Maharashtra

Nagpur

CC/137/2021

SHRI BALLUBHAI DAYARAM NISHAD - Complainant(s)

Versus

M/S DYNAMIC MOTORS NAGPUR - Opp.Party(s)

ADV SHASHANK KAMDI

26 Jul 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/137/2021
( Date of Filing : 18 Feb 2021 )
 
1. SHRI BALLUBHAI DAYARAM NISHAD
LILA ADHAO PLOT NO 3, BELTARODI ROAD, NEAR FULMATI LAY OUT, EKTA HOUSING SOC. BHAGWAN NAGAR NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S DYNAMIC MOTORS NAGPUR
SHOWROOM AT 11 12 AND 13, UPPER GROUND FLOOR, GAENSH HEIGHTS, OPP MARUTI SUZUKI ARENA SHOWROOM KHAMLA SQUARE, RING ROAD, NAGPUR 440025
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 26 Jul 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५(१) अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाकडून एक Two Wheeler TVS XL 100 (Black Colour) Invoice No. DM/19/20/2003, दिनांक १८/१०/२०१९ अन्‍वये एकूण रुपये ४४,५०६/- अदा करुन विकत घेतली ज्‍यामध्‍ये  सी.जी.एस.टी.,  एस.जी.एस.टी., कॉमन एक्‍सेसरीज, आर.टी.ओ. रजिस्‍ट्रेशन चार्जेस, आर.टी.ओ. टॅक्‍स अमाऊंट, इंशुरंस चार्जेस  चा समावेश आहे. विरुध्‍द पक्षाने वरीलप्रमाणे नगदी रक्‍कम प्राप्‍त होताच तक्रारकर्त्‍याला आर.टी.ओ. कार्यालयाकडून नोंदणी न झालेले वाहन दिनांक १८/१०/२०१९ ला संध्‍याकाळी ७.३० वाजता हस्‍तांतरीत केले व तक्रारकर्त्‍याला वाहन आर.टी.ओ. कडून पासिंग करण्‍याकरिता दिनांक २१/१०/२०१९ रोजी ठीक ११.०० वाजता आणण्‍यास सांगितले. विरुध्‍द पक्षाचे सूचनेनुसार तक्रारकर्त्‍याने वाहन शोरुम ला दिनांक २१/१०/२०१९ रोजी ठिक ११.०० वाजता परत केले त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला फोन करुन तक्रारकर्त्‍याला शोरुम ला बालाविले आणि त्‍याच दिवशी वाहन तक्रारकर्त्‍याला हस्‍तांतरीत केले आणि तक्रारकर्ता सदर वाहन घरी घेवून गेला त्‍यावेळी विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला सांगितले की, जोपर्यंत नोंदणी प्‍लेट वाहनाला लावण्‍यात येत नाही तोपर्यंत वाहन चालवू नये त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने वाहन घरात पार्क करुन ठेवले आणि आजही वाहन विकत घेतल्‍यापासून वाहन घरी पार्क आहे. दिनांक २१/१०/२०१९ रोजी विरुध्‍द पक्षाने वाहन तक्रारकर्त्‍याला हस्‍तांतरीत केले त्‍यावेळेस विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सांगितले की, तो सात दिवसांत तक्रारकर्त्‍याचे वाहनाला नोंदणी क्रमांक प्‍लेट लावण्‍याकरिता बोलावेल.
  3. परंतु विरुध्‍द पक्षाकडून फोन न आल्‍यामुळे १० दिवसानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाशी नंबर प्‍लेट मिळण्‍याकरिता संपर्क केला परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला ७ दिवसानंतर बोलावले. विरुध्द पक्षाचे सूचनानुसार तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचे शोरुम ला गेला परंतु त्‍यावेळेस तेथील मॅनेजरने आणि विक्री कर्मचा-याने तक्रारकर्त्‍याशी बोलण्‍याचे टाळले आणि तक्रारकर्त्‍याला प्रतिसाद देत नव्‍हते. त्‍याच कालावधीत विरुध्‍द  पक्षाने मनिष नगर येथील शोरुम बंद केले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला त्‍याचे नवीन शोरुम च्‍या पत्‍त्‍यावर बोलविले. तक्रारकर्त्‍याने दिनांक २१/१०/२०१९ नंतर १५० वेळा विरुध्‍द पक्षाचे शोरुम ला भेट दिली परंतु कोणत्‍याही व्‍यक्‍तीने तक्रारकर्त्‍याचे वाहनाचे नोंदणीकरण्‍याबाबत माहिती दिली नाही. तक्रारकर्त्‍याने वाहनाची संपूर्ण किंमत विरुध्‍द पक्षाला अदा करुनही तक्रारकर्त्‍याचे वाहन आजही नोंदणी झाले नाही आहे व वाहन घरी पार्क करुन ठेवले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता सदर वाहनाचा उपयोग करु शकत नाही किंवा रोडवर चालवू शकत नाही ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ता प्रती ञुटीपूर्ण सेवा होय तसेच अनुचित व्‍यापार प्रथेची कृती होय. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वकीलामार्फत दिनांक २८/१२/२०२० रोजी आर.पी.ऐ.डी. व्‍दारे विरुध्‍द पक्षाचे ईनव्‍हाईस पत्‍त्‍यावर नोटीस पाठविली व ती त्‍याला प्राप्‍त झाली. परंतु विरुध्‍द पक्षाने नोटीसची दखल घेतली नाही करिता तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वाहनाची किंमत रुपये ४४,५०६/- तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये १,००,०००/- आर्थिक नुकसानपोटी रुपये ९०,०००/-, मानसिक व शारीरिक ञासापोटी रुपये १,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २५,०००/- असे एकूण ३,५९,५०६/- अदा करण्‍याचे आदेश करावे.
  1. विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत रजिस्‍टर्ड आर.पी.ए.डी. व्‍दारे नोटीस बजावण्‍यात आली परंतु विरुध्‍द पक्षाने नोटीस घेण्‍यास नकार दिल्‍याने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने  दिनांक २१/६/२०२१ रोजी पारीत केला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत सादर केलेले दस्‍तावेज व लेखी युक्तिवाद याचे वाचन केल्‍यावर व तोंडी युक्तिवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

