Complaint Case No. CC/596/2022 | ( Date of Filing : 30 Aug 2022 ) |
| | 1. MADHUSUDAN SHANKARRAO SONKUSARE | PLOT NO.150 SHRINAGAR NO.2 MANEWADA SQUARE, NAGPUR 440034 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/S HAPPYS HAAPPY HOME DEVELOPERS 2 PVT. LTD., DIRECTOR, MR. AMMOL DEWAJI WALKE | NO.6, APPOSITE KALPTARU HOSPITAL, CHHATRAPATI NAGAR, RING ROAD, NAGPUR-440015 | NAGPUR | MAHARASHTRA | 2. MR. AMMOL DEWAJI WALKE, DIRECTOR, M/S HAAPPY HOME DEVELOPERS 2 PVT. LTD. | 65 HINDUSTAN COLONY, WARDHA ROAD, NAGPUR-440015 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. बाळकृष्ण चौधरी यांच्या आदेशान्वये- - तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, विरुद्ध पक्ष 1- Happy Home हि नोंदणीकृत कंपनी असून वि.प. 2 हे त्या कंपनी मार्फत डेव्हलपर्स चे काम पाहतात, व ले-आऊट टाकून राहण्याकरिता प्लॉट विकसित करून विकण्याचाव्यवसाय करतात. त्या अनुषंगाने दीनांक 10.12.2015 रोजी वि.प. 2 यांनी तक्रारकर्त्यासोबत मौजा कच्चीमेट, प्लॉट नं. 102,सर्वे नं. 41/1,42/2, 44,व 45, प.ह.नं. 12,एकूण क्षेत्रफळ 1819..45 चौ.फूट, तह. उमरेड, जिल्हा नागपूर चे रक्कम रु.2,55,345/- मध्ये विक्रीचा करारनामा केला. तक्रारकर्त्याने वि.प. यांना रक्कम रु.2,55,345/- चेक द्वारे दिल्यावर वि.प. यांनी दिनांक 15.12.2015 रोजी तक्रारकर्त्याला ताबा पत्र दिले. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्याला आश्वासन दिले कि, प्लॉटचे विक्री पत्र 48 महिन्यात करून देऊ. त्याच प्रमाणे करारनामा प्रमाणे प्लॉट संबंधित सर्व परवानगी व विकसित करण्याची जबाबदारी विरुद्ध पक्ष यांची होती. त्यानंतर 48 महिने उलटल्यावर तक्रारकर्त्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघितले असता त्या ठिकाणी वि.प. यांनी प्लॉटवर कोणतीही सुविधा व कोणत्याही परवानगी मिळवल्या नसल्याचे आढळून आले. वि.प. यांचेशी संपर्क साधला असता त्यावर त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही,व विक्रीपत्राची तारीख व विकसन शुल्क बाबत कळवले नाही म्हणून तक्रारकर्त्याने दि. 23.02.2022 रोजी व 07.03.2023 रोजी वि.प. याना पत्र पाठविले त्यावर वि.प. यांनी उत्तर दिले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दि. 30.03.2023 रोजी वि.प. याना कायदेशीर नोटीस दिला त्यावर सुद्धा वि.प. यांनी उत्तर दिले नाही परंतु वी.प. यांनी एक कोरे पत्र तक्रारकर्ता यांना पाठविले. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, वी.प. यांनी तक्रारकर्तायांना वर नमूद प्लॉटचे नियमितीकरण करून नोंदणी कृत विक्रीपत्र करून देण्याचा आदेश द्यावा, किंवा तक्रारकर्तायांचे कडून प्लॉटच्या सौदयापोटी स्वीकारलेली रक्कम रु. 2,55,345/- व त्यावर दी. 10.12.2015 पासून 12 टक्के द.सा.द.शे. प्रमाणे तक्रारकर्तायांना देण्याचे आदेश द्यावे, तसेच तक्रारीचा खर्च मंजूर करावा.
- विरुद्ध पक्ष 2 यांना नोटिस मिळून सुद्धा विहित मुदतीत आपला लेखि जबाब दाखल न केल्याने प्रकरण वी.प. 2 विरुद्ध एकतर्फी चालवण्याचा आदेश दी. 03.05.2023 रोजी करण्यात आला. विरुध्द पक्ष 1 ने आपला लेखी जबाब दाखल केला असून तक्रारीत त्यांच्यावर लावलेल्या आक्षेपाचे खंडन केले. तसेच आपल्या जबाबात नमूद केले की, उभय पक्षात सदनिका विक्रीबाबत झालेला व्यवहार व त्यापोटी रक्कम रुपये 2,55,345/- स्वीकारली असल्याचे बाब मान्य केलेली आहे. तसेच त्यांनी विशेष कथनात नमूद केले की,तक्रारकर्ता यांना प्लॉटचे विक्री पत्र करून द्यायला तयार आहे परंतु सबंधित प्राधिकरणा कडून मंजूरी प्राप्त झाल्यावरच ते विक्रीपत्र करून देवू किवा दुसरीकडे प्लॉट द्यायला तयार आहे. तसेच तक्रारकर्तायांची रक्कम परत करण्यास तयार आहे परंतु त्यावर व्याज द्यायला तयार नाही. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार उशिरा दाखल केल्यामुळे प्रस्तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्यानुसार मुदतबाहय आहे.म्हणून तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली.
