Dated the 31 Aug 2015
तक्रारदारांचे वकील अॅड बनकर हजर
अॅड बनकर यांनी निवेदन केले की त्यांची एम अे मध्ये सुनावणी घेण्यात यावी
अंतरिम अर्जाखालील पुढील आदेश पारीत करण्यात आला
अंतरीम अर्जाखाली आदेश
1. तक्रारदार यांनी सामनेवाले बांधकाम व्यवसायीक/विकासक यांच्याकडे सदनिका आरक्षीत केली होती, व त्याचा ताबा न मिळाल्यामुळे या मंचात तक्रार दाखल केली ती दाखल करुन घेण्यात आली असुन प्रलंबीत आहे. तक्रारदार यांनी तक्रारीचा निकाल लागेपर्यंत त्यांच्या हिताचे संरक्षण होण्याकरीता अंतरीम परिहाराकरीता अंतरीम अर्ज दाखल केला आहे. त्याबाबत ऐकण्यात आले.
2. आमच्या मते तक्रारदार यांनी अशा स्थितीत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अँक्टच्या कलम-52 चा जो महाराष्ट्र राज्यात सुधारीत स्वरुपात लागु आहे त्याचा उदारपणे व मुक्तपणे वापर करावा तो परिणामकारक आहे, व मंचातील कार्यभार मर्यादित ठेवण्यास उपयुक्त सिध्द होईल. संबंधीत निबंधक तक्रारदाराच्या या कृतीस योग्य प्रतिसाद देतील ही अपेक्षा.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदार यांनी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अँक्टच्या कलम-52 प्रमाणे कार्यवाही करावी.
2. अर्ज निकाली काढण्यात आला, तो वादसुचितुन काढून टाकण्यात यावा.
3. या आदेशाच्या प्रती तक्रारदार व सामनेवाले बांधकाम व्यवसायिक यांना निशुल्क देण्यात
याव्या/पाठविण्यात याव्या.