Maharashtra

Nagpur

CC/110/2019

MR. NITIN WAMANRAO KAKDE - Complainant(s)

Versus

M/S AJAY TOURISM, THROUGH ITS PROPRIETOR MR AJAY VANWE - Opp.Party(s)

ADV V. T. BHOSKAR

26 Nov 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/110/2019
( Date of Filing : 07 Feb 2019 )
 
1. MR. NITIN WAMANRAO KAKDE
SHRDDANANDPETH FRIENDS COLONY, KHAT ROAD, BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
2. MRS DEEPA NITIN KAKDE
SHRADDHANANDPETH , FRIENDS COLONY, KHAT ROAD, BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S AJAY TOURISM, THROUGH ITS PROPRIETOR MR AJAY VANWE
PLOT NO 34, SAIKRUPA SOCIETY, NEAR GAJAN AN MAHARAJ TEMPLE, NARENDRA NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV V. T. BHOSKAR, Advocate
For the Opp. Party:
Dated : 26 Nov 2019
Final Order / Judgement

आदेश

(आदेश पारित दिनांक 26.11.2019)

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.        तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष हा टूर्स अॅन्‍ड ट्रॅव्‍हल्‍सचा व्‍यवसाय करतात. तक्रारकर्ता दि. 11.04.2018 ला विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयात चारधाम टूर पॅकेजच्‍या चौकशीकरिता गेला असता विरुध्‍द पक्षाने आयोजित केलेल्‍या  दि. 05.06.2018 ते 14.06.2018 या कालावधीतील 9 रात्र व 10 दिवसाकरिता बद्रिनाथ, केदारनाथ, हरिद्वार व इतर ठिकाणी जाणा-या टूर मध्‍ये सहभाग घेण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाकडे नोंदणी केली व सदरच्‍या टूर पॅकेज पोटी विरुध्‍द पक्षाला दोन व्‍यक्‍तीकरिता रुपये 54,000/- दिले, ज्‍यामध्‍ये रुपये 5000/- रेल्‍वे प्रवास बुकिंग पोटी व या व्‍यतिरिक्‍त रुपये 15000/- हेलीकॅप्‍टर राईडकरिता वेगळे दिले असे एकूण संपूर्ण रक्‍कम रुपये 69,000/- प्रवास सुरु होण्‍यापूर्वी आगाऊ म्‍हणून विरुध्‍द पक्षाला दिली व त्‍याबाबतची विरुध्‍द पक्षाने पावती ही दिली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला  रेल्‍वे प्रवासपोटी दिलेली रक्‍कमेची पावती दिली नाही. कारण विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला त्‍याबाबतची रेल्‍वे तिकिट देणार होते. तसेच तक्रारकर्त्‍याने सदरची रक्‍कम नातेवाईक श्री. वधले व सरोज देसाई यांचे समक्ष दिली.    
  2.        तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की,   माहे मे 2018 ला विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दूरध्‍वनीवर टूरबाबत Confirmation दिले आणि कळविले की, त्‍यांचे प्रवासात 10 लोक आहेत ( पाहुणे) आणि 12 आसणी फोर्स ट्रॅव्‍हल्‍स बुक करण्‍यात आली आहे आणि सर्व OYO flagship deluxe with Ac, Wi-Fi facility असलेले हॉटेल तक्रारकर्त्‍याच्‍या व सहप्रवाशांकरिता बुक करण्‍यात आलेले आहे. सदर सहप्रवासामध्‍ये 4 लोक नागपूरचे आहेत, ज्‍यामध्‍ये तुमचा समावेश आहे आणि विरुध्‍द पक्ष स्‍वतः तक्रारकर्त्‍यासोबत प्रवासा दरम्‍यान उपस्थितीत राहणार आहे (प्रवास करणार आहे). विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला टूर पॅकेज संबंधात Tour itinerary पाठविली. परंतु 4 जुन 2018 ला प्रवास सुरु होण्‍याच्‍या 1 दिवस आधि विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दूरध्‍वनीवरुन कळविले की, केदारनाथ येथे पूर व नैसर्गिक आपत्‍ती असल्‍यामुळे टूर रद्द करण्‍यात आलेला आहे. अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने आकस्‍मात आणि कोणतीही पूर्व सूचना न देता टूर रद्द केला.
  3.       तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, टूर रद्द झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे चारधाम टूर पॅकेज पोटी जमा केलेली रक्‍कम रुपये 69,000 परत मिळण्‍याकरिता संपर्क साधला असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला काही दिवसात रक्‍कम परत करण्‍याचे आश्‍वासन दिले.  परंतु 1 महिन्‍याचा अवधी होऊन ही  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम परत केली नाही. म्‍हणून तक्रारकर्ता क्रं. 1 ने विरुध्‍द पक्षाला दूरध्‍वनीवरुन रक्‍कम परत करण्‍याची विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला टूर पॅकेजपोटी स्‍वीकारलेली रक्‍कम परत केली नाही. त्‍यानंतर दि. 24.08.2018 ला विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम परत न करण्‍याच्‍या उद्देशाने दि. 25.09.2018 पासून सुरु होणा-या प्रस्‍तावित टूर करिता ऑफर दिली असता तक्रारकर्त्‍याने सदर टूरची (itinerary) इटरनरी तक्रारकर्त्‍याला सोयीस्‍कर नसल्‍यामुळे तात्‍काळ विरुध्‍द पक्षाने दिलेली टूरला जाण्‍याची ऑफर नाकारली. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला एस.एम.एस. पाठवून कळविले की, तो दि. 25.09.2018 ला सरोज देसाई मार्फत रक्‍कम परत करील परंतु आजपर्यंत विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून टूर पॅकेज पोटी घेतलेली रक्‍कम परत केली नाही. What’s app Communication  च्‍या प्रति तक्रारी सोबत अॅनेक्‍चर बी म्‍हणून सादर केलेल्‍या आहेत.
  4.        तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, त्‍याने अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्‍याकडे याबाबत तक्रार केली असतांना ही त्‍याचा उपयोग झाला नाही. म्‍हणून दि. 27.11.2018 रोजी विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु सदरची नोटीस unclaimed (घेण्‍यास नकार) या पोस्‍टाच्‍या शे-यासह परत आली. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.

