Maharashtra

Ahmednagar

CC/18/86

Sau. Madhavi Ajit Bhongale - Complainant(s)

Versus

M/S . Kohinoor Proofing Industries - Opp.Party(s)

N.D. Jagtap & Sachin C. Ithape

29 Apr 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/18/86
( Date of Filing : 20 Mar 2018 )
 
1. Sau. Madhavi Ajit Bhongale
A/P- Shedgaon, Tal- Shrigonda
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/S . Kohinoor Proofing Industries
28/1- B, Tiny Industrial Estate, Kondhwa Bk, Pune- 411 048
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:N.D. Jagtap & Sachin C. Ithape, Advocate
For the Opp. Party:
Dated : 29 Apr 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

1.   तक्रारदार हिने सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी तक्रारदार हिस अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics) निकृष्‍ट दर्जाचा दिला व मागणी करुनही तो बदलून दिला नाही व द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.

2.   तक्रारदार हिची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणेः-

     तक्रारदार ही मु.पो.शेडगांव ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार हिने त्‍यांचे डाळींब बाग लागवडीसाठी त्‍यांच्‍या मालकीच्‍या शेतीमध्‍ये शेततळे करण्‍याचे ठरविले. सदर शेततळयामध्‍ये पाणी साठा करण्‍यासाठी अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics)     खरेदी करण्‍यासाठी सामनेवाला यांचेकडे व कृषी विभागाशी संपर्क साधला. सदरचे प्‍लॅस्‍टीक कागद उत्‍पादन हे महाराष्‍ट्र शासनाने अधोरेखीत केलेल्‍या योजनेनुसार संबंधीत शेतक-यांना सामनेवाला पुरवठा करतात. त्‍यानुसार तक्रारदार हिने दिनांक 17.11.2012 रोजी रक्‍कम रुपये 2,84,916/- या किंमतीचे अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics) खरेदी केले. सदर पेपर खरेदी केलेल्‍या बिलाची पावती प्रकरणात दाखल आहे. महाराष्‍ट्र शासनाचे नियमाप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदार हिस पुरवठा केलेल्‍या कागद उत्‍पादनासाठी खरेदी केलेल्‍या तारखेपासून पाच वर्षासाठी गॅरंटी व वॉरंटी दिलेली आहे. तक्रारदार हिने पुढे असे कथन केले आहे की, सदरचे प्‍लॅस्‍टीक पेपर हे निकृष्‍ट दर्जाचे असल्‍याने गॅरंटी व वॉरंटी कालावधी संपण्‍याआधीच ठिकठिकाणी संपुर्ण कागदास छिद्रे पडून खराब झालेला आहे. अशा प्रकारे सामनेवाला यांनी तक्रारदार सोबत व्‍यवहारामध्‍ये फसवणूक केलेली आहे. त्‍यामुळे त्‍यांनी संबंधीत कृषी विभागास रितसर तक्रार दाखल केली. सदर तक्रार अर्ज केल्‍यावर कृषी विभाग श्रीगोंदा येथील कृषी पर्यवेक्षक यांनी सदर शेत तळयाची प्रत्‍यक्ष भेट घेऊन, पाहाणी करुन स्‍थळ पाहाणी अहवाल दिनांक 28.08.2017 रोजी सादर केलेला आहे. सदरचे अहवालामध्‍ये कागदास ठिकठिकाणी छिद्रे असून कागद खराब झालेला आहे असे स्‍पष्‍टपणे नमुद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे शेततळयामध्‍ये पाणीसाठा होणे शक्‍य नाही असा पाहाणी अहवालामध्‍ये निष्‍कर्ष दिलेला आहे. तक्रारदार हिने सदर शेततळयामध्‍ये पाच एकर डाळींब लागवड केली आहे. परंतु निकृष्‍ट दर्जाचा कागद पुरविल्‍यामुळे संपुर्ण डाळींब बाग ही जळून गेली. त्‍यामुळे तक्रारदार हिचे एकरी रु.3,00,000/- प्रमाणे असे एकुण 15,00,000/- रुपयाचे नुकसान झालेले आहे. तक्रारदार हिने त्‍यानंतर सामनेवाला यांना दिनांक 17.10.2017 रोजी नोटीस पाठविली होती व कागद बदलून मागितला सामनेवाला यांनी तक्रारदार हिस सदरचा कागद बदलूनही दिला नाही. अशा प्रकारे तक्रारदार हिस मानसिक व शारीरीक, आर्थिक त्रास सहन करावा लागला. सामनेवाला यांनी तक्रारदार हिची नोटीस प्राप्‍त होऊनही तक्रारदार हिचे नोटीसला उत्‍तर दिले नाही. म्‍हणून तक्रारदार हिने मंचात तक्रार दाखल करुन परीच्‍छेद क्र.20 प्रमाणे मागणी केली आहे.

