Maharashtra

Nagpur

CC/408/2017

RAHUL RAOSAHEB BOBADE - Complainant(s)

Versus

M/S EICHER MOTORS, THROUGH MANAGING DIRECTOR - Opp.Party(s)

MR. SANJAY PATRIKAR

24 Nov 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/408/2017
( Date of Filing : 26 Sep 2017 )
 
1. RAHUL RAOSAHEB BOBADE
R/O. FLAT NO. 304, SANCHAYANI COMPLEX, RING ROAD, NEAR NIT GARDEN, TRIMURTI NAGAR, NAGPUR-440022
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/S EICHER MOTORS, THROUGH MANAGING DIRECTOR
OFF. AT. CONFLUENCE-BUSINESS CENTER, 16TH, FLOOR, BUILDING NO. 9A, DLF CYBER CITY, DLF PHASE III, GURGAON-122002
Nagpur
Maharashtra
2. M/S. PARAGON TRADERS, THROUGH MANAGING DIRECTOR
1&2, DHANASHREE COMPLEX, NEAR HOTEL HARDEV, NAGPUR-440012
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:MR. SANJAY PATRIKAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 24 Nov 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये ः-

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 हे Royal Enfield या  दुचाकी वाहनाचे उत्‍पादक असून विरुध्‍द पक्ष 2 हे वाहनाचे वितरक आहेत. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 कडून Royal Enfield  क्‍लासिक 350  (काळया रंग) हे दुचाकी वाहन खरेदी केले होते व त्‍याचा क्रं. MH.31- EW-2332 असा होता. तक्रारकर्त्‍याने सदरचे वाहन ताब्‍यात घेतल्‍यापासून त्‍यात दोष असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदरचे वाहन विरुध्‍द पक्ष 2 कडे वारंवांर दुरुस्‍तीकरिता दिले. सदरच्‍या वाहनात हॅन्‍डल बार व्‍यवस्थित नव्‍हते, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला वाहन वळविण्‍यात अडचण येत होती. तसेच वाहनाच्‍या समोरील चाकात दोष होता, त्‍यामुळे  सदरचे वाहन सरळ मार्गाने न जाता एका बाजूने वळत होते.  याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याशी संपर्क साधून वाहनातील दोषबाबत सांगितले असता सदरचा दोष अगदी लहान असल्‍याचे सांगून लवकरच त्‍यातील दोष दूर करुन देणार असे सांगितले, त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने वाहन वि.प. 2 च्‍या  अधिकृत  दुरुस्‍ती केंद्रात दिले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 कडून वाहन दुरुस्‍त झाल्‍यानंतर घेऊन गेल्‍यानंतर ही त्‍यातील दोष दूर झाले नसल्‍याचे आढळून आले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने  याबाबत वारंवांर विरुध्‍द पक्ष 2 कडे तक्रार केली व वाहन दुरुस्‍तीकरिता दिले होते व प्रत्‍येक वेळी विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारकर्त्‍याला खोटे आश्‍वासन दिले. यावरुन सदरच्‍या वाहनात गंभीर स्‍वरुपाचे निर्मित दोष असल्‍याचे  आढळून आल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 ला ई-मेल द्वारे सदरच्‍या वाहनात निर्मिती दोष असल्‍याने वाहन बदलून नविन वाहन देण्‍यात यावे असे कळविले, त्‍यावर विरुध्‍द पक्ष 2 ने तक्रारकर्त्‍याला आश्‍वासित केले की, विरुध्‍द पक्ष 1 चे सर्विस इंजिनियर येऊन वाहनाची तपासणी केल्‍यानंतर पुढील निर्णय घेण्‍यात येईल. ठरल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष 1 च्‍या सर्विस इंजिनिअरने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची तपासणी केली असता वादातीत वाहनाचे Handle Bar basic shaft defective असून तो एका बाजूने वाकलेला असल्‍यामुळे त्‍याची दुरुस्‍ती होऊ शकत नाही. त्‍यामुळे सदरचे वाहन बदलून देणे योग्‍य राहील असे मत मांडले होते.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 कडे दि. 23.06.2017 रोजी ई-मेल द्वारे सदरचे वाहन 15 दिवसात दुरुस्‍त करुन द्यावे किंवा बदलून देण्‍याची मागणी केली होती.  त्‍यावर विरुध्‍द पक्ष 1 ने तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष 2 कडे  पुन्‍हा एकदा  सदरचे वाहन दुरुस्‍तीकरिता व सर्विसिंगकरिता देण्‍यास सांगितले व त्‍यानंतर त्‍याची टेस्‍ट ड्राईव्‍ह घेण्‍यास सांगितले होते. परंतु विरुध्‍द पक्ष 2 च्‍या मॅकनिकने तक्रारकर्त्‍या सोबत गैरवर्तन केले व याबाबतची वि.प. 2 कडे तक्रार केली असता त्‍यांनी सुध्‍दा आपल्‍या मॅकनिकची बाजु घेतली. अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याची कोणतीही बाजू विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी ऐकून घेतली नाही. तसेच त्‍यांची  Royal Enfield हे  दुचाकी वाहन तक्रारकर्त्‍याला दुरुस्‍त करुन परत केले नाही व आज ही तक्रारकर्त्‍याचे दुचाकी वाहन विरुध्‍द पक्ष 2 कडेच दुरुस्‍तीकरिता प्रलंबित आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने सेवेत त्रुटी केल्‍याचे व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला Royal Enfield क्‍लासिक 350 (काळया रंगाचे )  दुचाकी नविन वाहन द्यावे. किंवा हे शक्‍य नसल्‍यास तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे सदरच्‍या वाहनाकरिता अदा केलेली रक्‍कम रुपये 1,46,704/-,  दि. 08.04.2016 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. त्‍याचप्रमाणे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.  

