सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र.14/2012
(मूळ तक्रार क्रमांक 66/1997)
1) श्री आत्माराम सखाराम नाडकर्णी
वय 61 वर्षे, धंदा – शेती,
2) श्री मंगेश सखाराम नाडकर्णी
वय- 56 वर्षे, धंदा – नोकरी
3) श्री विष्णू सखाराम नाडकर्णी
वय- 50 वर्षे, धंदा – नोकरी
4) श्रीमती सुहासिनी भास्कर पंडीत
वय 63 वर्षे, धंदा – घरकाम
अ.क्र.1 ते 4 सर्व राहाणार निरवडे,
(कुलकर्णीवाडा), ता.सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग तर्फे अखत्यारी तक्रारदार नं.1 ... अर्जदार/फिर्यादी
विरुध्द
मेसर्स दिपा एंटरप्रायझेस तर्फे
श्री सोमनाथ वसंत टोमके
वय 50 वर्षे, धंदा – व्यापार
राहा. माणिक चौक,
स्टेट बँक ऑफ इंडिया समोर,
वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष/आरोपी
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्री कमलाकांत ध. कुबल, सदस्य
3) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे – 1 स्वतः आणि 2 ते 4 करीता अखत्यारी.
विरुद्ध पक्ष – स्वतः
आदेश नि. 1 वर
(दि.28/04/2015)
द्वारा : मा. सौ. वफा जमशीद खान, सदस्या.
1) प्रस्तुत प्रकरणात मूळ तक्रार अर्ज क्र.66/1997 निकाल ता.22/11/1999 च्या आदेशावर अपिल होऊन अपिल क्र.AA/99/2455 आणि अपिल क्र.A/00/163 दाखल झाली होती. सदर अपिलांचा एकत्रित निर्णय दि.7/5/2012 रोजी झालेला होता. सदर आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी केली नसल्याने मूळ तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 27 अन्वये फिर्याद दाखल केली होती. दरम्यान उपरोक्त अपिलाच्या निर्णयावर मूळ विरुध्द पक्ष यांनी मा.राष्ट्रीय आयोग, दिल्ली यांचेकडे रिव्हिजन अर्ज नं.3646/2012 दाखल केला होता.
2) विरुध्द पक्ष यांनी आज रोजी नि.20 वर अर्ज दाखल करुन त्यासोबत मा.राष्ट्रीय आयोग, दिल्ली यांचेकडील रिव्हिजन अर्ज नं.3646/2012 निकाल ता.01/04/2015 मधील अंतीम आदेश दाखल केला. तसेच अंतीम आदेशाप्रमाणे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाची रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) चा तक्रारदार श्री आत्माराम सखाराम नाडकर्णी यांचे नावाने डिमांड ड्रा्फ्ट दाखल करुन प्रकरण निकाली काढण्याची विनंती केली.
3) तक्रारदार श्री आत्माराम नाडकर्णी यांनी मंचासमोर उपस्थित राहून सदर नि.20 सोबत विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेला रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) चा डिमांड ड्राफ्ट स्वीकारुन प्रकरण निकाली काढणेस हरकत नाही असे लिहून दिले.
4) सबब नि.20 चा अर्ज मंजूर करणेत येतो. तसेच नि.20 ला अनुलक्षून मूळ फिर्याद निकाली करणेत येते. खर्चाबद्दल आदेश नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 28/04/2015
sd/- sd/- sd/-
(वफा ज. खान) (अपर्णा वा. पळसुले) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, अध्यक्ष, सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग