Maharashtra

Nagpur

CC/407/2017

SURESH GANGADHAR GHATE THROUGH KARTA S.G. GHATE - Complainant(s)

Versus

M/S KONE ELEVATOR INDIA PVT. LTD. - Opp.Party(s)

ADV. A. BHATTACHARYA

18 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/407/2017
( Date of Filing : 25 Sep 2017 )
 
1. SURESH GANGADHAR GHATE THROUGH KARTA S.G. GHATE
R/O. DR. MUNJE MARG, DHANTOLI, NAGPUR-440012
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/S KONE ELEVATOR INDIA PVT. LTD.
50, VANAGARAM ROAD, AYANAMBAKKAM, CHENNAI-600095/ BRANCH OFFI. AT THE EDGE, PLOT NO. 12, SHANKAR NAGAR, NAGPUR. 440010
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV. A. BHATTACHARYA, Advocate
For the Opp. Party:
Dated : 18 Dec 2019
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.         तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, त्‍याला स्‍वतःच्‍या प्‍लॉटवर बांधकाम करीत असलेल्‍या इमारती मध्‍ये उद्वाहक स्‍थापित करावयाचे असल्‍याने तो विरुध्‍द पक्षाला सन 2013 च्‍या सुरुवातीला भेटला. त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्ता सोबत दि. 01.02.203 रोजी झालेल्‍या चर्चेनुसार त्‍याच्‍या प्‍लॉटवरील बिल्‍डींगमध्‍ये स्‍थापित करावयाच्‍या उद्वाहकाचे आवश्‍यक स्‍पेसिफिकेशन, फिचर, किंमत, टॅक्‍स इत्‍यादी बाबत संक्षिप्‍त माहिती पुरविली. उभय पक्षात करार करण्‍याच्‍या सुरुवातीला तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍यामध्‍ये करारा विषयी बोलणे झाले होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष तसेच त्‍याच्‍या प्रतिनिधीला सांगितले होते की, प्‍लॉट वरील इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्‍यावर तसेच भाडेकरु निश्चित झाल्‍यावर उद्वाहक स्‍थापित करण्‍यात येईल. कोणत्‍याही परिस्थितीत संपूर्ण इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्‍याशिवाय व भाडेकरु निश्चित झाल्‍यावर उद्वाहक स्‍थापित करण्‍यात येईल. वि.प.च्‍या प्रतिनिधीने बांधकामाच्‍या स्थितीची पाहणी करारनामा करण्‍यापूर्वी बघितली व करारनामा करण्‍याकरिता तयार झाला. 
  2.         तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, दि. 14.02.2003 ला तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी उद्वाहक स्‍थापित करुन त्‍याच्‍या टेस्‍टींगबाबत करार केला. तसेच सदरच्‍या उद्वाहकाचा पुरवठा व स्‍थापित करुन देण्‍याचा खर्च रुपये 6,00,000/- एवढया किंमती मध्‍ये  करण्‍याचा करार करण्‍यात आला. त्‍यामध्‍ये एक्‍ससाईज/ सर्विस टॅक्‍स, वॅट ऑक्‍ट्राय इत्‍यादीचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने कराराप्रमाणे उद्वाहक किंमतीचे 20 टक्‍के आगाऊ रक्‍कम रुपये 1,30,000/- विरुध्‍द पक्षाला अदा केली व वि.प.ने रक्‍कम मिळाल्‍याबाबतची पावती तक्रारकर्त्‍याला दिली.   तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, दि. 14.02.2013 च्‍या करारानुसार उद्वाहकाची करारातील किंमतीची ऑफर ही 12 महिन्‍याकरिता होती. .
  3.             तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, इमारतीचे सिव्‍हील वर्क हे जुन-जुलै 2013 मध्‍ये पूर्ण झाले होते. परंतु आर्थिक व्‍यवस्‍था ढासल्‍यामुळे आणि मार्केट स्थिती बरोबर नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या इमारतीचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे आणि तक्रारकर्ता कुणालाही इमारत भाडयाने देऊ शकला नाही.  सदरच्‍या करारातील वेळ हा मुद्दा प्रामुख्‍याने मुख्‍य होता. तक्रारकर्ता सदर इमारती मधील जागा कोणत्‍याही भाडेकरुला भाडे तत्‍तवावर बाजारभावातील चढ-उतारामुळे देऊ शकत नाही. त्‍यामुळे सदरचा करारनामा दि. 14.02.2013 हा निरर्थक झाला आणि कायद्याच्‍या दृष्‍टीने आपोआप रद्द झाला. तक्रारकर्त्‍याने अनेक वेळा विरुध्‍द पक्षाला रक्‍कम परत करण्‍याकरिता विनंती करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीकडे दुर्लक्ष केले. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दिनांक 17.07.2017 रोजी विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल न घेतल्‍यामुळे  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडून उद्वाहक विक्री व स्‍थापिती पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम द.सा.दशे. 12.5 टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला परत करण्‍याचे आदेश द्यावे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही  आदेश द्यावा.

 

  1.             विरुध्‍द पक्षाने आपला लेखी जबाब दाखल करुन त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने  सदरची तक्रार दोषपूर्ण सेवा दिल्‍याबद्दल दाखल केली आहे आणि आगाऊ रक्‍कम रुपये 1,20,000/- ची व्‍याजासह मागणी केली आहे. तक्रारकर्ता ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत  तक्रारी द्वारे रक्‍कमेची मागणी करु शकत नाही. जर तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत निव्‍वळ रक्‍कम परत मागण्‍याच्‍या उद्देशाने दाखल केली असल्‍यास सदरची तक्रार चालण्‍या योग्‍य नसून खारीज होण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने स्‍वतः तक्रारीत नमूद केले की, त्‍यांच्‍या मधील करार दि. 14.02.2014 रोजी संपुष्‍टात आला आहे, त्‍यामुळे तक्रार दाखल करण्‍याचे कारण दि. 14.02.2014 रोजी उद्भवले आहे. म्‍हणून  तक्रारकर्त्‍याने  सदरची तक्रार दि. 14.02.2016 च्‍या पूर्वी दाखल करणे आवश्‍यक होते. यावरुन तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार मुदतबाहय असल्‍याच्‍या कारणाने खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.
  2.         विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने स्‍वतः तक्रारीमध्‍ये उभय पक्षात करार झाल्‍याचे कबूल केले आहे. तक्रारकर्त्‍याने करारानुसार उद्वाहकाची किंमत विरुध्‍द पक्षाला न दिल्‍यामुळे सदरचा उद्वाहक पुरविण्‍याचा करार रद्द झाला. याचा अर्थ असा की, तक्रारकर्त्‍याने स्‍वतः करारनाम्‍यातील अटी व शर्तीचे पालन करण्‍यास कसूर केला आहे. करारातील अटीनुसार तक्रारकर्ता उद्वाहक खरेदीपोटी दिलेल्‍या रक्‍कमेच्‍या 25 टक्‍के रक्‍कम कपात करुन उर्वरित रक्‍कम मिळण्‍यास हक्‍कदार आहे. दुर्दैवाने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला करारातील उद्वाहक किंमतीच्‍या 20 टक्‍के रक्‍कम उद्वाहक पोटी दिली आहे. तक्रारकर्ता यांनी करारातील अटीचे पालन न केल्‍यामुळे तक्रारकर्ता करारातील अटीनुसार रक्‍कम परत मिळण्‍यास पात्र नाही. म्‍हणून सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे. 
  3.         उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले  व त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नमूद केले.

                   मुद्दे                                            उत्‍तर

  1.  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ              होय

 

  1.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

 अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला काय ॽ         होय

 

  1.  काय आदेश ॽ                            अंतिम आदेशानुसार     

            

कारणमिमांसा

6.      मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍यामध्‍ये दि. 14.02.2013 ला उद्वाहक खरेदी-विक्रीपोटी करारनामा करण्‍यात आला होता. त.क.ने विरुध्‍द पक्षाला करारातील अटी व शर्तीला धरुन उद्वाहक किंमत रुपये 6,00,000/- रक्‍कमेच्‍या 20 टक्‍के रक्‍कम रुपये 1,20,000/- अदा केली हे नि.क्रं  2 वर दाखल दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होती. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. उभय पक्षात झालेल्‍या करारातील नमूद उद्वाहक स्‍वीकृत किंमतीची विधीग्राहयता ही फक्‍त करार तारखेपासून 12 महिन्‍यापर्यंत होती. तक्रारकर्त्‍याने नि.क्रं.  2(2) वर दाखल केलेले KONE SITC AGREEMENT   मध्‍ये खालीलप्रमाणे अटी नमूद केलेल्‍या आहेत.  

Price Validity

The accepted price will be valid for a period of 12 months from the date of this Agreement, subject to adjustments as per IEEMA provisions. The price shall be subject to an escalation of minimum 10% for further 12 months. Beyond 24 months from the date of this agreement, the prices shall have to be re-negotiated between the parties.

Terms Cancellation

In the event of cancellation of order by the PURCHASER, the PURCHASER shall pay cancellation charges to KONE as detailed below:

15% of the Contract Value, if the order is cancelled by the PURCHASER before the General Arrangement Drawing is prepared.

        उपरोक्‍त नमूद करारातील अटीवरुन असे स्‍पष्‍टपणे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याने आपल्‍या वैयक्तिक अडचणीमुळे स्‍वतः करारनाम्‍याचा भंग केला असल्‍याने करारात नमूद केलेल्‍या अटी व शर्तीनुसार तक्रारकर्ता करारमुल्‍याच्‍या 15 टक्‍के रक्‍कम विरुध्‍द पक्षाला अदा करता उर्वरित 5 टक्‍के रक्‍कम परत मिळण्‍यास पात्र आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याशी झालेला करार रद्द झालेल्‍या तारखेपासून करारमुल्‍याच्‍या 15 टक्‍के रक्‍कम कमी करुन उर्वरित रक्‍कम तक्रारकर्त्‍याला परत करावयास पाहिजे होती. परंतु ती परत न केल्‍यामुळे तक्रारकर्ता करारमुल्‍याच्‍या 5 टक्‍के रक्‍कम व्‍याजासह परत मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.    

       सबब  खालीलप्रमाणे अंतिम  आदेश  पारित.

                           अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून उद्वाहक स्‍थापिती पोटी स्‍वीकारलेल्‍या रक्‍कम पैकी 5 टक्‍के रक्‍कम म्‍हणजेच रुपये 30,000/- व त्‍यावर दि. 15.02.2014 पासून द.सा.द.शे.12 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत तक्रारकर्त्‍याला अदा करावी .

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 5,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या विरुध्‍द पक्ष यांनी करावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.