Maharashtra

Ahmednagar

CC/18/100

Smt. Ragini Rajaram Pawar - Complainant(s)

Versus

M/s Harshlok Motors Ind Pvt. Ltd. - Opp.Party(s)

23 Jun 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/18/100
( Date of Filing : 03 Apr 2018 )
 
1. Smt. Ragini Rajaram Pawar
Madhuban Sandesh Nagar, Vasant Tekdi Near City Lown, Ahmednagar 414003
Ahmednagar
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/s Harshlok Motors Ind Pvt. Ltd.
Reg Office 145/2A, Boilhegoan Fata, Nagar Manmad Road, Ahmednagar 414003
Ahmednagar
Maharashtra
2. 2. Honda Cars India Ltd.
Reg Office 409, Tower B, DLF Commercial Complex, Jasola New Delhi 110025
New Delhi
New Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 23 Jun 2020
Final Order / Judgement

                                                                                       

निकालपत्र

निकाल दिनांक – २३/०६/२०२०

(द्वारा मा.सदस्‍या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

________________________________________________________

१.   तक्रारदार यांनी दिनांक ०७-०४-२०१६ रोजी सामनेवाले क्रमांक १ हर्षलोक मोटर्स इं.प्रा.लि यांचेकडुन सामनेवाले क्र.२ होंडा कार्स इंडिया लि. या कंपनीची होंडा ब्रीओ कार खरेदी केली. तक्रारदाराला सामनेवाले क्र.१ यांनी रक्‍कम रूपये २५,०००/- कॅश डिस्‍काऊंट दिला आहे. त्‍यानुसार दिनांक २१-०३-२०१६ रोजी सामनेवाले क्र.१ व तक्रारदार यांचेमध्‍ये गाडी खरेदी करण्‍याचे ठरले व त्‍यानुसार सदर कारची रक्‍कम रूपये ५,४७,७५५/- सामनेवालेला तक्रारदाराने दिले व कार खरेदी केली. ज्‍यावेळी वाहनाचा ताबा घेतला त्‍यावेळी कागदपत्र व बिले पाहिल्‍यानंतर तक्रारदाराचे लक्षात आले की, तक्रारदाराकडुन रक्‍कम रूपये १२,१८५/- जास्‍त घेतले आहे. तसेच सदरचे वाहनाचे आर.सी. बुक पाहिल्‍यानंतर सदरचे वाहन हे सन २०१६ ऐवजी २०१५ देऊन सामनेवालेने फसवणुक केली आहे. त्‍यामुळे तक्रारदाराने सामनेवाले क्रमांक १ यांचे प्रतिनिधी श्री.नितीन अपील यांचेशी चार्चा करून २०१६ चे नवीन मॉडेलची मागणी केली होती. परंतु त्‍यांनी दिले नाही व जादा घेतलेली रक्‍कम परत करण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे कंपनी व डिलरशी ई-मेल द्वारे संपर्क साधुन सदरचे बाबीबाबत कळविले. तक्रारदाराने त्‍याची कैफीयत अर्जात तपशील हा परिच्‍छेद ६ मध्‍ये नमुद केलेला आहे, तो खालीलप्रमाणे.

अ.नं.

तपशिल

विक्री करारात डिलरने दिलेला प्रस्‍ताव

मी मान्‍य केलेली करारातील रक्‍कम व अदा केलेली रक्‍कम रूपये

डिलरने दिलेल्‍या बील/ इनव्‍हॉइसची रक्‍कम रूपये

कारची किंमत

५,०४,२४८/-

५,०४,२४८/-

४,७५,७४८/-

विमा

१७,९२५/-

१७,९३५/-

१६,७५४/-

टॅक्‍स रजिस्‍ट्रेशन

४८,३८२/-

४५,३८२/-

४२,८१८/-

   २५०/-

रजिस्‍ट्रेशन हाताळणी

४,५००/-

१,०००/-

-

अॅक्‍सेसरीज

४,२००/-

४,२००/-

-

एक्‍स्‍टेन्‍डेड वॉरन्‍टी (३ व ४

वर्षे)  

५,७५५/-

नाकारली

-

रोड साईड असिस्‍टन्‍स ४ वर्षे

४,६९०/-

नाकारली

-

एकुण

५,८६,७००/-

५,७२,७५५/-

५,३५,५७०/-

 

                             कॅश डिस्‍काऊंट

२५,०००/-

२५,०००/-

 

 

                                             एकुण

५,६१,७००/-

५,४७,७५५/-

५,३५,५७०/-

     सामनेवाले यांनी रक्‍कम रूपये १२,१८५/- परत दिली नाही म्‍हणुन सामनेवाले यांनी अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे म्‍हणुन तक्रारदाराने तक्रार दाखल करून तक्रारीतील परिच्‍छेद क्रमांक ७ नुसार मागणी केली आहे.