- तक्रारकर्ता यांनी तक्रारी सोबत दाखल केलेल्या दस्तावेजाचे व विरुध्द पक्षाच्या लेखी जबाबाचे अवलोकन केले व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.
मुद्दे उत्तर - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय
- काय आदेश? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्ता यांचे वकिलानी युक्तिवाद केला की,दीनांक 10.12.2015 रोजीवि.प. 2 यांनी तक्रारकर्त्या सोबत मौजा कच्चीमेट, प्लॉट नं. 102, सर्वे नं. 41/1,42/2, 44,व 45 प.ह.नं. 12,एकूण क्षेत्रफळ1819..45चौ.फूट,तह. उमरेड, जिल्हा नागपूर चेरक्कमरु.2,55,345/- मध्ये विक्रीचा करारनामा केला. तक्रारकर्त्याने वि.प. यांना रक्कम रु.2,55,345/- चेक द्वारे दिल्यावर वि.प. यांनी दिनांक 15.12.2015 रोजी तक्रारकर्त्याला ताबा पत्र दिले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला आश्वासन दिले कि, प्लॉटचे विक्री पत्र 48 महिन्यात करून देऊ. त्याचप्रमाणे करारनामा प्रमाणे प्लॉट संबंधित सर्व परवानगी व विकसित करण्याची जबाबदारी विरुद्ध पक्ष यांची होती. त्यानंतर 48 महिने उलटल्यावर तक्रारकर्त्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघितले असता त्या ठिकाणी वि.प. यांनी प्लॉटवर कोणतीही सुविधा व कोणत्याही परवानगी मिळवल्या नसल्याचे आढळून आले. वि.प. यांचेशी संपर्क साधला असता त्यावर त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून सदरहू तक्रार मंजूर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षाकडून रुपये 2,55,345/- मध्ये प्लॉट विकत घेण्याचा करार केला होता हे नि.क्रं.2(1) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे सिध्द होते.
- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला रक्कम रुपये 2,55,345/- अदा केली असल्याच्या कथनात उभय पक्षात वाद नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला पूर्ण रक्कम अदा केल्यावर ही विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता यांना प्लॉटचे विक्री पत्र नोंदवून दिले नाही, अथवा प्लॉटपोटी स्वीकारलेली रक्कम ही परत केली नाही, ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्याचे स्पष्ट दिसून येते.
- तक्रारकर्ता यांनी सन 2015 मध्ये प्लॉटच्या खरेदी करिता वी.प. यांना संपूर्ण रक्कम दिल्यानंतर तक्रारकर्ता यांना लवकरात लवकर सदरहू प्लॉट खरेदी करून ताबा मिळालेला नाही. जर वि.प. यांनी सदरहू प्लॉट खरेदी करून ताबा दिला असता तर आज रोजी सदरहू प्लॉटची बाजारभाव फार मोठी किंमत तक्रारकर्ता यांना मिळू शकली असती आणि तक्रारकर्ता यांना उपभोग घेता आला असता. पूर्ण रक्कम देऊनही या बाबी तक्रारकर्ता यांना प्राप्त झालेल्या नाही, म्हणुन वि.प. यांनी तक्रारकर्ता यांचे नावे प्लॉटचे नियमितीकरण करून नोंदणीकृत विक्री पत्र करून द्यावे, किंवा वी.प. यांनी तक्रारकर्ता यांचे कडून प्लॉटच्या सौदयापोटी स्वीकारलेली रक्कम रु.2,55,345/- व त्यावर दी.10.12.2015 पासून 9टक्के द.सा.द.शे. व्याज दराने तक्रारकर्ता यांना द्यावे व तक्रारकर्ता यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासाकरिता भरपाई म्हणून रु.15,000/-. तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रु.10,000/- मंजूर करणे योग्य होईल असे आमचे मत आहे.
सबब आदेश खालीलप्रमाणे.... अंतिम आदेश - तक्रारकर्ता यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- वि.प. 1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना मौजा कच्चीमेट, प्लॉट नं.102,सर्वे नं. 41/1,42/2, 44,व 45 प.ह.नं.12,एकूण क्षेत्रफळ 1819..45 चौ.फूट, तह. उमरेड, जिल्हा नागपूर चे नोंदणीकृत विक्री पत्र करून द्यावे
अथवा वि.प. यांनी तक्रारकर्ता यांचे कडून स्वीकारलेली रक्कम रु.2,55,345/-व त्या रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने दिनांक 10.12.2015 पासून 9 टक्के द.सा.द.शे. व्याज दराने तक्रारकर्ता यांना अदा करावे. - विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी, नुकसान भरपाई म्हणुन रुपये 15,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/-अदा करावे.
- विरुध्द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेश पारित दिनांकापासून 45 दिवसाचे आत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्ता यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |