Maharashtra

Nagpur

CC/1/2019

SHRI. ASHISH HARIBHAU TAYWADE - Complainant(s)

Versus

M/S JHAM BUILDERS AND DEVELOPERS THROUGH MANAGING DIRECTOR SHRI HEMNAT SIKANDAR JHAM - Opp.Party(s)

ADV UDAY P KHIRSAGAR

06 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/1/2019
( Date of Filing : 01 Jan 2019 )
 
1. SHRI. ASHISH HARIBHAU TAYWADE
67, DINPRAJAHIT HOUSING SOCIETY, NEAR SHREE COMPLEX, NARENDRA NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SMT. NIVEDITA SATISH MUMULVAR URF NIVEDITA HARIBHAU TAYWADE
67, DINPRAJAHIT HOUSING SOCIETY, NEAR SHREE COMPLEX, NARENDRA NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S JHAM BUILDERS AND DEVELOPERS THROUGH MANAGING DIRECTOR SHRI HEMNAT SIKANDAR JHAM
PLOT NO 10, PARYAVARAN NAGAR, SOMALWADA, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI HEMANT SIKANDAR JHAM
CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR JHAM BUILDERS AND DEVELOPERS
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 06 Mar 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर. आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे मौजा बेसा, खसरा नंबर ६/२-७/२, प्‍लॉट नंबर १,२,३,४,५,६,७,८,९ व १०, पटवारी हलका नंबर ३८, नागपूर येथे उभारलेल्‍या  कन्‍हैया हाईट-१ मधील दुकान नंबर ६ (ग्राऊंड फ्लोअर ऐ विंग), एकूण क्षेञफळ १८० चौ.फुट, एकूण रक्‍कम रुपये ५,४५,०००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचा विरुध्‍द पक्षाशी रुपये १००/- किंमतीच्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर करारनामा दिनांक १८/७/२०१४ रोजी केला. करारानुसार दुकान बुकींगपोटी तक्रारकर्त्‍याला एकूण खरेदी किंमतीच्‍या ४० टक्‍के रक्‍कम विरुध्‍द पक्षाला अदा करावयाची होती. तक्रारकर्त्‍याने धनादेशाव्‍दारे दिनांक २५/६/२०११ रुपये २१,०००/-, दिनांक २०/०७/२०११ रोजी रुपये ७५,०००/-, दिनांक १२/८/२०११ रोजी रुपये ७०,०००/-, दिनांक २/१२/२०११ रोजी रुपये ५०,०००/-, दिनांक ८/१२/२०११ रोजी रुपये ७४,०००/- व दिनांक २३/०६/२०१४ रोजी रुपये १,००,०००/- असे एकूण रुपये ३,९०,०००/- अदा केले. उर्वरीत ३० टक्‍के रक्‍कम रुपये १,००,०००/- प्‍लींथ लेवल चे काम पूर्ण झाल्‍यावर व रुपये ५५,०००/- दुकानाचे फिनीशिंग पूर्ण झाल्‍यावर आणि ताबा देतेवेळी द्यावयाचे होते. दुकानाचे खरेदीपोटी संपूर्ण रक्‍कम अदा केल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला दुकानाचे विक्रीपञ करुन देणार होते.
  3. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक २४/०६/२०१४ ते दिनांक ८/१२/२०१४ या दरम्‍यान रुपये १,८५,३००/- विरुध्‍द पक्षाला अदा केले असे एकूण दुकानाचे खरेदीपोटी विरुध्‍द पक्षाला रुपये ५,७५,३००/- अदा केले. तक्रारकर्त्‍याने दुकान खरेदीपोटी विरुध्‍द पक्षाला विकसनशुल्‍कासह एकूण रुपये ५,७५,३००/- देऊनही विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला विक्रीपञ करुन दिेले नाही. करीता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक १२/१२/२०१८ ला कायदेशीर नोटीस पाठविली परंतू ती प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या पाठविलेल्‍या नोटीस ची दखल घेतली नाही. करीता तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मौजा बेसा, खसरा नंबर ६/२-७/२, प्‍लॉट नंबर १,२,३,४,५,६,७,८,९ व १०, पटवारी हलका नंबर ३८, नागपूर येथे उभारलेल्‍या कन्‍हैया हाईट-१ मधील दुकान नंबर ६ (ग्राऊंड फ्लोअर ऐ विंग), एकूण क्षेञफळ १८० चौ.फुट, चे विक्रीपञ करुन द्यावे.
  2. मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- अदा करावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना मंचामार्फत रजिस्‍टर्ड पोस्‍टाव्‍दारे नोटीस पाठविण्‍यात आली व ती प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ मंचासमक्ष हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक १/८/२०१९ रोजी पारित करण्‍यात आला.
  1. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवज व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर खालिल मुद्दे विचारात घेतले व त्‍यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                         मुद्दे                                                                  उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?        होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे मौजा बेसा, खसरा नंबर ६/२-७/२, प्‍लॉट नंबर १,२,३,४,५,६,७,८,९ व १०, पटवारी हलका नंबर ३८, नागपूर येथे उभारलेल्‍या  कन्‍हैया हाईट-१ मधील दुकान नंबर ६ (ग्राऊंड फ्लोअर ऐ विंग), एकूण क्षेञफळ १८० चौ.फुट, एकूण रक्‍कम रुपये ५,४५,०००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचा विरुध्‍द पक्षाशी रुपये १००/- किंमतीच्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर करारनामा दिनांक १८/७/२०१४ रोजी केला. करारानुसार तक्रारकर्त्‍याने दुकान खरेदीपोटी विरुध्‍द पक्षाला दिनांक २५/०६/२०११ ते दिनांक ८/१२/२०१४ या कालावधीत विकसनशुल्‍कासह एकूण रक्‍कम रुपये ५,७५,३००/- देऊनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विक्रीपञ करुन दिले नाही हे विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती ञुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. करीता खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने मौजा बेसा, खसरा नंबर ६/२-७/२, प्‍लॉट नंबर १,२,३,४,५,६,७,८,९ व १०, पटवारी हलका नंबर ३८, नागपूर येथे उभारलेल्‍या कन्‍हैया हाईट-१ मधील दुकान नंबर ६ (ग्राऊंड फ्लोअर ऐ विंग), एकूण क्षेञफळ १८० चौ.फुट, चे नोंदनीकृत विक्रीपञ तक्रारकर्त्‍याला करुन द्यावे व विक्रीपञाचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

किंवा

     विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना तांञिक अडचणीमुळे मौजा बेसा, खसरा नंबर ६/२-७/२, प्‍लॉट नंबर १,२,३,४,५,६,७,८,९ व १०, पटवारी हलका नंबर ३८, नागपूर येथे उभारलेल्‍या कन्‍हैया हाईट-१ मधील दुकान नंबर ६ (ग्राऊंड फ्लोअर ऐ विंग), एकूण क्षेञफळ १८० चौ.फुट, चे विक्रीपञ करुन देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याकडुन वादातील दुकानाचे विक्रीपोटी स्विकारलेली संपूर्ण रक्‍कम रुपये ५७५३००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावे व सदर रकमेवर द.सा.द.शे. १४ टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावे.

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  2. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.

तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी..

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.