Maharashtra

Nagpur

CC/172/2019

SAU NANDA ABDE ALI VAZIR - Complainant(s)

Versus

M/S J. M. JEWELERS THROUGH ITS PROPRIETOR SHRI GOPAL JAADIYA - Opp.Party(s)

ADV S. B. CHOURASIYA

26 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/172/2019
( Date of Filing : 12 Mar 2019 )
 
1. SAU NANDA ABDE ALI VAZIR
NEAR 10 NUMBER PUL BRIDGE, SADODAYA APARTMENT, KAMPTEE ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S J. M. JEWELERS THROUGH ITS PROPRIETOR SHRI GOPAL JAADIYA
SITUATED AT SARAFA BAZAR, ITWARI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV S. B. CHOURASIYA, Advocate
For the Opp. Party:
Dated : 26 Feb 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

  1.     तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की,  विरुध्‍द पक्ष यांचा सोने चांदी, खरेदी-विक्रीचे इतवारी येथे  दुकान आहे. तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची  नियमित ग्राहक आहे. तक्रारकर्तीने वि.प.कडून 7 ग्रॅम सोन्‍याचे दागिने या शर्तीवर खरेदी केले होते की, जेव्‍हा सदरचे दागिने परत करावयाचे असेल तेव्‍हा विरुध्‍द पक्ष तिला या दागिन्‍यांच्‍या एकूण किंमतीमधून 10 टक्‍के रक्‍कम कपात करुन उर्वरित 90 टक्‍के रक्‍कम परत करतील या विरुध्‍द पक्षाच्‍या बोलण्‍यावर विश्‍वास ठेवून विरुध्‍द पक्षाकडून  सोन्‍याचे 7 ग्रॅमचे कंगन रुपये 4,500/- च्‍या भावाने विकत घेतले. तेव्‍हा त्‍याची किंमत रुपये 3,350/- इतकी होती. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने सदरच्‍या दागिन्‍यांची किंमत दिनांक 23.10.2000 रोजी रुपये 3,350/- ची पावती दिली. त्‍यानंतर तक्रारकर्तीला सदरचे दागिने विरुध्‍द पक्षाला जानेवारी 2018 मध्‍ये विकावयाचे होते. तेव्‍हा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला सदरच्‍या 7 ग्रॅम कंगनची रक्‍कम परत केली नाही व आपले वचन पाळले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीने दि. 21.02.2018 व 07.06.2018 या तारखेला कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल घेतली नाही व दिलेल्‍या आश्‍वासनाप्रमाणे रक्‍कम ही परत केली नाही. 10 ग्रॅम  सोन्‍याच्‍या दागिन्‍याचा दर रुपये 4,500/- इतका होता आणि जानेवारी 2018 मध्‍ये 10 ग्रॅम सोन्‍याचा दर रुपये 30,000/- ते 31,000/- इतका आहे म्‍हणजेच 7 ग्रॅम कंगनचा दर रुपये 21,000/- ते 22,000/- इतका असावा. त्‍यामुळे तक्रारकर्तीने ही रक्‍कम मिळण्‍याकरिता प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

 

  1.      तक्रारकर्तीने आपल्‍या तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्ष यांनी 7 ग्रॅम सोन्‍याचे कंगन करिता रुपये 22,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश व्‍हावा अशी मागणी केलेली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ती घेण्‍यास नकार दिल्‍यामुळे सदरची नोटीस मंचात परत आली. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 30.12.2019 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाचे काळजीपूर्वक अवलोकन केले. तसेच त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्‍यात आला असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

                    अ.क्रं.      मुद्दे                          उत्‍तर

1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय ?होय

  1.   काय  आदेश  ?              अंतिम  आदेशानुसार

 

  •    निष्‍कर्ष

 

  1.  मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडून 7 ग्रॅम सोन्‍याचे  कंगन रुपये 4,500/- च्‍या भावाने दिनांक 23.10.2000 रोजी रुपये 3,350/- चे घेतले व त्‍याबाबतची पावती पावती नि.क्रं. 2 वर दाखल केली आहे. यावरुन तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला आश्‍वासित केले होते की, ज्‍यावेळी तक्रारकर्ती सदरचे 7 ग्रॅम सोन्‍याचे कंगन परत करेल त्‍यावेळी तिला त्‍यावेळेच्‍या दराप्रमाणे रक्‍कम परत करेल.  विरुध्‍द पक्षाच्‍या या आश्‍वानाप्रमाणे जेव्‍हा तक्रारकर्ती सदरचे 7 ग्रॅम सोन्‍याचे कंगन जानेवारी 2018 मध्‍ये विरुध्‍द पक्षाला परत करण्‍याकरिता गेली असता तक्रारकर्तीला 7 ग्रॅम कंगनची त्‍या दिवशीच्‍या दराप्रमाणे रक्‍कम मिळणे आवश्‍यक होते व ही रक्‍कम परत मिळण्‍याकरिता तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला अनेक वेळा विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या तक्रारीची दखल घेतली नाही व तक्रारकर्तीला दिलेल्‍या आश्‍वासनाप्रमाणे पूर्तता केली नाही, ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे सिध्‍द होते. म्‍हणून विरुध्‍द पक्ष यांनी आज आदेशाच्‍या दिवशी 10 ग्रॅम सोन्‍याची बाजारभावाप्रमाणे असलेली किंमत रुपये 43,000/- इतकी असल्‍यामुळे तक्रारकर्तीला 7 ग्रॅम सोन्‍याच्‍या कंगनची किंमत रुपये 30,100/- इतके देणे आवश्‍यक आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.                                                                                                                                                                                                        सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

                         अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला 7 ग्रॅम सोन्‍याच्‍या कंगनची किंमत रुपये 30,100/- द्यावी व सदरहू रक्‍कमेवर आदेश पारित दिनांक 26.02.2020 पासून ते रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत तक्रारकर्तीला द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने वयाज द्यावे.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रक्‍कम रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रक्‍कम रुपये 2,000/- परत करावी.
  3. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने परत करावी.
  4. तक्रारकर्तीला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.