न्यायनिर्णय
द्वारा- श्री.माधुरी विश्वरुपे...................मा.सदस्या.
1. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून त्यांच्या ऑटोरिक्षा करीता विना पॉलीसी ता.04.09.2007 ते ता.03.09.2008 या कालावधी करीता घेतली होती. तक्रारदारांच्या वाहनाचा ता.18.03.2008 रोजी सुमननगर, चेंबुर येथे अपघात झाला. सदर अपघातामध्ये वाहनातील सीएनजी/एलपीजी चा स्फोट होऊन वाहन पुर्णतः जळाले.
2. सदर अपघाताची माहिती सामनेवाले यांना दिल्यानंतर सर्व्हेअर यांनी घटनास्थळी येऊन अपघाताची पाहणी केली. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सदर अपघाताची नुकसानभरपाई मिळण्या करीता विमा प्रस्ताव दाखल केला. परंतु अदयापर्यंत सामनेवाले यांनी तक्रारदारांचा प्रस्तावाबाबत माहिती दिली नाही, अथवा नुकसानीची रक्कमही दिली नाही. अशी तक्रारदार यांची तक्रार आहे.
3. सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांची विमा पॉलीसी त्रयस्थ इसमास होणा-या नुकसानीबाबत घेतली होती. तक्रारदारांनी रु.1,330/- त्रयस्थ इसमास होणा-या नुकसानी खाली रु.60/- एल.पी.जी. किटमुळे होणा-या नुकसानीसाठीची वाढीव जोखीम, रु.167/- सर्व्हिस टॅक्स असा एकूण रु.1,562/- एवढया रकमेचा प्रिमीयम सामनेवाले यांचेकडे भरणा केला. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी योगय कारणास्तव विमा प्रस्ताव नामंजुर केला आहे.
4. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेली कैफीयत तसेच दाखल कागदपत्रे, दोन्ही बाजुंचा तोंडी युक्तीवाद यासर्वांचे अवलोकन केले असता, मंचासमोर खालील बाबी स्पष्ट होतात.
अ. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडून विमा पॉलीसी घेतली ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे.
ब. तक्रारदार यांनी ऑटो रिक्षा नं.एमएच-03-7921 या वाहनाच्या विमा पॉलीसीचा प्रिमियम Third Party जोखीम करीता घेतली होती. रु.1,330/- Third Party व रु.60/- एल.पी.जी. किटमुळे होणा-या नुकसानी करीता भरणा केला आहे. तक्रारदाराचे स्वतःचे वाहनाच्या नुकसानीचा प्रिमियम पॉलीसीमध्ये समाविष्ट नाही, हे विमा पॉलीसीवरुन दिसुन येते.
5. तक्रारदारांच्या विमा पॉलीसीमध्ये (Own Damage) स्वतःच्या वाहनाच्या नुकसानीची जोखीम कव्हर नाही. त्यामुळे तक्रारदारांना अपघातग्रस्त वाहनाची नुकसानभरपाईची रक्कम देता येत नाही.
6. सामनेवाले यांनी योग्य कारणास्तव विमा प्रस्ताव नाकारला असल्यामुळे सामनेवाले यांची सेवेतील त्रुटी स्पष्ट होत नाही असा निष्कर्ष मंच करीत आहे.
सबब,उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-43/2009 नामंजुर करण्यात येत आहे.
2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
3. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
ता.10.03.2015
जरवा/