र.255/2009 मधील तक्रारदाराने विरुध्द पक्षकार यांचेकडे 3 सदनिका विकत घेण्यासाठी एकंदर रु.4,25,000/- एवढी रक्कम दिली होती व त्यांची पोच पावती त्यांनी पावती क्र.01 दि.03/01/2005 रोजी क्र.02 दि.13/01/2005 व दि.14/03/2005 रोजी पावती क्र.03 तक्रारदारास दिली होती. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकाराकडे एकंदर सदनिका नं.202 ही 355 चौ.फुट रु.2,66,250/- रकमेला, सदनिका नं.203 ही सुध्दा 355 चौ.फुट रु.2,66,250/- इतक्या रकमेला, सदनिका नं.204 ही 300 चौ फुट रु.2,71,500/- एवढया एकंदर किंमतीला घेण्याचे ठरविले. म्हणजेच तिन्ही सदनिकांच्या देण्याचा एकुण रु. 8,04,000/- रकमेपैकी रु.4,25,000/- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांना दिलेले आहेत व सदर तिन्ही सदनिकांचा नोंदणीकृत करारनामा दि.14/10/2005 रोजी रजिस्ट्रेशन चार्चेस व स्टॅम्प डयुटी भरुन केला. त्यामध्ये बांधकाम सुरू झाल्यापासुन 12 महिन्यांच्या आत सदर सदनिकांचा ताबा देण्याचे ठरले. 4. तक्रार क्र.256/2009 मधील तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांचेकडे 'सिध्दीविनायक पार्क' या विंगमध्ये दुस-या मजल्यावरील सदनिका नं.B2/202 सुमारे 355चौ.फुटाची सदनिका दि.30/12/2006 रोजी नोंदणीकृत करारनामा करुन रु.2,48,500/-एवढया किंमतीला विकत घेण्याचे ठरविले व त्यासाठी सुरवातीला करारनाम्यातील पावतीप्रमाणे रु.55,625/- एवढी रक्कम देऊन तदनंतर एकंदर रु.1,15,000/- एवढी रक्कम देऊन त्याबद्दलच्या पावत्या विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास दिलेल्या आहेत. तसेच तक्रारकर्ता यांनी बँक ऑफ बरोडा कडुन रु.1,06,081/- रकमेचे लोन घेऊन परस्पर विरुध्द पक्षकार नं. 1 यांचेकडे पेऑडर दि.25/03/2006 द्वारे जमा झाले आहेत. म्हणजेच विरुध्द पक्षकार यांना तक्रारकर्ता यांचेकडुन रु.2,76,706/- एवढी रक्कम सदनिकेच्या किंमतीपोटी मिळाली आहे व करारनाम्यानुसार बांधकाम सुरू झाल्यापासुन 12 महिन्यात ताबा देण्याचे ठरलेले असुनही व पुर्ण रक्कम मिळुनही विरुध्द पक्षकार .. 3 .. हे तक्रारकर्ता यास वेळेवर सदनिकेचा ताबा देऊ शकलेले नाहीत असे तक्रारकर्ता यांचे म्हणणे आहे. 5. तक्रार क्र.388/2009 यामधील तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांचेकडे सिध्दीविनायक पार्क मध्ये पहील्या मजल्यावरील सदनिका नं. B2-102 क्ष्ेत्र सुमारे 355 चौ.फुटाची सदनिका रु.2,68,000/- एवढया किमती घेण्याचे ठरले व त्यासंबंधी दि.22/12/2005 रोजी नोंदणीकृत करारनामा होऊन रक्कम रु.80,250/- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांना दिले. त्याबाबत विरुध्द पक्षकार यांनी पावती क्र.14A 17A व 15A तत्सम रकमेबाबत एकंदर पोच दिलेली आहे. तसेच दि.24/12/2005 रोजी रु.20,000/- पावती क्र.16A व दि.28/02/2006 रोजी रु.10,000/- पावती क्र.21A दिले व तदबाबत विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांस पावत्या दिल्या. तक्रारकर्ता यांनी ठाणे भारत सहकारी बँक ठाणे यांचे कडुन रु.2,25,000/- रकमेचे लोन घेतले व बँकेने त्यापैकी रु.1,23,000/- रक्कम विरुध्द पक्षकार नु. 1 यांना दि.23/03/2006च्या पेऑर्डरने परस्पर दिली. त्याबद्दल दि.19/04/2006 रोजी बँकेतर्फे रु.1,23,750/-मिळाल्याबद्दल विरुध्द पक्षकार यांनी तत्सम पावती क्र.26A दिली होती. ती मंचासमोर दाखल आहे असे एकंदर रु.3,35,250/- एवढी रक्कम विरुध्द पक्षकार यांना मिळाल्याचे पुराव्यानुसार सिध्द होते. सदनिकेची संपुर्ण रक्कम विरुध्द पक्षकार नं. 1 यांना मिळुनही त्यांनी तक्रारकर्ता यांस सदर सदनिकेचा ताबा करारनाम्यानुसार बांधकाम सुरू झाल्यावर 1 वर्षाच्या आत किंवा अद्यापी दिलेला नाही यावरुन विरुध्द पक्षकार यांच्या सेवेत त्रृटी आढळतात. 6. वरील सर्व तक्रारकर्ता यांच्या म्हणण्यरानुसार विरुध्द पक्षकार यांचे सिध्दीविनायक पार्क ही तयार असुनही करारनाम्यातील ठरलेल्या अमीनीटीज त्यांनी अद्यापी दिलेल्या नाहीत, जसेच सोसायटी करुन दिलेली नाही, OC, CC व कन्व्हेयन्स करुन दिलेला नाही याबाबत तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकाराकडे मागणी केलेली आहे. तसेच निशाणी 5 वर कोणाचाही तिस-या पार्टीचा विरुध्द पक्षकार यांनी सदर मालमत्तेमध्ये हस्तक्षेप करु नये असा आदेश मागितला आहे. 