3.   सामनेवाला यांना या प्रकरणाची नोटीस प्राप्‍त होऊनही ते या प्रकरणात हजर झाले नाही. म्‍हणून निशाणी 1 वर त्‍यांचे विरुध्‍द सदरचे प्रकरण एकतर्फा  चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला.

4.   तक्रारदार हिने दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे, शपथपत्र यांचे अवलोकन केले. तसेच तक्रारदार हिचे वकील श्री.सचिन इथापे यांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.  

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारदार ही सामनेवाला यांची ग्राहक आहे काय.?                                                         

 

... होय.

2.

सामनेवाला यांनी तक्रारदार हिस सेवा देण्‍यास त्रुटी केली आहे काय.?

... होय.

3.

तक्रारदार ही सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे काय.?

... होय.

4.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

5.   मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार ही मु.पो.शेडगांव ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार हिने त्‍यांचे मालकीचे शेत जमीनीमध्‍ये डाळींब बाग लागवडीसाठी त्‍यांच्‍या मालकीच्‍या शेतीमध्‍ये शेततळे करण्‍याचे ठरविले. सदर शेततळयामध्‍ये पाणी साठा करण्‍यासाठी अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics) खरेदी करण्‍याचे ठरविले.  तक्रारदार हिस मिळालेल्‍या माहितीनुसार महाराष्‍ट्र शासनाने अधोरेखीत केलेल्‍या योजनेनुसार संबंधीत शेतक-यांना सामनेवाला यांचेकडून कागदाचा पुरवठा करीत असल्‍याचे समजले. त्‍यामुळे तक्रारदार हिने सामनेवाला यांचेकडे दिनांक 17.11.2012 रोजी रक्‍कम रुपये 2,84,916/- देऊन कागद खरेदी केला. सदरचा कागद खरेदी केल्‍याबाबतचा दस्‍त प्रकरणात दाखल आहे. सदर दस्‍ताचे अवलोकन केले असता ते सामनेवाला यांनी दिलेले टॅक्‍स इनव्‍हाईस आहे. यावरुन तक्रारदार ही सामनेवाला यांची ग्राहक आहे असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

6.   मुद्दा क्र.2 व 3   तक्रारदार हिने सामनेवाला यांचेकडून अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics) खरेदी केल्‍यानंतर लगेच सदरचे प्‍लॅस्‍टीक कागदास छिद्र पडू लागल्‍यामुळे तक्रारदार हिने या बाबतची तक्रार सामनेवाला यांचेकडे केली. तसेच कृषी विभाग श्रीगोंदा यांचेकडे तक्रार केली. तक्रारदार हिने करारानुसार श्रीगोंदा विभाग येथील कृषी पर्यवेक्षक यांनी सदर शेततळयाची प्रत्‍यक्ष भेट घेऊन, पाहाणी करुन स्‍थळ पाहाणी अहवाल दिनांक 28.08.2017 रोजी सादर केलेला आहे. तो अहवाल तक्रारदार हिने प्रकरणात दाखल केला आहे. त्‍या अहवालामध्‍ये अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics) ची पाहाणी केली असता ठिकठिकाणी संपुर्ण कागदास छिद्रे पडलेली असून संपुर्ण पेपर हा खराब झालेला आहे असे दिसून येते आहे. संपुर्ण पेपर हा जीर्ण खराब झालेला असल्‍यामुळे सदर शेततलावात पाणीसाठा होत नाही. त्‍यामुळे सदर शेतक-याच्‍या गटातील पाच एकर डाळींब पिक हे सुकलेल्‍या अवस्‍थेत दिसून येत आहे. त्‍यामुळे सदर    शेतक-याचे अंदाजे 15 ते 20 लाख रुपये नुकसान झाल्‍याचा अंदाज आहे. असे पाहाणी अहवालात नमुद केले आहे. सदरचे अहवालावर कृषी पर्यवेक्षक व इतर साक्षीदाराच्‍या सहया आहेत. यावरुन अशा प्रकारे सदर तक्रारदार हिने खरेदी केलेला कागद अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics) छिद्रे पडलेली आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदार हिने केलेल्‍या तक्रारीचे निराकरण केलेले नाही. व तक्रारदार हिने सामनेवाला यांना नोटीस देऊनही त्‍यांनी त्‍यांचे नोटीसला उत्‍तर दिले नाही. व सदरच्‍या तक्रारीची मंचाची नोटीस प्राप्‍त होऊनही सामनेवाला हे प्रकरणात हजर झाले नाही. त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचे आदेश निशाणी 1 वर पारीत करण्‍यात आले. अशा प्रकारे तक्रारीतील कथन खोडून काढण्‍याची संधी सामनेवाला यांनी गमावली आहे. तक्रारदार हिचे तक्रारीतील कथनाप्रमाणे तक्रारदार हिची मागणीस प्रतिसाद दिला नाही. व निकृष्‍ट दर्जाचा अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics) दिला हे सिध्‍द होते. यावरुन सामनेवाला यांनी निश्चितच सेवेत त्रुटी केली आहे ही बाब स्‍पष्‍ट होते.

