(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे ता. 17/05/2016 ते ता. 22/05/2016 या कालावधीसाठी मॉरिशस सहलीचे पॅकेज घेतले होते. सामनेवाले यांनी सदर सहलीच्या पुर्वनियोजित वेळापत्रकानुसार प्रेक्षणीय स्थळे बदलुन ता. 22/05/2016 रोजी तक्रारदार यांना सर्व प्रवाशांसह दाखवली.
2. सामनेवाले यांच्या सहल आयोजकांनी ता. 18/05/2016 रोजीची नियोजित स्थळे ता. 22/05/2016 रोजी रविवारी असल्यामुळे सदर महत्वाची प्रेक्षणिय स्थळे बंद असल्याचे कारण दर्शवुन ती दाखवली नाहीत. तक्रारदार यांनी एवढया मोठया प्रमाणात सदर सहलीसाठी खर्च करुनही मॉरशिस मधील महत्वाची प्रेक्षणिय स्थळे पाहण्यापासून त्यांना वंचित राहावे लागले आहे. अशी तक्रारदार यांची सामनेवाले यांचे विरुध्द तक्रार आहे.
3. सामनेवाले यांच्या म्हणण्यानुसार त्यांना सहलीचे वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार असल्याचे सहलीच्या अटी व शर्ती मध्ये नमुद केले असल्याने सदरची बाब तक्रारदारांनी मान्य व कबुल असल्याचे त्याचेवर बंधनकारक आहे.
4. सामनेवाले यांच्या पुर्वनियोजित सहलीच्या वेळापत्रकानुसार ता. 22/05/2016 रोजी “Cassela Bird Park” तक्रारदार यांना दाखविण्याचे ठरले होते. तथापी रविवारी सदर “Bird Park” बंद असल्याने व सहलीमधील सर्व प्रवाश्यांना “Bird Park” पाहण्याची इच्छा असल्याने सर्वांच्या समतीने सहलीच्या वेळापत्रकाचे reshuffling केले. सामनेवाले यांचेकडे सहलीमधील कोणत्याही प्रवाशांनी सदर वेळापत्रकासंदर्भातील बदलाबाबत तक्रार केली नाही. सामनेवाले यांनी सहलीतील प्रवाश्यांना नियोजित सहलीप्रमाणे सर्व प्रेक्षणिय स्थळे दाखवली असुन सहलीच्या 4थ्या व 5व्या दिवशी प्रवाश्यांना मार्केटिंग (shopping) साठी नेण्यात आले होते. तक्रारदारांनी feedback form मध्ये टूर-लिडर यांचे संदर्भात चांगले रिमार्क दिले असुन कोणतीही तक्रार असल्याचे नमुद नाही. सामनेवाले यांनी सदर बाब लेखी कैफीयतीच्या परिच्छेद 8 मध्ये नमुद केली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्र, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद सामनेवाले यांची लेखी कैफियत, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र तसेच लेखी युक्तिवाद यांचे वाचन केले. तक्रारदार क्र. 2 व सामनेवाले यांचे वकीलांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला. सामनेवाले यांनी त्यांची लेखी कैफियत व पुरावा शपथपत्र हाच त्यांचा तोंडी युक्तिवाद असल्याबबात पुरशिस दिली. यावरुन मंच खालील प्रमाणे निष्कर्ष काढत आहे.
6. कारणमिमांसाः
अ) तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे मॉरीशस सहलीकरीता ता. 04/04/2016 रोजी रक्कम रु. 50,000/- तसेच ता. 21/04/2016 रोजी रु. 47,845/- व रु. 62,790/- अशा रकमा भरणा केल्याबाबतच्या पावत्या मंचात दाखल आहेत. यावरुन तक्रारदार यंनी सामनेवाले यांचेकडे मॉरीशस सहलीकरीता एकुण रक्कम रु.1,60,726/- भरणा केल्याचे दिसुन येते. सामनेवाले यांचा या संदर्भात कोणताही आक्षेप नाही.
ब) सामनेवाले यांची ता. 18/05/2016 ते ता. 22/05/2016 या पाच दिवसाच्या मॉरीशस सहलीची तक्रारदार यांना दिलेली “itinerary” ची प्रत मंचात दाखल आहे. सामनेवाले यांना सदर नियोजित सहलीचे मुळ वेळापत्रक असल्याचे मान्य व कबुल आहे. सदर मुळ वेळापत्रकामध्ये खालील प्रमाणे नमुद केले आहे.
M2 – MAURITIUS
5 Days 4 Hotel Nights
Mauritius : Mauritius 4N, Port, Ile Aux Cerfs, Trou Aux Cerfs, Curepipe, Grand Bassin, Chamarel.
