Maharashtra

Nagpur

CC/12/2019

MS. NISHA NAIR - Complainant(s)

Versus

M/S ALTER ECOWORKS EBIKES, THROUGH ITS OWER/PARTNERS - Opp.Party(s)

ADV RUPA KHANDEKAR

23 Jul 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/2019
( Date of Filing : 07 Jan 2019 )
 
1. MS. NISHA NAIR
D-96, BEHIND AFJAL KAKERY , AAKAR NAGAR KATOL ROAD, NAGPUR 440013
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S ALTER ECOWORKS EBIKES, THROUGH ITS OWER/PARTNERS
74, GUPTA MANSION, ABHAYNKAR NAGAR, NAGPUR 440022
NAGPUR
MAHARASHTRA
2. M/S HERO ELECTRIC BIKE MANUFACTURING COMPANY
50, OKHLA INDUSTRIAL ESTATE (PHASE III), NEW DELHI 110020
DELHI
DELHI
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 23 Jul 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष यांचेकडून एक (ई-बाईक) हिरो इलेक्‍ट्रीक बाईक, मॉडेल ऑप्‍टीमा प्‍लस लिथीअम आय ऑन (ग्रे कलर) जिचा चेसीस क्रमांक ओ.एस. १७ ऐ एम ओ २०६ एकूण रुपये ५६,०९५/- एवढ्या किंमतीत बिल क्रमांक एच ई ००२३९, दिनांक ११/१/२०१८ अन्‍वये विकत घेतली. सदर बाईक ही अजून वॉरंटी कालावधीत आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हा सदर ई-बाईक चा निर्माता असून विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हा अधिकृत विक्रेता आहे आणि सदर ई-बाईकची सर्व्हिस सेंटर ची फ्रॅन्‍चायजी त्‍याचे जवळ आहे.
  3. तक्रारकर्तीने दिनांक ११/१/२०१८ रोजी ई-बाईक विकत घेतल्‍यानंतर सुरवातीपासून ई-बाईकमध्‍ये छोटी छोटी समस्‍याला तक्रारकर्तीला सामोरे जावे लागले आणि प्रत्‍येक वेळेस तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रमांक १ ला त्‍याबाबत कळविले आणि दुरुस्‍ती करण्‍याबाबत विनंती केली. तक्रारकर्तीने वाहन विकत घेतल्‍यापासून तक्रारकर्तीची ई-बाईक सहा पेक्षा जास्‍त वेळा नादुरुस्‍त (आऊट ऑफ ऑर्डर) झाली आणि ई-बाईक ला मिळेल त्‍या  वाहनाव्‍दारे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ च्‍या सर्व्हिस सेंटर ला दुरुस्‍ती करिता आणावे लागले. प्रत्‍येकवेळी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी वाहन दुरुस्‍ती करिता सर्व्हिस सेंटरला ठेवले व त्‍यानी चुकिची माहिती तक्रारकर्तीला दिली. वाहनातील प्रॉब्‍लेम संबंधीत मेकॅनिक ने बघितला असून तक्रारकर्तीला चुकीची खाञी देण्‍यात आली की यापूढे भविष्‍यात असा दोष निर्माण होणार नाही.
  4. तक्रारकर्तीला तिच्‍या दैनंदिन कामाकरिता ई-बाईकवर अवलंबून राहणे अशक्‍य झाले होते. तक्रारकर्तीला भिती होती की, ईबाईक मध्‍ये  रस्‍त्‍यामध्‍ये केव्‍हाही मेकॅनिकल दोष निर्माण होवून तक्रारकर्तीची दयनीय अवस्‍था होईल. तक्रारकर्तीने दिनांक ४/४/२०१८ रोजी विरुध्‍ण्‍द पक्ष क्रमांक १ ला ईमेल केला व त्‍याव्‍दारे काही ठोक पाऊल उचलण्‍यास सूचविले. ई-बाईकमध्‍ये काही अंगभूत मेकॅनिकल दोष होता जो कोणत्‍याही किमतीत दुरुस्‍ती/कमी होऊ शकत नव्‍हता.
