| | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे . |
|
|
Complaint Case No. CC/293/2014 |
| | 1. Mr. SURESHSINGH RAMVILAS CHAUHAN, 2) Mrs. Salinisingh sureshsingh Chauhan | At .Both Residing 126, B.2 Building, Umiya Complex, Phase II, Titwala (E)Kalyan , Dist Thane 421605. | Thane | MH |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/s Harmya Developers A Partnership Firm | Neelyog Square, B wing ,6th floor, Opp Railway Sttion, Ghatcoer (E) Mumbay 400077 | Mumbai | MH | 2. Mr. HARESH RANCHHODBHAI BHANUSHALI | R/at.A/1302,Akruti Elegance,90 ft. Rd, Gavanpada, Mulund (E), Mumbai 400081 | Mumbai | MH | 3. MR. VINIT ARVIND SHAH . | At. 49/50, 5th floor, Prem Court, Near Jaslok Hospital, Peddar Road, Mumbai 400026 | Mumbai | MH | 4. . CHINTAN ARVIND SHAH | At. 49/50, 5th floor, Prem Court, Near Jaslok Hospital, Peddar Road, Mumbai 400026 | Mumbai | MH | 5. Mr. Bharat Dhiraj Bhanushali | aT. a/1302,Akruti Elegance,90 ft. Rd, Gavanpada, Mulund (E), Mumbai 400081 | Mumbai | MH |
| ............Opp.Party(s) |
|
|
|
BEFORE: | | | HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT | | HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER | | HON'BLE MR. N D Kadam MEMBER | |
|
For the Complainant: | For the Opp. Party: | |
ORDER | Dated the 05 Apr 2016 न्यायनिर्णय (द्वारा सौ. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या) - तक्रारदारांनी सामनेवाले HARMYA DEVELOPERS यांचेकडून सदनिका क्र. 110, पहिल्या मजल्यावरील, C विंग मधील 400 चौ.फू. (Carpet Area) 50 चौ. फू. ओपन टेरेससहीत असलेली “Valram Ashish” या इमारतीतील सर्व्हे नं.112 हिस्सा नं. 4,5 व 6 मौ. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे येथील रक्कम रु. 8,44,950/- विकत घेण्याचे निश्चित केले.
- तक्रारदार व सामनेवाले यांचेमधील दि. 12/02/2011 रोजीच्या सदनिका खरेदी करार दि. 21/02/2011 रोजी नोंदणीकृत करण्यात आला.
- तक्रारदारांनी रक्कम रु. 8,02,703/- कराराची किंमत रु. 8,450/- VAT, रु. 14,187/- सर्व्हीस टॅक्स, रु. 25,000/- सोसायटी चार्जेस अशी एकूण रु. 8,50,440/- सामनेवाले यांना करारातील अटी व शर्तींनुसार अदा केली. तक्रारदार उर्वरीत रक्कम सदनिकेचा ताबा घेतांना देण्यास तयार आहेत. सामनेवाले यांनी सदर करारानुसार तक्रारदारांना मे, 2012 मध्ये सदनिका ताब्यात देण्याचे मान्य केले होते. परंतु सामनेवाले यांनी दि. 04/10/2013 रोजीच्या पत्रानुसार डिसेंबर, 2013 मध्ये सदनिका ताब्यात देण्याचे तसेच सदनिका ताबा देण्यात झालेल्या विलंबाबाबत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात ताबा दिला नाही.
- तकारदारांनी सामनेवाले यांना दि. 25/02/2014 रोजी कायदेशीर नोटीस वकीलांमार्फत पाठविली. परंतु सामनेवाले यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.
- तक्रारदारांनी सदनिका खरेदीसाठी बॅकेतून गृहकर्ज घेतले आहे. तक्रारदारांना सदर गृहकर्जाच्या मासिक हप्त्याची परतफेड करुन किरायाने घेतलेल्या घराचे भाडयाची रक्कम भरणा करणे खूप त्रासदायक झाले आहे. सामनेवाले यांनी सदनिका कराराप्रमाणे विहीत मुदतीत सदनिकेचा ताबा न देऊन त्रुटीची सेवा दिल्यामुळे तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केली आहे.
