मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई ग्राहक तक्रार क्रमांक – 137/2010 तक्रार दाखल दिनांक – 24/09/2010 निकालपत्र दिनांक - 30/04/2011 श्री. कृष्णा क्नितविअर टेकनॉलॉजी लिमिटेड, श्री. माधव एस. मगर, मु. कृष्णा हाऊस, रघुवंशी, मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई 13. ........ तक्रारदार विरुध्द
1) मेसर्स ऑटोबान एंटरप्रायझेस प्रा. लि., कार्यालय, प्लॉट नंबर 3, स्ट्रीट नंबर 9, झाकेरिया बंदर रोड, बाल्मर अँड लॉरी रोड, शिवरी (वेस्ट), मुंबई 400 01. 2) मेसर्स स्कोडा ऑटो इंडिया प्रा. लि., रजिस्टर्ड कार्यालय, ए-1/1, एम.आय.डी.सी., फाईव्ह स्टार इंडस्ट्रीयल एरिया, शेन्द्रा, औरंगाबाद 431 201. 3) मेसर्स जेएमडी ऑटो इंडिया प्रा. लि., कार्यालय – पृथवी पार्क, शोरुन नंबर 8, 9 व 10, प्लॉट नंबर 4, 5 व 6, सेक्टर 30, सानपाडा, वाशी, नवी मुंबई 4000 702. ......... सामनेवाले क्रमांक 1 ते 3 समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती – उभयपक्ष हजर - निकालपत्र - - द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत तक्रार कृष्णा कृष्णा क्नितविअर टेकनॉलॉजी लिमिटेड, तर्फे श्री. माधव एस. मगर यांनी दाखल केलेली आहे. तक्रारदाराने नमूद केले आहे की, त्याने गैरअर्जदार क्रमांक 2 उत्पादीत स्कोडा वाहन क्रमांक डीएन-09-सी-2951 हे गैरअर्जदार क्रमांक 1 मार्फत दिनांक 04/03/2006 रोजी विकत घेतले होते. सदर वाहनाची 3 वर्षापर्यंत वॉरंटी कालावधी होता. तक्रारदाराने नमूद केले आहे की वाहनात जानेवारी 2009, मार्च 2010 मध्ये बिघाड झाला. त्याकरीता त्याने वाहनाची गैरअर्जदार क्रमांक 1 कडून दुरुस्ती करुन घेतली. तसेच त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 ला वाहनाच्या दुरुस्तीकरीता रुपये 1,55,823/- दुरुस्ती व स्पेअरपार्टसचे दिलेले आहेत. तक्रारदाराने नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 कडून वाहन दुरुस्ती करुन घेतले आहे व त्याकरीता रुपये 1,84,450/- दुरुस्ती व स्पेअरपार्टच्या रकमा दिलेल्या आहेत. 2) मंचा मार्फत गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे हजर झाले व त्यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे, तो येणे प्रमाणे -
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी नमूद केलेले आहे की, त्यांनी तक्रारदाराला दिनांक 4 मार्च 2006 मध्ये वाहन विकले होते. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी ही बाब अमान्य केली आहे की, वाहनाला 3 वर्षापर्यंत वॉरंटीचा कालावधी दिला होता. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी नमूद केले आहे की, वाहनाचा वॉंरटी कालावधी हा दोन वर्षाचा होता. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदार यांनी लावलेले आरोप अमान्य केले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने नमूद केले आहे की, तक्रारदाराचे वाहन त्यांच्याकडे 7 जानेवारी, 2010 मध्ये दुरुस्तीकरीता आणले होते तेव्हा वाहन हे 67655 किलो मीटर चालविले होते. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी नमूद केले आहे की, त्यांनी जानेवारी 2010 नंतर वाहनाची दिनांक 4 मार्च 2010, 31 मार्च 2010, 14 एप्रिल 2010, 30 एप्रिल 2010 व 8 मे 2010 रोजी दुरुस्ती करुन दिलेली असून वाहनाचे आवश्यक ते सुट्टे भाग बदलून दिलेले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने नमूद कले आहे की, तक्रारदाराने वाहनाच्या इलेक्ट्रीकल वायरींगची दुस-या मेकॅनिकलकडून दुरुस्ती करुन घेतलेली आहे. तसेच वाहनामध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक ते स्पेअरपाटर्स व दुरुस्ती, तक्रादाराने करुन घेतलेली नाही त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारिज करण्यात यावी. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने नमूद केलेले आहे की, त्यांनी वाहनाची वॉरंटी ही दोन वर्षाच्या कालावधीकरीता दिली होती. तदनंतर वाहनाच्या दुरुस्ती व स्पेअरपार्टसचा खर्च हा तक्रारदाराने देण्याची जबाबदारी आहे. तसेच वाहन हे 67655 किलो मीटर चालले आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी सेवेत त्रृटी दिलेली नाही त्यामुळे तक्रार खारिज करण्यात यावी. 3) गैरअर्जदार क्रमांक 3 चे लेखी जबाबात म्हणणे खालीलप्रमाणे आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने तक्रारदार यांनी त्यांचेवर लावलेले आरोप अमान्य केलेले आहेत. तसेच नमूद केलेले आहे की तो गैरअर्जदार क्रमांक 1 चा एजंट आहे. तक्रारदाराचे वाहनाचे उत्पादन हे गैरअर्जदार क्रमांक 2 मार्फत करण्यात येते व गैरअर्जदार क्रमांक 1 हे वाहनाचे दुरुस्ती केंद्र आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी तक्रारीत केलेल्या मागणीसाठी ते जबाबदार नाहीत. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 विरुध्दची तक्रार खारिज करण्यात यावी. 3) प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तीवादाकरीता दिनांक 11/04/2011 रोजी आली असता तक्रारदारातर्फे त्यांचे प्रतिनिधी दिनेश कुमार जैन हजर, तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे वकील श्री. पुष्कर पाटणकर हजर होते. गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे वकील श्री. एस. के. हलवासीया हजर. मंचाने उभयपक्षांनी केलेला मौखिक युक्तीवाद ऐकून घेतला, तसेच उभयपक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील मुद्यांचा विचार करीत आहेत –
मुद्दा क्रमांक 1) - तक्रारदारांनी ही बाब सिध्द केली आहे काय की तो गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय? उत्तर होय मुद्दा क्रमांक 2) - तक्रारदारांनी ही बाब सिध्द केली आहे काय की गैरअर्जदार यांनी सेवेत त्रृटी दिलेली आहे काय? उत्तर नाही स्पष्टीकरण मुद्दा क्रमांक 1) - प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 हे स्कोडा कारचे उत्पादक आहेत. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 हे त्यांचे अधिकृत विक्रेते आहेत. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 हे वाहन विकल्यानंतर वाहनाचे सुट्टे भाग व दुरुस्तीची सेवा तत्पर देतात. तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 कडून वाहन विकत घेतले होते त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 चे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(ड) अन्वये ग्राहक आहेत. तक्रारदाराने ही बाब सिध्द केली नाही की त्याने गैरअर्जदार क्रमांक 3 कडून केवळ वाहन घेतले होते गैरअर्जदार क्रमांक 3 हा गैरअर्जदार क्रमांक 1 चा एजंट आहे. परंतु तत्पर सेवा ही गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी द्यावयाची होती व ते अँथोराईज सर्व्हिस सेंटर आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 विरुध्दची तक्रार ही खारिज होण्यास पात्र आहे. स्पष्टीकरण मुद्दा क्रमांक 2) – प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी गैरअर्जदारांविरुध्द वाहन दुरुस्ती व स्पेअर पार्टची दिलेली रक्कम रुपये 1,84,450/- ची मागणी केलेली आहे. तक्रारदाराने नमूद केले आहे की, त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 उत्पादीत स्कोडा ऑक्टीव्हा हे वाहन गैरअर्जदार क्रमांक 1 कडून दिनांक 4 मार्च 2006 रोजी विकत घेतले होते. तसेच वाहनाचा वॉरंटी कालावधी हा 3 वर्षाचा होता. परंतु त्याबाबत कोणताच पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही यावरुन गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी नमूद केले आहे की, वाहनाचा वॉरंटी कालावधी हा दोन वर्षे होता. आम्ही तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता वाहन हे वॉरंटी कालावधीमध्ये नादुरुस्त होते, ही बाब सिध्द होत नाही. मंचाच्या मते वॉरंटीचा कालावधी हा दोन वर्षांचा होता. तक्रारदार यांच्या वाहनात बिघाड असल्यामुळे वाहन बंद पडत असल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे 4 मार्च 2010 रोजी दुरुस्तीसाठी दिले होते तेव्हा वाहनाला रुपये 1,55,823/- खर्च आला होता. तसेच त्याच महिन्यात वाहन दोन वेळा बंद पडले, व गैरअर्जदार यांनी वाहनासाठी पुन्हा रुपये 19,127/- खर्च केला. तसेच वाहन हे 30 एप्रिल व 4 मे 2010 रोजी गैरअर्जदार यांचेकडे दुरुस्तीकरीता आणले होते. सदर बाब ही गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना पण मान्य आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी नमूद केले आहे की सदर वाहन हे 67655 किलो मीटर चालवल्यानंतर दुरुस्तीकरीता आणले आहे. गैरअर्जदार यांनी नमूद केले आहे की, त्यांनी वाहन 7 जानेवारी, 2010 रोजी आणले असता वाहनात आवश्यक ती दुरुस्तीकरीता मंजूरी तक्रारदार यांनी दिलेली नव्हती व वाहन दुरुस्त करुन घेतलेले नव्हते. मंचाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी ज्या रकमेची मागणी केलेली आहे ती संयुक्तीक वाटत नाही. सदर वाहन हे वॉरंटी कालावधीनंतर दुरुस्ती केल्यानंतर त्याचे काही नविन पार्टस बदलण्यात आले होते. तसेच वाहन हे 67655 किलो मीटर चालवले होते. त्यामुळे गैरअर्जदार यांनी सेवेत त्रृटी दिलेली आहे ही बाब सिध्द होत नाही. तसेच तक्रारदार यांनी वाहनामध्ये गैरअर्जदार क्रामंक 1 व 2 यांनी सांगितल्याप्रमाणे वाहनाची दुरुस्ती करुन घेतलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी सेवेत त्रृटी दिलेली नाही त्यामुळे तक्रार ही खारिज होण्यास पात्र आहे. गैरअर्जदार यांनी वाहनाची 14 एप्रिल 2010 व 30 एप्रिल 2010 रोजी मोफत तपासणी करुन घेतली होती व वाहनाच्या इंजिनमध्ये बेसिक सेटींग करुन दिलेले होते त्याकरीता कोणतेच शूल्क आकारलेले नव्हते. मंचाच्या मते तक्रारदाराने मागणी सिध्द केलेली नाही त्यामुळे तक्रार खारिज होण्यास पात्र आहे.
सबब मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहेत - - अंतिम आदेश - 1) तक्रार क्रमांक 137/2010 तक्रारदाराने पुराव्यानिशी सिध्द न केल्यामुळे खारिज करण्यात येते. 1) 2) न्यायिक खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतः करावे. 3) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 30/04/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई (सदर तक्रारीचा आदेश लगेच मंचाच्या बैठकीत पारीत करण्यात आला.) एम.एम.टी./- |