Maharashtra

Nagpur

CC/92/2020

DR. SHESHRAO LAXMANRAO ASHTANKAR - Complainant(s)

Versus

M/S FLYING EAGLE HOLIDAYS PVT. LTD. THROUGH ITS DIRECTOR - Opp.Party(s)

ADV ANKIT SHRIVASTAVA

24 Nov 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/92/2020
( Date of Filing : 11 Feb 2020 )
 
1. DR. SHESHRAO LAXMANRAO ASHTANKAR
14 , SUYOG NAGAR BEHIND TUKARAM SABHAGRUHA RING ROAD, NAGPUR 440015
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S FLYING EAGLE HOLIDAYS PVT. LTD. THROUGH ITS DIRECTOR
101 SAI GANGA APARTMENT, MADHAV NAGAR, NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
2. MR . SHANTANU BALKRUSHNA WAGH
10/4 , AKAR BUILDING NO.4, NEAR KADAN SCHOOL OPP. DALAL NURSING HOME, BYRAMJI TOWN, NAGPUR. R/O NEAR SAPTASHRUNGI TEMPLE DAHEGAO ROAD, KHPERKEHDA TAH. SAONER DIST NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
3. MR. BALKRUSHNA WAGH
NEAR SAPTASHRUNGI TEMPLE, DAHEGAON ROAD, KHAPERKHEDA, TA SAONER DIST NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV ANKIT SHRIVASTAVA, Advocate for the Complainant 1
 
Dated : 24 Nov 2022
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजणे यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  विरुध्‍द पक्षाचा मे. फ्लाईंग ईगल हॉलीडे प्रा.लि. या नावाने व्‍यवसाय असून विरुध्‍द पक्ष 2 व 3 हे त्‍याचे संचालक आहेत. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे Delightful Dubai (4 रात्र / 5 दिवस) ला जाणा-या टूरची नोंदणी केली. सदर दुबई टूर करिता तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे रुपये 50,000/- प्रति.व्‍यक्‍तीप्रमाणे अदा करावयाचे होते. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने स्‍वतःकरिता व पत्‍नीच्‍या टूर पोटी दि. 06.11.2017 ला रुपये 40,000/- व दि. 25.11.2017 ला रुपये 60,000/- अदा केले तसेच वि.प.च्‍या मागणीनुसार विदेशी चलना पोटी दि. 20.12.2017 रोजी रुपये 15,000/- नगदी जमा केले अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दुबई टूर पोटी रुपये 1,15000/- जमा केले होते व त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला टूर प्रोग्राम दिला होता.   

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने आयोजित केलेला टूर विरुध्‍द पक्षाने स्‍वतःहून 2 वेळा रद्द केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे टूरपोटी जमा केलेल्‍या रक्‍कमेची मागणी केली.  त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला धनादेश क्र. 086289 दि. 04.02.2018 स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया अंबाझरी शाखेचा रुपये 1,15000/- चा धनादेश दिला. सदरचा धनादेश वटविण्‍याकरिता जमा केला असता धनोदश returned memo dated 16.02.2018 अपु-या रक्‍कमेच्‍या शे-यासह अनादरित झाला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 2 व 3 यांच्‍याशी संपर्क साधला असता त्‍यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही व त.क.चा दूरध्‍वनी घेण्‍यास तसेच भेटण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे घोषित करावे. तसेच तक्रारकर्त्‍याने टूर पोटी जमा केलेली रुपये 1,15,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने परत करण्‍याचा आदेश द्यावा. त्‍याचप्रमाणे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांना मंचामार्फत स्‍थानिक वृत्‍तपत्रातून जाहीर नोटीस प्रसिध्‍द करण्‍यात आली होती त्‍यानंतर ही विरुध्‍द पक्ष 2 व 3 आयोगा समक्ष उपस्थितीत झाले नाही अथवा आपला लेखी जबाब दाखल केला नाही. तसेच विरुध्‍द पक्ष 3 यांना देखील आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगासमक्ष हजर न झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि.23.03.2022 रोजी पारित करण्‍यात आला.
  2.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले व त.क.च्‍या वकिलाचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

1.  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ               होय

2.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ॽ          होय

3.  काय आदेश ॽ                                      अंतिम आदेशाप्रमाणे  

                                                           कारणमिमांसा   

  1. मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 बाबत -   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाने आयोजित केलेल्‍या दि. 29.12.2017 पासून 4 रात्र 5 दिवसाकरिता दुबई येथील सहलीस जाण्‍याकरिता  स्‍वतःच्‍या व पत्‍नीच्‍या नांवे नोंदणीकरिता दि. 06.11.2017 ला रुपये 40,000/- व दि. 25.11.2017 ला रुपये 60,000/- आणि विदेशी चलना पोटी दि. 20.12.2017 रोजी रुपये 15,000/- असे एकूण रुपये 1,15,000/- जमा केले होते हे नि.क्रं 2 वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते.  विरुध्‍द पक्षाने दि. 29.12.2017 ला दुबई येथे आयोजित केलेला टूर(सहल)  स्‍वतःहून 2 वेळा रद्द केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे टूर पोटी जमा केलेल्‍या रक्‍कमेची मागणी केली होती, त्‍यानुसार विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि.04.02.2018 ला स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा–अंबाझरी  बॅंकेचा रुपये 1,15,000/- चा धनादेश क्रं. 086289 दिला होता. परंतु सदरचा धनादेश हा अपु-या रक्‍कमे अभावी अनादरित झाला. याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला कळवून ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल घेतली नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने अनेक वेळा विरुध्‍द पक्षाकडे टूर पोटी जमा केलेल्‍या रक्‍कमेची मागणी करुन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल घेतली नाही व योग्‍य तो प्रतिसाद दिला नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.

 सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.     

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍याकडून दुबई टूर पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 1,15,000/- व त्‍यावर दि. 27.02.2020 पासून म्‍हणजेच तक्रार दाखल दिनांकापासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम द्यावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1  ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.  
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.