Maharashtra

Pune

CC/09/366

S.S.Bhiragi - Complainant(s)

Versus

M/S Acumen Developers Pvt. Ltd. - Opp.Party(s)

30 Jun 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/09/366
 
1. S.S.Bhiragi
Row House No. 4, Nakshatra, Baner-Mhalunge Road,S.No. 114/1/2, Baner,Pune 411045
...........Complainant(s)
Versus
1. M/S Acumen Developers Pvt. Ltd.
992/93/3A, Rajendra Nagar,Pune 411030
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारदारांकरिता अॅड. यू.एम.देशपांडे
जाबदेणारांकरिता अॅड. उमेश देशमुख
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
श्रीमती, अंजली देशमुख, मा. अध्‍यक्ष यांचेनुसार
 
                           :- निकालपत्र :-
                         दिनांक 30 जुन 2012
 
 
तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-
 
1.           तक्रारदारांनी जाबदेणारांकडून रो हाऊस विकत घेण्‍याचे ठरविले. त्‍यानुसार जाबदेणार यांनी राबविलेल्‍या “ नक्षत्र” या योजनेमध्‍ये, प्‍लॉट नं 9 व 10, सर्व्‍हे नं 114 हिस्‍सा नं 2 /2 बाणेर येथील रो हाऊस क्र.4, 163.7 चौ.मिटर, टेरेस 11.14 चौ. मिटर व कार पार्किंग लॉट नं 4 संदर्भात तक्रारदार आणि जाबदेणार यांच्‍यामध्‍ये दिनांक 29/10/2007 रोजी नोंदणीकृत करारनामा झाला. जाबदेणार यांनी तक्रारदारास प्रत्‍येक रो हाऊस स्‍वतंत्र बांधलेले असेल, प्रत्‍येक रो हाऊस मध्‍ये स्‍वतंत्र सोई सुविधा असतील असे सांगितले होते. पुणे महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन साईट पर्यन्‍त आलेली नसल्‍यामुळे प्रत्‍येक रो हाऊसला स्‍वतंत्र सेप्‍टीक टँक व सोक पिट्स देण्‍यात येतील असेही जाबदेणार यांनी तक्रारदारांना सांगितले होते. रो होऊस बांधत असतांना तक्रारदार नेहमी साईटवर जात असत. रो हाऊसची एकूण किंमत रुपये 48,50,000/- होती. जाबदेणार यांनी दिनांक 9/12/2008 रोजी रो हाऊसचा ताबा तक्रारदारांना दिला. कंपाऊंड वॉलमधील, पार्कींग मधील जागा फक्‍त तक्रारदारांच्‍याच वापरासाठी आहे असे तक्रारदारांना वाटले होते. ताबा घेतल्‍यानंतर तक्रारदारास रो हाऊस मध्‍ये अनेक त्रुटी आढळून आल्‍या. त्‍या खालीलप्रमाणे-
A]        सोलर वॉटर हिटरला गिझर मास्‍टर टॉयलेट मध्‍ये ऑन ऑफ च्‍या बटणांसह बसविणे
B]    बोअरिंगच्‍या पाण्‍यासाठी अंडरग्राऊंड वॉटर टँक व्‍हॉल्‍व्‍ह
C]    मास्‍टर टॉयलेट, वॉश बेसिन ब्रॅकेट पेंटिंग
D]    मास्‍टर बेडरुम मधील तीन टाईल्‍स बदलणे
E]    खिडक्‍यांभोवतीचे फिनिशींग
F]    खिडक्‍यांमधून व टेरेसच्‍या दारातून होणारे वॉटर लिकेज
G]    ग्‍लास क्लिनिंग
H]    टाईल्‍स मध्‍ये व्‍हाईट सिमेंट भरणे
I]     स्‍टेअरकेस मधील लुज रेलिंग वर्क
J]     बाहेरुन रंगकाम
K]    मास्‍टर टॉयलेट फिनिशिंग वर्क
L]    गेस्‍ट बेडरुम मध्‍ये इलेक्ट्रिकल फिनिशिंग वर्क
M]    गेस्‍ट टॉयलेट मध्‍ये टाईल्‍स क्रॅक
N]    ग्राऊंडवरुन वरील पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टँकला जोडणी
O]    व्हिडीओ डोअर बेल
P]    फ्रन्‍ट डोअर, सेफटी गेट व नेट पेंटिंग वर्क
Q]    मुख्‍य लाकडी दाराच्‍या फ्रेमला तडा
R]    पेव्हिंग ब्‍लॉक फिनिशींग वर्क
S]    kitchen window view from entrance gate finishing
T]    गॅलरी मधून पावसाच्‍या पाण्‍याचा आऊटलेट
U]    लाईटेड साईन बोर्ड
V]    इलेक्ट्रिकल व कन्‍सील्‍ड प्‍लंबींग ड्राईंग     
 