- सामनेवाले यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही मंचासमोर हजर न झाल्याने सामनेवालेविरुध्द दि. 09/07/2015 रोजी एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.
- तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे हाच त्यांचा पुरावा ग्राहय धरण्यात यावा अशी पुरसिस दाखल केली. तक्रारीतील उपलब्ध कागदपत्रांआधारे मंच खालीलप्रमाणे निष्कर्ष काढीत आहेः
मुद्देः -
| सामनेवाले यांनी दि. 21/02/2011 रोजीच्या सदनिका खरेदी करारानुसार विहीत मुदतीत सदनिकेचा ताबा न देऊन त्रुटीची सेवा दिल्याची बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे काय? | होय | -
| तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहेत का? | | -
| अंतिम आदेश? | निकालाप्रमाणे |
कारणमिमांसाः - तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये दि. 17/02/2011चा “अॅग्रीमेंट फॉर सेल” करार दि. 21/02/2011 रोजी नोंदणीकृत झाला. सदर कराराची प्रत मंचात दाखल आहे.
ब. सदनिका खरेदी करारातील परिच्छेद 13 प्रमाणे सामनेवाले यांनी मे, 2012 मध्ये सदनिकेचा ताबा देण्याचे मान्य केले आहे. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि. 04/10/2013 रोजीचे पत्रान्वये 31 डिसेंबर, 2013 मध्ये ताबा देण्याचे आश्वासन दिले असून ताबा देण्यात झालेल्या विलंबाची नुकसान भरपाई देण्याचे मान्य केल्याचे दिसून येते. सबब सामनेवाले यांनी तक्रारदारांना यासंदर्भात नुकसान भरपाईची रक्कम रु. 2,00,000/- देणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे. क. तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि. 17/02/2014 व दि. 20/09/2014 रोजी पत्राद्वारे 95% रक्कम अदा करुनही ताबा न दिल्याबाबत कळवले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून रक्कम रु. 8,07,918/- स्विकारुनही सदनिकेचा ताबा न देऊन त्रुटीची सेवा दिल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत मुद्दा क्र. अ व ब चे उत्तर होकारार्थी देत आहोत. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहेः आ दे श - तक्रार क्र. 293/2014 अंशतः मंजूर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून सदनिका खरेदीपोटी 95% रक्कम स्विकारुन करारामध्ये मान्य केल्याप्रमाणे सदनिकेचा ताबा न देऊन त्रुटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
- सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की तक्रारदारांना सदनिका क्र. 110, पहिल्या मजल्यावरील, C विंग मधील 400 चौ.फू. (Carpet Area) 50 चौ.फू. ओपन टेरेससहीत असलेली “Valram Ashish” या इमारतीतील सर्व्हे नं.112 हिस्सा नं. 4,5 व 6 मौ. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे चा ताबा दि. 31/05/2016 पर्यंत दयावा. तसे न केल्यास दि. 01/06/2016 पासून प्रत्येक महिन्यास रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) दयावेत.
-
- तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे ताबा घेण्यासंबंधी पत्र प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसांचे आंत बाकी रक्कम रु. 42,522/- (अक्षरी रुपये बेचाळीस हजार पाचशे बाविस) सामनेवाले यांना अदा करावी.
- सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना नुकसान भरपाईची रक्कम रु.2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख) व तक्रारीचा खर्च रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) दि. 31/05/2016 पर्यंत दयावी. सदर रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास दि. 01/06/2016 पासून दरसाल दर शेकडा 9% व्याजदरासहीत दयावी.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
- संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.
| |
|
| [HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE] | PRESIDENT
| | [HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE] | MEMBER
| | [HON'BLE MR. N D Kadam] | MEMBER
| |