न्यायनिर्णय
(न्यायनिर्णयाचा दिनांक आज दि.15 जानेवारी, 2019)
न्यायनिर्णय द्वारा- मा.अध्यक्ष श्री.रा.गो. वानखडे.
1. तक्रारीतील मजकूर थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारदार हे संगीतकार असुन, संगीताचे कार्यक्रम करीत असतात. त्यांनी सामनेवाले यांच्या संकेत स्थळावरुन परदेशी जाण्यासाठी विमानाचे तिकीट घेतले होते ते तिकीट ता.04.06.2017 रोजी स्टॉकहोलम स्विडनच्या ता.26.06.2017 रोजी लंडन येथे जाण्यासाठी व लंडनवरुन ता.27.06.2017 रोजी मुंबई येथे परत येण्यासाठी नोंदविले होते. त्या तिकीटापोटी तक्रारदार यांनी रु.27,386/- ऑन लाईन खर्च केले होते. ता.26.06.2017 रोजी स्टॉकहोलमवरुन निघाल्यानंतर त्यांस पुढील विमानात बसू दिले नाही, कारण विमानतळ अधिकारी यांनी ट्रान्झीट व्हीजा (Transit-Visa) मागितला जो तक्रारदार यांच्याकडे नव्हता. ट्रान्झीट व्हीजा (Transit-Visa) लागतो याबाबत कल्पना त्यांस दिली नव्हती. सामनेवाले यांनी निमूट रहाणे पसंत केले. त्यामुळे तक्रारदारास ता.27.06.2017 रोजी दुबई मार्गे मुंबई येथे यावे लागले, व ते मुंबईस ता.28.06.2017 रोजी पोहोचले, व त्या करीता त्यांना रु.39,000/- खर्च आला. सामनेवाले यांनी परदेशी प्रवास करतांना व ट्रान्झीट व्हीजाबद्दल कल्पना दयावयास पाहिजे होती, परंतु ती त्यांनी दिली नाही. त्यामुळे त्यांनी सेवेमध्ये त्रुटी केली असे जाहिर करुन एकूण रु.66,386/- व त्यावर 18 टक्के व्याज व निष्काळजीपणामुळे सामनेवाले यांच्याकडून रु.50,000/- मोबदला मिळावा म्हणून ही तक्रार दाखल केली. कारण तक्रारदार यांनी केलेली मागणी ता.02.08.2017 रोजी सामनेवाले यांच्या वकीलामार्फत पत्र पाठवून नाकारली आहे.
3. सामनेवाले यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल करुन ट्रान्झीट व्हीजा (Transit-Visa) घ्यावा लागतो हे सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती, तसेच प्रवास करण्यासंबंधीच्या तिकीट नोंदविणे करीता असणा-या अटी तक्रारदार यांनी स्वतःहून वाचून घ्यावयास पाहिजे. सामनेवाले यांच्याकडून कोणतीही कोणतीही सेवेमध्ये त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदार यांनी त्यांच्याकडे व्हीजा संबंधी चौकशी केलेली नाही. ऑन लाईन तिकीट नोंदवीतांना ज्या शर्ती व अटी असतात त्यापैंकी क्लॉज-13 प्रमाणे तक्रारदार यांची ट्रान्झीट व्हीजा (Transit-Visa) घेण्याची जबाबदारी होती. मा.राष्ट्रीय आयोगाच्या एआयआर इंडिया विरुध्द सुशिलकुमार II (2015) CPJ 75 (NC) प्रमाणे सामनेवाले यांची कोणतीही जबाबदारी येत नसुन सेवेमध्ये त्रुटी ठेवल्याचे म्हणता येणार नाही म्हणून ही तक्रार खारीज करुन ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम-26 प्रमाणे रु.1,50,000/- खर्च व नुकसानभरपाई दयावी असे म्हटले आहे.
4. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाले यांचा लेखी जबाब, उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे यासर्वांचे सखोल वाचन केले. तसेच तक्रारदार यांचे वकील श्रीमती पंथी लाड व सामनेवाले यांचे वकील श्री.पृथ्वीक राव यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. तक्रारदार हे संगीत व्यवसायात असुन ते संगीतकार आहेत व संगीतासंबंधी कार्यक्रमासाठी ते वेगवेगळया ठिकाणी जात असतात. तक्रारदारास लंडन येथे जाण्यासाठी त्यांनी ता.04.06.2017 रोजी सामनेवाले यांच्या संकेत स्थळावरुन ता.26.06.2017 रोजी स्टॉकहोलम स्विडन ते लंडन व ता.27.06.2017 चे लंडन ते मुंबई असे तिकीट काढले होते, व त्यासाठी रु.27,386/- खर्च केले होते.
6. ज्यावेळेस सामनेवाले यांच्या संकेत स्थळावरुन ऑन लाईन तिकीट काढले त्यावेळेस तक्रारदार यांचा प्रवास स्टॉकहोलम (Stockholm्हबत कल्पना त्यांस दिली नवह) ते लंडन व लंडन ते मुंबई असा ता.26.06.2017 व ता.27.06.2017 ला असल्याची जाणीव सामनेवाले यांस होती. स्टॉकहोलम (Stockholm्हबत कल्पना त्यांस दिली नवह) येथून निघतांना लंडन येथे जाऊन लंडन येथून दुसरे विमान बदलावे लाणार व त्यासाठी ट्रान्झीट व्हीजा लागणार याची कल्पना तक्रारदारास नव्हती व तशी कल्पना देण्यात आली नसल्याचे प्राथमिक दृष्टया दिसुन येते. जरी काही शर्ती व अटींमध्ये ट्रान्झीट व्हीजा विषयी लिहिलेले असले तरी ती सांगण्याची जबाबदारी सामनेवाले यांच्यावर होती व आहे.
