Complaint Case No. CC/216/2020 | ( Date of Filing : 06 Jul 2020 ) |
| | 1. SHRI GANESH RAMCHANDRA SADAVARTI | C/O VISHWASRAO BHIVAPURKAR PLOT NO 5, ADHYAPAK NAGAR, AMARNAGAR RAOD, MANEWADA, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/S KRUSHNA CONSTRUCTION THROUGH PROP. PARTNER SHRI GAJENDRA BHOJRAJ RAHANGADALE | PRINCE APARTMENT, RING ROAD, GONDIA | GONDIA | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत प्रस्तुत तक्रार दाखल केली असून त्यात नमूद केले की, त्याने विरुध्द पक्षासोबत मौजा- चिखली, खसरा क्रं. 12/2, सरिता को-ऑप. सोसायटी, शिवशक्तीनगर, नागपूर येथील भूखंड क्रं. 8 वरील एकूण क्षेत्रफळ 1675 चौ.फु.च्या प्लॉटवर रुपये 29,31,250/- मध्ये घराचे बांधकाम करण्याबाबतचा दि. 12.03.2019 रोजी करारनामा केला होता व त्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला भारतीय स्टेट बॅंक, बिलासपूर शाखेचा धनादेश क्रं. 726286 अन्वये रुपये 10,00,000/- ची रक्कम दिली होती व उर्वरित रक्कम तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला करारनाम्यात नमूद केल्याप्रमाणे बांधकामाच्या टप्प्यानुसार देण्याचे ठरले होते. विरुध्द पक्षाने निव्वळ रुपये 6,05,400/- एवढया रक्कमेचे बांधकाम केले. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला रुपये 3,94,600/- एवढी जास्त घेतलेली रक्कम परत करण्याची विनंती केली व त्यासंबंधी विरुध्द पक्षाशी पत्रव्यवहार सुध्दा केला, तरी विरुध्द पक्षाने त्यासंबंधी कुठलीही सूचना दिली नाही. या दरम्यान तक्रारकर्त्याला नागपूरला राहण्याकरिता यावे लागल्याने त्याने दरमहा 8500/- रुपयाने घर भाडयाने घेतले. विरुध्द पक्षाने करारनाम्यानुसार 12 महिने उलटून ही तक्रारकर्त्याच्या घराचे बांधकाम करुन दिले नाही. तक्रारकर्ता विरुध्द पक्षास करारपत्राप्रमाणे घर बांधण्याकरिता लागणारी संपूर्ण रक्कम रुपये 29,31,250/-देण्याकरिता तयार असून सुध्दा विरुध्द पक्षाने ठरल्याप्रमाणे घराचे बांधकाम करुन दिले नाही, ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटी असून त्याने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे दिसून येते. करिता तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची वापरलेली रक्कम रुपये 3,94,600/-, दिनांक 12.03.2019 पासून द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याजासह देण्याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा ही आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन ही विरुध्द आयोगा समक्ष हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 17.02.2021 रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेज व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.
- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दोषपूर्ण सेवा दिली काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत - उभय पक्षात घर बांधकामाचा करारनामा रुपये 100/- च्या स्टॅम्प पेपरवर दि. 12.03.2019 रोजी करण्यात आल्याचे दिसून येते. सदर करारनाम्यात नमूद असल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला रुपये 29,31,250/- एक वर्षाच्या आंत द्यावयाचे होते व त्याकरिता टप्प्याने बांधकाम पूर्ण करावयाचे होते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला बयाणा रक्कम म्हणून भारतीय स्टेट बॅंक बिलासपूर शाखेचा रुपये 10,00,000/- चा धनादेश दि. 12.03.2019 रोजीच दिलेला असल्याचे दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्त्याने श्री. राहुल देशपांडे रजिस्टर्ड आर्किटेक यांच्यातर्फे सविस्तर स्वरुपातील सर्टिफिकेट ऑफ व्हॅल्यूएशन दि. 26.02.2020 रोजीचे प्राप्त केलेले केलेले आहे. यानुसार विरुध्द पक्षाने भूखंडक्रं.8 वर निव्वळ रुपये 6,05,400/- चे बांधकाम केले असल्याचे नमूद आहे. तसेच या अहवाला सोबत दि. 15.02.2020 पर्यंत करण्यात आलेल्या बांधकामाच्या फोटोसह अहवाल दाखल केलेला आहे. त्यानंतर दि. 11.06.2020 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला वकिला मार्फत पाठविलेली नोटीस अभिलेखावर दाखल केलेली आहे. त्यानंतर ही विरुध्द पक्षाने कुठलीही दखल घेतलेली नसल्याचे दिसून येते. यावरुन तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केलेले कथन सत्य असल्याचे स्पष्ट होते.
करिता खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
ब. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास त्याची वापरलेली रक्कम रुपये 3,94,600/- व त्यावर दि. 12.03.2019 पासून द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याजासह परत करावी. क. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे. ड. विरुध्द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आंत करावी. इ. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी. ई. तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी. | |