7. विरुध्द पक्षकार यांनी त्यांची लेखी कैफीयत दि.15/07/2009 रोजी निशाण 11 वर सर्व तक्रारीमध्ये दाखल केली आहे यामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना सदर प्रॉपर्टी डेव्हलपर्स करण्यास ते. अनील अड सुंदर कं यांनी पॉवर ऑफ अटॉनी दिली होती व त्यांच्यामध्ये मालक श्री.लाड विरुध्द रेव्हेन्यु अधिका-यासमोर खटला सुरू आहे व ठाणे म्युनिसीपालीटीच्या हस्तक्षेपामुळे विरुध्द पक्षकार यांना फक्त 80% बांधकाम पुर्ण करता आले व पुढील राहिलेले बांधकाम करु शकले नाहीत म्हणुन 9% व्याजाने विरुध्द पक्षकार तक्रारदारानी भरलेली रक्कम परत करण्यास तयार आहेत. विरुध्द पक्षकार हे अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे असहाय्य आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. 8. उभयपक्षकारांची शपथपत्रे, पुरावा कागदपत्रे, लेखी कैफीयत व लेखी युक्तीवाद मंचाने पडताळुन पाहीले व पुढील एकमेव प्रश्न उपस्थित होते. .. 4 .. विरुध्द पक्षकार यांनी त्यांच्या सेवेत त्रृटी व निष्काळजीपणा दर्शविला आहे का? 9. वरील प्रशनाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा तक्रार क्र.255/2009 मधील तक्रारकर्ता यांनी करारनाम्यानुसार ज्या तिन्ही सदनिका विकत घेण्याचे ठरलेली किंमत रु.8,04,000/- रकमेपैकी तक्रारदार यांनी विरुध्द पक्षकार यांना रु.4,25,000/- रकमेची पोच केलेली आहे. तक्रारकर्ता यांनी बांधलेली इमारत सिध्दीविनायक पार्क तयार आहे. त्यामुळे विरुध्द पक्षकार यांनी कोणताही तिस-या व्यकीचा हस्तक्षेप न करता सदर सदनिकांची राहिलेली रक्कम रु.3,79,000/- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांना द्यावी व तदनुसार दुस-या मजल्यावरील सदनिका नं.202, 203, 204 करारनम्यानुसार विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना ताब्यात द्यावी. विरुध्द पक्षकार यांना तक्रारकर्ता यांनी दिलेली रक्कम मिळाली होती विरुध्द पक्षकार नं. 2 व 3 हे विरुध्द पक्षकार नं.1 यांचे भागीदार आहेत. त्यामुळे दोन्ही भागीदारही समसमान जबाबदार आहेत. 10. तक्रार क्र.256/2009 मधील तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांना B2/202 दुसरा मजला सिध्दि विनायक पार्क या सदनिकेची करारनाम्याप्रमाणे ठरलेल्या रु.2,48,500/- रकमेबद्दल रु.2,76,706/- एवढी रक्कम मिळाली आहे. त्यामुळे संपुर्ण रक्कम मिळुनही विरुध्द पक्षकार यांनी सदर सदनिकेचा ताबा दिला नाही. यामध्ये विरुध्द पक्षकार यांच्या सेवेत कमतरता आढळते. 11. तक्रार क्र. 388/2009 मधील तक्रारकर्तां यांनी विरुध्द पक्षकार यांना सदनिका नं.B2/102 पहिला मजला या सदनिकेच्या करारनाम्यातील ठरलेल्या किंमत रु.2,68,000/- रकमेपैकी एकंदर रु.3,35,250/- एवढी रक्कम मिळालेली आहे. इमारत तयार असुनही विरुध्द पक्षकार यांनी सदर सदनिकेचा ताबा अद्याप दिलेला नाही. विरुध्द पक्षकार यांनी कोणताही तिस-या पक्षाचा हस्तक्षेप न करता सदर सदनिकेचा ताबा तक्रारकर्ता यास दिला पाहिजे. 12. वरील सर्व तक्रारीमधील मागणीनुसार विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना नोंदणीकृत सोसायटी बनवुन देणे, OC, CC व कन्व्हेयन्स करुन देणे ही जबाबदारी पुर्ण करणे आवश्यक आहे. तसेच विरुध्द पक्षकार यांनी पाणी व वीजेची नियमित सोय करणे, भितींना प्लास्टरींग करणे, किचन बाथरुमला टाईल्स लावणे, ड्रेनेज सिस्टिम, करारनाम्यातील अमेनिटिजची पुर्तता विरुध्द पक्षकार यांनी करुन देण्याची कायदेशीर जबाबदारी पुर्ण करण्यास विरुध्द पक्षकार असमर्थ ठरले आहेत म्हणुन हे मंच पुढील अंतीम आदेश देत आहे. अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 255/2009, 256/2009 व 388/2009 अंशतः मंजुर करण्यात येत असुन विरुध्द पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) प्रत्येक तक्रारदार यांस द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा.