        अ.क्र.                  मुद्दे                                                    निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?         होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाकडून एक Two Wheeler TVS XL 100 (Black Colour) Invoice No. DM/19/20/2003, दिनांक १८/१०/२०१९ अन्‍वये एकूण रुपये ४४,५०६/- अदा करुन विकत घेतली ज्‍यामध्‍ये  सी.जी.एस.टी., एस.जी.एस.टी., कॉम एक्‍सेसरीज, आर.टी.ओ. रजिस्‍ट्रेशन चार्जेस, आर.टी.ओ. टॅक्‍स अमाऊंट, इंशुरंस चार्जेस चा समावेश आहे. विरुध्‍द पक्षाने वरीलप्रमाणे नगदी रक्‍कम प्राप्‍त होताच तक्रारकर्त्‍याला आर.टी.ओ. कार्यालयाकडून नोंदणी न झालेले वाहन दिनांक १८/१०/२०१९ ला संध्‍याकाळी ७.३० वाजता हस्‍तांतरीत केले व तक्रारकर्त्‍याला वाहन आर.टी.ओ. कडून पासिंग करण्‍याकरिता दिनांक २१/१०/२०१९ रोजी ठीक ११.०० वाजता आणण्‍यास सांगितले. विरुध्‍द पक्षाचे सूचनेनुसार तक्रारकर्त्‍याने वाहन शोरुम ला दिनांक २१/१०/२०१९ रोजी ठिक ११.०० वाजता परत केले त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला फोन करुन तक्रारकर्त्‍याला शोरुम ला बालाविले आणि त्‍याच दिवशी वाहन तक्रारकर्त्‍याला हस्‍तांतरीत केले आणि तक्रारकर्ता सदर वाहन घरी घेवून गेला त्‍यावेळी विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला सांगितले की, जोपर्यंत नोंदणी प्‍लेट वाहनाला लावण्‍यात येत नाही तोपर्यंत वाहन चालवू नये त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने वाहन घरात पार्क करुन ठेवले आणि आजही वाहन विकत घेतल्‍यापासून वाहन घरी पार्क आहे. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍तऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून वाहनाचे परिवहन कार्यालयाकडून नोंदणी करुन घेण्‍याबाबत रुपये ९७५/- स्विकारुनही तक्रारकर्त्‍याला त्‍याचे वाहनाचे परिवहन कार्यालयाकडून नोंदणी करुन दिले नाही त्‍यामुळे तक्रारकर्ता  विरुध्‍द पक्षाकडून विकत घेतलेल्‍या वाहनाचा उपयोग करु शकला नाही तसेच रोडवर वाहन चालवू शकला नाही, ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती ञुटीपूर्ण सेवा असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे वाहनाचे परीवहन विभागाकडून नोंदणीकरण त्‍वरीत करुन द्यावे.
  3. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक, शारीरिक व नुकसान भरपाईपोटी रुपये ५०,०००/- अदा करावे व तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.