  5. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ला वाहन बदलवून देण्‍याबाबत विनंती केली कारण वाहन वॉरंट कालावधीत होते. परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने तक्रारकर्तीचे विनंतीकडे लक्ष दिले नाही, ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ती प्रति अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ला माहित होते की, ११ महिण्‍याच्‍या कालावधीमध्‍ये गाडी विकत घेतल्‍याच्‍या  तारखेपासून वाहन ६ महिण्‍यापेक्षा जास्‍त काळ वापरात नव्‍हते. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीला दिलेल्‍या ञुटीपूर्ण सेवेकरिता व अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याबाबत कायदेशीर नोटीस दिनांक २४/१०/२०१८ रोजी बजावण्‍यात आली व त्‍याव्‍दारे विरुध्‍द पक्षाला वाहन बदलवून देण्‍याबाबत किंवा रुपये ५६,०९५/- १८ टक्‍के  व्‍याजासह परत करण्‍याबाबत कळविण्‍यात आले. सदर नोटीस विरुध्‍द पक्षाला दिनांक २९/१०/२०१८ रोजी प्राप्‍त झाली परंतु विरुध्‍द पक्षाने नोटीस ची दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागण्‍या केल्‍या आहेत.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये ५६,०९५/- १८ टक्‍के व्‍याजासह दिनांक १२/१/२०१८ पासून परत करावे किंवा ई-बाईकबदलवून द्यावी.
  2. मा‍नसिक व शारीरिक ञासाकरिता तसेच तक्रारीचा खर्च देण्‍याबाबत आदेशीत करावे.
  1. विरुध्‍द पक्षाचे कथनानुसार विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे इलेक्‍ट्रीक बाईक चा निर्माता असून ती आंत‍रराष्‍ट्रीय नामांकित कंपनी आहे. ती भारत देशभर इलेक्‍ट्रीक बाईक ची विक्री करते. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हा विरुध्‍द पक्ष क्रमांक २ चा सब डीलर आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी निर्मित केलेल्‍या वाहनाची आहे त्‍या स्थितीत विक्री करते.  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी नागपूर शहरात अनेक ग्राहकांना इलेक्‍ट्रीक बाईक ची विक्री केली आहे ते वाहनाचे Performance बाबत समाधानी असून विरुध्‍द पक्षाकडून मिळणारे सर्व्हिस बाबत समाधानी आहे.
  2. तक्रारकर्तीने दिनांक ११/१/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडून इलेक्‍ट्रीक बाईक, मॉडेल ऑप्‍टीमा प्‍लस लिथीअम आय ऑन (ग्रे कलर) विकत घेतली तक्रारकर्तीने वाहन विकत घेण्‍यापूर्वी वाहन चालवून (टेस्‍ट ड्राईव्‍ह) त्‍याची तपासणी केली व त्‍यानंतर तक्रारकर्तीने वाहन विकत घेतले. सदर बाब तक्रारकर्तीने तिच्‍या प्रतिउत्‍तरात कबूल केली आहे. नेहमीप्रमाणे वाहनाची टेस्‍ट ड्राईव्‍ह घेतांना विरुध्‍द पक्ष क्रमांक १ च्‍या  प्रतिनिधीने वाहनाबाबत सविस्‍तर माहिती व तिचा वापर कसा करावा याबाबत तक्रारकर्तीला समजवून सांगितले ही बाब सुद्धा तक्रारकर्तीने तिच्‍या प्रतिउत्‍तरात मान्‍य केली आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी वाहनाचे फायदे व गैरफायदे याबाबत तक्रारकर्तीला समजावून सांगितले, जी बाब इतर ग्राहकांना वाहन विकत घेण्‍यापूर्वी सांगण्‍यात येते व त्‍यानंतरच तक्रारकर्तीने वाहन विकत घेतले व विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने तक्रारकर्तीला विकले.