मे. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत.
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता. पाटणकर
*************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक: एपिडिएफ/225/2008
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 03/02/2005
तक्रार निकाल दिनांक : 05/12/2011
श्री. वीश्वास रामचंद्र जोशी ...)
राहणार: ए 10/101, करिष्मा को ऑ हौ. सोसा. ...)
कोथरुड, पुणे – 411 029. ...) तक्रारदार
विरुध्द
मे. गुरुनाथ ट्रॅव्हल्स प्रा. लि. ...)
बाजीराव रोड, नातूबाग सरस्वती शाळेजवळ, ...)
पुणे – 2 द्वारा- चेअरमन – श्रीधर वैद्य ...) जाबदार
********************************************************************
द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत
// निशाणी –1 वरील आदेश //
सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक मंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पिडिएफ/36/2006 असा नोंदणिकृत नंबर देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा मंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपिडिएफ/225/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
सदरहू प्रकरण मंचाकडे सन 2006 पासून प्रलंबित असल्यामुळे प्रकरण चालविण्याचे आहे अथा नाही याबाबत तक्रारदारांचे निवेदन येणेसाठी तक्रारदारांनी नोटीस काढली असता तक्रारदारांची ‘नॉट क्लेम’ या शे-यासह परत आली आहे. अर्थात अशा परिस्थितीत सदरहू प्रकरण योग्य तजवीजी अभावी काढून टाकण्यात येत आहे.
( श्रीमती प्रणाली सावंत)
अध्यक्ष
(श्रीमती सुजाता पाटणकर)
सदस्य
दिनांक: 05/12/2011
पुणे.