Maharashtra

Nagpur

CC/512/2018

SMT. KIRAN CHANDAN CHOUHAN - Complainant(s)

Versus

M/S INDIA SHELTER FINANCE CORPORATION LTD. (THE COMPANY OR ISFCL) THROUGH CHAIRMAN/DIRECTOR - Opp.Party(s)

ADV. MRS. S. K. PAUNIKAR

24 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/512/2018
( Date of Filing : 02 Aug 2018 )
 
1. SMT. KIRAN CHANDAN CHOUHAN
R/O. PLOT NO. 6, GULMOHAR NAGAR, GHASHIDAS NAGAR, NEAR SHRIMAN TRAVELS, GIRNAR COOPERATIVE SOCIETY, NAGPUR
NAGPUR
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/S INDIA SHELTER FINANCE CORPORATION LTD. (THE COMPANY OR ISFCL) THROUGH CHAIRMAN/DIRECTOR
OFF. AT, 6TH FLOOR, PLOT NO.15, INSTITUTIONAL AREA, 44, GURUGRAM, (HARAYANA) 122002
GURUGRAM
HARYANA
2. M/S INDIA SHELTER FINANCE CORPORATION LTD., THROUGH BRANCH MANAGER
3RD FLOOR, ABOVE BANK OF INDIA, KADBI CHOWK, KAMPTEE ROAD, NAGPUR
NAGPUR
Maharashtra
3. M/S SHRIRAM LIFE INSURANCE COMPANY LTD., THROUGH CLAIM MANAGER
5TH FLOOR, RAMKY SELENIUM, PLOT NO. 31,32, FINACIAL DISTRICT, (BESIDE ANDHRA BANK TRAINING CENTER), GACHIBOWLI, HYDERABAD-500032
HYDERABAD
ANDHRA PRADESH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV. MRS. S. K. PAUNIKAR, Advocate
For the Opp. Party:
Dated : 24 Feb 2020
Final Order / Judgement

आदेश

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण काद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, तिच्‍या पतीने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांच्‍याकडून मौजा- भरतवाडा,  खसरा क्रं. 69, प.ह.नं. 17, तह. जि. नागपूर या मिळकती मधील धनलक्ष्‍मी गृहनिर्माण सह.संस्‍था यांनी निर्माण केलेल्‍या प्‍लॉट क्रं. 36, क्षेत्रफळ 750 स्‍के.फिट. चे घर खरेदी करण्‍याकरिता रुपये 11,00,000/-चे गृहकर्ज दि. 23.06.2016 रोजी घेतले होते आणि त्‍याचवेळी तक्रारकर्तीच्‍या पतीने विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांच्‍याकडून श्रीराम लाईफ गृप लाईफ प्रोटेक्‍टर प्‍लॅन एस.पी. या पॉलिसी क्रं.  GN011508000391 प्रमाणे सदरहू गृहकर्ज हे संरक्षित केले होते. सदरहू पॉलिसीप्रमाणे जर तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु झाला तर विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांची सदरहू गृहकर्ज परतफेडीची जबाबदारी होती. परंतु तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या मृत्‍युनंतर विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांच्‍याकडून सदरहू गृहकर्जाची रक्‍कम मिळविण्‍यासाठी काहीही प्रयत्‍न केले नाही.

 

  1.      तक्रारकर्तीने पुढे असे नमूद केले की, तिचे पती अचानक दिनांक 01.07.2016 रोजी आजारी पडले, त्‍यावर डॉक्‍टरांनी चौकशी केली असता  तक्रारकर्तीच्‍या पतीला दि. 13.07.2016 रोजी कॅन्‍सर हॉस्‍पीटल, तुकडोजी चौक, मानेवाडा, नागपूर येथे भरती करण्‍यात आले आणि तिथे त्‍यावर सतत उपचार करण्‍यात आले. परंतु शेवटी तक्रारकर्तीच्‍या पतीचा दि. 02.02.2017 रोजी मृत्‍यु झाला. पतीच्‍या मृत्‍युनंतर तक्रारकर्तीने गृहकर्जाच्‍या रक्‍कमेबाबत इन्‍श्‍युरन्‍स कंपनीने पैसे दिला अथवा नाही याबाबत चौकशी केली आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांच्‍याकडून  No Objection Certificate आणि No Dues Certificate ची मागणी केली असता तिला असे समजले की, मृत्‍युचा दाखल दिल्‍यानंतर ही विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी गृहकर्जाची रक्‍कम मागणी करण्‍यासाठी विरुध्‍द पक्ष क्रं. 3 ला पत्र पाठविले नाही. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी ( SURFAESI Act 2002) सरफेसी कायद्याप्रमाणे गृहकर्ज रक्‍कम रुपये 12,70,409/- ची मागणी करणारी नोटीस तक्रारकर्तीला पाठविली.

 

  1.      तक्रारकर्तीने पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍युचा दाखल दिल्‍यानंतर ही जवळपास दिड वर्षा पर्यंत विरुध्‍द पक्ष यांनी गृहकर्जाची रक्‍कम मिळण्‍याकरिता काहीही कार्यवाही केली नाही आणि शेवटी अचानक नोटीस पाठविली. तक्रारकर्तीच्‍या पतीने गृहकर्जाची संपूर्ण रक्‍कम पॉलिसी द्वारे संरक्षित असल्‍यामुळे उर्वरित गृहकर्ज रक्‍कम देण्‍यास जबाबदार नाही. त्‍यानंतर तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांना त्‍वरित वकिलामार्फत नोटीस पाठविली आणि रक्‍कमेची मागणी केली. परंतु विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी सदरहू मागणी मान्‍य न केल्‍यामुळे तक्रारकर्तीने वर्तमान तक्रार मंचासमक्ष दाखल करुन केली खालीलप्रमाणे मागण्‍या केल्‍या आहेत.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांना पॉलिसीप्रमाणे गृहकर्ज संरक्षित रक्‍कम दि. 02.02.2017 पासून व्‍याजासह तक्रारकर्तीस देण्‍यात यावी.  

 

  1.  विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांना गृहकर्जाचे विवरण देण्‍याचा आदेश करण्‍यात यावा.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 5,00,000/- देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 6 वर दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, तक्रारीतील परिच्‍छेद क्रं. 1 व 2 मधील मजकूर नाकारलेला नाही. त्‍यांनी पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्तीच्‍या पतीने इन्‍श्‍युरन्‍स पॉलिसी असून त्‍याप्रमाणे विमा किस्‍त भरलेली आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी दि. 30.03.2017 च्‍या पत्राप्रमाणे तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारलेला आहे आणि तक्रारकर्तीच्‍या पतीला Buccal Mucosa (Cancer at Right lower Alveoli) झाल्‍याचे दि. 27.06.2016 रोजी निदान झालेले आहे आणि मयत चंदन कांचन चव्‍हान याने त्‍याबाबत विमा पॉलिसीमध्‍ये माहिती नमूद केली नव्‍हती, हे म्‍हणणे खरे नाही. त्‍यांनी पुढे परिच्‍छेद क्रं. 8 ते 18 मधील मजकूर नाकारलेला आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी आपल्‍या विशेष कथनात असे नमूद केले की, गृहकर्जाचा करारनामा हा दि. 30.06.2016 रोजी करण्‍यात आला आणि रक्‍कम रुपये 11,00,000/- मंजूर करुन तक्रारकर्तीच्‍या पतीला देण्‍यात आली. तक्रारकर्तीच्‍या पतीने सदरहू पॉलिसी विरुध्‍द पक्ष क्रं. 3 कडून घेतलेली होती. परंतु त्‍याने पूर्वीच्‍या आजाराबाबतची माहिती लपविल्‍यामुळे विमा कंपनीने विमा दावा नाकारला आहे आणि त्‍याबाबतचे पत्र दि. 30.03.2017 रोजी पाठविलेले आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी सरफेसी कायद्याप्रमाणे कार्यवाही केलेली आहे. म्‍हणून विरुध्‍द पक्ष 1 व 2 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 12 वर दाखल केला असून परिच्‍छेद क्रं. 1 ते 3 मधील मजकूर नाकारलेला नाही. परंतु परिच्‍छेद क्रं. 4 ते 18 मधील मजकूर नाकारलेला आहे. त्‍यांनी आपल्‍या विशेष कथनात असे नमूद केले की, तक्रारकर्तीच्‍या पतीने त्‍याच्‍या आरोग्‍यबाबतची महत्‍वाची माहिती लपवून ठेवली म्‍हणून सदरची तक्रार ही कायद्याप्रमाणे चालू शकत नाही. त्‍यांनी पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्तीच्‍या पतीने दि. 30.06.2016 ते 30.06.2036 या कालावधीकरिता पॉलिसी नं.MN160719017013529 ही Loan ID No. HL2900000066 प्रमाणे रुपये 11,00,000/- चे कर्ज संरक्षित करण्‍याकरिता काढलेली होती. त्‍यांनी पुढे असे नमूद केले की, सदरहू विमा पॉलिसी ही काही अटींवर मंजूर केलेली होती आणि तक्रारकर्तीच्‍या पतीने  Declaration of Good Health बाबतचा Form भरुन दिला होता आणि रुपये 22,473.91 पै. एवढया रक्‍कमेचा विमा हप्‍ता भरला होता. त्‍यांनी पुढे असे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या मृत्‍युबाबत विरुध्‍द पक्ष क्रं. 3 ला सूचना दिली होती आणि दि. 02.02.2017 रोजी त्‍याचा मृत्‍यु झाल्‍याचे कळविले होते. सदरहू सूचना विरुध्‍द पक्ष क्रं. 3 ला दि. 23.03.2017 रोजी मिळाली आणि तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा पॉलिसी काढल्‍यानंतर 7 महिन्‍याच्‍या आंत झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी विमा दाव्‍याची चौकशी केली असता राष्‍ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्‍सर हॉस्‍पीटल व रिसर्च सेंटर यांच्‍याकडील मेडिकल रेकॉर्ड मागविले. त्‍यावरुन तक्रारकर्तीच्‍या पतीला Buccal Mucosa (Cancer at Right lower Alveoli) झाल्‍याचे दि. 27.06.2016 रोजी निदान झालेले आहे असे दिसून आले आणि तक्रारकर्तीच्‍या पतीने सदरहू माहिती पॉलिसी काढतांना लपवून ठेवली होती.  म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारलेला आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी कोणत्‍याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नसल्‍यामुळे सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

