Complaint Case No. CC/677/2018 | ( Date of Filing : 13 Nov 2018 ) |
| | 1. CHANDRAKANT PARASRAMJI SAGARKAR | R/O. BLOCK NO. F-114, NEAR K.D.K. COLLEGE, NIT GHARKUL, NANDANWAN, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/S INFRATECH REAL ESTATE PVT. LTD., THROUGH PROPRIETOR/ DIRECTOR | R/O. MAHATMA FULE NAGAR, SOMALWADA, WARDHA ROAD, NAGPUR-440025 | NAGPUR | MAHARASHTRA | 2. SHRI. VIJAY ANANDRAO SHELKE, PROPRIETOR/DIRECTOR-M/S. INFRATECH REAL ESTATE PVT. LTD. | R/O. MAHATMA FULE NAGAR, SOMALWADA, WARDHA ROAD, NAGPUR-440025 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश (आदेश पारित दि. 21.09.2019) मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. - तक्रारकर्त्याने तक्रारीत असे कथन केले की, विरुध्द पक्ष कंपनीने व्यंकटेश मेडोज या नावाने प्लॉट क्रं. 30, 31, 32, 33, 34, 35 , 36 व 37, खसरा क्रं. 47, 48/2, आणि 50, प.ह.नं. 1, मौजा- पिपरी, तह. कुही, जि. नागपूर येथे स्किम काढून सदर स्किम मध्ये दुकाने व रिकामी जागा असे सर्व विकसित करुन देऊन सदर स्किम जाहिराती द्वारे जाहीर केली होती. तक्रारकर्त्याने उपरोक्त स्किम मध्ये एक दुकान नं. जी-9, विंग नं. ए, एकूण क्षेत्रफळ 177.77 चौ.फु. (16.51 चौ.मी.) एकूण किंमत रुपये 4,26,648/- मध्ये खरेदी करण्याचा सौदा केला. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने सदर दुकानाच्या खरेदीपोटी विरुध्द पक्षाला दि. 14.01.2010 रोजी रुपये 50,000/- व दिनांक 18.01.2010 रोजी रुपये 45,000/- असे एकूण रुपये 95,000/- अदा केले व रक्कम मिळाल्याबाबतची तक्रारकर्त्याला पावती देण्यात आली.
- तक्रारकर्त्याने पुढे असे नमूद केले की, विरुध्द पक्षाला वरीलप्रमाणे दुकान विक्रीपोटी रुपये 95,000/- मिळाल्यानंतर त्याने तक्रारकर्त्याला दिनांक 12.06.2010 रोजीचे ताबापत्र/ ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यानंतर तक्रारकर्ता विरुध्द पक्षाच्या कार्यालयात उपरोक्त स्किमचे बांधकामबाबत विचारणा करण्यास अनेक वेळा गेला, परंतु विरुध्द पक्षाने त्याबाबत कोणतेही उत्तर न देता त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तसेच सदरच्या दुकानाबाबतचे कोणतेही कागदपत्रे दिले नाही. यावरुन त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने पोलिस निरीक्षक, सोनेगांव, येथे दि. 30.08.2018 रोजी विरुध्द पक्षा विरुध्द तक्रार दाखल केली. तसेच दि. 01.10.2018 रोजी तक्रारकर्त्याने आपल्या वकिला मार्फत विरुध्द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस दि. 03.10.2018 रोजी प्राप्त होऊन ही विरुध्द पक्षाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून घेतलेली रक्कम रुपये 95,000/- 18 टक्के दराने व्याजासह परत करावी. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश व्हावा.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन ते मंचासमक्ष हजर न झाल्यामुळे दि.17.05.2019 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नोंदविली.
मुद्दे उत्तर - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा देऊन
अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला काय ॽहोय - काय आदेश ॽ अंतिम आदेशानुसार
कारणमिमांसा - मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून व्यंकटेश मेडोज या नावाने प्लॉट क्रं. 30, 31, 32, 33, 34, 35 , 36 व 37, खसरा क्रं. 47, 48/2, आणि 50, प.ह.नं. 1, मौजा- पिपरी, तह. कुही, जि. नागपूर येथील प्रस्तावित योजनेमधील दुकान क्रं. जी-9, विंग नं. ए, एकूण क्षेत्रफळ 177.77 चौ.फु. (16.51 चौ.मी.) एकूण किंमत रुपये 4,26,648/- मध्ये खरेदी करण्याचा सौदा केला होता व त्यापोटी एकूण रुपये 95,000/- विरुध्द पक्षाला अदा केले हे नि.क्रं. 2 (1) वर दाखल दस्तावेजावरुन स्पष्ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे सिध्द होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून दुकान विक्रीपोटी अग्रिम राशी स्वीकारुन ही तसेच ताबापत्र/ ना हरकत प्रमाणपत्र देऊन ही प्रस्तावित योजनेमधील दुकान नं. जी-9 चे बांधकाम केले नाही. तसेच तक्रारकर्त्याने दुकान खरेदी पोटी विरुध्द पक्षाकडे जमा केलेली रक्कम परत मिळण्याबाबतची अनेक वेळा मागणी करुन ही उपरोक्त रक्कम विरुध्द पक्षाने परत केली नाही ही विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्याचे स्पष्ट होते. म्हणून तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडून दुकान खरेदी पोटी दिलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून घेतलेली रक्कम रुपये 95,000/- परत करावी व
सदरहू रक्कमेवर दिनांक 18.01.2010 पासून द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज रक्कमेच्या प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत तक्रारकर्त्याला अदा करावे. - विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान
भरपाई म्हणून रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे. - वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक
महिन्याच्या आत विरुध्द पक्षाने करावी. - उभय पक्षानां आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |