Maharashtra

Nagpur

CC/14/660

Smt. Rakhi W/o Sandeep Bharti - Complainant(s)

Versus

M/s ICAD School of Learning Pvt. Ltd.Through its Chief Executive Officer Shri. Sarang Upganlawar, - Opp.Party(s)

J.C. Shukla

02 Dec 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/14/660
 
1. Smt. Rakhi W/o Sandeep Bharti
Flat No. F-5,Girija Palace, Katol road, Nagpur 440013
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s ICAD School of Learning Pvt. Ltd.Through its Chief Executive Officer Shri. Sarang Upganlawar,
21, Tilak Nagar, Near Law College Square, Nagpur -440010
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 02 Dec 2016
Final Order / Judgement

(आदेश पारित व्दारा -श्री विजय सी प्रेमचंदानी,  मा.अध्‍यक्ष )

आदेश

( पारित दिनांक– 02 डिसेंबर,  2016)

  1. तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याचे कथन थोडक्‍यात येणेप्रमाणे - तक्रारकर्त्याने त्याचे मुलाकरिता  विरुध्‍दपक्षाकडे योग्य ते शुल्क भरुन प्रवेश घेतला होता. तक्रारकर्त्याच्या मुलाने विरुध्‍द पक्षाचे क्लासेस मधे दि.6.6.2014  पासून जाणे बंद केले. तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाला घेतलेले शुल्क परत करण्‍याची विनंती केली. तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाला धनादेशाव्दारे 11,833/- रुपये परत केले. तक्रारकत्याने विरुध्‍द पक्षाकडे प्रवेश घेतेवेळी 63,180/- रुपयाचा भरणा केला होता. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला पुर्ण रक्कम परत न करुन 11,833/- रुपये परत केले ही बाब विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्याचे प्रती सेवेत त्रुटी असून विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्याचे प्रती अनुचित व्यापारी प्रथेला अवलंब आहे म्हणुन तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचामसक्ष दाखल केली आहे.
  3. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला रुपये 51,347/- व्याजासह परत करावे व तक्रारीचा खर्च मिळण्‍याचा आदेश  व्हावा.
  4. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस काढण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष तक्रारीत हजर झाले व नि.क्रं. 11 वर त्यांचे लेखी उत्तर दाखल केले. त्यात विरुध्‍द पक्षाने असे कथन केले आहे की, तक्रारकर्त्याने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नाकबुल आहे. विरुध्‍द पक्षाने पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्त्याने व त्यांचे मुलाने विरुध्‍द पक्षाकडे प्रवेश घेतांना विरुध्‍द पक्षाचे सर्व शर्ती व अटी मान्य केलेल्या होत्या व त्यावर स्वाक्षरी केली होती. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला नोंदणी शुल्क रुपये 10,000/- ची पावती दि. 21.4.2014 ला दिली होती व ती रक्कम ना परतावा होती. तक्रारकर्त्याने दि. 27.6.2014 ला पालकांची बदली झाली असल्याने विरुध्‍द पक्षाकडे तक्रारकर्त्याचा मुलगा क्लासेस मधे उपस्थीत राहू शकत नाही म्हणुन भरलेले शुल्क परत करण्‍याची विनंती केलेली होती.  प्रवेशानंतर दोन महिने संपत आले होते म्हणुन विरुध्‍द पक्षाचे शर्ती व अटी नुसार कोणतीही शुल्काची रक्कम तक्रारकर्त्याला परत करणे शक्य नव्हते तरीसुध्‍दा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला रुपये 11,833/- परत केले. सदर रक्कम तक्रारकर्त्याला मान्य होती तरीसुध्‍दा तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाला त्याचे वकीलामार्फत दि. 22.9.2014 रोजी नोटीस पाठविली. त्यात असे नमुद केलेले होते की, तक्रारकर्त्याचे मुलाने शासकीय पॉलीटेक्नीक येथे प्रवेश घेतल्याचे दर्शविले ही बाब पहिल्यादा विरुध्‍द पक्षाला माहित पडली. तक्रारकर्त्याने व त्याचे मुलाने विरुध्‍द पक्षाच्या शैक्षणीक संस्थेत एक जागा राखीव करण्‍याकरिता रक्कम भरली होती व दुस-या संस्थेत प्रवेश मिळाल्यावर प्रवेश फी परत मागणी करीत आहे म्हणुन सदर तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.
  5. तक्रारकर्त्‍यांनी दाखल तक्रार, दस्तऐवज, प्रतिउत्‍तर, लेखी युक्‍तीवाद, विरुध्‍द पक्षाचा लेखी उत्तर, दस्तऐवज, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता मंचा समक्ष खाली मुद्दे विचारार्थ आले.

मुद्दे                                          निष्‍कर्ष

1. तक्रारकर्ता हा वि.प. यांचा ग्राहक आहे काय ?            होय.

2. विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्याचे प्रती अनुचित व्यापारी

   प्रथेची अवहेलना केलेली आहे का?                     होय.

3. आदेश ?                                  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

-कारणमिमांसा-

  1. मुद्दा क्र.1 बाबत – तक्रारकर्त्याने वि.प.कडे त्यांचे मुलाकरिता प्रवेश घेतेवेळी एकुण रुपये 63,180/- चा भरणा केला होता. यात तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षात कोणताही वाद नाही. सबब तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष.चा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. म्हणुन मुद्दा क्रं.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.
  2. मुद्दा क्र.2 बाबत –  तक्रारकर्त्याने वि.प. कडे त्यांचे मुलाचे प्रवेशाकरिता 63,180/- रुपयाचा भरणा केला होता यात दोन्ही पक्षात कोणताही वाद नाही. विरुध्‍द पक्षाने त्याचे लेखी उत्तरासोबत नि.क्रं.11 वर विरुध्‍द पक्षाचे शर्ती व अटी दाखल केल्या आहेत. सदर शर्ती व अटींचे पडताळणी करतांना असे दिसून आले की, अट क्रं.13, No refund of any fees paid, admission is cancelled after one week of the due date of the respective installments. परंतु सदर अटींची विरुध्‍द पक्षाने कोणतीही दखल न घेता तक्रारकर्त्याला रुपये 11,833/- परत केले. अट क्रं.11-If for any reason, admission is cancelled within one day of the due date of the installment 100% of the tution fees paid of that installment will be refunded. अट क्रं.12- If for any reason admission is cancelled after one day but within a one week of the due date of the installment, 50% of the tution fees paid of that installment will be refunded. वरील नमुद अटींचे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती अटी व शर्तीचे स्वतः पालन केल्याचे दिसून येत नाही. याअर्थी वि.प.यांना स्वतः वरील नमुद अट मंजूर नव्हती. तक्रारकर्त्याना शुल्क रुपये 11,833/-  परत देतेवेळी कशाप्रकारे आकारणी करण्‍यात आली होती याबाबत वि.प.ने दाखल  दस्त क्रं.3 मधे कोणताही खुलासा केलेला नाही. म्हणुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला प्रवेश शुल्क परत करतेवेळी प्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे निष्‍पन्न व सिध्‍द होते सबब मुद्दा क्रं.2 चे उत्तर होकारार्थी देण्‍यात येते.
  3. मुद्दा क्रं.3 बाबत - मुद्दा क्रं.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

-आदेश-

1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला रुपये 51,347/- द.सा.द.शे. 9%, दराने दिनांक 18.6.2014 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो मिळुन येणारी रक्कम द्यावी.

3.    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई दाखल रु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- द्यावेत.

4.    वरील आदेशाची पुर्तता विरुध्‍द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत  करावी.

5.    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क  द्यावी.

6.    तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी. 

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.