एप्रिल 2009 मध्‍ये तक्रारदारास असे आढळून आले की, त्‍यांच्‍या रो हाऊस मधील सेप्‍टीक टँक व सोक पिट मध्‍ये इतर रो हाऊसेसचे वेस्‍ट ड्रेनेज सोडण्‍यात आले होते. त्‍यामुळे तक्रारदार व त्‍यांच्‍या कुटूंबियांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे, आरोग्‍यावर परिणाम होत आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांच्‍याशिवाय कुणीही बाकी तीन रो हाऊसेसचा ताबा घेतलेला नव्‍हता. तरीसुध्‍दा बांधकाम मजुर व स्‍टाफ मधील कर्मचारी यांच्‍या वापरामुळे त्‍या रो हाऊस  मधून येणा-या दुर्गंधीचा त्रास तक्रारदारांना सहन करावा लागत होता. जाबदेणार यांनी प्रत्‍येक रो हाऊसला वेगळे सेप्‍टीक टँक बांधून देऊ असे सांगूनही तसे बांधले नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांच्‍या सेप्‍टीक टँक मधील ड्रेनेज पाईप लाईन ब्‍लॉक केली होती. रो हाऊस क्र.2 मधील मालक रहावयास आल्‍यानंतर जाबदेणार यांनी ब्‍लॉक केलेली ड्रेनेज पाईप लाईन परत सुरु केली. त्‍यामुळे पुन्‍हा तक्रारदार व त्‍यांच्‍या कुटूंबियांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. जाबदेणार तक्रारदारांकडून दरमहिन्‍याला मेंटेनन्‍स पोटी रुपये 2500/- देखभालीचा खर्च म्‍हणून घेतात. परंतु त्‍याचा हिशेब देत नाहीत. तसेच सोसायटी स्‍थापनेसाठी, वीज मिटरसाठी, कायदेशिर खर्चाच्‍या रकमांचा हिशेब ठेवण्‍यात आलेला नाही. त्‍यामुळे देखभाल खर्चापोटी प्राप्‍त झालेला रकमेचा जाबदेणार दुरुपयोग करतात असे तक्रारदारांचे म्‍हणणे आहे. जाबदेणार यांनी ऑर्गनायझेशन ऑफ युनिट होल्‍डर्स, कन्‍व्‍हेअन्‍स डीड करुन दिलेले नाही. म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून त्‍यांचे प्रतिनिधी, कर्मचारी, मजुर, कॉन्‍ट्रॅक्‍टर्स यांनी तक्रारदारांच्‍या रो हाऊस क्र.4 च्‍या सेप्‍टीक टँक व सोकपिट मध्‍ये इतर रो हाऊस मधील ड्रेनेज येऊ नये, तसेच शांततेचा भंग होऊ नये, त्रास होऊ नये, म्‍हणून कायम स्‍वरुपी मनाईचा आदेश  मागतात. तसेच जाबदेणार यांनी ऑर्गनायझेशन ऑफ युनिट होल्‍डर्स, कन्‍व्‍हेअन्‍ड डीड करुन दयावे, रो हाऊस क्र.4 चे ऑक्‍युपन्‍सी सर्टिफिकीट मिळावे व तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र.15 मध्‍ये नमूद केलेल्‍या त्रुटी दूर करुन मिळाव्‍यात अशी मागणी करतात. यासर्वांमुळे तक्रारदारांना जो त्रास सहन करावा लागला त्‍यासाठी म्‍हणून नुकसान भरपाई पोटी रुपये 2,00,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2.          जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांनी तक्रारदारासोबत रो हाऊस क्र.4 संदर्भात करार केलेला होता. त्‍यावेळीच तक्रारदारांना नकाशा, सर्च रिपोर्ट, 7/12चा उतारा व इतर आवश्‍यक कागदपत्रे देण्‍यात आलेली होती. तसेच मंजुर नकाशाची प्रतही तक्रारदारांना पाहण्‍यासाठी देण्‍यात आलेली होती त्‍यामध्‍ये तक्रारदारांच्‍या रो हाऊस जवळ सेप्‍टीक टँक दर्शविण्‍यात आलेला आहे. जरी समजा तक्रारदारांना नकाशामधील सेप्‍टीक टँक वाचता आला नसेल, तरी सुध्‍दा रो हाऊस क्र.4 खरेदी करावयाच्‍या आधी तक्रारदारांनी साईट बघितली होती, त्‍यावेळी सेप्‍टीक टॅंक रो हाऊस क्र.4 च्‍या जवळ असल्‍याचे व सर्व रो हाऊसेस साठी सामाईक असल्‍याचेही तक्रारदारांना अवगत करुन देण्‍यात आलेले होते. कारण तोपर्यन्‍त तिथे पुणे महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन आलेली नव्‍हती. ही सर्व माहिती घेऊन प्रत्‍यक्ष साईट बघून, कागदपत्रांची पाहणी करुनच तक्रारदारांनी दिनांक 29/10/2007 रोजी रो हाऊस घेण्‍यासाठी करार केला होता. करारामधील अटी व शर्ती तक्रारदारांना मान्‍य असल्‍यामुळेच तक्रारदारांनी त्‍यावर सही केलेली आहे त्‍यामुळे सेप्टिक टँक सामाईक आहे ही बाब तक्रारदार आता नाकारु शकत नाहीत. रो हाऊस बांधते वेळी तक्रारदार नेहमीच साईटवर येत होते. त्‍यामुळे सेप्टिक टँक बांधते वेळी ते पाहत होते. तक्रारदारांना 1125 चौ.फुटांचे लॉन दिलेले होते, परंतु प्रत्‍यक्षात तक्रारदार 1365 चौ.फुटांचे लॉन वापरत आहेत, 240 चौ.फुटांचे अनाधिकृत बांधलेले शेड वापरत आहेत. तक्रारदारांना सेप्टिक टँक सामाईक वापरासाठी असल्‍याचे माहित होते तरीसुध्‍दा तो ब्‍लॉक करण्‍यासाठी म्‍हणून इतर रो हाऊस धारकांना तसेच साईट इंजिनिअर्स व वॉचमन यांना तक्रारदार धमकी देत होते. हे सर्व इतर रो हाऊस धारकांना त्रासदायक ठरत होते. जाबदेणार यांनी दिनांक 29/7/2009 रोजी पुणे महानगरपालिकेची ड्रेनेजची एन.ओ.सी आणलेली आहे. त्‍यामुळे आता त्‍याबद्यल कुठलाही आक्षेप असावयास नको. जाबदेणार पुढे असे नमूद करतात की, पुणे महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन तिथपर्यन्‍त आलेली नसल्‍यामुळे सेप्टिक टँक ही तात्‍पुरती व्‍यवस्‍था आहे. ज्‍यावेळी पुणे महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन येईल त्‍यावेळी सिवेज लाईन ड्रेनेज लाईनला जोडली जाईल. जाबदेणार यांनी पुणे महानगरपालिकेची ड्रेनेज एन.ओ.सी आणलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्‍या मंजुर नकाशानुसार व ड्रॉईंग नुसारच जाबदेणार यांनी सेप्टिक टँक बांधलेला आहे. त्‍यास संबंधित अॅथोरिटीने परवानगी दिलेली आहे. जाबदेणार यांनी कुठलेही बेकायदेशिर बांधकाम केलेले नाही. तक्रारदारांनी जाबदेणार यांना अद्यापपर्यन्‍त रुपये 38,000/- दिलेले नाहीत. त्‍यामुळे कन्‍व्‍हेअन्‍स डीड करुन देण्‍यात आलेले नाही. याच कारणांमुळे तक्रारदारांनी सिव्‍हील कोर्टात रेग्‍युलर सिव्हिल सुट क्र. 839/2009 जाबदेणारांविरुध्‍द दाखल केलेला आहे. तिथेही हीच मागणी केलेली आहे. त्‍यामुळे एकाच वेळी दोन अॅथोरिटी कडे तक्रारदार मागणी करु शकत नाहीत. वरील कारणांमुळे तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र व कागदपत्र दाखल केले.
 
3.          तक्रारदार आणि जाबदेणार यांनी प्रत्‍येकी स्‍वतंत्र आर्किटेक्‍ट नेमून त्‍यांचा अहवाल दाखल केला आहे. तक्रारदारांचा आर्किटेक्‍ट साकार ग्रुप्‍स हॅबिटॅट आर्किटेक्‍ट्स आहेत. साकार ग्रुप्‍स हॅबिटॅट आर्किटेक्‍ट्स यांचे श्री. संजय एन. दरमवार यांचा दिनांक 17/6/2011 चा अहवाल दाखल करण्‍यात आलेला आहे. या अहवालामध्‍ये तक्रारदारांचे रो हाऊस क्र.4 च्‍या गार्डन एरिया मध्‍ये सेप्टिक टँक व सोकपिट बांधण्‍यात आल्‍याचे नमूद करण्‍यात आलेले आहे. चारही रो हाऊसचे ड्रेन वॉटर या सेप्टिक टँक व सोकपिट मध्‍ये सोडण्‍यात आलेले आहे. सामाईक सेप्टिक टँक व सोकपिट साठी रो हाऊस क्र.4 च्‍या गार्डन एरिया शिवाय इतर सामाईक जागा नाही. तांत्रिकदृष्‍टया एकाच सोकपिट व सेप्टिक टँक मध्‍ये सर्व ड्रेन वॉटर सोडणे हे चुकीचे आहे. त्‍यासाठी पर्यायी व्‍यवस्‍था आर्किटेक्‍ट यांनी नमूद केलेली आहे. प्रत्‍येक रो हाऊसच्‍या स्‍टील्‍ट एरिया मध्‍ये सेप्टिक टँक व सोकपिट देता येऊ शकेल. ड्रेनेज लाईन मेन सिवर लाईनला स्‍टील्‍ट एरिया मधून जोडता येऊ शकते. जरी म्‍युनिसिपल ड्रेन लाईन रो हाऊस क्र.4 मधील सेप्टिक टँक व सोकपिटला जोडली तरी तक्रारदारांना लिव्‍हींग एरियामध्‍येदेखील दुर्गंधीचा त्रास होऊ शकेल, मुलांना खेळण्‍यासाठी गार्डन एरिया वापरता येणार नाही. चोकींग व प्‍लडींग मुळे तक्रारदारांच्‍या व त्‍यांच्‍या कुटूंबियांच्‍या आरोग्‍याला ते हानीकारक आहे.
 
