(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 17 एप्रिल 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. तक्रासरकर्ता हा व्यवसायाने डॉक्टर आहे. विरुध्दपक्ष यांचा प्लॉट डेव्हलपमेंट करुन विकणे, घरे बांधणे, फ्लॅट बांधणी इत्यादीचा व्यवसाय आहे. विरुध्दपक्ष यांनी दैनिक वृत्तपञातून मासीक किस्तीमध्ये फ्लॅट खरेदी करण्याची जाहिरात दिली होती. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्षाची जाहिरात बघून 3 प्लॉट आरक्षीत केले. प्लॉट क्रमांक 81 व 82 प्रत्येकी क्षेञफळ 1143.65 असे दोन प्लॉट ज्याचे एकूण क्षेञफळ 2287.30 चौ.फुट सर्वे नं.30, प.ह.क्र.68, मौजा – खैरी (खुर्द), ता. हिंगणा, जिल्हा – नागपूर आणि प्लॉट क्रमांक 34 याचे एकूण क्षेञफळ 1433.76 चौ.फुट सर्वे नं. 74/1, प.ह.क्र.69, मौजा – भंसोली, तहसिल – हिंगणा, जिल्हा – नागपूर येथे असे एकूण 3 प्लॉट बुक केले. योजनेनुसार प्लॉटची किंमत प्लॉट क्र.81 व 82 करीत एकूण रुपये 2,85,914/- आणि प्लॉट क्रमांक 34 करीता रुपये 2,86,752/- अशी ठरली होती. त्यानुसार तक्रारकर्त्याने बुकींग रक्कम म्हणून विरुध्दपक्ष यांनी प्लॉट क्रमांक 81 व 82 करीता रक्कम रुपये 85,774/- नगदी दिले, तसेच प्लॉट क्रमांक 34 करीता नगदी रक्कम रुपये 86,086/- दिली आणि उर्वरीत रक्कम रुपये 2,00,140/- प्लॉट क्रमांक 81 व 82 करीता प्रत्येकी रुपये 5560/- चे 36 मासीक किस्तीमध्ये द्यायचे होते, तसेच रुपये 2,00,726/- प्लॉट क्रमांक 34 करीता 36 मासिक किस्त प्रत्येकी 5576/- प्रमाणे द्यावयाचे होते. त्यानुसार, तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष हे प्लॉटचे सर्व सोपस्कार करुन यात N.A. ले-आऊट इत्यादी करुन तक्रारकर्त्यास देण्यात येणार होते. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष याच्यात दिनांक 4.1.2012 ला तीनही प्लॉटकरीता ज्यात प्लॉट क्रमांक 81 व 82 चा एकञीत व प्लॉट क्रमांक 34 करीता वेगळा असे दोन करार करण्यात आले.
3. करारनाम्यानुसार तक्रारकर्त्याने दिनांक 4.1.2012 ते 4.1.2015 या कालावधीत विरुध्दपक्ष यांनी दिलेल्या विरुध्दपक्ष क्र.2 यांचे बँक खाते क्रमांक 875510110001306 बँक ऑफ इंडिया, शाखा नागपूर या खात्यात अमरावती येथून ऑनलाईन रक्कम जमा केली. करारनाम्यानुसार मासिक किस्तीची संपूर्ण रक्कम रुपये 2,00,140/- आणि रुपये 2,00,726/- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांच्या बॉंक खात्यात जमा केले. तक्रारकर्त्याने संपूर्ण रक्कम विरुध्दपक्षाकडे जमा झाल्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास प्लॉट हस्तांतरणाबाबत व विक्रीपञाकरीता विनंती केली, परंतु विरुध्दपक्ष यांनी काही तांञिक अडचणीमुळे प्लॉटचे हस्तांतरण करण्यास वेळ लागेल असे सांगितले. यानंतर, तक्रारकर्त्याने वारंवार विरुध्दपक्ष यांना विक्रीपञाकरीता व प्लॉट हस्तांतरण करण्याकरीता विनंती करीत होता, परंतु विरुध्दपक्ष हे कोणत्या न कोणत्या कारणावरुन टाळाटाळ करीत होते. यावरुन, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास करारनाम्यानुसार सेवा देण्यास टाळाटाळ व निष्काळजीपणा केल्याने त्यांनी Unfair Trade Practice चा अवलंब केल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्त्याने खालीलप्रमाणे प्रार्थना केली आहे.
4. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास प्लॉट क्रमांक 81, 82 व 34 करीता एकूण दिलेली रक्कम रुपयेय 5,72,666/-, त्याचप्रमाणे तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक ञासापोटी रुपये 1,00,000/-, तसेच तक्रारकर्त्याने दिलेल्या रकमेवरील 24 टक्के दराने दिनांक 4.1.2015 ते 4.5.2016 पर्यंतचे व्याज रुपये 1,94,675/-, नोटीसचा खर्च रुपये 5,000/-, नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,00,000/- असे एकूण रक्कम रुपये 9,72,341/- मिळण्याकरीता पाञ आहे व तो त्यांना देण्याकरीता मंचाने आदेश करावा अशी विनंती केली.
