(मंचाचा निर्णय : श्रीमती चंद्रिका क. बैस, मा. सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांकः 21/5/2018)
1. तक्रारकर्त्यानी विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये संयुक्त तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणेप्रमाणे...
2. तक्रारकर्त्याने दिनांक 31/12/2015 रोजी मायक्रोमॅक्स कॅनवास 5 ई 481 मोबाईल विरुध्द पक्ष क्रमांक 1 कडून रुपये 12,900/- रुपयात विकत घेतला होता. विरुध्द पक्ष क्रमांक 2 हे निर्माते आहे. विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी मोबाईल ची वॉरंटी घेतली होती. सदरच्या मोबाईल मध्ये कोणत्याही प्रकारची समस्या अथवा निर्मिती दोष आढळल्यास विरुध्द पक्ष या मोबाईल ची भरपाई, दुरुस्ती किंवा बदलवुन देतील असे आश्वासन दिले होते. दिनांक 18/1/2016 रोजी हा मोबाईल तक्रारकर्ता चे हातून खाली पडला व त्याचा डिस्प्ले तुटला त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक 1 च्या दुकानात जाऊन मोबाईल दाखविला आणि झालेल्या घटनेबद्दल व त्यांना सांगीतले की हा मोबाईल दुरुस्त करुन द्यावे. विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्यास त्यांचे धंतोली येथील सेवा केंद्र मध्ये जाण्यास सांगितले. सदर सेवा केंद्रातील व्यक्तीने हा मोबाईल दुरुस्ती करीता ठेवुन घेतला आणि त्यांनी तक्रारकर्त्यास दुरुस्तीबाबत जॉब शिट नंबर 21220470116-21401083 तक्रारकर्त्यास दिला. त्याप्रमाणे त्यांनी दुरुस्तीचा खर्च रुपये 4,350/- इतका सांगितला व त्यास तक्रारकर्ता तयार होता. सेवा केंद्र मध्ये तक्रारकर्त्याचा मोबाईल दिनांक 4/2/2016 पर्यंत तसाच ठेवला गेला व तो त्यांनी दुरुस्त केला नव्हता. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांचेशी संवाद साधला व त्यांना सांगितल्या गेले की, त्यांचा मायक्रोमॅक्स कॅनवास 5 ई 481 मोबाईल दुरुस्तीकरीता रुपये 2,999/- ऑनलाईन द्वारे तक्रारकर्त्यास द्यावे लागेल व त्याकरीता सुद्धा तक्रारकर्ता तयार झाला. त्यांनी ही रक्कम ऑनलाईन द्वारे विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांना पाठविली आणि 10 दिवसात विरुध्द पक्ष क्रमांक 2 हे तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्त करुन त्यांना वापस करणार होते परंतु आजतागायत विरुध्द पक्ष क्रमांक 2 ने तक्रारकर्त्याचा मोबाईल तक्रारकर्त्यास दुरुस्त करुन वापस केला नाही.
3. त्या दरम्यान तक्रारकर्ता ने धंतोली येथील सेवा केंदामध्ये मोबाईल घेण्याकरीता गेले असता त्यांचा मोबाईल न दुरुस्त करताच तसाच वापस केला गेला. यावरुन विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारकर्ता ला वॉरंटी/गॅरंटी देऊनही तक्रारकर्ता चा मोबाईल व्यवस्थीतरीत्या दुरुस्त दिला नाही त्यामुळे तक्रारकर्त्यास आर्थिक, शारीरीक व मानसिक ञासास समोर जावे लागले त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 26/2/2018 रोजी विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना नोटीस पाठविले. परंतु त्याचे उत्तर तक्रारकर्त्याला अजुनपर्यंत मिळाले नाही. या दरम्यान तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांचेसोबत संवाद साधून त्यांना तक्रारकर्त्याने जमा केलेली रक्कम रुपये 2,999/- वापस करण्याकरीता विनंती केली. परंतु विरुध्द पक्ष क्रमांक 2 ने तक्रारकर्ता यांना दुरुस्तीच्या समस्याकरीता रुपये 4,000/- देण्यास सांगितले. या सर्व घटनाक्रमामुळे तक्रारकर्त्याचे समस्येचे समाधान झाले नाही त्यामुळे त्यांना विद्यमान मंचास येणे भाग पडले.
4. विरुध्द पक्ष क्रमांक 1 याना मंचाची नोटीस प्राप्त झाली असुन सदर पोच पावती निशानी क्रमांक 5 वर दाखल आहे तरी देखील विरुध्द पक्ष गैरहजर असल्यामुळे दिनांक 6/2/2018 रोजी सदर प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
5. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले कागदपञांचे अवलोकन केले व त्यावरुन पुढील मुद्दे उपस्थित झाले.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय? होय
2. अंतिम आदेश ? आदेशाप्रमाणे
कारणे व निष्कर्ष
6. मुद्दा क्रमांक 1 व 2 - तक्रारकर्त्याने वि.प. यांचे कडून दिनांक 31/12/2015 रोजी मायक्रोमॅक्स कॅनवास 5 ई 481 मोबाईल रुपये 12,900/- मध्ये विकल घेतला होता. त्यानुसार निशानी क्रमांक 2 वर दाखल केलेल्या बिलाप्रमाणे नमुद आहे. यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक 1 कडून मोबाईल् विकत घेल्याचे दिसुन येते. तक्रारकर्त्याने यापुढे विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यास ईमेल द्वारे मोबाईल दुरुस्त करुन देण्याकरीता सुचित केल्याचे दिसुन येते. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने रुपये 2,950/- भरण्याकरीता सांगितले होते. तक्रारकर्ता आजतागायत आपला मोबाईल विरुध्द पक्ष क्रमांक 1 किंवा 2 यांच्याद्वारे दुरस्त होऊन येण्याची वाट पाहत आहे परंतु त्यांचा मोबाईल अजुनपर्यंत दुरुस्त होऊन वापस मिळाला नाही. यावरुन विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करुन करुन सेवेत ञुटी केल्याचे दिसुन येते.
7. तक्रारकर्त्याच्या प्रार्थनेनूसार त्यांनी मायक्रोमॅक्स मोबाईल चे मॉडेल 5 ई 481 व्यवस्थीत दुरुस्ती करुन मागीतला आहे किंवा नविन बदलवुन मागीतला आहे. किंवा हे शक्य नसेल तर तक्रारकर्त्याच्या मोबाईलची किंमत रुपये 12900/- व्याजासह वापस करण्यात यावी. तसेच शारीरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी रुपये 20000/- तक्रारकर्त्याला देण्यात यावे व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- देण्यात यावा.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की त्यांनी संयुक्तीक व वैयक्तीकरीत्या तक्रारकर्त्यास मोबाईल, तक्रारकर्त्याचे समाधान होईपर्यंत दुरुस्त करुन देण्यात यावा किंवा नविन मोबाईल जुन्या मोबाईल च्या बदल्यात बदलवुन देण्यात यावा.
- मोबाईल दुरुस्त करण्याकरीता लागणारा खर्च कमीत कमी खर्चात तक्रारकर्ता कडून घ्यावा. जर हे शक्य नसेल तर तक्रारकर्त्यास त्यांना मोबाईल घेण्याकरीता जमा केलेली रक्कम रुपये 12,900/- 9 टक्के व्याजाने हातात पडेपर्यंत तक्रारकर्त्यास देण्यात यावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 2,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,000/- द्यावे.
- सदर आदेशाचे पालन 30 दिवसात करण्यात यावे.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
- तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.