जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्य – श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – 178/2012
तक्रार दाखल दिनांक – 22/10/2012
तक्रार निकाली दिनांक – 31/12/2012
श्री.भास्करराव मोतीराम पाटील. ----- तक्रारदार
प्लॉट नं.1,राजहंस, नागाई कॉलनी,
देवपूर,धुळे.(नकाणे रोड),पीन कोड 424002.
विरुध्द
मे.अॅन्जल ड्रीम होम शॉपी. ----- विरुध्दपक्ष
नेहरु चौक,देवपूर,धुळे-424002.
(योगेश्वर नागरी सहकारी पतपेढी कार्यालय समोर)
न्यायासन
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – श्रीमती.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – स्वतः)
(विरुध्दपक्ष तर्फे – स्वतः)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
--------------------------------------------------------------------------
(1) सदर प्रकरणी तक्रारदार व विरुध्दपक्ष यांनी नि.नं.4 वर संयुक्तरित्या स्वाक्षरी केलेली पुरसीस दाखल करुन, उभयपक्षांमध्ये मंचाबाहेर आपसात खाजगीत समझोता झाल्याचे कथन केले आहे. त्यामुळे त्यांना सदर प्रकरण मंचापुढे चालविणे नसल्याने प्रकरण निकाली काढण्यात यावे अशी त्यांनी विनंती केली आहे.
(2) तक्रारदार व विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेली पुरसीस पाहता त्यांच्यात आपसात समझोता झाल्याने, तक्रारीस कारण राहिले नसल्याचे स्पष्ट झाल्याने, त्यांनी नि.नं.4 वर दाखल केलेली पुरसीस मंजूर करण्यात आली आले. त्यामुळे प्रकरण निकाली काढणे योग्य होईल असे या न्यायमंचाचे मत आहे. सबब न्यायाचे दृष्टीने खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः 31-12-2012.
(श्रीमती.एस.एस.जैन.) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.