 

  1.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

 अ.क्रं.                                मुद्दे                                                     उत्‍तर

 

1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 ची ग्राहक आहे काय ?होय

 

2. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय?होय

 

3. विरुध्‍द पक्ष 3 ने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय?होय

 

4. काय आदेश ?अंतिम आदेशानुसार

 

  •            निष्‍कर्ष                   

 

  1.             आम्‍ही तक्रारकर्तीचे वकील श्रीमती पौनीकर यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांचे वकील नाखले आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांचे वकील श्रीमती देहाड राय यांचा युक्तिवाद ऐकला. तसेच उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या दस्‍तएवेजाचे, जबाबाचे आणि लेखी युक्तिवादाचे अवलोकन केले आणि तक्रारकर्ती आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 3 च्‍या वकिलांनी दाखल केलेल्‍या न्‍यायनिवाडयाचे अवलोकन केले.

 

  1.      तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्‍या पतीने एकमुस्‍त विमा हप्‍ता भरुन कर्जाबाबतची पॉलिसी घेतली होती आणि पॉलिसी घेतल्‍यानंतर 6-7 महिन्‍याने त्‍याचा मृत्‍यु झाला. तक्रारकर्तीच्‍या पतीने दि.23.06.2016 रोजी गृहकर्ज घेतले आणि कोणत्‍याही प्रकारे माहिती लपवून ठेवलेली नाही आणि सदरहू कर्जाबाबतचा करारनामा हा त्रिपक्षीय असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांच्‍या विरुध्‍द तक्रार मंजूर करण्‍यात यावी. याकरिता त्‍यांनी खालील न्‍यायनिवाडयांचा आधार घेतला आहे.

 

  1. II (2019) CPJ 49 (SC), ASHATAI  VS. SHRIRAM CITY UNION FINANCE LTD.
  2. NCPRC 2017 (2) CLT 253,  Jamnaben Shambhubhai Mange VS. Life Insurance Corp. Of India

 

  1. NCDRC II (2018) CPJ 95 (NC)  SBI LIFE INSURANCE CO.LTD.  VS. BAIJNATH TANTI

 

  1. NCDRC I (2019)CPJ 441 (NC)  PNB METLIFE INSURANCE CO.LTD. VS. VINITA DEVI

 

  1. NCDRC 2016 (1)CLT  520,  LIC Of India & anr.  Vs. Kolla Santhi & anr.

 

  1.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांच्‍या वकिलांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी कोणत्‍याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नाही आणि त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

 

  1.      विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांच्‍या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्‍या पतीने त्‍याच्‍या फॉर्म मध्‍ये कोणताही आजार नाही असे नमूद केले आहे आणि कॅन्‍सर असल्‍याबाबतची माहिती लपवून फसवणूक केली आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी योग्‍य प्रकारे दावा नाकारलेला आहे. तसेच मेडिकल रेकॉर्डप्रमाणे तक्रारकर्तीच्‍या पतीला दि. 25.06.2016 रोजीच कॅन्‍सर असल्‍याचे दिसून येते, म्‍हणून विमा दावा नाकारण्‍याची केलेली कार्यवाही योग्‍य असल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे. आपल्‍या कथनाच्‍या समर्थनार्थ त्‍यांनी खालील न्‍यायनिवाडयांचा आधार घेतलेला आहे.