4.          जाबदेणार यांनी नेमलेल्‍या श्री. दिलीप जी. काळे, आर्किटेक्‍ट यांचा दिनांक 4/6/2012 रोजीचा अहवाल दाखल करण्‍यात आलेला आहे. या अहवालामध्‍ये पुणे महानगरपालिकेने दिनांक 21/7/2009 रोजी ड्रेनेज कामासाठी एन.ओ.सी दिलेली आहे. श्री. काळे यांनी लायसेन्‍स प्‍लंबर यांच्‍याशी काही बाबींवर चर्चा केली होती ती पुढीलप्रमाणे-
            प्‍लॉट टोपोग्राफीप्रमाणे, पाण्‍याची लाईन व ड्रेनेज लाईन एकमेकांना क्रॉस होऊ नये म्‍हणून काळजी घेतली गेली होती. अंडरग्राउंड वॉटर टँक व सेप्टिक टॅंक, सोकपिट हे लांब ठेवले जातात. सिवेज संदर्भात, दुर्गंधी बाबत काळजी घेण्‍यात आलेली होती. तपासणी अंती आर्किटेक्‍ट यांना पुढीलप्रमाणे आढळून आले-
            रो हाऊस क्र.2 व रो हाऊस क्र.3 यांना स्‍वतंत्र सेप्टिक टँक व सोकपिट साठी जागा नाही. पुणे महानगरपालिकेच्‍या नियमाप्रमाणे प्रत्‍येक प्‍लॉट मध्‍ये एकच सेप्टिक टँकची परवानगी असते. बाणेर भाग हा झपाटयाने विकसित होणारा असल्‍यामुळे पुणे महानगरपालिकेकडून सामाईक सिवेज सिस्‍टीम लवकरच मिळेल. या सिवेज लाईनला एकाच चेंबर मधून कनेक्‍शन देणे योग्‍य होईल. अन्‍यथा चार लाईन तोडून व प्रत्‍येक रो हाऊस समोर चेंबर बांधावे लागेल. व त्‍यावेळी रो हाऊस क्र.1 व 3 यांच्‍या हॅबिटेबल एरिया खालून ड्रेनेज लाईन घ्‍यावी लागेल व असे करण्‍यास पुणे महानगरपालिकेकडून परवानगी मिळणार नाही. शेवटी पुणे महानगरपालिकेकडून येणा-या ड्रेनेज लाईनला रो हाऊस क्र.4 मधील ड्रेनेज लाईन जोडण्‍यात येणार असल्‍यामुळे हा तात्‍पुरता इश्‍यु आहे असे नमूद करण्‍यात आलेले आहे.
 
