Maharashtra

Nagpur

CC/278/2019

SHRI VASUDEO DAMAJI KATHANE - Complainant(s)

Versus

M/S FIRST INDIAN REALTORS NAGPUR, PARTNERSHIP FIRM - Opp.Party(s)

ADV D. P. JAISWAL

10 Feb 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/278/2019
( Date of Filing : 09 May 2019 )
 
1. SHRI VASUDEO DAMAJI KATHANE
110, TUKDOJI COMPLEX VELEKAR LAYOUT, MANEWDA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S FIRST INDIAN REALTORS NAGPUR, PARTNERSHIP FIRM
48, AMBAZHARI LAYOUT, HILL TOP NAGPUR 440033
NAGPUR
MAHARASTRA
2. THROUGH PARTNER, SHRI ANANDA NARENDRA FISKE
48, AMBAZHARI LAYOUT, HILL TOP NAGPUR 440033
NAGPUR
MAHARASHTRA
3. SHRI ARUN MAHESHWAR PRASAD SHRIWASTAV
1/14 , PANCHSHIL COLONY, NAGPUR 440017
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 10 Feb 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही भागीदारी फर्म असून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ही फर्म चे भागीदार आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांचा मुख्‍य व्‍यवसाय जमिन खरेदी करुन त्‍यावर लेआऊट पाडून गरजू लोकांना/ग्राहकांना प्‍लॉट विकतात. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन मौजा हिंगना, खसरा क्रमांक ११६, प्‍लॉट नंबर १३, एकूण क्षेञफळ १४४ चौरस मीटर (१८६०.६६ चौ.फुट) इसासणी प्रोजेक्‍ट स्‍कीमचा रुपये ३,२०,०००/- इतक्‍या रकमेत खरेदी करण्‍याचा तोंडी करार विरुध्‍द पक्षाशी दिनांक १७/१०/२००८ रोजी केला. तक्रारकर्त्‍याने तोंडी करारानूसार प्‍लाट खरेदीपोटी विरुध्‍द पक्षाला धनादेश क्रमांक ०२७०९९ दिनांक १७/१०/२००८ युनियन बॅंक ऑफ इंडिया, शाखा मानेवाडा रोड, नागपूर व्‍दारे रुपये ७०,०००/-, धनादेश क्रमांक ०१२०८५, दिनांक १७/१०/२००८ पोस्‍टाचे सेविंग बॅंकव्‍दारे रुपये ५०,०००/- आणि धनादेश क्रमांक ०३५१६६ दिनांक ४/४/२००९, युनियन बॅंक ऑफ इंडिया, शाखा मानेवाडा रोड, नागपूर अन्‍वये रुपये २,००,०००/- असे एकूण रुपये ३,२०,०००/- अदा केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट खरेदीपोटी संपूर्ण रक्‍कम देऊनही विरुध्‍द पक्षाने लेखी स्‍वरुपात करारणामा लिहून देतो असे आश्‍वासन देवूनही लेखी करारणामा तक्रारकर्त्‍याला करुन दिला नाही.
  3. तक्रारकर्ता व त्‍याची पत्‍नी विरुध्‍द पक्षाचे राहत्‍या घरी गेले व प्‍लॉटची विक्रीपञ करुन देण्‍याची विरुध्‍द पक्षाला विनंती केली. विरुध्‍द पक्षाने आश्‍वासन दिले परंतु विक्रीपञ करुन दिले नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वकीलामार्फत रजिस्‍टर्ड पोस्‍टाव्‍दारे दिनांक ३/११/२०१८ रोजी विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठविली व त्‍याव्‍दारे प्‍लॉटचे विक्रीपञ करुन देण्‍याबाबत कळविले. परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ला नोटीस प्राप्‍त होऊनही विक्रीपञ करुन दिले नाही. तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ला पाठविलेली नोटीस विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी घर बदविल्‍यामुळे परत आली म्‍हणून तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक  १ ते ३ यांना आदेशीत करण्‍यात यावे की, त्‍यांनी मौजा हिंगना, खसरा क्रमांक ११६, प्‍लॉट नंबर १३, एकूण क्षेञफळ १४४ चौरस मीटर (१८६०.६६ चौ.फुट) याचे विक्रीपञ नोंदणी तक्रारकर्त्‍याला करुन द्यावे व त्‍याअगोदर उपरोक्‍त भूखंडावर विरुध्‍द पक्षाशी मालकी असलेले कागदपञे तक्रारकर्ते यांना द्यावे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना आदेशीत करण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये १,००,०००/- व तक्रारीचा खर्च  द्यावा.
  3. विरुध्‍द पक्षाला आदेशीत करण्‍यात यावे की, उपरोक्‍त प्‍लॉटचे पंजिकृत विक्रीपञ करण्‍यास कायद्याने असमर्थ असल्‍यास रक्‍कम रुपये ३,२०,०००/- व त्‍यावर १८ टक्‍के व्‍याज + रुपये २,५०,०००/- असे एकूण रुपये ५,७०,०००/- व त्‍यावर १८ टक्‍के व्‍याज परत करण्‍याचा आदेश द्यावा.
  1. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली व ती नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ मंचात हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक ५/११/२०१९ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना स्‍थानिक वर्तमानपञातून नोटीस पाठवूनही विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ मंचात हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक १२/२/२०२० रोजी पारित करण्‍यात आला.
  3. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्‍तीवाद व तोंडी युक्‍तीवाद यांचे वाचन केल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

   अ.क्र.                  मुद्दे                                                                           उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                    होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                           होय
  3. काय आदेश ?                                                                           अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमीमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन मौजा हिंगना, खसरा क्रमांक ११६, प्‍लॉट नंबर १३, एकूण क्षेञफळ १४४ चौरस मीटर (१८६०.६६ चौ.फुट) इसासणी प्रोजेक्‍ट स्‍क्‍ीमचा रुपये ३,२०,०००/- इतक्‍या रकमेत खरेदी करण्‍याचा तोंडी करार विरुध्‍द पक्षाशी दिनांक १७/१०/२००८ रोजी केला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट खरेदीपोटी संपूर्ण रक्‍कम रुपये ३,२०,०००/- अदा केले. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍तावेजांचे अवलोकन केल्‍यावर असे निर्दशनास येते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. विरुध्‍द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्‍याचा करार केला आहे. तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC)  या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍याचे अधिकार आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून प्‍लॉट विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त करुनही तक्रारकर्त्‍याला प्‍लॉटचे विक्रीपञ करुन दिले नाही ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती न्‍युनतम सेवा असून अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला मौजा हिंगना, खसरा क्रमांक ११६, प्‍लॉट नंबर १३, एकूण क्षेञफळ १४४ चौरस मीटर (१८६०.६६ चौ.फुट) इसासणी प्रोजेक्‍ट मधील प्‍लॉटचे  कायदेशीर विक्रीपञ लावून द्यावे. विक्रीपञाचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा. व त्‍याअगोदर उपरोक्‍त भूखंडावर विरुध्‍द पक्षाची मालकी असलेले कागदपञे तक्रारकर्ता यांना द्यावे.

किंवा

          सदर भुखंड क्रमांक १३ चे नोंदनी करण्‍यास कोणत्‍याही प्रकारे कायदेशीर व तांञिक अडचण आल्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी १४४ चौरस मीटर (१८६०.६६ चौ.फुट)  इतके क्षेञफळ असलेल्‍या  भुखंडासाठी मौजा हिंगना  तह.जिल्‍हा  नागपूर  झोनमधील अथवा नजीकच्‍या  इतर झोनमध्‍ये १४४ चौरस मीटर (१८६०.६६ चौ.फुट) अकृषक भुखंडासाठी शासकीय दराने आदेशाच्‍या दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्त्‍याला आदेशाच्‍या  दिनांकापासुन एक महिण्‍याच्‍या आत द्यावी आणि सदरहु रक्‍कम एक महिण्‍याच्‍या  आत न दिल्‍यास त्‍या रकमेवर दिनांक १०/०२/२०२१ पासुन द.सा.द.शे. १० टक्‍के  दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.

  1. विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ आदेशीत करण्‍यात येते की, विरुध्‍द  पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  2. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.