 

  1.        तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडून चारधाम टूर पॅकेज पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 69,000/- द.सा.दशे. 18 टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत रक्‍कम अदा करण्‍याचे आदेश द्यावे. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही  आदेश द्यावा.

 

  1.        विरुध्‍द पक्ष यांना मंचा मार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 09.07.2019 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.        तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले  व त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नमूद केले.

             मुद्दे                                           उत्‍तर

  1.  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ           होय

 

  1.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला काय ॽ             होय

 

  1.  काय आदेश ॽ                               अंतिम आदेशानुसार      

                

  •                                                                                            कारणमिमांसा

8.      मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाने आयोजित केलेल्‍या 9 रात्र व 10 दिवस दि. 05.06.2018 ते 14.06.2018 या कालावधीकरिता बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वार व इतर ठिकाणाच्‍या 2 व्‍यक्‍तीच्‍या चारधाम टूर पॅकेजकरिता  एकूण रुपये 54,000/- विरुध्‍द पक्षाला अदा केले. यामध्‍ये रुपये 5000/- रेल्‍वे प्रवास बुकिंग पोटी रक्‍कम दिल्‍याचा समावेश आहे, परंतु याबाबतची पावती दिलेली नाही.कारण विरुध्‍द पक्ष हे तक्रारकर्त्‍याला त्‍याबाबतचे रेल्‍वे तिकिट देणार होते. या व्‍यतिरिक्‍त तक्रारकर्त्‍याने रुपये 15,000/- हेलीकॅप्‍टर राईडकरिता दिले होते. याबाबतची विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला पावती दिलेली आहे. सदरची पावती नि.क्रं. 2 वर दाखल केलेली आहे,  यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते.

 9.           विरुध्‍द पक्षाने दि. 04.06.2018 ला म्‍हणजेच टूर सुरु होण्‍याच्‍या एक दिवस आधि बद्रीनाथ येथे पूर व नैसर्गिक आपत्‍ती असल्‍यामुळे सदरचा टूर रद्द झाल्‍याचे तक्रारकर्त्‍याला दूरध्‍वनीवरुन कळविले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला टूर पॅकेज  पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 69,000/- परत करण्‍याची विनंती केली, परंतु विरुध्‍द पक्षाने आश्‍वासन देऊन ही रक्‍कम परत केली नाही. विरुध्‍द पक्षाने दि. 25.09.2018 पासून सुरु होणा-या प्रस्‍तावित टूर करिता ऑफर दिली असता तक्रारकर्त्‍याने सदर टूरची (itinerary) इटरनरी तक्रारकर्त्‍याला सोयीस्‍कर नसल्‍यामुळे तात्‍काळ टूरला जाण्‍याची ऑफर नाकारली, त्‍यामुळे उभय पक्षात नविन करार निर्माण झालेला नाही. सबब  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून चारधाम टूर पॅकेज पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम परत करणे आवश्‍यक होते असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  

10.           विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर झाला नाही व आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयर्थ कुठलेही दस्‍तऐवज अथवा लेखी उत्‍तर सादर केले नाही. यावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली असून अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे सिध्‍द होते. म्‍हणून  तक्रारकर्त्‍याची टूर पॅकेज पोटी भरलेली रक्‍कम परत मिळण्‍याची मागणी मंजूर करणे योग्‍य व वाजवी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  

             सबब  खालीलप्रमाणे अंतिम  आदेश  पारित.

                                 अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडून टूर पॅकेज पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 69,000/- व त्‍यावर दि. 28.05.2018 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या विरुध्‍द पक्ष यांनी करावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी. 
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.