Day 1 - Mauritius
Arrive at Mauritius Free time for relaxation and enjoy beach activities.
Day 2 - Port Louis
Visit Pamplemousses – the Royal Botanical Gardens. Take a panoramic view of Port Louis city from citadel Fort. The orientation tour of port Louis includes Catholic Church, Mosque, High Court building, port Louis Theatre, French Colonial buildings etc. Enjoy shopping at caudan water front.
Day 3 - Ile Aur cerfs Island
Visit to Ile Aux Cerfs Island by high speed boat. Take a thrilling experience of para sailing. Enjoy shopping at Caudan water front.
Day 4 – South Tour
Visit Model Ship Factory, Trou Aux Cerfs, the Volcanic Crater, Curepipe - the scenic residential town, Garden village, Grand Bassin – The Sacred Lake, Shiva Temple, Black River George, Chamarel Waterfall and Chamarel – Seven Coloured earth.
Day 5 – Casela Bird Park – Departure from Mauritius
Visit Casela Bird Park, see amazing species of birds from all the five continents. Board the flight for your hometown. Tour concludes.
क) सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार Day 5 (ता. 22/05/2017) “Cassela Bird Park” प्रवाश्यांना दाखवायचे नियोजित सहलीच्या मुळ वेळापत्राकानुसार ठरविण्यात आले होते. तथापी ता. 22/05/2017 रोजी रविवार असुन सदर “Bird Park” रविवारी बंद असल्याने मुळ वेळापत्रकामध्ये बदल करुन Day 5 चे site seen बदलुन Day 2 ला reshuffling करण्यात आले.
ड) Day 2 ला नियोजित मुळ वेळा पत्रकाप्रमाणे
Port Louis –
i) Visit pamplelmousses - the Royal Botanical Gardens. – (Not Seen)
ii) Take a panoramic view of port Louis city from Citadel Fort. – (Not Seen)
iii) The Orientation tour of port Louis includes Catholic church, Mosque, High court building, Port Louis Theatre, French Colonial building etc., – (Not Seen)
Enjoy shopping at Caudan water front
असे मुळ वेळापत्रकामध्ये नमुद केल्याचे दिसुन येते.
तक्रारदार यांनी ता. 05/11/2016 रोजी दाखल केलेल्या Reply नुसार
i) “Panoramic view from Citadel Fort” हे दाखविण्यात आले. Day 2 ला वरीलप्रमाणे नमुद केल्यानुसार
ii) क्रमांकाचे प्रेक्षणिय स्थळ तक्रारदार यांना सामनेवाले यांनी दाखवले असुन क्र. i) व iii) मध्ये नमुद केलेली प्रेक्षणिय स्थळे दाखवली नाहीत. Day 2 मध्ये मुळ वेळापत्रकामधील प्रेक्षणीय स्थळे Day 5 ला reshuffle केली असल्याने व ता. 22/05/2016 रोजी रविवारी सदर स्थळे बंद असल्याने तक्रारदार यांना सदर site seen पाहणे शक्य झाले नसल्याचे दिसुन येते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सहलीच्या आयोजकांनी प्रवाश्यांना शेवटच्या दिवशी Citadel fort मधुन बसने caudan water front येथे shopping साठी नेण्यात आले तथापी रविवारी सदर मार्केट बंद असल्याने समस्त महीलावर्ग खूप नाराज झाला. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार वर नमुद केलेली port Louis orientation मध्ये नमुद केलेल्या सर्व बिल्डींग mosque, High court building, port Louis Theatre, French, colonial building रविवारी बंद असल्याने आतुन दाखवणे शक्य नव्हते तथापी बाहेरुन सदर बिल्डिंग दाखवणे सहजरित्या शक्य होते. सामनेवाले यांनी प्रवाश्यांना सदर प्रेक्षणिय स्थळे बाहेरुन दाखविण्याचे नाकारुन त्रृटींची सेवा दिली आहे. तसेच सामनेवाले यांनी Day 5 ला रविवारी पुर्वनियोजित वेळापत्रकामध्ये “Cassela Bird Park” बंद असल्याचे माहीत असुनही नमुद केले असुन Day 2 मध्ये पुर्वनियोजित वेळापत्रकामधील प्रेक्षणिय स्थळे रविवारी बंद असल्याचे माहीत असुनही Day 5 ला रविवारी reshuffle करुन त्रृटीची सेवा दिल्याचे बाबत तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केल्याचे दिसुन येते.
इ) सामनेवाले यांनी सहलीचे reshuffling केल्याबाबत तक्रारदारांची कोणतीही तक्रार नाही तथापी सामनेवाले यांनी पुर्वनियोजित मुळ वेळापत्रामध्ये Day 5 ला बंद असलेले “Cassela Bird Park” नमुद करुन तसेच Day 2 मध्ये नमुद केलेली प्रेक्षणिय स्थळे रविवारी बंद असल्याचे माहीत असुनही reshuffle केल्याने तक्रारदार यांना सदर महत्वाची प्रेक्षणिय स्थळे पाहण्यापासुन वंचित व्हावे लागले आहे. तसेच सामनेवाले यांनी याबाबत प्रवाशांना झालेल्या असुविधेबाबत दिलगिरी ही व्यक्त केलेली नाही. तक्रारदार क्र. 1 व 2 हे जेष्ठ नागरिक असुन त्यांच्या वयाचा व सहलीच्या खर्चाचा विचार करता सदर स्थळे पाहण्यासाठी पुन्हा मॉरिशस येथे जाणे शक्य नाही. सामनेवाले यानी तक्रारदार यांना मॉरशिस सहलीमधील प्रेक्षणिय स्थळे न दाखवुन त्रृटीची सेवा दिल्याने तक्रारदार यांना निश्चितच मानसिक त्रास झाला आहे. सामनेवाले यांनी सहलीमधील इतर नियोजित प्रेक्षणिय स्थळे तक्रारदार यांना दाखवली असुन नियोजित सहलीमधील Day 3 प्रमाणे “para sailing” ची सुविधा वातावरणातील बदलांमुळे प्रवाशांना देणे शक्य झाले नाही. तथापी सामनेवाले यांनी त्या ऐवजी “underwater walk” ची सुविधा सर्व प्रवाशांना दिल्याबाबतची बाब तक्रारदार यांना मान्य आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही अतिरिक्त सुविधा दिलेली नाही. सामनेवाले यांनी नमुद केलेली “Glass Bottom Ride” ही सुविधा ही संबंधित हॉटेल कडुन सर्व ग्राहकांना दिलेली अतिरिक्त सुविधा आहे. (This facility was actually part of the hotel stay freebees) असे तक्रारदार यांनी ता. 05/11/2016 रोजी जबाबामध्ये नमुद केले आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचे विरुध्द सहलीमधील काही किरकोळ गोष्टी बाबत तक्रारीमध्ये व शपथपत्रामध्ये नमुद केले आहे. तथापी तक्रारदार यांना वर नमुद महत्वाची प्रेक्षणीय स्थळे सदर सहलीमध्ये सामनेवाले यांनी दाखवली नाहीत याबाबत प्रामुख्याने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. सामनेवाले यांनी फक्त port Louis orientation मधील प्रेक्षणिय स्थळे तक्रारदार यांना दाखवली नाहीत. तसेच Caudan water front बंद असल्याने मार्केटिंग करता आले नाही. सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार सामनेवाले यांनी सदर स्थळे दाखवली असुन इतर अतिरिक्त सुविधा प्रवाश्यांना पुरवली आहे. परंतु या बाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. सबब सामनेवाले यांचे सदरचे म्हणणे ग्राह्य धरता येत नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारदार क्र. 2 यांनी तोंडी युक्तिवादाचे दरम्यान नमुद केल्याप्रमाणे सदर सहलीमध्ये प्रवाश्यांनी Day 4 ला feed back form भरुन दिले आहेत. सबब सदर फॉर्ममध्ये Day 5 बाबतवी तक्रार नमुद केली नाही. सबब तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 30,000/- सहलीच्या खर्चाची रक्कम परत देणे तसेच तक्रारदार यांना सामनेवाले यांनी मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 5,000/- देणे न्यायोचित आहे असे मंचाचे मत आहे.
7. सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे “या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही .”
आदेश
1. तक्रार क्र. 492/2016 अंशतः मंजुर करण्यात यते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्रृटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना सहलीच्या खर्चाची रक्कम रु. 30,000/- (अक्षरी रु. तीस हजार फक्त) ता. 30/06/2017 पर्यंत परत द्यावी. विहीत मुदतीत आदेशाची पुर्तता न केल्यास ता. 01/07/2017 पासून संपुर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे 9% व्याजदरासह द्यावी.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासाकरीता रु. 5,000/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) तसेच तक्रारीच्या खर्चाचे रु. 5,000/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) ता. 30/06/2017 पर्यंत द्यावी. विहीत मुदतीत सदर रक्कम अदा न केल्यास दि. 01/07/2017 पासून आदेशाच्या पुर्ततेपर्यंत द.सा.द.शे 9% व्याज दराने द्यावी.
5. आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
6. संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.