7. ता.26.06.2017 रोजी तक्रारदार स्टॉकहोलम (Stockholm्हबत कल्पना त्यांस दिली नवह) येथून निघाल्यावर लंडन येथे त्यांना दुसरे विमान बदलतांना विमानतळ अधिकारी यांनी ट्रान्झीट व्हीजा (Transit-Visa) नव्हता म्हणून अडविले त्यामुळे त्यांना लंडन ते मुंबई हा प्रवास त्यादिवशी करता आला नाही. लंडन ते मुंबई प्रवास करण्यासाठी तक्रारदारास ता.28.06.2017 रोजी जास्तीचे रु.39,000/- भरावे लागले. तक्रारदारास स्टॉकहोलम ते मुंबई दुबई मार्गे यावे लागले कारण दुबई मार्गे येतांना ट्रान्झीट व्हीजा (Transit-Visa) लागत नाही. अशा परिस्थितीत जास्तीचे रु.39,000/- चा भुर्दंड पडला. 8. सामनेवाले यांच्या वकीलांच्या युक्तीवादानुसार ट्रान्झीट व्हीजा लागतो किंवा नाही यासंबंधीच्या शर्ती व अटी तक्रारदार यांनी वाचून घेणे बंधनकारक होते, व त्यामध्ये सामनेवाले यांची कोणतीही चुक नाही व कोणतीही त्रुटी ठेवली नाही. या त्यांच्या युक्तीवादाच्या समर्थनार्थ त्यांनी मा.राष्ट्रीय आयोगाच्या एआयआर इंडिया विरुध्द सुशिलकुमार II (2015) CPJ 75 (NC) या न्याय निर्णयाचा आधार घेतला. या न्याय निर्णयामध्ये ट्रान्झीट व्हीजा (Transit-Visa) लागतो व त्यांना ट्रान्झीट व्हीजा (Transit-Visa) मिळाला नाही म्हणून प्रवास करता आला नाही. या हातातील प्रकरणात मात्र कथने वेगळी असल्याने त्या न्याय निर्णयाची मदत सामनेवाले यांस होणार नाही.
9. वरील चर्चेवरुन ही गोष्ट स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून ऑन लाईन तिकीट नोंदवून स्टॉकहोलम ते लंडन आणि लंडन ते मुंबई अशी केली होती, व त्यावेळेस ट्रान्झीट व्हीजा (Transit-Visa) विषयी पुर्ण जाणकारी व माहिती तक्रारदारास दिली गेली नाही. सामनेवाले हे प्रवास व त्यासाठी लागणा-या सुविधा व ऑन लाईनच्या तिकीटासाठी व्यवसाय करतात. अशा परिस्थितीत तक्रारदार किेंवा त्या सारख्या व्यक्तींना प्रवासाच्या तिकीटा विषयी दोन देशांमधील असलेल्या ट्रान्झीट व्हिजा (Transit-Visa) किंवा इतर महत्वाच्या गोष्टी सांगावयास पाहिजे व ही त्यांची जबाबदारी असते. ती जबाबदारी सामनेवाले यांनी पाळली नसल्यामुळे सेवेमध्ये त्रुटी ठेवल्याचे म्हणता येईल. या प्रकरणात सामनेवाले यांच्याकडून तिकीटा संबंधी रु.66,386/- ची मागणी व्याजासह केली आहे, व रु.50,000/- मानसिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी रक्कम रु.45,000/- ची मागणी केलेली आहे. वरील चर्चा लक्षांत घेता तक्रारदारास त्यांस आलेल्या तिकीटाचा खर्च व झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मंजुर केल्यास न्यायाच्या दृष्टीने उचित होईल असे वाटते. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
- आ दे श -
तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(1) सामनेवाले यांनी सेवेमध्ये त्रुटी ठेवल्याचे जाहिर करण्यात येते.
(2) सामनेवाले यांनी तक्रारदारास तिकीटाचा खर्च रक्कम रु.66,386/- (अक्षरी रुपये सहासष्ट हजार तीनशे शहयांशी) तिकीटा संबंधी आज पासुन दोन महिन्यांच्या आंत परत करावे.
(3) वरील रक्कम दोन महिन्यांच्या आंत परत न केल्यास दोन महिन्यांचा अवधी संपल्यानंतर तेव्हा पासुन पुर्ण रक्कम वसुल होई पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दयावे.
(4) सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) दयावेत.
(5) सामनेवाले यांनी तक्रारदारास तक्रार खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) दयावेत.
(6) अंतिम न्यायनिर्णयाची प्रत तक्रारदार व सामनेवाले यांना ग्राहक संरक्षण नियम, 2005 मधील नियम 18 (6) मधील तरतुदीनुसार शेवटच्या पृष्ठावर सदर नोंदीसह साधारण टपालाने पाठविण्यात यावी.
(7) अंतिम न्यायनिर्णयाची साक्षांकित सत्यप्रत उभय पक्षकारांना त्यांचे अर्जान्वये ग्राहक संरक्षण नियम, 2005 मधील नियम 21 मधील तरतुदीनुसार देण्यात यावा.
(8) सदस्य संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
(9) तीन दिवसात निकालपत्र कन्फोनेट प्रणालीमध्ये मंचातील संबंधीत कर्मचा-याने अपलोड करावे.के शे. र ा
दिनांकः 15 जानेवारी, 2019.
ठिकाणः वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051.
जरवा/