निकालपत्र :- (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला तसेच त्यांचे वकिल गैरहजर. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, कोल्हापूर येथील महानगरपालिका हद्दीतील ई वॉर्ड, राजारामपुरी, 7 वी गल्ली येथील सि.स.नं.1871/अ/ब/क/ड ही मिळकत सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी विकसित केली. सदर मिळकतीवर बांधण्यात आलेल्या ‘कदम कॉम्प्लेक्स अपार्टमेंटमधील तळमजल्यावरील दुकान गाळा नं.3, क्षेत्र 107.99 चौ.फूट सदर दुकानगाळा खरेदी घेणेबाबतचा करार सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांचेबरोबर दि.01.04.1995 रोजी झालेला आहे व कराराप्रमाणे रुपये 1 लाख मोबदल्यापैकी रक्कम रुपये 25,000/- कराराच्या दिवशी अदा केले आहेत व उर्वरित रक्कम रुपये 75,000/- सामनेवाला यांना वेळोवेळी अदा केले आहेत. परंतु सामनेवाला यांनी करारानंतर मिळकतीचा कब्जा दिला. परंतु, भोगवटा प्रमाणपत्र, डीड ऑफ डिक्लेरेशन करुन तक्रारदारांना नोंद खरेदीपत्र करुन दिले नाही व वेळोवेळी थोडे दिवस थांबा असे सांगून खरेदीपत्र करुन दिले नाही. तसेच, दि.01.04.1995 चे करारपत्र दि.01.06.2009 रोजी रुपये 100/- च्या स्टॅम्पवर नोटरी करुन दिलेला आहे. तसेच, सामनेवाला यांना वकिलामार्फत नोटीसही पाठविलेली आहे. सबब, दुकानगाळयाचे खरेदपत्र करुन देणेचाआदेश व्हावा. त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 75,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत दुकानगाळा नं.3 चे साठेखत, दि.01.06.2009 रोजीचे करार वजा पत्र, प्रॉपर्टी कार्डस्, दि.03.03.2010 रोजीची वकिलामार्फत नोटीस, सामनेवाला क्र.7 चे नोटीसीस वकिलामार्फत दिलेले उत्तर, सामनेवाला फर्मने दिलीपराव कदम यांना दिलेले वटमुखत्यारपत्र इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्यातक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सदर सामनेवाला यांनी नोंद खरेदीपत्र करुन देणेचे टाळलेले नाही. मूळ मिळकतीचे मालक-श्री.शिवाजीराव आबाजीराव कदम, यशवंतराव आबाजीराव कदम व हणमंतराव आबाजीराव कदम हे मयत झाले आहेत. कायदेशीर बाबींची पूर्तता करुन नविन वटमुखत्यारपत्र देणेबाबत सदर मयतांचे वारदारांना लेखी कळविले आहे. परंतु, त्यांनी अद्याप कागदपत्रे पूर्ण करुन दिलेली नाही. सामनेवाला हे खरेदीपत्र पूर्ण करुन देणेस तयार आहेत. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे ते खरेदीपत्र पूर्ण करु देवू शकत नाहीत. त्यामुळे पुढील योग्य ते आदेश व्हावेत व नुकसान भरपाईची मागणी मान्य करणेत येवू नयेत अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे, उपलब्ध कागदपत्रे यांचे अवलोकन केल आहे. तक्रारीत उल्लेख केलेलली मिळकत सामनेवाला यांनी विकसित करुन त्या ठिकाणी कदम कॉम्प्लेक्स नांवाचे अपार्टमेंट बांधलेले आहे वतक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सदर इमारतीती तळमजला दुकानगाळा नं.3 याचे करारपत्र सामनेवाल बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना करुन दिले आहे. सदर करारपत्रानुसार ठरलेली रक्कम रुपये 1 लाख सामनेवाला यांन स्विकारलेले आहेत ही वस्तुस्थिती सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये मान्य केलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारीत उल्लेख केलेल्या मिळकतीचे मुळ मालकाकडून वटमुखत्यार घेवून सदर मिळकत विकसित केलेली आहे व त्या अनुषंगाने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे दुकान गाळा नं.3 चे तक्रारदारांना खरेदीपत्र करुन दिलेले आहे. त्यामुळे सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना नोंद खरेदीपत्र करुन दिलेले नाही. त्यामुळे त्यास सेवेत त्रुटी झाली आहे या निष्कर्षाप्रत हे मचं येत आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेला करार हा दि.01.04.1995 रोजी झाला आहे व त्यानंतर दि. 01.06.2009रोजी पुन्हा करारपत्रामध्ये नुतनीकरण करुन त्याची जबाबदारी घेतली आहे. अशी वस्तुस्थिती असतानाही सामनेवाला यांनी तक्रारदारांना नोंद खरेदीपत्र करुन दिलेले नाही. याचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. उपरोक्त विवेचन विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना करारात उल्लेख केलेप्रमाणे दुकान गाळा नं.3 चे महानगरपालिकेकडून बांधकाम पूर्तता प्रमाणपत्र घेवून नोंद खरेदीपत्र करुन द्यावे. 3. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्योवत. 4. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |