जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, अमरावती
ग्राहक तक्रार क्र.140/2014
दाखल दिनांक : 21/07/2014
निर्णय दिनांक : 03/02/2015
हरीशंकर रतनलाल अग्रवाल, :
वय 72, धंदा – शेती- व्यापार, :
रा. एल.आय.सी.ऑफीस,अचलपूर रोड : .. तक्रारकर्ता..
- , ता.अचलपूर, जि.अमरावती. :
विरुध्द
- श्रीमती आरती सुशील जैन, :
सेल्स मॅनेजर, स्टार हेल्थ अॅन्ड अलाईड :
इन्शुरन्स कंपनी लि. मुधोळकर पेठ, :
- मॅनेजर, स्टार हेल्थ अॅन्ड अलाईड :
इन्शुरन्स कंपनी लि., 1 ला माळा, :
बी.एस.ई.एल. टेक. पार्क, सेक्टर -30-ए,:
वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, :
नवी मुंबई – 400705. : ..विरुध्दपक्ष...
गणपूर्ती : 1) मा.श्री.मा.के.वालचाळे, अध्यक्ष
2) मा.श्री.रा.कि.पाटील, सदस्य
तकतर्फे : अॅड.श्री.पाठकर
विपतर्फे : अॅड.श्री.वैद्य
..2..
ग्रा.त.क्र.140/2014
..2..
: न्यायनिर्णय :
( दिनांक 03/02/2015 )
मा.श्री.मा.के.वालचाळे, अध्यक्ष यांचे नुसार
1.. तक्रारकर्त्याने सदरचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत कलम 12 अन्वये दाखल केलेला आहे.
तक्रारकर्ता याच्या कथनाप्रमाणे त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडून Senior Citizens Red Carpet Insurance Policy (यापुढे यास मेडीक्लेम पॉलीसी असे संबोधण्यांत येईल) घेतली होती, ज्याचा कालावधी दिनांक 11/07/2013 ते 10/07/2014 असा होता. ही मेडीक्लेम पॉलीसी त्याने त्याच्या व त्याची पत्नी विमलादेवी यांच्यासाठी रु.2,00,000/- ची घेतली होती, याबद्दल रु.19,000/- प्रिमियम भरले होते. तक्रारकर्ता याने या मेडीक्लेम पॉलीसी पूर्वी दुस-या विमा कंपनीकडून 2009 ते 2013 या पाच वर्षाच्या कालावधीत सुध्दा मेडीक्लेम पॉलीसी घेतली होती.
तक्रारकर्ता याच्या कथनाप्रमाणे दिनांक 19/09/2013 रोजी त्याला मणक्याचा त्रास (spondelises) झाला होता व त्यासाठी डॉ.अरविंद कुलकर्णी यांच्याकडून बॉम्बे हॉस्पीटल मेडीकल रिसर्च सेंटर मुंबई यांचे वैद्यकीय उपचार दिनांक 19/09/2013 ते
..3..
ग्रा.त.क्र.140/2014
..3..
29/09/2013 या कालावधीत घेतले होते. त्यांच्यावर या कालावधीत शस्त्रक्रिया करण्यांत आली होती. त्याचे निदान “L4-L5 spondylolisthesis” झाले व यावर वैद्यकीय उपचारासाठी तक्रारकर्ता याला रु.6,36,212/- खर्च आला होता. याबद्दलची सुचना विरुध्दपक्ष यांना देवून मेडीक्लेम पॉलीसी अंतर्गत रु.2,00,000/- प्रतिपूर्ती मिळण्यासाठी अर्ज केला होता. परंतू विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांच्या दिनांक 09/01/2014 च्या पत्राप्रमाणे प्रतीपूर्तीचा अर्ज हा नामंजूर केला व त्यात कारण असे दिले की, तक्रारकर्ता याने त्यास असलेल्या आजाराबद्दलची माहिती विमा पॉलीसी काढतांना लपवून ठेवली होती.
तक्रारकर्त्याच्या कथनाप्रमाणे 2009 ते 2013 या कालावधीत त्याने नियमितपणे मेडीक्लेम पॉलीसी दुस-या विमा कंपनीच्या घेतलेल्या होत्या व शेवटची मेडीक्लेम पॉलीसी ही विरुध्दपक्ष क्र.1 कडून घेतलेली होती. मागील पाच वर्षापासून त्याने मेडीक्लेम पॉलीसी घेतलेल्या असल्याने विरुध्दपक्ष क्र.1 कडून घेतलेल्या पॉलीसी अंतर्गत त्यास रु.2,00,000/- प्रतीपूर्ती त्यास
..4..