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ नमुद करतो की, तक्रारकर्ती तिचे वाहनाचा दिलेल्‍या  सूचनेप्रमाणे वापर करत नव्‍हती. इलेक्‍ट्रीक वाहन हे बॅटरीवर चालते आणि बॅटरी डिस्‍चार्ज होताच इलेक्‍ट्रीक वाहन बंद पडते आणि जेव्‍हा बॅटरी चार्ज करण्‍यात येते त्‍यावेळी वाहन पुनश्‍च सुरळीत चालते. वाहन चार्जर हे त्‍या   वाहनाचा एक भाग आहे आणि त्‍या चार्जरची किंमत वाहनाच्‍या किंमतीत समाविष्‍ट आहे. प्रत्‍येक ग्राहकाला वाहन कसे चार्ज करावे याबाबत माहिती दिली जाते. बॅटरी डिस्‍चार्ज होईस्‍तोवर तक्रारकर्ती वाहन चालवत होती व एखाद्या ठिकाणी बॅटरी डिस्‍चार्ज झाल्‍यामुळे वाहन बंद झाले त्‍यावेळेस तक्रारकर्ती विरुध्‍द पक्ष क्रमांक १ च्‍या कर्मचा-यांना फोन करुन चालते वाहन बंद झाल्‍याबाबतची वस्‍तुस्थिती सांगत होती. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ च्‍या  कर्मचा-यांनी नेहमीच व प्रत्‍येक वेळेस तक्रारकर्तीला सांगितले की, बहुधा बॅटरी डिस्‍चार्ज झाली असावी आणि त्‍यामुळे सदरचे वाहन चालने थांबले आणि ज्‍याक्षणी बॅटरी चार्ज करण्‍यात येईल त्‍यावेळेस काही ञास नव्‍हता. वाहन पुन्‍हा सुरळीत सुरु होईल आणि ही प्रत्‍येक वेळेची बाब आहे. तक्रारकर्तीच्‍या  चुकीमुळे प्रत्‍येक वेळेस जिथे तक्रारकर्तीचे वाहन बंद झाले त्‍या ठिकाणावरुन वाहन बंद झाल्‍याबाबत तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ला फोन करुन कळवित असे आणि वाहन घेवून जाण्‍याबाबत कळवित असे त्‍यावेळी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ वाहन बांधून आणून किंवा वाहनाची प्रत्‍यक्ष उचल करुन आणण्‍याकरिता जबाबदार जरी नसला तरी विरुध्‍द पक्षाचे कर्मचारी वाहन उचलून आणण्‍याची व्‍यवस्‍था करीत असे व त्‍याकरिता एकही पैसा आकारीत नसे.
  4. तक्रारकर्ती वाहनातील दोष सिद्ध करण्‍यास अपयशी ठरली आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ नमुद करतो की, दस्‍तऐवज तसेच जॉब कार्डचे अवलोकन केल्‍यावर लक्षात येते की, वाहनामध्‍ये कोणताही दोष (प्रॉब्‍लेम) नव्‍हता. दिनांक ११/१/२०१८ रोजी वाहन विकत घेतल्‍यानंतर तक्रारकर्तीने दिनांक १६/७/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडे वाहन सर्व्हिस सेंटरला आणले आणि सदरचे वाहन दिनांक १७/७/२०१८ ला त्‍यांचे पतीने परत नेले. (जॉब कार्ड दिनांक १६/७/२०१८) तक्रारकर्तीच्‍या कर्मचा-याने शंका उत्‍पन्‍न केले की, त्‍याला वाहनामधून आवाज ऐकू येतो आणि सदरचा आवाज नॉर्मल आहे की तो वाहनातील दोष आहे याचा तपास करावा, अशी विनंती केली. विरुध्‍द पक्षाचे कर्मचा-याने तक्रारकर्त्‍याच्‍या कर्मचा-याने जे सांगितले त्‍याबाबतची नोंद घेतली की, वाहनाचे सर्व्हिसींग वेळेस तो वाहनातील असलेल्‍या दोष तपासेल. वाहनाचे नियमीत सर्व्हिसींगनंतर वाहनात शंका उपलब्‍ध केल्‍याप्रमाणे दोष आढळला नाही आणि वाहनाचे सर्व्हिसींग नंतर वाहन तक्रारकर्तीला हस्‍तांतरीत करण्‍यात आले आणि फक्‍त रुपये २५०/- सर्व्हिसींग चार्ज तक्रारकर्तीकडून घेण्‍यात आला. वाहनामध्‍ये काही दोष, मेकॅनिकल दोष असल्‍याचे पूर्णतः नाकारण्‍यात येत आहे आणि तो पुन्‍हा उद्भवत नसल्‍याचे नाकारण्‍यात येत आहे.
  5. तक्रारकर्तीने दिनांक २३/८/२०१८ चे जॉब कार्ड जोडले आहे त्‍यामध्‍ये  तक्रारकर्तीने वाहनाचे ऐवरेज बाबत तक्रार केली होती. जेव्‍हा तक्रारकर्तीचे वाहन दिनांक २३/८/२०१८ रोजी सर्व्हिस सेंटरला प्राप्‍त झाले त्‍यावेळी वाहन ५२६५ किमी चालले होते, असे वाहनाचे मीटर रिडींग दाखवित होते. त्‍यानंतर वाहनाची बॅटरी चार्ज करण्‍यात आली आणि वाहन बॅटरी डिस्‍चार्ज होईपर्यंत चालविण्‍यात आली आणि ज्‍यावेळी वाहन बंद झाले त्‍यावेळी वाहनाचे मीटर रिडींग ५३२० किमी दाखवित होते ते हे दर्शवित होते की, वाहन ज्‍यावेळी पूर्णपणे चार्ज केल्‍या जाते त्‍यावेळी वाहन ५५ किमी ऐवरेज देते. त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या वाहनामध्‍ये ऐवरेज बाबत दोष नव्‍हता हे दिनांक २३/८/२०१८ चे जॉब कार्डवरुन दिसून येते. तक्रारकर्तीचा कर्मचा-याचे समाधान झाल्‍यावर तो वाहन परत घेवून गेला.
  6.  तक्रारकर्ती वाहनामध्‍ये Inherent Mechanical Defect or any defect असल्‍याबाबत सिद्ध करण्‍यात किंवा दाखविण्‍यात अपयशी ठरली आहे व त्‍याबाबत तक्रारकर्तीने एखादा पुरावा अभिलेखावर दर्शविला नाही किंवा मंचासमोर सिद्ध केले नाही की Inherent Mechanical Defect काय आहे आणि तक्रारकर्ती Assumption ज्‍या आधारावर मा. मंचासमोर Approach झाली आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ सादर करतो की, वाहनामध्‍ये Inherent Mechanical Defect नाही आहे तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ नाकारतो की, वाहन हे Bureau of Indian Standard किंवा कोणत्‍याही ऐजन्‍सीने निर्धारीत केलेल्‍या मानकापेक्षा कमी मानकाचे वाहन आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी निर्मित केलेल्‍या अनेक वाहनाची विक्री केली आहे. परंतु कोणत्‍याही वाहनाबाबत तक्रार प्राप्‍त नाही आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ सादर करतो की, वाहनाचे वॉरंटी कालावधी मध्‍ये जर वाहनाचा एखादा सुटा भाग Defective आढळला तर तो बदलवून दिला जातो. परंतु वाहन खरेदीदाराला वाहन Reject करण्‍याचा अधिकार नाही. सदर प्रकरणात वाहनाचा सुटा भाग Defective नाही आहे त्‍यामुळे वाहनाचा सुटा भाग बदलवून द्यायचा प्रश्‍न नाही. तक्रारकर्तीने वाहन विकत घेतल्‍यापासून ११ महिण्‍याचे कालावधीत वाहनाचा ६ महिण्‍याचे वर गाडीचा वापर केला नाही परंतु संपूर्ण तक्रारीमध्‍ये  तक्रारकर्तीचे वाहन आयडल उभे असल्‍याबाबत कुठेच नमुद केले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ती नियमीतपणे आजही वाहनाचा उपयोग घेत आहे तसेच तक्रारकर्तीने तिच्‍या प्रतिउत्‍तरात वाहन नियमीत चालवित असल्‍याचे कबुल केले आहे. तक्रारकर्ती वाहनाचा उपयोग नियमीत घेत आहे व वाहनामध्‍ये कोणताही Inherent Mechanical Defect नाही आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीला वाहन बदलवून देण्‍याचा किंवा रक्‍कम परत करण्‍याचा प्रश्‍न उद्भवत नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  7. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ला मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली व नोटीस प्राप्‍त होऊन सुद्धा विरुध्‍द पक्ष क्रमांक २ मंचात हजर झाले नाही. करिता विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश दिनांक २७/६/२०१९ रोजी पारीत करण्‍यात आला.
  8. उभयपक्षांनी अभिलेखावर दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी जबाब, प्रतिउत्‍तर  लेखी युक्तिवाद यांचे वाचन केल्‍यावर व उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

        अ.क्र.                  मुद्दे                                                    निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय ?          नाही
  3. काय आदेश ?                                                           अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्तीने विरुध्‍द  पक्ष क्रमांक १ यांचेकडून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी निर्मित केलेली (ई-बाईक) हिरो इलेक्‍ट्रीक बाईक, मॉडेल ऑप्‍टीमा प्‍लस लिथीअम आय ऑन (ग्रे कलर) जिचा चेसीस क्रमांक ओ.एस. १७ ऐ एम ओ २०६ एकूण रुपये ५६,०९५/- एवढ्या किंमतीत बिल क्रमांक एच ई ००२३९, दिनांक ११/१/२०१८ अन्‍वये विकत घेतली. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक ४ (१२) वर दाखल दस्‍तऐवजाचे अवलेाकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक ४(१५) वर दाखल जॉब कार्ड दिनांक १६/७/२०१८ चे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीने दिनांक १६/७/२०१८ रोजी वाहनाचे हॅंडलमध्‍ये दोष असल्‍याबाबत व वाहनातील आवाजाकरिता वाहन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे सर्व्हिस सेंटरला दाखल केले होते. सदरचे वाहन योग्‍य दुरुस्‍तीनंतर तक्रारकर्तीला दिनांक १७/७/२०१८ रोजी हस्‍तांतरीत करण्‍यात आले होते. त्‍यानंतर पुनश्‍च तक्रारकर्तीने वाहन सुरु असतांना मधातच वाहन बंद पडत असल्‍या कारणास्‍तव वाहन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे सर्व्हिस सेंटरला दिनांक २७/७/२०१७ रोजी ११.४५ वाजता दाखल केल्‍याचे निशानी क्रमांक ४(१७) वर दाखल जॉब कार्ड दिनांक २७/७/२०१८ चे अवलोकन केल्‍यावर निदर्शनास येते. सदर वाहन त्‍याचदिवशी तक्रारकर्तीला ठीक दुपारी ३.०० वाजता हस्‍तांतरीत केल्‍याचे दिसून येते. त्‍यानंतर तक्रारकर्तीने वाहनातील ऐवरेज दोषाकरिता वाहन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे सर्व्हिस सेंटरला दिनांक २३/८/२०१८ रोजी दाखल केल्‍याचे निशानी क्रमांक ४ (१८) वर दाखल जॉबकार्डचे अवलोकन केल्‍यावर दिसून येते. सदर वाहन सर्व्हिस सेंटरला दाखल करतेवेळी वाहनाचे मीटर रिडींग ५२६५ किमी हे होते. त्‍यानंतर बॅटरी चार्ज केल्‍यानंतर वाहन बॅटरी डिस्‍चार्ज होईस्‍तोवर चालविण्‍यात आले. वाहनातील बॅटरी डिस्‍चार्ज झाल्‍यानंतर वाहन बंद झाले त्‍यावेळी वाहनाचे मीटर रिडींग ५३२० किमी हे होते. यावरुन वाहनाचा ऐवरेज ५५ किमी आहे  हे  जॉब कार्डवरुन दिसून येते.
  2. तक्रारकर्तीने अभिलेखावर दाखल दस्‍तवेजाचे व जॉब कार्डचे अवलोकन केल्‍यावर असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीने ज्‍यावेळी वाहनातील दोषाकरिता वाहन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे सर्व्हिस सेंटरला दाखल केले त्‍या प्रत्‍येकवेळी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने तक्रारकर्तीच्‍या वाहनातील दोष काढून तक्रारकर्तीला वाहन हस्‍तांतरीत केले. यावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही हे सिद्ध होते. तक्रारकर्तीने दाखल तक्रारीत वाहनामध्‍ये  Inherent Mechanical Defect असल्‍याबाबतची तक्रार केली आहे परंतु तक्रारकर्तीने वाहनामध्‍ये डिफेक्‍ट असल्‍याचा एकही पुरावा अभिलेखावर दाखल केला नाही तसेच वाहनामध्‍ये डिफेक्‍ट असल्‍याचा तज्‍ज्ञ अहवाल अभिलेखावर दाखल केला नाही किंवा वाहनामध्‍ये डिफेक्‍ट असल्‍याचे सिद्ध करण्‍यात तक्रारकर्ती अपयशी ठरली आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍द पक्षाने राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, न्‍यु दिल्‍ली येथे दाखल तक्रार टाटा मोटर्स वि. राजेश त्‍यागी आणि इतर, रिवीजन पिटीशन क्रमांक १०३०/२००८ या प्रकरणातील दिनांक ३/१२/२०१३ च्‍या निर्णयाची प्रत सादर केली आहे तसेच मारुती सुझुकी  इंडिया लिमी. वि. डॉ. कोनेरु सत्‍यकिशोर यांनी रिवीजन पिटीशन क्रमांक ३७९८/२००७ दिनांक १६/११/२०१७ च्‍या निर्णयाची प्रत समर्थनार्थ सादर केली आहे. सदर प्रकरणातील न्‍यायनिवाडे या प्रकरणातील तथ्‍य या वर्तमान प्रकरणाशी मिळतेजूळते आहे आणि खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.