Maharashtra

Nagpur

CC/722/2018

ADV. CHANDRASHEKHAR RAMCHANDRA DHAK - Complainant(s)

Versus

M/S EUREKA FORBES LIMITED THROUGH ITS MANAGER - Opp.Party(s)

ADV RAMESH BANDE

19 Aug 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/722/2018
( Date of Filing : 05 Dec 2018 )
 
1. ADV. CHANDRASHEKHAR RAMCHANDRA DHAK
4/76, RAJE RAGHUJI NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S EUREKA FORBES LIMITED THROUGH ITS MANAGER
503, 5TH FLOOR, PAUL COMMERCIAL COMPLEX, OPPOSITE AJIT BAKERY AJNI SQUARE, WARDHA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV RAMESH BANDE, Advocate
For the Opp. Party:
Dated : 19 Aug 2019
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.       तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या राहत्‍या घरी विरुध्‍द पक्ष कंपनीचे प्रतिनिधी माहे सप्‍टेंबर 2016 मध्‍ये आले व  त्‍यांच्‍या कंपनीचे व्‍हॅक्‍यूम क्लिनर घेण्‍याबाबत विनंती केली.  परंतु तक्रारकर्त्‍याने  घरघुती आर्थिक अडचणी असल्‍यामुळे घेण्‍यास नकार दिला. परंतु त्‍यानंतर वारंवांर विरुध्‍द पक्षाचे प्रतिनिधी तक्रारकर्त्‍याच्‍या घरी भेट देऊन सदर मशिन घेण्‍याकरिता आग्रह करीत होते आणि विशेष सवलतीच्‍या दरात उपलब्‍ध करुन देण्‍याचे आश्‍वासित करीत होते. परंतु तक्रारकर्त्‍या जवळ व्‍हॅक्‍यूम क्लिनर असल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाच्‍या प्रतिनिधीनी तक्रारकर्त्‍याच्‍या वापरात असलेल्‍या व्‍हॅक्‍यूम क्लिनरच्‍या बदल्‍यात नविन व्‍हॅक्‍यूम क्लिनर रुपये 4,000/- मध्‍ये देण्‍याची तक्रारकर्त्‍याला ऑफर(प्रस्‍ताव) दिली. परंतु तक्रारकर्त्‍याने घरघुती अडचणीमुळे घेण्‍यास नकार दिला.
  2.        त्‍यानंतर पुनःश्‍च विरुध्‍द पक्षाचे प्रतिनिधी मोतीलाल तक्रारकर्त्‍याच्‍या घरी आले व त्‍याने त्‍याच्‍या कंपनीचा Vacuum cleaner  WD X 2 रुपये 9,000/- मध्‍ये विकत घेण्‍याबाबत तयारी दाखविली व त्‍याच्‍या बदल्‍यात तक्रारकर्त्‍याला जुना व्‍हॅक्‍यूम क्लिनर द्यायवाचा होता. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे प्रतिनिधी जवळून व्‍हॅक्‍यूम क्लिनर घेण्‍याची तयारी दर्शविली. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या प्रतिनिधीला रुपये 9,000/- दिले, परंतु त्‍याने फक्‍त तक्रारकर्त्‍याला रुपये 1,000/- देण्‍यास सांगितले व उर्वरित रक्‍कम व्‍हॅक्‍यूम क्लिनरची डिलिवरी देते वेळी देण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याने रुपये 1,000/- विरुध्‍द पक्षाचे प्रतिनिधी मोतीलाल यांना दिले व त्‍यांनी पावती क्रं. 106, ज्‍याचा कोड नं. 62496 , CSS’s Name MOTILAL कोड नं. 4003859  अशी  पावती तक्रारकर्त्‍याला दिली व व्‍हॅक्‍यूम क्लिनर ची डिलिवरी  4-5 दिवसात देतो असे सांगितले व व्‍हॅक्‍यूम क्लिनर मिळाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाचे संबंधित प्रतिनिधी यांना भ्रमणध्‍वनी क्रं. 7841830990 वर फोन करायचा होता. व्‍हॅक्‍यूम क्लिनरचे प्रात्‍यक्षिक बघितल्‍यावर तक्रारकर्त्‍याला उर्वरित रक्‍कम द्यावयाची होती आणि जुने व्‍हॅक्‍यूम क्लिनर परत द्यावयाचे होते.
  3.        तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, त्‍याने संपूर्ण आठवडा व्‍हॅक्‍यूम क्लिनर या प्रॉडक्‍टची वाट बघितली परंतु व्‍हॅक्‍यूम क्लिनर त्‍याला प्राप्‍त झाले नाही. म्‍हणून विरुध्‍द पक्ष कंपनीच्‍या प्रतिनिधीशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्‍यांनी सांगितले की, दिवाळीच्‍या सणामुळे व्‍हॅक्‍यूम क्लिनरचा तुटवडा आहे. त्‍यामुळे त्‍याला व्‍हॅक्‍यूम क्लिनरची डिलिवरी वेळेत देणे शक्‍य नाही, परंतु काही आठवडयातच ती देण्‍यात येईल. त्‍यानंतर ही काही दिवस वाट पाहून ही  सदरचे प्रॉडक्‍ट तक्रारकर्त्‍याच्‍या घरी पोहचविले नाही व विचारणा केली असता प्रत्‍येक वेळी उडवाउडवीचे उत्‍तर दिले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने प्रत्‍यक्ष कंपनीच्‍या अधिका-यांशी संपर्क साधला असता त्‍यांनी प्रॉडक्‍टची डिलिवरी देण्‍याची असमर्थता दर्शविली व अतिरिक्‍त रक्‍कमेची मागणी केली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मार्च 2017 मध्‍ये विरुध्‍द पक्षाचे कस्‍टमर केअरशी संपर्क साधला व सांगितले की, त्‍याच्‍या तक्रारीची जर दखल घेतल्‍या गेली नाही तर तक्रारकर्ता हा कायदेशीर कार्यवाही करेल. त्‍यावर विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याची तक्रार लवकरात लवकर सोडविण्‍यात येईल व सबंधित व्‍यक्‍तीकडे आपली तक्रार पाठविण्‍यात येईल असे आश्‍वासित केले आणि तक्रारकर्त्‍याला तक्रार क्रं. 98967735 हा पुढील कार्यवाहीकरिता दिला. परंतु त्‍याचा काहीही उपयोग झाला नाही. त्‍यानंतर पुनःश्‍च तक्रारकर्त्‍याने 02239883333  या क्रमांकावर तक्रार केली त्‍यावेळी पुन्‍हा तक्रारकर्त्‍याला 99494809 हा तक्रार क्रमांक दिला आणि 48 तास वाट बघण्‍यास सांगितले परंतु आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्‍यात आली नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दि. 31.05.2017 रोजी विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली व ती प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची कोणतीही दखल घेतली नाही व तक्रारकर्त्‍याला विनंती केली की त्‍याच्‍या विरुध्‍द कोणतीही कायदेशीर कार्यवाही करु नये. तसेच त्‍याची तक्रार लवकरच सोडविण्‍यात येईल असे सांगितले.  त्‍यानंतर कंपनीचे वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापक श्री. दिपक भावसार यांनी भेट देण्‍याबाबत कळविले आणि काही वेळ वाट बघण्‍यास सांगितले. त्‍यानंतर त्‍यांनी प्रत्‍यक्ष तक्रारकर्त्‍याची भेट घेतली परंतु तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचे निवारण करण्‍यात आले नाही. शेवटी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला व्‍हॅक्‍यूम क्लिनर या प्रॉडक्‍टची डिलिवरी देऊ शकत नाही असे सांगितले. त्‍यामुळे शेवटी नाईलाजास्‍तव तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
  4.        तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारीत मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने करार केल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याला व्‍हॅक्‍यूम क्लिनर प्रॉडक्‍टची डिलिवरी देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.
  5.        विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन विरुध्‍द पक्ष  मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा दि. 26.02.2019 रोजी आदेश पारित करण्‍यात आला.  
  6.        तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार, नि.क्रं. 3 वर दाखल दस्‍तावेज, लेखी युक्तिवाद तसेच तक्रारकर्त्‍याचा तोंडी युक्तिवाद ऐकून मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नोंदविले.  

