(घोषित द्वारा – श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराची स्वत:ची खाजगी कंपनी आहे त्या कंपनीसाठी त्यांना सॉफ्टवेअरची आवश्यकता होती म्हणून त्यांनी, त्यांना जसे पाहिजे होते तसे सॉफ्टवेअर SAP B1 ची मागणी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे केली. गैरअर्जदार क्रमांक 1 हे गैरअर्जदार क्रमांक 2 यांची फ्रेंन्चायसी आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ही मागणी नुसार सॉफ्टवेअर बनविणारी कंपनी आहे. SAP B1 हे तक्रारदारानी कंपनीकडून मागविलेल्या सॉफ्टवेअर ट्रेडचे नाव आहे. हे सॉफ्टवेअर तक्रारदारास आवश्यकता असल्याप्रमाणे, स्पेशल डिझाईन व मॉडिफिकेशन केलेले सॉफ्टवेअर होते. या सॉफ्टवेअरची किंमत रु 9,73,954/- अशी होती. या रु 9,73,954/- या किंमतीमध्ये सॉफ्टवेअरची किंमत, कस्टमायझेशन, इन्स्टॉलेशन आणि रजिष्ट्रेशनचा समावेश होतो. तक्रारदार व गैरअर्जदारांमध्ये सॉफ्टवेअर खरेदी करण्याचा करार झाला होता त्या कराराच्या अटी व शर्तीमध्ये तक्रारदारानी गैरअर्जदारास दिनांक 22/11/2007 रोजी रु 2 लाख दिले. त्यानंतर जानेवारी 2008 मध्ये रु 2,65,000/- दिले. गैरअर्जदारानी सदरील सॉफ्टवेअर तक्रारदाराच्या युनिटमध्ये बसविले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सॉफ्टवेअरचे इन्स्टॉलेशन पर्चेस ऑर्डरप्रमाणे नाही. करारानुसार पर्चेस, कस्टमायझेशन, मॉडिफिकेशन त्यात केले नाहीत. त्यामुळे त्या सॉफ्टवेअरचा त्यांना कांहीही उपयोग होत नाही. यासाठी तक्रारदारानी गैरअर्जदार क्रमांक 1 आणि 2 यांच्याकडे अनेकवेळा चौकशी करुन ऑर्डरप्रमाणे सॉफ्टवेअर बसविण्याची मागणी केली. तक्रारदारानी त्यांच्या कंपनीच्या युनिटसाठी स्पेशली मॉडिफिकेशन, अल्ट्रेशन केलेले सॉफ्टवेअर गैरअर्जदाराकडून बसवून मागितले होते. त्या संदर्भात दोघांमध्ये करार झालेला होता. ठरलेल्या किंमतीपैकी तक्रारदाराने रक्कम रु 4,50,000/- गैरअर्जदारांस अडव्हान्स म्हणून दिले होते. तरी सुध्दा गैरअर्जदारांनी तक्रारदारास जसे पाहिजे होते तसे सॉफ्टवेअर दिले नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदाराने शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीची व कागदपत्राची मंचाने पाहणी केली. गैरअर्जदारांनी तक्रारदारास जे सॉफ्टवेअर बनवून दिले ते पर्चेस ऑर्डर प्रमाणे नव्हते. तक्रारदारानी अडव्हान्स रु 4,50,000/- गैरअर्जदारास दिले हे तक्रारदाराने दाखल केलेल्या पुराव्यावरुन दिसून येते. पासवर्ड आणि आयडी सुध्दा बरेच दिवस दिला गेला नाही. दिल्यानंतर सुध्दा ते उपयोगात येत नव्हते. त्यांच्या इंजिनिअरने सुध्दा त्यासाठी प्रयत्न केले होते तसा ईमेल तक्रारदाराने दाखल केला आहे. तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. अनेकवेळा योग्य ते सॉफ्टवेअर बनवून द्यावे किंवा सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करुन द्यावी म्हणून तक्रारदारानी ई-मेल द्वारा पाठपुरावा केला परंतु तो निष्फळ ठरला. तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यातील ई-मेल द्वारा झालेला, सॉफ्टवेअर संदर्भातील पत्रव्यवहार तक्रारदारानी दाखल केला आहे. तक्रारदारानी ज्याप्रमाणे सॉफ्टवेअर बनविण्यास सांगितले होते तसे सॉफ्टवेअर गैरअर्जदारानी बनवून दिले नाही त्यामुळे आता त्या सॉफ्टवेअरचा तक्रारदारास कांहीही उपयोग नाही. म्हणून तक्रारदारानी तो दिनांक 20/09/2009रोजी करार रद्द केला व रक्कम परत मागितली. कराराप्रमाणे तक्रारदाराने गैरअर्जदारांना अडव्हान्स रक्कम दिली परंतु गैरअर्जदारांनी तक्रारदारास जसे पाहिजे होते तसे सॉफ्टवेअर बनवून दिले नाही ही त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. तक्रारदारानी रु 2,00,000/- ही रक्कम नुकसान भरपाई म्हणून मागितली, त्याचे स्पष्टीकरण (break up) मात्र दिले नाही परंतु रु 4,50,000/- ही रक्कम देऊनही पाहिजे तसे सॉफ्टवेअर मिळाले नाहीत याचा त्यांना मानसिक त्रास झाला असेल असे समजून रक्कम रु 5000/- देण्याचा मंच आदेश देत आहे. म्हणून मंच गैरअर्जदारांना असा आदेश देते की, त्यांनी रक्कम रु 4,50,000/- दिनांक 19/01/2008 पासून 9 % व्याजदाराने तक्रारदारास परत करावे तसेच नुकसान भरपाई म्हणून रु 5000/- द्यावेत. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास रक्कम रु 4,50,000/- दिनांक 19/01/2008 पासून द.सा.द.शे. 9 % व्याजदराने द्यावेत तसेच मानसिक त्रासापोटी रु 5000/- द्यावेत व तक्रारीचा खर्च रु 1,000/- द्यावा. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |