तक्रार क्रमांक – 766/2009 तक्रार दाखल दिनांक – 08/12/2009 निकालपञ दिनांक – 01/07/2010 कालावधी - 00वर्ष 06 महिने 23 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर विरेंद्र आसारामजी जालन A-13, वघानी महाल सी.एच.एस लि., महाराणा प्रताप रोड, भायंदर(पश्चिम), जिल्हा - ठाणे. .. तक्रारदार विरूध्द दि प्रोपराईटर, मे. टाटा शु स्टोअर्स 5,6,7, समवृधी प्लाझा, साई पेट्रोल पंप समोर, मिरा भायंदर रोड, मिरा रोड(पुर्व), जि - ठाणे. .. सामनेवाला
समक्ष - मा. श्रीमती. शशिकला श. पाटील – अध्यक्षा मा. श्रीमती भावना पिसाळ - सदस्या मा. श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल वि.प एकतर्फा एकतर्फा आदेश (पारित दिः 01/07/2010 ) मा.श्री.पी.एन.शिरसाट – सदस्य यांचे आदेशानुसार 1. तक्रारदाराची सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 12 अन्वये दाखल केली असुन त्यातील कथन संक्षिप्तपणे खालीलप्रमाणेः- दि.03/03/2009 रोजी तक्रारदाराने विरुध्द पक्षकाराकडुन बाटा सॅन्डल आर्टीकल नं.8613030 हि रु.849/- एवढया किंमतीस खरेदी केली. 1 वर्षाची गॅरंटी दिली. त्या मुदतीत काही दोष निर्माण झाल्यास वस्तु बदलुन नविन देण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु 20 दिवसाचे आत सदरची बाटा सँडल फाटली. त्याची तक्रार विरुध्द पक्षकाराकडे केली दुकानात बरेच वेळा जाऊन विनवणी केली परंतु विरुध्द पक्षकाराने कोणतीही दखल घेतली नाही. उलट त्यांना तक्रारदाराचा राग आला. शेवटी तक्रारदाराने वकिलामार्फत दि.23/07/2009 रोजी नोटीस पाठविली. त्या नोटीशीची विरुध्द पक्षकाराने दखल/दक्षता घेतली नाही. म्हणुन तक्रारदाराने सदरची तक्रार या मंचात दाखल केली असुन तक्रार आर्थिक व भौगोलिक कार्यक्षेत्राच्या आत असल्यामुळे या मंचाला हि तक्रार चालविण्याचा व निर्णयीत करण्याचा पुर्ण अधिकार आहे असे कथन केले. तक्रारदाराची प्रार्थना खालीलप्रमाणेः- 1.विरुध्द पक्षकाराने तक्रारदाराची बाटा सॅन्डल बदलुन नविन द्यावी. अथवा रु.849/- परत करावेत.
.. 2 .. 2.विरुध्द पक्षकाराने मानसिक नुकसानीपोटी रु.5,000/- द्यावे. 3.विरुध्द पक्षकाराने तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावा. 4.अन्य हुकुम तक्रारदाराचे लाभात व्हावेत.
2. वरील तक्रारीची मंचाची नोटीस 5 वर विरुध्द पक्षकारास प्राप्त झाली. तक्रारदाराने निशाणी 6 वर विरुध्द पक्षकारावर नोटिस मिळाल्याचा अहवाल दाखल केला. विरुध्द पक्षकाराने तक्रारीची नोटीस मिळुनही कोणतीही घेतली नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द "NO WS'' ''काहीही म्हणणे नाही'' असा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारदाराने पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, निशाणी 7 वर दाखल केले. निशाणी 8 वर लेखी युक्तीवाद व निशाणी 9 वर प्रतिज्ञापत्र व निशाणी 10 वर कागदपत्रे दाखल करण्याची विनंती अर्ज दाखल व निशाणी 11 वर कागदपत्रे दाखल केली.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत खालील कागदपत्रे दाखल केली. 1. बाटा सॅन्डल खरेदी केल्याची कॅश मेमो नं. 556 दि.03/03/2009. 2. दि. 23/07/2009 रोजी वकिलाची नोटीस. 3. आरपीएडी ने पाठविलेली पावती. 4.युपीसी ने पाठविलेली पावती. 5.न्यायिक निवाडे दाखल. तक्रारदाराने प्रतिज्ञापत्र, पुराव्याची कागदपत्रे, लेखी युक्तीवाद इत्यादी दाखल केले. विरुध्द पक्षकारास नोटिस मिळुनही त्यांनी त्या नोटीसची कोणतीही दखल/दक्षता/काळजी घेतली नाही. त्यामुळे त्याचे विरुध्द "NO WS'' ''काहीही म्हणणे नाही'' असा आदेश फर्माविण्यात आला. तक्रारादाराने त्यासंबंधी न्यायिक प्रक्रियेसाठी खालील 2 मुद्दे उपस्थित होतात ते येणेप्रमाणेः- अ)विरुध्द पक्षकाराने सेवेमध्ये त्रृटी, न्युनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे तक्रारदार सिध्द करु शकले काय? उत्तर – होय. ब)तक्रारदार हे मानसिक नुकसानीपोटी भरपाई मिळण्यास तथा न्यायिक खर्च मिळण्यास पात्र ठरतात काय? उत्तर – होय. कारण मिमांसा अ) स्पष्टिकरणाचा मुद्दा - तक्रारदाराने विरुध्द पक्षकाराचे दुकानातुन दिनांक 03/03/2009 रोजी रु.849/- एवढी रक्कम देऊन बाटा सॅन्डल खरेदी केली. उभय पक्षकारामध्ये आर्थिक व्यवहार झाला असल्यामुळे त्यामध्ये प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रक्ट होता व आहे. सदरची बाटा सॅन्डल खरेदी केली. उभय पक्षकारामध्ये आर्थिक व्यवहार झाला असल्यामुळे त्यामध्ये कन्सिडरेशनही होता व आहे. सदरची बाटा सॅन्डल 20 दिवसाचे आत तुटली. त्याची तक्रार केली. विरुध्द पक्षकाराचे दुकानात अनेक वेळा भेट दिली परंतु विरुध्द पक्षकाराने कानाडोळा केला. सदरच्या बाटा सॅन्डलची 1 वर्षाची गॅरंटी कालावधी असुनही वस्तु परत न करणे दुरूस्ती करुन न देणे, नविन वस्तु बदलुन न देणे इत्यादी सर्व कृति ह्या .. 3 .. सेवेमध्ये त्रृटी, न्युनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा ठरतात. विरुध्द पक्षकाराच्या वरील कृती न्यायोचित व विधियुक्त नाहीत. सबब वस्तु बदलुन देण्यास/ दुरुस्ती करण्यास/नविन वस्तु देण्यास विरुध्द पक्षकार नैसर्गिक न्यायाचे दृष्टिनेही जबाबदार ठरतात. ब) स्पष्टिकरणाचा मुद्दाः- सदरची बाटा सॅन्डल 1 वर्षाच्य वारंटी कालावधीमध्ये परत केली असती/दुरुस्ती केली असती तर न्यायोचित व विधीयुक्त होते परंतु वस्तु बदलुन न दिल्यामुळे तक्रारदाराला मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास झाला त्याची भरपाई करणे विरुध्द पक्षकाराचे न्यायिक व विधियुक्त कर्तव्य आहे. असे या मंचास वाटते तक्रारदाराने तक्रारीसंबंधी खालील न्यायिक निवाडा सादर केला आहे. III(1991) CPJ 314] Karnataka State Consumer Disputes Redressal Commission, Banglore in Dr. S.P.Thirumala Rao v/s. Bata Shoe Stores Mysore in Appeal no.56/1991 - Decided on 01/06/1991. Consumer Protection Act 1986 – Section 14(1)(b) Replacement - A pair of shoes purchased by the Complainant – After about a month bottom portion of the left shoe come out – Request for replacemnet made not complied with – complaint filed before the District Forum for replacement and payment of incidental expenses of Rs.200/- - price of the shoe awarded by the District Forum Additional Rs. 100/- awarded towards costs in appeal by the State Commission – Appeal party allowed. वरील न्यायिक निवाडा या तक्रारीसंबंधी तांतोतंत लागु होतो. सबब तक्रारीमध्ये तथ्ये आणि सत्य आढळुन आल्याने हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश 1. तक्रार क्र. 766/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. 2.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास बाटा सॅन्डल बदलुन नविन द्यावी, अथवा रु.849/- (रु. आठशे एकोनपन्नास फक्त) तक्रारदारास परत करावे. 3.विरुध्द पक्षकाराने तक्रारकर्तीस रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) मानसिक नुकसानीपोटी भरपाई द्यावी. 4.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) न्यायिक खर्च द्यावा. 5.वरील आदेशाची तामिली सही शिक्कयाची प्रत मिळाल्या तारखेपासुन 30 दिवसाचे आत परस्पर करावी. 6.वरील आदेशाची सांक्षांकित प्रत उभय पक्षकारास त्वरीत द्यावी.
दिनांक – 01/07/2010 ठिकाण - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|