जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा-सौ.वी.वी.दाणी. मा.सदस्या-सौ.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १४६/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ३०/०८/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २१/०६/२०१३
श्री.पाटील अजय भिकनराव. ----- तक्रारदार.
उ.व.३४,धंदा-नोकरी.
रा.प्लॉट नं.८०,निळकंठेश्वर सोसायटी,
साक्रीरोड,महिंदळे शिवार,ता.जि.धुळे.
विरुध्द
(१)मे.कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इलेक्ट्रीकल्स, ----- सामनेवाले.
रा.८४,म्युनसिपल कॉम्प्लेक्स,झाशीची राणी
पुतळयाजवळ,धुळे.
(२)मे.अकाई टी.व्ही.लि.,
ग्लोबल ब्रॅन्ड्स एन्टरप्रायजेस सोल्यूशनस प्रा.लि.
रा.प्लॉट नं.९७, सेक्टर नं.४४,
गुरगांव-१२२००२ (भारत)
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.वी.वी.दाणी.)
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – स्वत:)
(सामनेवाले नं.१ व २ तर्फे – गैरहजर)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.वी.वी.दाणी.)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून नादुरुस्त दुरदर्शन संच बदलून नवीन दुरदर्शन संच मिळणेकामी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले नं.२ यांचा अकाई लिमिटेड याद्वारे निर्मित केलेला दुरदर्शन संच सामनेवाले नं.१ यांच्याकडून दि.०८-०७-२००८ रोजी खरेदी केला. सदर दुरदर्शन संचास सात वर्षाची वॉरंटी सामनेवाले यांनी दिलेली होती. दुरदर्शन संच हा खरेदी केल्यानंतर सतत नादुरुस्त होत होता. त्या बाबत सामनेवाले नं.२ यांच्याकडून वारंवार तात्पूरत्या दुरुस्त्या करुन घेण्यात आल्या. दि.२०-०३-२०१३ रोजी दुरदर्शन संचामध्ये गंभीर प्रकारची नादुरुस्ती असल्याने सामनेवाले नं.२ यांच्या सर्व्हीस सेंटर मार्फत दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांनी ञस्थ होऊन, सामनेवाले याच्याकडे टोल फ्री क्रमांका मार्फत सदर दुरदर्शन संचामध्ये निर्मीती दोष आहे या बाबत तक्रार दिली व दुरदर्शन संच बदलून देण्याची विनंती केली. परंतु सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक ञास सहन करावा लागत आहे. सबब सदरची तक्रार दाखल करण्यात येऊन नादुरुस्त दुरदर्शन संच बदलून नवीन दुरदर्शन संच मिळावा किंवा या दुरदर्शन संचाची मुळ किंमत रु.८,०००/- व्याजासह मिळावी अशी तक्रारदार यांनी विनंती केली आहे.
सामनेवाले नं.१ व २ यांना मंचाची नोटिस मिळूनही ते गैरहजर आहेत. तसेच त्यांनी स्वत: अथवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे स्वत:चे बचावपञही दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द दि.०८-०५-२०१३ रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आला आहे.
(३) तक्रारदारांचा अर्ज नि.नं.१, शपथपञ नि.नं.२, कागदपञ नि.नं.३ वर एकूण १ ते ८, तसेच तक्रारदार यांनी स्वत: केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(४) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून दुरदर्शन संच खरेदी केल्याची पावती नि.नं.१ वर दाखल केली आहे. सदर पावती “कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इलेक्ट्रीक्स” या नावाची असून, त्यावर तक्रारदाराचे नांव आहे. त्यावर त्यांनी अकाई मॉडेल क्र.२२१० डब्ल्यू हा दुरदर्शन संच रक्कम रु.८,०००/- किमतीस घेतल्याची नोंद आहे. सदर पावती पाहता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(५) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी या दुरदर्शन संचाचे एक्सटंडेड वॉरंटीकार्ड दाखल केलेले आहे. त्यात खालील बाब नमूद आहे.
AKAI gives warranty to be purchaser of this product that it is free from defects in material and workmanship. The product is warranted against manufacturing defects of parts and components for a period of 6 years and 4 years extended warranty on colour picture tube,from the date of purchase. Thereby you are entitled to a total of 7 years of Comprehensive Warranty on CTV. In the event ot any complaint, contact your nearest authorized AKAI Service Centre.
यावरुन, सामनेवाले नं.२ यांनी सदर दुरदर्शन संचामध्ये उत्पादित दोष असल्यास त्याच्या भागासंदर्भात दुरुस्तीबाबत सहा वर्षाची वॉरंटी व कलर पिक्चर टयुब बाबत चार वर्षाची वॉरंटी दिलेली असून, एकूण ७ वर्षाची कॉम्प्रीहेन्सीव्ह वॉरंटी दिलेली दिसत आहे. या कागदपञांचा विचार होता तक्रारदारांनी खरेदी केलेला दुरदर्शन संच हा वॉरंटी कालावधीत नादुरुस्त झालेला आहे. त्यामुळे सदरचा दोष हा वॉरंटी कालावधीत येत आहे. त्यामुळे सामनेवाले नं.१ व २ यांची सदरचा दुरदर्शन संच दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी आहे हे स्पष्ट होत आहे.