5.          दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची आणि दोन्‍ही आर्किटेक्‍ट अहवालांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांची मुख्‍य एकच तक्रार आहे की, त्‍यांच्‍या रो हाऊस क्र.4 च्‍या गार्डन एरिया मधील सेप्टिक टँक व सोकपिट मध्‍ये इतर तीन रो हाऊसेसचे सिवेज ड्रेनेजला सोडण्‍यात आले होते. त्‍यामुळे येणा-या दुर्गंधीचा तक्रारदारांना व त्‍यांच्‍या कुटूंबियांना त्रास होत होता, त्‍यांच्‍या आरोग्‍यास ते हानीकारक होते. तक्रारदारांच्‍या मुलांना गार्डनमध्‍ये खेळता येत नव्‍हते. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार प्रत्‍येक रो हाऊसला स्‍वतंत्र सोई सुविधा व स्‍वतंत्र सेप्‍टीक टँक व सोक पिट्स देण्‍यात येतील असेही जाबदेणार यांनी सांगितले होते. असे असले तरी, तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत परिच्‍छेद क्र.4 मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे रो हाऊस क्र.4 चे बांधकाम सुरु असतांना ते तेथे जात होते तसेच रो हाऊस क्र.4 मधील जागेचा कुठल्‍याही प्रकारे सामाईक उपयोग होणार नाही हे बघत होते. त्‍यामुळे आता सामाईक सेप्टिक टँक व सोकपिट बद्यल तक्रारदारांना माहिती नव्‍हती असे तक्रारदार म्‍हणू शकत नाहीत. जाबदेणार यांनी पुणे महानगरपालिकेची ड्रेनेज संदर्भातील एन.ओ.सी दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी दाखल केलेला साकार ग्रुप्‍स हॅबिटॅट आर्किटेक्‍ट्स यांचे श्री. संजय एन. दरमवार यांचा दिनांक 17/6/2011 चा अहवाल तांत्रिक दृष्‍टया योग्‍य ठरणार नाही. कारण असे असेल तर पुणे महानगरपालिकेने जाबदेणार यांच्‍या नकाशाला मान्‍यताच दिली नसती तसेच ड्रेनेज एन.ओ.सी दिली नसती. त्‍यामुळे तक्रारदारांनी दाखल केलेला आर्किटेक्‍टचा अहवाल मंच विचारात घेत नाही.
            जाबदेणार यांनी दाखल केलेल्‍या श्री. दिलीप जी. काळे, आर्किटेक्‍ट यांचा दिनांक 4/6/2012 रोजीच्‍या अहवालामध्‍ये शेवटी असा निष्‍कर्ष आहे की पुणे महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन साईट पर्यन्‍त आल्‍यानंतर रो हाऊस क्र.4 मधील सेप्टिक टँक व सोकपिट त्‍यास जोडण्‍यात येईल, हा मुद्या तात्‍पुरता आहे असे श्री. काळे यांचे म्‍हणणे आहे. ते मंचास पटते कारण  महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन येण्‍याआधी घरे बांधण्‍यात आल्‍यामुळे अशा प्रकारचा त्रास काही दिवस सहन करावाच लागतो. यासर्वांवरुन जाबदेणार यांनी पुणे महानगरपालिकेच्‍या मान्‍यते प्रमाणेच रो हाऊस क्र.4 चे बांधकाम केलेले आहे. त्‍यामुळे रो हाऊस क्र.4 मध्‍ये स्‍वतंत्र सेप्टिक टँक व सोकपिट असावे ही तक्रारदारांची मागणी मंच मान्‍य करीत नाही. परंतु पुणे महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन आल्‍यानंतर ताबडतोब त्‍यास रो हाऊस क्र.4 ची सेप्टिक टँक व सोकपिट लाईन – सिवेज जोडणी करुन दयावी ज्‍यायोगे तक्रारदारांच्‍या व त्‍यांच्‍या कुटूंबियांचे आरोग्‍य हानीकारक, त्रासदायक होणार नाही, असा जाबदेणार यांना मंच आदेश देत आहे. जाबदेणार यांनी अद्यापपर्यन्‍त कन्‍व्‍हेअन्‍स डीड करुन दिले नसल्‍यामुळे ते स्‍वत:च देखभाल करतात, त्‍यामुळे सोकपिट व सेप्टिक टँकची चांगली देखभाल करावी असाही जाबदेणार यांना मंच आदेश देत आहे.   
            तक्रारदारांनी तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र. 15 मध्‍ये त्‍यांच्‍या रो हाऊस मधील त्रुटी दूर करुन मिळाव्‍यात असे नमूद केले आहे. परंतु त्रुटींबद्यलचा कुठलाही पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही, आर्किटेक्‍टच्‍या अहवालामध्‍येही त्‍याबद्यलचा उल्‍लेख नाही. म्‍हणून मंच तक्रारदारांची ही मागणी विचारात घेत नाही. दिनांक 9/12/2008 रोजी जाबदेणारांनी तक्रारदारास रो हाऊसचा ताबा दिला होता परंतु ऑक्‍युपन्‍सी सर्टिफिकीट, ऑर्गनायझेशन ऑफ युनिट होल्‍डर्स, कन्‍व्‍हेअन्‍ड डीड ही जाबदेणार यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे. जाबदेणार यांनी तक्रारदारांना ऑक्‍युपन्‍सी सर्टिफिकीट, ऑर्गनायझेशन ऑफ युनिट होल्‍डर्स, कन्‍व्‍हेअन्‍ड डीड आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत करुन दयावे. जोपर्यन्‍त ऑर्गनायझेशन ऑफ युनिट होल्‍डर्स, कन्‍व्‍हेअन्‍ड डीड जाबदेणार करुन देत नाही तोपर्यन्‍त तक्रारदारांच्‍या रो हाऊस क्र. 4 मधील सेप्टिक टँक व सोकपिटची देखभाल करावी. तसेच नुकसान भरपाईपोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- तक्रारदारास दयावा.
 
            वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्‍यात येत आहे-
                              :- आदेश :-
            [1]    तक्रार अंशत: मान्‍य करण्‍यात येत आहे.
            [2]    जाबदेणार यांनी तक्रारदारांना ऑक्‍युपन्‍सी सर्टिफिकीट, ऑर्गनायझेशन ऑफ
युनिट होल्‍डर्स, कन्‍व्‍हेअन्‍ड डीड आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत करुन दयावे.
[3]    जोपर्यन्‍त ऑर्गनायझेशन ऑफ युनिट होल्‍डर्स, कन्‍व्‍हेअन्‍ड डीड जाबदेणार करुन देत नाही तोपर्यन्‍त तक्रारदारांच्‍या रो हाऊस क्र. 4 मधील सेप्टिक टँक व सोकपिटची देखभाल करावी.
[4]    जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत अदा करावे.
      आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.