अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
- // कारणमिमांसा //-
4. मुद्दा क्र.1 बाबतः- तक्रारकर्त्याने निशाणी क्र.4 वर दाखल केलेल्या दस्तावेजांची पडताळणी करतांना असे दिसून आले की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे वादातीत प्लॉटचे बुकींग करण्याकरीता रु.1,16,000/- दिले होते व त्याबाबत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास पावत्याही दिलेल्या आहेत. यावरुन असे सिध्द होते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास वादातीत प्लॉटचे बुकींग करीता सदर रक्कम दिलेली होती. सबब तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ‘ग्राहक’, आहे हे सिध्द होते. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविले आहे.
5. मुद्दा क्र.2 बाबतः- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास प्लॉटचे विक्रीपत्र करुन दिले नाही तसेच नोटीस पाठवुन सुध्दा प्लॉटच्या बुकींगकरीता भरलेली रक्कमही परत केली नाही, हे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन सिध्द होते. तसेच विरुध्द पक्ष सदर प्रकरणाची नोटीस मिळूनही गैरहजर राहीले, यावरुन हे सिध्द होते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे त्यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविले आहे.
6. मुद्दा क्र.3 बाबतः- मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंचाव्दारे खालिल प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून वादातीत प्लॉटकरीता घेतलेली रक्कम रु.1,16,000/- दि.09.04.2011 पासुन अदायगी पर्यंत द.सा.द.शे.8% व्याजासह परत करावी.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
5. उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.