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 यांनी आपला लेखी जबाब दाखल केला असून त्‍यात  नमूद केले की,  त्‍यांचे कार्यालय हे कलम 11(2) (बी) अंतर्गत येत असल्‍यामुळे आयोगाच्‍या अधिकार क्षेत्रात येत नसल्‍याने प्रस्‍तुत तक्रार चालू शकत नाही. तक्रारकर्त्‍याने कोर्टाची दिशाभूल केली असून तो स्‍वच्‍छ हाताने आलेला नाही. तक्रारकर्त्‍यास तक्रार दाखल करण्‍यास कारण घडलेले नसल्‍याने जाणूनबुजून त्रास देण्‍याच्‍या उद्देशाने प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून आपले म्‍हणणे सिध्‍द करण्‍याकरिता कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनात कुठलाही तांत्रिक दोष नाही. Royal Enfield ही प्रतिष्‍ठीत व नामांकित कंपनी असून त्‍यांच्‍याकडे उत्‍कृष्‍ट तांत्रिक असून त्‍यांचे कर्मचारी हे सहयोगी आहेत.  तक्रारकर्ता हा कलम 2 (1) (ड) प्रमाणे ग्राहक होत नाही.      वि.प. 2 ने आपल्‍या उत्‍तरात नमूद केले आहे की, तक्रारकर्त्‍याचे वाहन हे दुरुस्‍तीकरिता आले होते व त्‍यांनी सदरचे वाहन दुरुस्‍त करुन ते घेऊन जाण्‍यास सांगून ही तक्रारकर्ता घेऊन गेला नाही.  याबाबत विरुध्‍द पक्ष 2 ने ई-मेल सुध्‍दा केला होता. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी कुठलीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला नुकसानभरपाई देण्‍यास जबाबदार नाही. म्‍हणून विरुध्‍द पक्ष 1 व 2 विरुध्‍द दाखल केलेली तक्रार खारीज करण्‍यात यावी.  
  2.      विरुध्‍द पक्ष 2 यांनी आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले आहे की, विरुध्‍द पक्ष 1 हे Royal Enfield  या वाहनाचे उत्‍पादक असून तो सदरच्‍या वाहनाचा वितरक आहे आणि Royal Enfield ही एक नामांकित प्रतिष्ठित कंपनी आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन विरुध्‍द पक्षाकडे दि. 08.12.2016 ते 13.07.2017 या कालावधी दरम्‍यान वाहन वॉरन्‍टी कालावधीत असतांना बदलविण्‍याकरिता/ दुरुस्‍तीकरिता आणले नसून श्रीकृष्‍णा अॅटोमोबाईल्‍स दुकान क्रं. 6, 7 व 8, छाप्रुनगर चौक, सेंट्रल रेव्‍हन्‍यू रोड, नागपूर येथे दुरुस्‍तीकरिता नेले होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 यांना ई-मेल द्वारे काहीही कळविलेले नाही व याबाबतचा कुठलाही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 2 ने मान्‍य केले आहे की, त्‍यांनी दि. 08.04.2016 रोजी तक्रारकर्त्‍याला वाहन तपासणीनंतर तक्रारकर्त्‍याचे समाधान झाल्‍यावर वाहनाचा ताबा दिला होता व याबाबतचे दस्‍तावेज दाखल केलेले आहे. तसेच दि. 22.05.2016 रोजी तक्रारकर्त्‍याने सदरचे वाहन प्रथमतः फ्री सर्विसकरिता आणले होते, त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याचे वाहन हे 360 कि.मी. चालले असल्‍याचे दिसून आले होते. त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष 2 ने सदरचे दुचाकी वाहन हे दुरुस्‍त करुन दिले व जॉब कार्ड क्रं. आर.जे.सी. 0266161701058 प्रमाणे तक्रारकर्त्‍याला वाहन परत केले व आवश्‍यकते प्रमाणे ऑईल बदलून सर्विसिंग करुन दिली, त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने रुपये 1100/-  अदा केले होते. त्‍यानंतर तक्रारकर्ता दि. 22.05.2016 रोजी दुस-या फ्री सर्विसिंगकरिता वाहन घेऊन आले होते व त्‍याचा जॉब कार्ड क्रं. आर.