.. 5 .. 2. विरुध्द पक्षकार यांनी स्वतत्रपणे किंवा एकत्रीतरित्या खालील सर्व आदेशाची पुर्तता करावी. तसेच या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 3 महीन्याच्या आत सदर आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षकार यांनी करावी. a)तक्रार क्र.255/2009 मध्ये विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास दि.14/10/2005 रोजीच्या करारनाम्याप्रमाणे सर्व अटी व अमेनीटी पुर्ण करुन सिध्दीविनायक पार्क मधील दुस-या मजल्यावरील सदनिका नं.202, 203 व 204 यांचा ताबा द्यावा व त्याचवेळेस सदर तक्रारदारोन ठरलेल्या किंमतीपैकी देण्याची राहिललेली रक्कम रु.3,79,000/-(रु. तीन लाख एकोनएंशी हजार फक्त) विरुध्द पक्षकार यांना द्यावी अन्यथा तक्रारकर्ता यांची हरकत नसल्यास त्यांच्या संमतीने व परवानगीने सदर सदनिकांची फेडलेली रक्कम रु.4,25,000/- (रु.चार लाख पंचवीस हजार फक्त) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांस दि.01/11/2006 पासुन 15% व्याजाने परत करावेत. तोपर्यंत सदर सदनिकेबाबत तिसरा कोणताही व्यवहारांचा हस्तक्षेप करु नये. b) तक्रार क्र. 256/2009 मण्ध्से विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यास दि.30/12/2006 रोजीच्या करारनाम्यानुसार सर्व अटी अमेनीटीज पुर्ण करुन सिध्दीविनायक पार्क मधील सदनिका नं. B2/202 क्षेत्र 355 चौ.फुट ह्या सदनिकेचा ताबा द्यावा. यामध्ये विरुध्द पक्षकार यांना सदनिकेची ठरलेली पुर्ण रक्कम तक्रारकर्ता कडुन मिळालेली आहे. सदर सदनिकेत त्यामुळे कोणत्याही तिस-या पक्षाचा हस्तक्षेप किंवा व्यवहार विरुध्द पक्षकार यांना करता येणार नाही. c)तक्रार क्र. 388/2009 मध्ये विरुध्द पक्षकार यांनी दि.22/12/2005 रोजीच्या करारनाम्यानुसार सर्व अटी व अमेनीटिज पुर्ण करुन सिध्दीविनायक पार्क मधील सदनिका नं. B/2- 102 क्षेत्र 355 चौ.फुट ही सदनिका तक्रारकर्ता यांस द्यावी. 3.विरुध्द पक्षकार यांनी वरील तिन्ही तक्रारीतील तक्रारकर्तास सदनिकेचा ताबा देऊन सोसायटी बनवुन द्यावी, तसेच OC, CC व कन्व्हेयन्स करुन द्यावे. सर्व टाईल्स फ्लास्टरींग करावे, पाणी व विजेची स्वतंत्र सोय करुन द्यावी. लिफ्ट, सोसायटी ऑफीस, जीने, किचन प्लाटफॉर्म करुन द्यावा. 4. तक्रारीतील सर्व तक्रारकर्ता यांस मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी प्रत्येकी रु.5,000/- (रु. पाच हजार फक्त) द्यावेत. 5.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
दिनांक – 20/03/2010 ठिकान - ठाणे (श्री.पी.एन.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) सदस्य सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे D:\judg.aft.02-06-08\Pisal Madam
|