(६) तक्रारदार यांनी सदरचा दुरदर्शन संच दि.०८-०७-२००८ रोजी खरेदी केलेला असून त्यानंतर सतत सदर दुरदर्शन संचामध्ये दोष निर्माण होत आहेत व दि.२०-०३-२०१२ रोजी गंभीर प्रकारची नादुरुस्ती या दुरदर्शन संचामध्ये निर्माण झाली आहे, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. परंतु या बाबत तक्रारदारांनी सदर दुरदर्शन संचामध्ये कोणता उत्पादीत दोष आहे या बाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. परंतु सदर दुरदर्शन संच खरेदी केल्यापासून त्यात वारंवार दोष निर्माण होत आहेत हे या बाबत तक्रारदारांचा तक्रार अर्ज व दाखल केलेले शपथपञ व सामनेवालेंकडे केलेल्या तक्रारी पाहता सदर दुरदर्शन संचामध्ये दोष आहे हे गृहित धरुन त्या बाबत सामनेवाले जबाबदार आहेत. याचा विचार होता सामनेवाले यांनी सदर दुरदर्शन संचामध्ये निर्माण झालेला दोष पुर्णपणे दुरुस्त करुन देणे किंवा देण शक्य नसल्यास सदरचा भाग पूर्णपण बदलून देणे आवश्यक आहे.
तक्रारदार यांनी दुरदर्शन संच पूर्णपणे बदलून मिळण्याची किंवा त्या बाबतची रक्कम मिळण्याची विनंती केलेली आहे. परंतु सदर दुरदर्शन संचामध्ये कोणता उत्पादीत दोष आहे या बाबतचा कोणताही पुरावा न आल्याने, तसेच सामनेवाले हे सतत गैरहजर असल्याने त्या बाबतचा कोणताही खुलासा होऊ शकत नाही. त्यामुळे सदरचा मुळ दुरदर्शन संच हा पूर्णपणे बदलून देणे योग्य होणार नाही. त्याऐवजी त्या बाबत होणारी दुरुस्ती किंवा भाग बदलून देणे शक्य आहे असे मंचाचे मत आहे. परंतु तक्रारदार यांनी दुरदर्शन संच दुरुस्ती करुन मिळण्याबातची विनंती केलेली नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा दुरदर्शन संच हा वॉरंटी कालावधीत असल्याने योग्य वेळेत पूर्णपणे दुरुस्त करुन देणे गरजेचे व न्यायाचे होते. परंतु तशी दुरुस्ती सामनेवाले यांनी आजपावेतो केलेली नाही. यावरुन सामनेवाले नं. १ व २ यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होत आहे.
सदर दुरदर्शन संच हा सामनेवाले यांनी वॉरंटी कालावधीत दुरुस्त न केल्याने सदर दुरदर्शन संचाची खरेदी केलेली किंमत ही तक्रारदारास परत करणे योग्य होईल. सदरचा दुरदर्शन संच हा दि.०८-०७-२००८ रोजी घेतलेला असल्याने व त्यामध्ये उत्पादीत दोष दि.२२-०८-२०१२ रोजी निर्माण झाला असल्यामुळे, सदर दोष हा जवळ जवळ चार वर्षाने निर्माण झालेला दिसत आहे. याचा विचार करता सदरचा दुरदर्शन संच पुर्णपणे बदलून देण्याऐवजी त्याची मुळ रक्कम परत करणे योग्य होईल. परंतु सदर दुदर्शन संच परत करतांना त्यावर सुमारे चार वर्षाचा ६ % प्रमाणे होणारा घसारा रु. १,५३६/- वजा जाता येणारी उर्वरीत रक्कम रु.६,४६४/- ही सामनेवाले नं. १ व २ यांनी तक्रारदारास परत करणे योग्य होईल. या बाबीचा विचार करता मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) वरील सर्व कारणांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले नं.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिक रित्या, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) सदर दुरदर्शन संचाची मुळ किंमत घसारा वजा जाता येणारी रक्कम ६,४६४/- (अक्षरी रु.सहा हजार चारशे चौसष्ठ माञ) तक्रारदारास देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी ६ % व्याजासह द्यावी.
(२) तक्रारदारास मानसिक ञसापोटी रक्कम ५००/- (अक्षरी रु.पाचशे माञ) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम ५००/- (अक्षरी रु.पाचशे माञ) द्यावेत.
धुळे.
दिनांकः २१/०६/२०१३.
(सौ.एस.एस.जैन.) (सौ.वी.वी.दाणी.)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.