जे.सी.ओ. 26616701609 प्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रुपये 200/- अदा करुन वाहन घेऊन गेले होते. त्‍यानंतर तक्रारकर्ता दि. 05.12.2016 रोजी पुन्‍हा सदरचे वाहन घेऊन आले त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याचे वाहन हे 2701 कि.मी. चालविण्‍यात आल्‍याचे दिसून येत होते. त्‍यावेळी जॉब कार्ड क्रं. आर.जे.सी.0266161704735 असा होता व त्‍याकरिता रुपये 101/- एवढी रक्‍कम अदा केली होती. अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने सदरचे वाहन वॉरन्‍ट कालावधीत 3-4 वेळा फ्री सर्विसिंग घेतलेल्‍या होत्‍या. तक्रारकर्त्‍याने दि. 09.01.2017 ते 30.01.2017 या कालावधीत श्री.कृष्‍णा अॅटोमोबाईल्‍स नागपूर यांच्‍याकडून सुध्‍दा वाहनात दुरुस्‍ती करुन घेतली होती, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने श्रीकृष्‍णा अॅटोमोबाईल्‍स यांना पक्षकार करणे आवश्‍यक होते. तसेच तक्रारकर्त्‍याने दि. 23.06.2017 रोजी विरुध्‍द पक्ष 2 ला कुठल्‍याही प्रकारचा ई-मेल पाठविलेला नसून सदरचा ई-मेल विरुध्‍द पक्ष 1 ला पाठविण्‍यात आलेला होता. तसेच विरुध्‍द पक्ष 1 ने दि. 24.06.2017 रोजी तक्रारकर्त्‍यास मेल पाठवून त्‍याचे वादातीत वाहन हे दि.25.06.2017 रोजी सकाळी 11.30 वा. वि.प. 2 कडे दुरुस्‍तीकरिता आणण्‍यास सांगितले होते, परंतु तक्रारकर्त्‍याने  सदरचे वाहन न आणता दि. 02.07.2017 रोजी श्रीकष्‍ण अॅटोमोबाईलसचे प्रोपा. योगेश यांना सदरचे वाहन दुरुस्‍त करण्‍यास सांगितले. दि. 14.07.2017 रोजी त.क.ने वि.प. 2 कडे सदरचे वाहन आणले व याबाबतची माहिती वि.प. 1 चे एरिया सर्विस मॅनेजर, अनुप झोडे यांना माहिती दिली व त्‍यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची तपासणी केली असता त्‍यांना सदरच्‍या वाहनात कुठलाही दोष आढळून आला नाही. परंतु तक्रारकर्त्‍याच्‍या समाधानाकरिता एरिया सर्विस मॅनेजरने सदरचे वाहन हे वॉरन्‍टी कालावधीत असल्‍यामुळे वाहनाचे headlamp casing, handlebar, ball neck kit, बदलविण्‍यास सांगितले. त्‍यानंतर जुलै 2017 पर्यंत  तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची वारंवांर टेस्‍ट ड्राईव्‍ह घेतल्‍या, तो पर्यंत सदरच्‍या वाहनाचा ताबा विरुध्‍द पक्षाकडे होता. परंतु त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याच्‍या 942068857 या मो.क्रं. वर संपर्क साधून त्‍यांना वारंवांर वाहन घेऊन जाण्‍यास सांगितले असतांना सुध्‍दा तक्रारकर्ता वाहन घेऊन गेला नाही, म्‍हणून वि.प. 2 ने (Receipt No. EM471153371IN द्वारे) दि. 17.11.2017 रोजी पत्र पाठवून वाहन घेऊन जाण्‍यास सांगितले होते. त्‍यानंतर ही तक्रारकर्ता वाहन घेण्‍यास आला नाही व आज ही सदरचे वाहन हे वि.प. 2 कडेच आहे. यात वि.प. 2 ची कुठलीही चूक नाही, तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनात कुठल्‍याही प्रकारचा दोष नाही. त्‍याचप्रमाणे सदरची तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडले नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कुठलीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही अथवा अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केलेला नाही, म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.  

 

  1.      उभय पक्षांनी  दाखल केलेले दस्‍तऐवज, लेखी युक्तिवाद याचे काळजीपूर्वक अवलोकन केले व तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

अ.क्रं. मुद्दे उत्‍तर

 

1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?          होय

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय? होय

 

3. काय आदेश ?                            अंतिम आदेशानुसार

 

  • निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 ने निर्मित केलेले Royal Enfield  क्‍लासिक 350  (काळया रंग) हे दुचाकी वाहन विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून  दि. 08.04.2016 रोजी रुपये 1,46,704/- मध्‍ये खरेदी केले होते व त्‍याचा क्रं. MH.31- EW-2332 असा होता व सदरच्‍या वाहनाचा त्‍याच दिवशी ताबा घेतला असल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष 1 व 2 चा ग्राहक असल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्त्‍याने वाहन खरेदी केल्‍यापासून सदरच्‍या वाहनात headlamp casing, handlebar, ball neck kit, मध्‍ये दोष होता, त्‍यामुळे वाहन वळविण्‍यात अडचण येत होती. तसेच वाहनाच्‍या समोरील चाकात दोष होता व दुचाकी वाहनाचा Handle Bar basic shaft defective असल्‍यामुळे सदरचे वाहन सरळ मार्गाने न जाता एका बाजूने वळत होते, याकरिता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 कडे दि. 25.05.2016 रोजी प्रथम फ्री सर्विसिंगकरिता घेऊन गेला होता, त्‍यानंतर दि. 20.06.2016 रोजी दुसरी फ्री सर्विसिंगकरिता घेऊन गेला होता व तिसरी फ्री  सर्विसिंग दि. 05.12.2016 ला व चौथी सर्विसिंग दि. 28.01.2017 ला केली असल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 ला ई-मेल द्वारे सदरच्‍या वाहनात पुन्‍हा दोष आढळल्‍याबाबत दि. 23.06.2017 रोजी कळविले होते.  परंतु सदरचे वाहन दुरुस्‍तीकरिता दिल्‍यानंतर सुध्‍दा वादातीत वाहनातील दोष दूर  झाले नसल्‍याचे ई-मेल मध्‍ये नमूद केले आहे. त्‍यानंतर पुन्‍हा वाहनातील दोष दूर न झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 02.07.2017 रोजी ई-मेल द्वारे सदरच्‍या वादातीत वाहनातील दोष दूर करुन देण्‍यात आले नसल्‍याचे कळविले असल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते यावर विरुध्‍द पक्षाने  दि. 24.07.2017 रोजी तक्रारकर्त्‍याला ई-मेल पाठवून वादातीत वाहन दुरुस्‍तीकरिता आणण्‍यास सांगितले असल्‍याचे दिसून येते.यासंबंधीच सर्व दस्‍तावेज नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन स्‍पष्‍टपणे दिसून येते. तसेच अभिलेखावरील दस्‍तावेजानुसार सदरच्‍या वाहनात दोष असल्‍याचे विरुध्‍द पक्षाने मान्‍य केले होते. त्‍यामुळे सदरचे वाहनात दोष असल्‍याबाबतचे म्‍हणणे सिध्‍द करण्‍याकरिता तज्ञ अहवालाची गरज नाही असे आयोगाचे मत आहे.
  2.        विरुध्‍द पक्षाने पाठविलेल्‍या ई-मेल प्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 कडे वादातीत वाहन आणले असतांना सुध्‍दा तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनातील दोष दूर न झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 कडून वादातीत वाहन घेऊन गेले नाही.  तक्रारकर्त्‍याने वारंवांर वादातीत वाहन बदलून देण्‍याची मागणी करुन सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण वाहन बदलून दिले नाही, ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे आयोगाचे स्‍पष्‍ट आहे. 

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

                         अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला नविन Royal Enfield  क्‍लासिक 350  (काळया रंग) हे दुचाकी वाहन द्यावे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                       किंवा

उपरोक्‍त आदेशाचे पालन करणे कोणत्‍याही कारणास्‍तव शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याने वाहनापोटी जमा केलेली रक्‍कम रुपये 1,46,704/- ही दिनांक 08.04.2016 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 16 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला  द्यावी.   

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या  तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्चम्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त  झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.