Maharashtra

Nagpur

EA/32/2017

K.K. Dwivedi - Complainant(s)

Versus

M/s Jham Builders &Developers Pvt Ltd , Through Chief Managing Director Hement Jham - Opp.Party(s)

Adv. S.K.Paunikar

29 Oct 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Execution Application No. EA/32/2017
( Date of Filing : 02 Mar 2017 )
In
Complaint Case No. CC/664/2015
 
1. K.K. Dwivedi
R/o. B-2/401, Sahara City Homes, Hardoi Bypass Road, Near IIM, Lucknow, Aternate Address c/o. Kailasnath Mehetre, Tower No. 6, Flat No. 406, Lake View Enclave, Wadi Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Kusum K. Dwivedi
R/o. B-2/401, Sahara City Homes, Hardoi Bypass Road, Near IIM Lucknow, Aternate Address- C/o. Kailasnath Mehetre, Tower No. 6, Flat No. 406, Lake View Enclave, Wadi, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. M/s Jham Builders &Developers Pvt Ltd , Through Chief Managing Director Hement Jham
10,Paryavaran Nagar Somalwada Wardha Road Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Adv. S.K.Paunikar, Advocate for the Appellant 1
 
Dated : 29 Oct 2021
Final Order / Judgement

 

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये-

  1.       प्रस्‍तुत दरखास्‍त प्रकरण गैरअर्जदार यांनी मंचाने मुळ तक्रारीत पारित केलेल्‍या अंतिम आदेशाचे पालन केले नाही म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 25 अंतर्गत दाखल केलेली आहे.

 

  1.      अर्जदाराने गैरअर्जदार विरुध्‍द ग्राहक तक्रार क्रमांक 664/2015 मंचात दाखल केली होती. त्‍या तक्रारीमध्‍ये मंचाने दिनांक 02.04.2016 ला आदेश पारित करुन तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करतांना विरुध्‍द पक्ष यांना आदेशित केले होते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडून घेतलेली रक्‍कम रुपये 4,95,500/-, दि. 11.01.2011 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 11 टक्‍के व्‍याजासह प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत परत करावी.  तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या  शारिरीक, मानसिक त्रासापोटी रुपये 15,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 5,000/- द्यावे असा आदेश पारित झाला होता व सदरचा आदेशाची अंमलबजावणी 30 दिवसाच्‍या आंत करावयाची होती.

 

 

  1.      मंचाने तक्रार क्रमांक 664/2015 मध्‍ये दिनांक 02.04.2016 रोजी पारित  केलेल्‍या आदेशाचे गैरअर्जदाराने 30 दिवसाच्‍या मुदतीत पालन केले नाही आणि मंचाचे आदेशाची अवमानना केली. त्‍यामुळे अर्जदारास प्रस्‍तुत दरखास्‍त मंचासमोर दाखल करावी लागली.

 

  1.      अर्जदाराने सदर दरखास्‍त अर्ज सादर करुन दिनांक 02.04.2016 रोजीच्‍या  मंचाच्‍या आदेशाप्रमाणे रक्‍कम रुपये4,95,500/- दिनांक 11.01.2011 पासून रक्‍कम तक्रारकर्त्‍याच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत 11 टक्‍के  व्‍याजासह देण्‍यात यावे. तसेच आदेशित झालेल्‍या मानसिक, शारीरिक त्रासापोटी खर्च व तक्रार खर्च देण्‍याकरीता गैरअर्जदार विरुध्‍द वसुली प्रमाणपत्र देण्‍याची मागणी केली.
  2.      अर्जदाराची दरखास्‍त दाखल झाल्‍यानंतर गैरअर्जदाराला नोटीस प्राप्‍त होऊन ही मंचासमक्ष हजर झाले नाही अथवा आपला लेखी जबाब दाखल केला नाही. त्‍यामुळे गैरअर्जदारा विरुध्‍द एकतर्फी प्रकरण चालविण्‍याचा आदेश दिनांक 10.01.2020 रोजी पारीत केला. त्‍यामुळे गैरअर्जदाराने मंचाचे आदेशाचे पालन केले नसल्‍याचे सिद्ध होते.
  3.      प्रस्‍तुत दरखास्‍त प्रकरणातील मुळ ग्राहक तक्रार क्रमांक 664/2015 मधील दिनांक 02.04.2016 रोजीचे आदेशाची अंमलबजावणी करण्‍यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 25 नुसार मंजूर होण्‍यास पात्र आहे. जमीन महसुलीच्‍या थकीत रक्‍कमेचा वसुली पद्धतीने ( Recovery of Arrears of land revenue) गैरअर्जदाराची चल/अंचल संपत्‍ती जप्‍ती करुन आदेशित रक्‍कम जिल्‍हाधिकारी, नागपूर यांनी अर्जदारास मिळवून देणे क्रमप्राप्‍त आहे. अर्जदाराची दरखास्‍त ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 25 नुसार मंजूर करुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

 

 

अंतिम आदेश

 

  1. अर्जदाराची दरखास्‍त पुढील निर्देशासह मंजूर करण्‍यात येते.
  2. प्रबंधक यांनी आदेशाची प्रत व मुळ तक्रारीतील अंतिम आदेशाची प्रत (Operative Part) वसुली दाखल्‍यासह जिल्‍हाधिकारी नागपूर यांना वसुलीकरिता पाठवावी.
  3. जिल्‍हाधिकारी नागपूर किंवा त्‍यांनी नेमलेले अधिकारी यांनी जमीन महसुलाच्‍या  थकीत रक्‍कमेचा वसुली पद्धतीने ( Recovery of Arrears of land revenue) दिलेल्‍या वसुली दाखल्‍यानूसार रुपये 4,95,500/- दिनांक 11.01.2011 पासून द.सा.द.शे. 11 टक्‍के दराने व्‍याजासह प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत व नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 15,000/-, तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 5000/- गैरअर्जदाराकडून वसूल करुन अर्जदारास द्यावे.
  4. जिल्‍हाधिकारी यांनी वसुलीबाबतचा अहवाल या आयोगाकडे सादर करावा.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.