DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR | New Administrative Building | 5th Floor, Civil Lines, | Nagpur-440 001 | 0712-2548522 |
|
|
Complaint Case No. CC/388/2018 | ( Date of Filing : 24 May 2018 ) |
| | 1. SHRI. NANKSINGH NITAMAL KACHAILA | R/O. 310, AISHVRYA APARTMENT, M.B. TOWN, JUNA PARDI NAKA, NAGPUR | Nagpur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/S ANAND GURU GANESH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. , THROUGH SHRI. OMPRAKASH TOLARAM MAINANI | OFF. AT, OMPRAKASH MAINANI FRUIT COMPANY, SHOP NO. 12 KALMNA MARKET, NAGPUR / R/O. BANGLA NO. 21, JUNA PARDI NAKA, H.B. TOWN, NAGPUR/ OMPRAKASH MAINANI, PLOT NO.52, N.B.TOWN, JUNA PARDI NAKA, NAGPUR | Nagpur | Maharashtra | 2. M/S OM SHRI. MAINANI BUILDERS & DEVELOPERS PVT. LTD. , THROUGH SHRI. OMPRAKASH TOLARAM MAINANI | OFF. AT, OMPRAKASH MAINANI FRUIT COMPANY, SHOP NO. 12 KALMNA MARKET, NAGPUR / R/O. BANGLA NO. 21, JUNA PARDI NAKA, H.B. TOWN, NAGPUR/ OMPRAKASH MAINANI, PLOT NO.52, N.B.TOWN, JUNA PARDI NAKA, NAGPUR | Nagpur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
|
BEFORE: | | | HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT | | HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER | | HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER | |
|
For the Complainant: | ADV. YASHWANT MESHRAM, Advocate | For the Opp. Party: | ADV. HARISH DANGRE, Advocate | | ADV. HARISH DANGRE, Advocate | |
Dated : 24 Oct 2019 |
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केली असून त्यात असे नमूद केले की, त्याने विरुध्द पक्षाकडून मौजा- पारडी, खसरा नं. 64, 65, 66 आणि 63/1, नागपूर सुधार प्रन्यासच्या हद्दीतील वार्ड नं. 21, एकूण क्षेत्रफळ 2,280 .64 चंद्रा नगर, नागपूर येथील ऐश्वर्या पॅलेस मधील दुसरा मजला, फ्लॅट क्रं. 210 चे नोंदणीकृत विक्रीलेख, मा. दुय्यम निबंधक वर्ग – 2 नागपूर यांच्या समक्ष दि. 09.03.2015 रोजी करण्यात आलेले होते. तक्रारकर्त्याला सन 2017 मध्ये कर्जाची गरज असल्यामुळे त्याने कोटक महिंद्रा बॅंक यांच्याकडे सदर सदनिकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र जमा केले असता त्यांनी नोंदणीकृत दस्तऐवजामधील पान क्रं. 7 वर नमूद स्थावर मालमत्तेच्या विवरणात चुकिने दुसरा मजला ऐवजी तिसरा मजला लिहिण्यात आलेली आहे ही बाब तक्रारकर्त्याच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला सदरच्या नोंदणीकृत विक्रीपत्रातील पान क्रं. 7 वरील स्थावर मालमत्ते दुरुस्ती करण्याबाबत वारंवांर विनंती करुन ही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दिनांक 03.04.2018 रोजी विरुध्द पक्षाला वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजाविली व नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आंत विक्रीपत्रात झालेली चूक दुरुस्त करुन देण्याबाबत कळविले. विरुध्द पक्षाला सदरची नोटीस दि. 09.04.2018 ला प्राप्त होऊन ही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या नोंदणीकृत विक्रीपत्रातील पान क्रं. 7 वरील दस्तऐवजात झालेली चूक दुरुस्ती करुन देण्याची दखल घेतली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.
- विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात यावे की, त्यांनी तक्रारकर्त्याच्या नोंदणीकृत विक्रीपत्रातील पान क्रं.7 मध्ये झालेली चूक दुरुस्त करुन वादग्रस्त सदनिकेचे दुरुस्त नोंदणीकृत करुन द्यावे.
आ. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा. 3. विरुध्द पक्ष 1 व 2 यांना मंचामार्फत पाठविण्यात आलेली नोटीस प्राप्त होऊन ते मंचासमक्ष हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 22.07.2019 रोजी पारित करण्यात आला. 4. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेज, लेखी युक्तिवाद व त्यांच्या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले व त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नमूद केले. मुद्दे उत्तर - तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय ॽ होय
- काय आदेश ॽ अंतिम आदेशानुसार
5. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून मौजा- पारडी, खसरा नं. 64, 65, 66 आणि 63/1, नागपूर सुधार प्रन्यासच्या हद्दीतील वार्ड नं. 21, एकूण क्षेत्रफळ 2,280.64 चौ.मी. चंद्रा नगर, नागपूर येथील ऐश्वर्या पॅलेस मधील दुसरा मजला, फ्लॅट क्रं. 210 चे नोंदणीकृत विक्रीलेख, मा. दुय्यम निबंधक वर्ग – 2, नागपूर यांच्या समक्ष दि. 09.03.2015 रोजी करण्यात आलेले होते, ही बाब तक्रारी सोबत दाखल विक्रीपत्रावरुन स्पष्ट होते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे सिध्द होते. तसेच तक्रारकर्त्याच्या सदनिका क्रं. 210 च्या नोंदणीकृत विक्रीपत्रामधील पान क्रं. 7 वर नमूद स्थावर मालमत्तेच्या विवरणात चुकिने दुसरा मजला ऐवजी तिसरा मजला असे नमूद करण्यात आलेले आहे व सदरची बाब तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यात रीतसर कायदेशीररित्या दुरुस्ती करण्याबाबत अनेक वेळा विनंती केली. तसेच वकिला मार्फत दि. 03.04.2018 रोजी नोटीस पाठवून ही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीची दखल घेतली नाही ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या सदनिका क्रं. 210 च्या नोंदणीकृत विक्रीपत्रातील पान क्रं. 7 वरील स्थावर मालमत्ते मध्ये चुकिने दर्शविलेला तिसरा मजला ऐवजी दुसरा मजला अशी दुरुस्ती करुन तक्रारकर्त्याला दुरुस्ती नोंदणीकृत करुन विक्रीपत्राचे दुरुस्तीपत्र करुन द्यावे व दुरुस्तीसाठी येणारा नोंदणीचा खर्च विरुध्द पक्षाने सोसावा.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या विरुध्द पक्षाने करावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |
|
| [HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL] | PRESIDENT
| | | [HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS] | MEMBER
| | | [HON'BLE MR. SUBHASH R. AJANE] | MEMBER
| | |