5. तक्रारकर्त्यांचे तक्रारीनुसार विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना पाठविलेली नोटीस मंचास परत आली. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.1 व 2 चे विरुध्द नोटीस दिनांक 9.11.2006 च्या ‘दैनिक भास्कर’ या वृत्तपञातून जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात आला. तरी सुध्दा विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी मंचात उपस्थित होऊन तक्रारीला उत्तर दाखल केले नाही, करीता सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र.1 व 2 चे विरुध्द एकतर्फा आदेश निशाणी क्र.1 वर दिनांक 8.12.2016 ला पारीत केला.
6. तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. सदर प्रकरणातील अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
7. तक्रारकर्त्या विरुध्दपक्षाकडे प्लॉट क्रमांक 81 व 82 प्रत्येकी क्षेञफळ 1143.65 असे दोन प्लॉट ज्याचे एकूण क्षेञफळ 2287.30 चौ.फुट, सर्वे नंबर 30, प.ह.क्र.68, मौजा – खैरी (खुर्द), ता. हिंगणा, जिल्हा – नागपूर, तसेच प्लॉट क्रमांक 34 याचे एकूण क्षेञफळ 1433.76 चौ.फुट, सर्वे नंबर 74/1, प.ह.क्र.69, मौजा – भंसोली, ता. हिंगणा, जिल्हा – नागपूर असे एकूण तीन प्लॉट बुक केले. त्याचे करारपञ निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.6 व 7 वर जोडले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी भरलेल्या पैशाच्या रसिदा निशाणी क्र.1 ते 5 वर जोडले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे ठरल्यानुसार प्लॉट क्रमांक 81 व 82 चे संपूर्ण रक्कम रुपये 2,85,914/-, तसेच प्लॉट क्र.34 ची एकूण रक्कम रुपये 2,86,752/- अशी एकूण रुपये 5,72,666/- एवढी रक्कम नगदी व बँक ऑफ इंडिया, शाखा नागपूर खाते क्रमांक 875510110001306 या खात्यात ऑनलाईनव्दारे विरुध्दपक्षाकडे जमा केली व संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतर विरुध्दपक्षास विक्रीपञ करण्यासंबंधी व प्लॉटचा ताबा देण्यासंबंधी वारंवार विनंती केली. परंतु, विरुध्दपक्षाने प्रत्येक वेळेस वेगळे कारण सांगून टाळाटाळ केली. त्याप्रमाणे मंचाव्दारे दिनांक 8.6.2016 ला नोटीस पाठवून दिनांक 11.7.2016 रोजी उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठविली होती, त्यानंतर पुन्हा दिनांक 18.8.2016 रोजी नोटीस पाठविली. परंतु, विरुध्दपक्ष मंचात हजर झाले नाही करीता दिनांक 9.11.2016 च्या ‘दैनिक भास्कर’ या वृत्तपञातून जाहीर नोटीस प्रसिध्द केला, परंतु, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 मंचात हजर झाले नाही, म्हणून दिनांक 8.12.2016 रोजी मंचा तर्फे सदर प्रकरण विरुध्दपक्षांचे विरुध्द एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
8. तक्रारकर्त्याने तीनही प्लॉट क्रमांक 81, 82 व 34 प्लॉटची निर्धारीत रक्कम नगदी व चेकव्दारे एकूण रुपये 5,72,666/- विरुध्दपक्षाकडे जमा केली आहे. करारपञा प्रमाणे विक्रीपञाकरीता लागणारा प्लॉटचे अकृषक व स्विकृत नकाशाचे कागदपञ त्यांनी शासनाकडून मिळवीले नाही. तसेच करारपञानुसार विरुध्दपक्षाने त्याचे विक्रीपञ करुन दिले नाही आणि त्यांना प्लॉट हस्तांतरण केलेले नाही. यावरुन विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याप्रती सेवेत ञुटी केल्याचे दिसून येते, असे मंचाला वाटते.
करीता, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास त्यांनी आरक्षित केलेला प्लॉट क्रमांक 81, 82 व 34 चे कायदेशिर विक्रीपञ करुन प्लॉट हस्तांतरीत करावे.
किंवा
उपरोक्त प्लॉटचे कायदेशिर विक्रीपञ करुन देणे शक्य नसल्यास विरुध्दपक्ष यांचेकड तक्रारकर्त्याची जमा असलेली एकूण रक्कम रुपये 5,72,666/- द.सा.द.शे. 12 % टक्के व्याजाने तक्रारकर्त्याने शेवटची रक्कम जमा केल्याचे दिनांकापासून रक्कम तक्रारकर्त्याचे हातात मिळेपर्यंत द्यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 17/04/2017