 

  1. AIR 2019 Supreme Court 2606 LIC VS. Manish Gupta

 

  1. State Consumer Dispute Redressal Commission , LIC VS.  Smt. Shibani Guha on 7 june 2017

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  आम्‍ही तक्रारकर्ती आणि विरुध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्ते यांनी गृहकर्ज मिळविण्‍याकरिता आणि पॉलिसी करिता दि. 23.06.2016 रोजीच अर्ज केलेला आहे आणि विरुध्‍द पक्ष यांनी सदरहू पॉलिसी ही दि. 30.06.2016 पासून 30.06.2036 पर्यंत मंजूर केलेली आहे. सदरहू कागदपत्राप्रमाणे कॅन्‍सर डायबिटीज वैगरे आजाराबाबतच्‍या कॉलम समोर No च्‍या कॉलम मध्‍ये केवळ टिकमार्क केले असल्‍याचे दिसून येते व सदरहू अर्ज हा दि. 23.06.2016 रोजी भरले असल्‍याचे दिसून येते. दि. 23.06.2016 रोजी तक्रारकर्तीच्‍या पतीला कोणत्‍याही प्रकारचा आजार असल्‍याबाबतचा पुरावा दाखल केलेला नाही. विरुध्‍द पक्ष यांनी  RST Regional Cancer Hospital and Research  Centre यांनी दिलेल्‍या कागदपत्रांचा आधार घेतलेला आहे. परंतु सदरहू कागदपत्राप्रमाणे दि. 27.06.2016 रोजी कॅन्‍सरबाबत  कोणतेही निदान केलेले दिसून येत नाही आणि केवळ  Wedge Biopsy ची सर्जरी केली असल्‍याचे दिसून येते आणि तिथे कॅन्‍सर असल्‍याबाबतचे स्‍पष्‍ट निदान नाही. Just Because a Doctor has ordered a biopsy test, it doesn’t mean that a patient has cancer and Doctors used biopsies to test whether abnormalities in the body of patient are caused by cancer or by any other conditions   या उलट विरुध्‍द  पक्ष 3 यांनीच His to pathology report  हा  दाखल केलेला आहे. सदरहू रिपोर्ट हा दि. 18.07.2016 चा आहे. सबब तक्रारकर्तीच्‍या पतीला कॅन्‍सर झाल्‍याचे निदान हे दि. 30.06.2016 नंतरच झालेले आहे. सदरहू हॉस्‍पीटलच्‍या कागदपत्राप्रमाणे तक्रारकर्तीचे पती हे दिनांक  13.07.2016 नंतरच अॅडमिट झाले असल्‍याचे दिसून येते आणि प्रत्‍यक्ष निदान हे दि. 18.07.2016 रोजी झाले असल्‍याचे दिसून येते. सबब विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी तक्रारकर्त्‍या विरुध्‍द केलेला माहिती लपविल्‍याचा आक्षेप हा चुकिचा आहे आणि चुकिच्‍या कारणाकरिता विमा दावा नाकारल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते.  सबब विरुध्‍द पक्षाच्‍या वकिलांनी वरील न्‍यायनिवाडयाचा घेतलेला आधार चुकिचा आहे. या उलट तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी आशाताई विरुध्‍द श्रीराम सिटी युनियन फायनान्‍स लि. या न्‍यायनिवाडयाचा योग्‍य प्रकारे आधार घेतलेला आहे. या न्‍यायनिवाडयामध्‍ये मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने खालीलप्रमाणे निर्देशे नोंदविलेली आहेत...

Finance Company was providing a loan facility to borrowers, which was secured by an insurance policy issued by its own sister concern- It was a composite inter-linked transaction. Finance Company delayed in obtaining insurance policy from its sister concern –Risk would be covered from date of payment of insurance premium-Loan was secured from date on which insurance premium was paid- Premium having been paid by appellant’s husband during his life time, loan was to be adjusted from insurance policy-Deficiency proved-compensation awarded.

 

  1.      उपरोक्‍त न्‍यायनिवाडयातील तथ्‍य हे वर्तमान प्रकरणाशी सुसंगत असल्‍याचे दिसून येते. यावरुन विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी चुकिच्‍या कारणाने विमा दावा नाकारल्‍याचे  सिध्‍द होते.  म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांच्‍या विरुध्‍द वर्तमान तक्रार मंजूर करणे योग्‍य व वाजवी आहे असे आमचे मत आहे आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी गृहकर्ज खात्‍याचे विवरण देणे आवश्‍यक आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 50,000/- देणे उचित आहे असे मंचाचे मत आहे.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीला गृहकर्ज खात्‍याचे विवरण द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी तक्रारकर्तीला विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 10,97,388/- त्‍वरित द्यावी आणि सदरहू रक्‍कमेवर विमा दावा नाकारल्‍याच्‍या दिवसापासून म्‍हणजेच दि. 30.03.2017 पासून तर रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांनी करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्तीला तक्रारीची ब व क प्रत परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.