Maharashtra

Nagpur

CC/454/2020

ANJUMAN HAMI-E-ISLAM, A REGISTERED SOCIETY THROUGH ADMINISTRATOR, SHRI. B.A. SHAIKH - Complainant(s)

Versus

M/S AREKAR RESEARCH & APPLICATION INDIA PVT. LTD. ENGINEERING - Opp.Party(s)

ADV. Y.M. RAHATE

12 Apr 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/454/2020
( Date of Filing : 05 Nov 2020 )
 
1. ANJUMAN HAMI-E-ISLAM, A REGISTERED SOCIETY THROUGH ADMINISTRATOR, SHRI. B.A. SHAIKH
OFF.AT, ANJUMAN CHOWK, SADAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S AREKAR RESEARCH & APPLICATION INDIA PVT. LTD. ENGINEERING
E-2, RAMBAGH COMPLEX, VIVEKANAND NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. ADIYOGI AREKAR, AUTHORISED SIGNATORY, M/S AREKAR RESEARCH & APPLICATION INDIA PVT. LTD. ENGINEERING
E-2, RAMBAGH COMPLEX, VIVEKANAND NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 12 Apr 2021
Final Order / Judgement

 (मा. अध्‍यक्षश्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये)

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार थोडक्‍यात खालिलप्रमाणे..
  2. तक्रारकर्ते ही नोंदणीकृत संस्‍था आहे आणि तिचा रजिस्‍ट्रेशन नंबर ९०/१९२७ असा आहे. तक्रारकर्ते संस्‍था ही सामाजिक आणि शैक्षणिक संस्‍था आहे आणि गरीब लोकांना शिक्षण देण्‍याचे कार्य करीत असते. मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती श्री ए.ए. गिनवाला यांनी निवृत्‍त  प्रमुख जिल्‍हा न्‍यायाधीश श्री बी.ए.शेख यांची व्‍यवस्‍थापक (Administrator)   म्‍हणून नेमणूक केलेली आहे. नागपूर महानगरपालिका यांचे नियमाप्रमाणे संस्‍थेच्‍या ईमारतीमध्‍ये फायर फायटींग योजना करावी लागते आणि म्‍हणून तक्रारकर्ते यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचेशी सल्‍ला मसलत केली आणि दिनांक २५/७/२०१९ च्‍या पञाप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी सदरहू फायर फायटींग उपकरणे आणि उपाययोजना करण्‍यासाठी रुपये १,९०,०००/- चे कोटेशन दिले. उभयपक्षांमध्‍ये झालेल्‍या चर्चेनंतर दिनांक १/८/२०१९ रोजी विरुध्‍द पक्ष यांनी सदरहू कामकाज रुपये १,७५,०००/- मध्‍ये करण्‍याचे कबुल केले. सबब तक्रारकर्ते यांनी रुपये १,४०,०००/- विरुध्‍द पक्ष यांना धनादेश क्रमांक २१४०१२ प्रमाणे दिले आणि दिनांक ३/८/२०१९ रोजी वर्क ऑर्डर दिली. विरुध्‍द पक्ष यांनी सदरहू कामकाज २१ दिवस ते ३ महिने एवढ्या कालावधीमध्‍ये पूर्ण करण्‍याचे कबुल केले होते. परंतु विरुध्‍द पक्ष यांनी कोणतेही कामकाज केले नाही आणि तक्रारकर्ते यांना कोणतीही सेवा दिली नाही. म्‍हणून तक्रारकर्ते संस्‍थेने दिनांक ११/११/२०१९ रोजी आणि दिनांक १९/११/२०१९ रोजी पञ पाठ‍वून चौकशी केली परंतु विरुध्‍द पक्ष यांनी कामकाज करण्‍यास टाळाटाळ केले. तक्रारकर्ते संस्‍थेने दिनांक ९/१२/२०१९ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना वकीलांमार्फत नोटीस पाठविली परंतु त्‍यानंतरही विरुध्‍द पक्ष यांनी कोणतेही काम केले नाही आणि रुपये १,४०,०००/- परत केले नाही. म्‍हणून तक्रारकर्ते संस्‍थेने वर्तमान तक्रार दाखल केली आहे. विरुध्‍द पक्ष यांनी अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब केल्‍याचे आणि सेवेमध्‍ये ञुटी केल्‍याचे आक्षेप घेवून विरुध्‍द पक्ष यांचेकडून सदरहू रक्‍कम व्‍याजासह परत मागितले आहे आणि रुपये २,००,०००/- नुकसान भरपाई आणि रुपये ६०,०००/- तक्रारीच्‍या खर्चाबाबत मागणी केलेली आहे. तक्रारकर्ते यांनी मुळ रक्‍कम रुपये १,४०,०००/- वर द.सा.द.शे. १८ टक्‍के दराने व्‍याजाची मागणी केली आहे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना रजिस्‍टर्ड पोस्‍टाने नोटीस, तक्रारीची प्रत आणि कागदपञे पाठविण्‍यात आले परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी सदरहू नोटीस घेण्‍यास टाळाटाळ केली आहे आणि म्‍हणून विरुध्‍द पक्ष यांचे विरुध्‍द दिनांक १०/०२/२०२१ च्‍या आदेशाप्रमाणे वर्तमान तक्रार एकतर्फी चालविण्‍यात आली.
  4. वर्तमान तक्रारीतील तक्रारकर्ते यांची कथने आणि कागदपञे विचारात घेतल्‍यानंतर या आयोगाने खालिल मुद्दे न्‍यायनिर्णयासाठी विचारात घेतले आणि त्‍यावर खालिलप्रमाणे निष्‍कर्षे नोंदविले आहेत.

अ.क्र.          मुद्दे                                                                         उत्‍तर

 

 I.    तक्रारकर्ते/संस्‍था विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहे कायॽ              होय

 II.    विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्ते यांचे प्रति

     सेवेमध्‍ये ञुटी केली आहे काय ॽ                                              होय

III.   विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी अनुचित व्‍यापारी प्रथांचा

        अवलंब  केला आहे कायॽ                                                   होय

  1. काय आदेशॽ                                                                 अंतिम आदेशाप्रमाणे

 

 

कारणमीमांसा

  1. आम्‍ही वर्तमान तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या सर्व कागदपञांचे अवलोकन केले. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी कागदपञे क्रमांक १ प्रमाणे रुपये १,९०,०००/- चे कोटेशन दिले होते. सदरहू कागदपञांवर चर्चेत ठरल्‍याप्रमाणे फायर फायटींग उपाययोजना बाबतचे कामकाज रुपये १,७५,०००/- मध्‍ये  करण्‍याचे पूर्ण करण्‍याचे विरुध्‍द पक्ष यांनी वचन दिले आणि सदरहू मिटींगमध्‍ये ठरल्‍याप्रमाणे उभयपक्ष यांनी त्‍यावर सह्या केलेल्‍या आहेत. मिटींगमध्‍ये ठरल्‍यानंतर संस्‍थेचे कोर्ट अॅडमिनीस्‍ट्रेटर यांनी सदरहू व्‍यवहार स्विकृत करुन विरुध्‍द पक्ष यांना दिनांक ३/८/२०१९ रोजी वर्क ऑर्डर दिली आहे आणि ८० टक्‍के अॅडव्‍हांस म्‍हणून रुपये १,४०,०००/- एवढी रक्‍कम धनादेशाने विरुध्‍द पक्ष यांना दिलेली आहे. सबब तक्रारकर्ते संस्‍था ही विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहे. विरुध्‍द पक्ष यांनी कागदपञ क्रमांक १ मध्‍ये ठरल्‍याप्रमाणे कोणतेही कामकाज केले नाही आणि म्‍हणून सेवेमध्‍ये ञुटी केलेली आहे. तसेच सदरहू रक्‍कम कामकाज न केल्‍यामुळे तक्रारकर्ते संस्‍थेला परत केलेली नाही आणि तक्रारकर्ते यांची फसवणूक केलेली आहे आणि अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब केल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते. सबब मुद्दा क्रमांक २ व ३ वर आम्‍ही होकारार्थी उत्‍तर देत आहोत. विरुध्‍द पक्ष हे सदरहू रक्‍कम रुपये १,४०,०००/- तक्रारकर्ते यांना परत करण्‍यास जबाबदार आहे. तक्रारकर्ती संस्‍था ही शैक्षणिक संस्‍था असल्‍यामुळे तेथे आग संपुष्‍टात आणण्‍यासाठी करण्‍यात येणारी उपाययोजना ही अत्‍यंत महत्‍वाची बाब आहे आणि रक्‍कम मिळाल्‍यानंतरही विरुध्‍द पक्ष यांनी कोणतेही काम केले नाही. म्‍हणून विरुध्‍द पक्ष हे द.सा.द.शे. १८ टक्‍के दराने व्‍याज देण्‍यास जबाबदार आहे तसेच तक्रारकर्ती संस्‍थेला योग्‍य आणि वाजवी नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रुपये १,००,०००/- देण्‍यास जबाबदार आहे, असे आमचे मत आहे.

सबब आदेश खालिलप्रमाणे..

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकती संस्‍था यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्ते सस्‍थेच्‍या प्रति अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब केला आहे आणि सेवेमध्‍ये ञुटी केलेल्‍या आहेत असे जाहीर करण्‍यात येते.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्ते संस्‍थेला वैयक्तिकरीत्‍या अथवा संयुक्तिकरीत्‍या रक्‍कम रुपये १,४०,०००/- त्‍वरीत परत करावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिकरीत्‍या अथवा संयुक्तिकरीत्‍या वरील रकमेवर द.सा.द.शे. १८ टक्‍के दराने दिनांक ९/१२/२०१९ पासून रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत व्‍याज द्यावे.
  5. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिकरीत्‍या अथवा संयुक्तिकरीत्‍या तक्रारकर्ते संस्‍थेला नुकसान भरपाई बाबत रक्‍कम रुपये १,००,०००/- द्यावे आणि तक्रारीच्‍या खर्चाबाबत रक्‍कम रुपये ३०,०००/- द्यावे.
  6. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  7. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  8. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.