मुद्दे उत्‍तर

  1.   तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे कायॽ                    होय
  2.   विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली कायॽ           होय
  3.   काय आदेश                                       अंतिम आदेशानुसार

 

  •    कारणमिमांसा

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून व्‍हॅक्‍यूम क्लिनर WD X2 रुपये 9,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा सौदा केला होता व त्‍याच्‍या बदल्‍यात जुना व्‍हॅक्‍यूम क्लिनर द्यायचा होता. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने व्‍हॅक्‍यूम क्लिनरच्‍या खरेदीपोटी रुपये 1,000/- विरुध्‍द पक्षाला अदा केले व त्‍याची पावती तक्रारकर्त्‍याने नि.क्रं.3 (1) वर दाखल केली आहे. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  तक्रारकर्त्‍याने  नि.क्रं. 3(1) वर दाखल केलेल्‍या पावती क्रं. 106 चे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍यामध्‍ये व्‍हॅक्‍यूम क्लिनर रुपये 9,000/- मध्‍ये खरेदी केल्‍याचा कुठेही करार झालेला नाही. तसेच नविन व्‍हॅक्‍यूम क्लिनरच्‍या बदल्‍यात जुना व्‍हॅक्‍यूम क्लिनर देण्‍याचे नमूद नाही. विरुध्‍द पक्ष यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही त्‍यांनी आपल्‍या बचावात लेखी उत्‍तर दाखल केले नाही. तक्रारकर्त्‍याने पावतीची प्रत अभिलेखावर दाखल केल्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून व्‍हॅक्‍यूम क्लिनरच्‍या बुकिंगपोटी दिलेली रक्‍कम रुपये 1,000/- परत मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

       सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.  
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याकडून व्‍हॅक्‍यूम क्लिनर बुकिंग पोटी घेतलेली रक्‍कम रुपये 1,000/- परत करावी व सदरहू रक्‍कमेवर दिनांक 06.10.2016  पासून  तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत तक्रारकर्त्‍याला द.सा.द.शे.9 टक्के दराने व्‍याज द्यावे.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला शारिरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 3,000/-(रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 2,000/-(रुपये दोन हजार फक्त ) अदा करावे.
  4. वरील आदेशाचे पालन विरुध्‍द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.   

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.