२.   सामनेवाले क्रमांक १ यांना तक्रारीची नोटीस पाठविण्‍यात आली. परंतु ते प्रकरणात हजर झाले नाही म्‍हणुन सामनेवाले क्र.१ विरूध्‍द एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला.

३.   सामनेवाले क्रमांक २ यांनी त्‍यांचा लेखी खुलासा प्रकरणात दाखल केला. त्‍यांनी असे कथन केले की, सामनेवाले क्र.२ ही उत्‍पादक कंपनी आहे. त्‍यामुळे डिलरने तक्रारदाराकडुन काही जादा रक्‍कम घेतली आहे, त्‍यात त्‍यांचा काही संबंध येत नाही. वाहनात काही उत्‍पादक दोष असेल तर कंपनीला जबाबदार धरता येईल. परंतु सामनेवाले क्रमांक १ यांनी तक्रारदाराकडुन जादा रक्‍कम घेऊन फसवणुक केली, असे तक्रारदाराचे तक्रारीत कथन आहे. परंतु त्‍यासाठी सामनेवाले क्र.२ हे जबाबदार नाहीत. तसेच वाहन हे सन २०१६ ला खरेदी केले परंतु ते वाहन सन २०१५ चे दिले ही बाब स्‍पष्‍ट करण्‍यासाठी तक्रारदाराने तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही किंवा तज्ञाची नियुक्‍ती करून अहवाल दाखल करणे गरजेचे होते. परंतु तसे केले नाही. या तक्रारीसाठी सामनेवाले क्र.२ यांना जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदाराची सदरची तक्रार सामनेवाले क्र.२ यांचेविरूध्‍द खारीज करण्‍यात यावी, असे सामनेवाले क्र.२ यांनी मंचाला विनंती केली आहे.  

४.   तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दस्‍तऐवज सामनेवाले क्रमांक २ यांनी दाखल केलेला खुलासा यांचे अवलोकन केले असता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील कारणमिमंसेप्रमाणे देत आहोत.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती सेवेत त्रुटी दिली काय ?

होय

 केवळ सामनेवाले क्रमांक १ यांनी

(३)

आदेश काय ?

अंतिम आदेशा प्रमाणे

 
५.  मुद्दा क्र. (१) तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ होंडा कार्स इंडिया लि. या कंपनीची सामनेवाले क्रमांक १ हर्षलोक मोटर्स प्रा.लि. यांच्‍याकडुन ब्रीओ कार दिनांक २१-०३-२०१६ रोजी सामनेवाले क्र.१ व तक्रारदार यांचेमध्‍ये गाडी खरेदी करण्‍याचे ठरले व त्‍यानुसार सदरची कार रक्‍कम रूपये ५,४७,७५५/- सामनेवालेला तक्रारदाराने दिले व कार खरेदी केली. सदरचे वाहन खरेदी केल्‍याबाबतचे दस्‍त हे कॉन्‍ट्रॅक्‍ट व्‍हेईकल टॅक्‍स इनव्‍हॉईस पावती व तक्रारदाराने सदरची रक्‍कम सामनेवाले क्र.१ यांना आर.टी.जी.एस. मार्फत दिली त्‍याची पावती स्‍टेटमेंट प्रकरणात दाखल केले आहे. यावरून ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारदाराने सामनेवालेकडुन वाहन खरेदी केले आहे व तक्रारदार हे सामनेवाले क्रमांक १ व २ चे ग्राहक आहेत. म्‍हणुन मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.  

६.  मुद्दा क्र. (२) तक्रारदार यांनी दिनांक २१-०३-२०१६ रोजी सामनेवाले क्र.२ कंपनीची सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडुन ब्रीओ ही कार रक्‍कम रूपये ५,४७,७५५/- ला खरेदी केली. ही बाब दाखल टॅक्‍स इनव्‍हॉइस यावरून स्‍पष्‍ट होते. तसेच तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीमध्‍ये असे कथन केले की, सदरची वाहनाची किंमत रक्‍कम रूपये ५,०४,२४८/- अशी होती. मात्र सामनेवाले क्र.१ यांनी रक्‍कम रूपये ४,७५,७४८/- चे बिल देखील दिले. तक्रारदाराला सामनेवाले यांनी रक्‍कम रूपये २५,०००/- चे कॅश डिस्‍काऊंट दिले होते, ही बाब तक्रारदाराने त्‍याचे तक्रारीमध्‍ये  नमुद केलेले आहे. वाहन खरेदी केल्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवाले यांना बिलाची मागणी केली असता सदरचे बिल हे वाहनाचे मुळ किंमत व तक्रारदाराने जी रक्‍कम आर.टी.जी.एस. ने सामनेवाले यांना दिले आहे त्‍या रकमेपैकी कमी रकमेचे देण्‍यात आले. तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ यांना आर.टी.जी.एस. ने ५,४७,७५५/- एवढे रूपये दिले व रोख रक्‍कम रूपये ५,०००/- दिली. त्‍या बाबतची पावती प्रकरणात तक्रारदाराने दाखल केली आहे. बॅंकेचे स्‍टेटमेंट व पावतीचे अवलोकन केले असता तक्रारदाराने रक्‍कम रूपये ५,४७,७५५/- सामनेवाले क्र.१ यांना दिलेले आहे, ही बाब स्‍पष्‍ट होते. तसेच व्‍हेईकल टॅक्‍स इनव्‍हॉसचे अवलोकन केले असता सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदाराला रक्‍कम रूपये ४,७५,७४८/- हे बिल दिलेली आहे. संपुर्ण बिलाचा तपशील तक्रारदाराने सामनेवाले यांना पाठविल्‍याचे मेलमध्‍ये नमुद केले आहे. तो दस्‍त निशाणी क्रमांक ११ वर दाखल केला आहे. त्‍यावरून पावती कमी रकमेची दिली, हे बाब स्‍पष्‍ट होते. तक्रारदाराने एकुण रक्‍कम रूपये ५,४७,७५५/- दिले व सामनेवाले यांनी रक्‍कम रूपये ५,३५,५७०/- एवढ्या रकमचे बिल दिले आहे. यावरून ही बाब स्‍पष्‍ट झाली आहे की, तक्रारदाराकडुन जेवढी रक्‍कम स्विकारली त्‍याचे बिल न देता कमी रकमेचे बिल दिले होते. याचाच अर्थ तक्रारदाराकडुन सामनेवाले क्र.१ यांनी जादा रक्‍कम घेतली आहे. तक्रारदाराने त्‍याचे तक्रारीत रक्‍कम रूपये १२,१८५/- अतिरीक्‍त घेतले, असे कथन केले. ही बाब दाखल कागदपत्रावरून स्‍पष्‍ट झाली आहे. तसेच सामनेवाले क्र.१ हे तक्रारीची नोटीस मिळूनही मंचात हजर झाले नाही व त्‍यांनी तक्रारदाराचे कथन खोडुन काढण्‍याची संधी गमावली. त्‍यामुळे तक्रारदाराने जो कागदपत्रांचा पुरावा व शपथपत्र दिले आहे, त्‍यावरून तक्रारदाराचे कथन हे योग्‍य आहे, असे मंचाचे मत आहे.

     सामनेवाले क्रमांक २ ही उत्‍पादक कंपनी आहे. सामनेवाले क्र.२ यांच्‍याकडे तक्रारदाराने ई-मेलद्वारे संपर्क साधुन सदरचे वाहनाचे सामनेवाले क्र.१ यांनी जादा रक्‍कम स्विकारली व सदरचे वाहन हे सन २०१५ चे दिलेले आहे, अशा प्रकारे जुने वाहन दिले. त्‍यामुळे माझी फसवणुक केली म्‍हणुन मागणी केली. तक्रारदाराचे या कथनावर सामनेवाले क्र.२ यांनी त्‍यांच्‍या लेखी कैफीयतीमध्‍ये  असा बचाव घेतला की, सामनेवाले क्र.२ ही उत्‍पादक कंपनी आहे. त्‍यामुळे वाहनात कोणताही उत्‍पादक दोष असेल तर त्‍यासाठी सामनेवाले क्र.२ हे जबाबदार राहतील आणि सदरचे वाहन खरेदी विक्री करण्‍याचा करार हा सामनेवाले क्र.१ व तक्रारदार यांच्‍यामध्‍ये झालेला आहे. त्‍यामुळे सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदाराकडुन फसवणुक करून जादा पैसे घेतले, याबाबत कंपनीचा कोणताही संबंध येत नाही. कंपनी ही सदरचे वाहनाची किंमत ठरवल्‍यानंतर डिलरकडे सदरचे वाहन पाठवुन त्‍यामध्‍ये डिस्‍काऊंट देणे किंवा इतर बाबी या डिलरच्‍या अधिकार क्षेत्रात येतात. यामध्‍ये सामनेवाले क्र.२ यांचा कोणताही संबंध नाही. सामनेवाले क्र.१ स्‍वतः सदरच्‍या कारणासाठी जबाबदार आहेत, असे सामनेवाले क्र.२ यांनी बचाव घेतला.

     संपुर्ण कागदपत्र व तक्रारीचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, वाहनामध्‍ये कोणताही उत्‍पादकीय दोष नाही व उत्‍पादाक दोष असलेबाबत तक्रार नाही. तक्रारदाराकडुन सदर वाहनाची रक्‍कम रूपये १२,१८५/- एवढी रक्‍कम जादा घेण्‍यात आली, ही बाब तक्रारदाराने त्‍याचे कागदोपत्री पुराव्‍यानिशी स्‍पष्‍ट  केली आहे. मात्र सन २०१६ ला २०१५ चे मॉडेल दिले व तक्रारदाराची फसवणुक केली, हे तक्रारीतील तक्रारदाराचे कथन आहे. परंतु ही बाब स्‍पष्‍ट करण्‍यासाठी तक्रारदाराने कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने त्‍याचे तक्रारीत असे कथन केले की, सदर वाहनाचे आर.सी. बुक वर सदरचे वाहन हे सन २०१६ चे ऐवजी सन २०१५ साली उत्‍पादीत झाले ही बाब स्‍पष्‍ट करणेसाठी त्‍यांनी आर.सी. बुक दाखल केले. सदर आर.सी. बुकचे अवलोकन केले असता ते अस्‍पष्‍ट आहे. परंतु तक्रारदाराने स्‍वतः तक्रारीत कथन केले की, त्‍यांना डिलरने रक्‍कम रूपये २५,०००/- डिस्‍काऊंट दिले. सदरचे डिस्‍काऊंट कशाबाबत दिले याबाबत कथन नाही. तसेच सदरहु वाहन हे एप्रिल २०१६ मध्‍ये तक्रारदाराने खरेदी केले आहे, असे निदर्शनास येते. त्‍यामुळे सन २०१५ चे वाहन त्‍यांनी सन २०१६ मध्‍ये खरेदी केले त्‍यावेळी सदर वाहन कोणत्‍या वर्षीचे आहे हे पाहणे   घेणा-या व्‍यक्‍तीची जबाबदारी असते व सदरचे वाहन हे एक वर्ष जुने होते, ही बाब दर्शविणारा कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. त्‍यामुळे तक्रारदाराची सदरची मागणी ग्राह्य धरता येणार नाही, असे मंचाचे मत आहे. मात्र तक्रारदाराकडुन वाहनाची जादा रक्‍कम सामनेवाले क्र.१ यांनी स्विकारली ही बाब तक्रारदाराने मंचात पुराव्‍यानिशी सिध्‍द केली आहे. सदरचे कारणास्‍तव सामनेवाले क्र.२ कंपनी यांना जबाबदार धरता येणार नाही त्‍यामुळे त्‍यांचेविरूध्‍द सदरची तक्रार खारीज करण्‍यात येते, असे मंचाचे मत आहे. सामनेवाले क्र.१ यांनी वाहनाची जादा रक्‍कम स्विकारली म्‍हणुन सामनेवाले क्र.१ ने तक्रारदाराला सेवेत त्रुटी दिली, ही बाब स्‍पष्‍ट होते. सबब मुद्दा क्र.२ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

७.  मुद्दा क्र. (३) :  मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आदेश

१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२. सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदाराला रक्‍कम रूपये १२,१८५/- (बारा हजार एकशे पंचाऐंशी) व त्‍यावर दिनांक २८-०३-२०१६ पासुन ६% व्‍याजदराने तक्रारदाराला द्यावेत.  

 

३. सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार मात्र) व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार मात्र) द्यावा.

 

४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

 

५. सामनेवाले क्र.२ विरूध्‍द तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

 

६. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

७. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत  करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.