Maharashtra

Nagpur

CC/398/2019

SMT. PRABHABAI BHOJRAJ PARDHI - Complainant(s)

Versus

M/S INFRATECH REAL ESTATE PVT. LTD., THROUGH PROPRIETOR - Opp.Party(s)

ADV. ABHAY M. PATNKAR

05 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/398/2019
( Date of Filing : 17 Jul 2019 )
 
1. SMT. PRABHABAI BHOJRAJ PARDHI
R/O. PLOT NO. 1-B, 65, SHANTINAGAR COLONY, ITWARI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S INFRATECH REAL ESTATE PVT. LTD., THROUGH PROPRIETOR
R/O. MAHATMA FULEY NAGAR, SOMALWADA, WARDHA ROAD, NAGPUR-440025
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. VIJAY ANANDRAO SHELKE, PROP. M/S INFRATECH REAL ESTATE PVT. LTD.
R/O. MAHATMA FULEY NAGAR, SOMALWADA, WARDHA ROAD, NAGPUR-440025
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 05 Mar 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष यांचे सेक्‍टर-८ व्‍ही.सी. ४ या स्‍कीम मधील प्‍लॉट क्रमांक १,बयाणा रक्‍कम रुपये २१,०००/- अदा करुन बुक केला. तक्रारकर्तीने प्‍लॉट चे खरेदीपोटी विरुध्‍दपक्षाला दिनांक १३/१०/२०१० रोजी रुपये २१,०००/- दिनांक २१/१०/२०१० रोजी रुपये ६५,०००/-, दिनांक १०/१०/२०१० रोजी रुपये ५४,०००/-, दिनांक २३/११/२०१० रोजी रुपये २०,०००/- आणि दिनांक १२/१२/२०१० रोजी रुपये ४०,०००/- असे एकूण रुपये २,००,०००/- अदा केले. विरुध्‍द पक्षाने रक्‍कम मिळाल्‍याची पावती तक्रारकर्तीला केली. विरुध्‍द  पक्षाला तक्रारकर्तीकडुन संपूर्ण रक्‍कम मिळूनही विरुध्‍द पक्ष तक्रारकर्तीला  प्‍लॉटचे विक्री करारनामा किंवा अलॉटमेंट पञ देण्‍यास टाळाटाळ करीत होता. तक्रारकर्तीला विरुध्‍द पक्षाकडुन कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्‍यामुळे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट खरेदीपोटी दिलेल्‍या रकमेची मागणी केली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीस रक्‍कम देण्‍याची बाब मंजूर केली. परंतू विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्तीला दिलेल्‍या मुळ पावत्‍या विरुध्‍द पक्षाला परत केल्‍यावर विरुध्‍द पक्ष तक्रारकर्तीला रुपये २,००,०००/- देण्‍याचे कबुल केले. तक्रारकर्तीने तिच्‍याजवळ असलेल्‍या संपूर्ण मुळ पावत्‍यांची प्रतिलीपी काढुन त्‍या  विरुध्‍दपक्षाला दिल्‍याची पोच घेतली. त्‍याचबरोबर विरुध्‍द पक्षाने  प्‍लॉट रद्द केल्‍याबाबतचे लेटर सुद्धा दिनांक २१/१२/२०१५ रोजी तक्रारकर्तीस दिले.  परंतू आजपर्यंत तक्रारकर्तीस प्‍लॉट खरेदीपोटी दिलेली रक्‍कम रुपये २,००,०००/- परत मिळाली नाही. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाचे कार्यालयाला अनेकदा भेटी दिल्‍या व रकमेची मागणी केली परंतू विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दिले नाही. करीता तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्षाला दिनांक १२/०६/२०१९ रोजी कायदेशीर नोटीस पाठविली व ती विरुध्‍द पक्षाला दिनांक २१/०६/२०१९ रोजी प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्षाने नोटीस ची दखल घेतली नाही. करीता तक्रारकर्तीने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, तक्रारकर्तीला दिलेली एकूण रक्‍कम रुपये २,००,०००/-, १८ टक्‍के व्‍याजासहीत परत करण्‍याचे आदेश द्यावे.
  2. मानसिक व शारिरीक ञासाकरीता व तक्रारीचा खर्च अदा करावा.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ ला मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. विरुध्‍द पक्षाला नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष मंचासमोर हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक ३/१०/२०१९ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल केलेले दस्‍ताऐवज व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे नोंदविले आहे.

       अ.क्र.                           मुद्दे                                                                 उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?        होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष यांचे सेक्‍टर-८ व्‍ही.सी. ४ या स्‍कीम मधील प्‍लॉट क्रमांक १,बयाणा रक्‍कम रुपये २१,०००/- अदा करुन बुक केला. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला दिनांक १३/१०/२०१० ते दिनांक १२/१२/२०१० या कालावधीत विरुध्‍द पक्षाकडुन प्‍लॉट क्रमांक १ चे खरेदीपोटी एकूण रुपये २,००,०००/- अदा केले. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजांचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे. विरुध्‍द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्‍याचा करार केला आहे. तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC)  या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍याचे अधिकार आहे. विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्तीला संपूर्ण रक्‍कम मिळूनही तक्रारकर्तीला विक्री करारनामा करुन दिला नाही. तसेच तक्रारकर्तीकडुन प्‍लॉट खरदीपोटी दिलेल्‍या संपूर्ण मुळ पावत्‍या स्‍वतःकडे घेऊन तक्रारकर्तीला रुपये २,००,०००/- देण्‍याचे कबुल करुनही विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्तीला रुपये २,००,०००/- परत केले नाही. ही विरुध्‍दपक्षाची तक्रारकर्तीप्रती ञुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना निर्देश देण्‍यात येते की, यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे वादातील प्‍लॉट नंबर १ चे विक्रीपोटी तक्रारकर्तीकडुन घेतलेली रक्‍कम रुपये २,००,०००/-, तक्रारकर्तीला अदा करावे व त्‍यावर द.सा.द.शे. १४ टक्‍के व्‍याज तक्रारकर्तीला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना निर्देश देण्‍यात येते की, यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारिरीक ञासाकरीता  रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.