7.   तक्रारदार हिने त्‍यांचे तक्रारीमध्‍ये पुढे असे कथन केले आहे की, त्‍यांनी डाळींब पिकाची लागवड केली आहे. व शेततळयाचा अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics) निकृष्‍ट दर्जाचा असल्‍यामुळे पाणी साठवणूक होऊ शकली नाही. त्‍यामुळे संपुर्ण पिक जळाले. त्‍यामुळे तक्रारदार हिने रक्‍कम रु.15,00,000/- मागणी केली आहे. परंतु या नुकसान भरपाईस तक्रारदार हिने कोणताही कागदोपत्री पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारदार हिची सदरचे पिकांबाबत किती व कशामुळे नुकसान झाले ही बाब मंचासमोर स्‍पष्‍ट झालेली नाही. त्‍यामुळे तक्रारदार हिची सदरचे नुकसान भरपाईची मागणी देता येणार नाही. मात्र तक्रारदार हिने सामनेवाला यांचेकडून अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics) खरेदी केला आहे ही बाब बिलावरुन स्‍पष्‍ट होते. व सदरचा कागद हा निकृष्‍ट दर्जाचा आहे ही बाब स्‍थळ पाहाणी अहवालावरुन तक्रारदार हिने सिध्‍द केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार हिने खरेदी केलेला अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics) ची किंमत किंवा पेपर बदलून नविन द्यावा ही मागणी मिळण्‍यास पात्र ठरतात या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

8.   तक्रारदार हिस अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics) छिद्र पडल्‍यामुळे तो बदलून द्यावा किंवा त्‍याची रक्‍कम द्यावी याबाबत तक्रार अर्ज करुनही सामनेवाला यांनी त्‍याची दखल घेतली नाही. म्‍हणून तक्रारदार हिला मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्‍यामुळे तक्रारदार हिस निश्‍चीतच शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. सबब त्‍यांना शारीरीक, मानसिक व आर्थिक खर्चापोटी काही रक्‍कम व तक्रार दाखल केल्‍यामुळे तक्रारीचे खर्चापोटी तक्रारदार ही काही रक्‍कम मिळणेस पात्र आहेत.

9.   मुद्दा क्र.4   मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.4 चे उत्‍तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ  दे  श -

1)   तक्रारदार हिची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

2)   सामनेवाला यांनी तक्रारदार हिस अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics) या आदेशापासून 30 दिवसाचे आंत बदलून द्यावा. किंवा अस्‍तरीकरण प्‍लॅस्‍टीक पेपर (HDPE Geomembrane Fabrics) ची घेतलेली किंमत रक्‍कम रुपये 2,84,916/- [रक्‍कम रुपये दोन लाख चव-याऐंशी नऊशे सोळा फक्‍त] या निकालाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत द्यावी. न दिल्यास तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे.9 टक्‍के दराने संपुर्ण रक्‍कम फिटेपावेतो व्‍याज द्यावे.  

3)   सामनेवाला यांनी तक्रारदार हिस शारीरीक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम  रु.10,000/- [रक्‍कम रुपये दहा हजार फक्‍त] व या तक्रारीचा खर्च रक्‍कम  रु.5,000/- [रक्‍कम रुपये पाच हजार फक्‍त] तक्रारदार हिस द्यावा.

4) वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी या आदेशापासून 30 दिवसाचे आत करावी.

5)   या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क द्यावी.

6)   या प्रकरणाची  “ ब ” व “ क ” फाईल तक्रारदार हिस परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.