ग्रा.त.क्र.140/2014
..4..
वैद्यकीय खर्चाबाबत व यावर व्याजासह द्यावी तसेच त्यास झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु.1,00,000/- व तक्रारीचा खर्च रु.15,000/- विरुध्दपक्षा कडून मिळावा यासाठी तक्रार अर्ज दाखल केला.
2. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी निशाणी 13 ला त्यांचा लेखी जबाब दाखल केला. जो विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी पुरसीस निशाणी 16 प्रमाणे त्यांचा लेखी जबाब म्हणून स्विकारला.
विरुध्दपक्ष यांनी हे कबूल केले की, तक्रारकर्ता याला त्यांनी मेडीक्लेम पॉलीसी दिली होती तसेच त्याचा कालावधी हा दिनांक 11/07/2013 ते 10/07/2014 असा होता व ती पॉलीसी रु.2,00,000/- होती. त्यांनी हे कबूल केले की, विरुध्दपक्ष यांनी या पॉलीसी पूर्वी 2009 ते 2013 या कालावधीत प्रत्येक IFFCO -TIG या कंपनीची मेडीक्लेम पॉलीसी घेतली होती. त्यांनी हे कबूल केले की, तक्रारकर्त्याचा प्रतीपूर्ती मिळण्याचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो नामंजूर करण्यांत आला. त्यांच्या कथनाप्रमाणे त्यांनी पॉलीसी काढतांना जे प्रपोझल दिले होते त्यात त्याला असलेल्या मणक्याच्या त्रासाबद्दल जी बाब ही नमूद न करता
..5..
ग्रा.त.क्र.140/2014
..5..
लपवून ठेवली, त्यास हा आजार आधीपासून होता व त्यामुळे या बाबीवर त्याचा अर्ज नामंजूर करण्यांत आला. कारण त्याने मेडीक्लेम पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग केला. त्यांनी असे कथन केले की, हा तक्रार अर्ज या मंचासमोर चालू शकत नाही.
विरुध्दपक्ष यांच्या कथनाप्रमाणे त्याने सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नसून तक्रार अर्ज हा खर्चासह रद्द करण्यांत यावा अशी विनंती केली.
3. तक्रारकर्ता याने निशाणी 18 ला प्रतिउत्तर दाखल केले.
4. दोन्ही पक्षांनी त्यांचा लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारकर्त्यातर्फे अॅड.श्री.पाटकर व विरुध्दपक्षातर्फे अॅड.श्री.वैद्य यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला यावरुन खालील मुद्दे उपस्थित करण्यांत आले.
मुद्दे उत्तर
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता याचा मेडीक्लेम
विमा पॉलीसी अंतर्गत दावा अर्ज योग्य
कारणाने नाकारला आहे का ? नाही
..6..
ग्रा.त.क्र.140/2014
..6..
- विरुध्दपक्ष यांनी सेवेत त्रुटी केली
आहे का ? होय
- आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणे व निष्कर्ष
5.मुद्दा क्र.1 ते 2 :- अॅड.श्री.पाटकर यांनी त्यांच्या युक्तीवादा दरम्यान तक्रारकर्ता याने तक्रार अर्जात ज्या बाबी नमूद केल्या त्या आधारावर युक्तीवाद केला व पॉलीसीच्या exclusion – II चा आधार घेतला तसेच त्याला प्रृष्टी देण्यासाठी त्यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. .... विरुध्द... आर.के. केशवानी [ I (1992) CPJ 1992 ] या निकालाचा आधार घेतला.
6. विरुध्दपक्षातर्फे अॅड.श्री.वैद्य यांनी मेडीक्लेम पॉलीसी मधील exclusion – 1 & 5V चा आधार घेवून असा युक्तीवाद केला की, तक्रारकर्ता याने जो प्रपोझल फॉर्म भरुन दिला होता त्यामधे त्यांनी त्याला पूर्वी असा त्रास झाला असल्याबद्दलच्या कॉल्ममधे ‘नाही’ असे लिहले. परंतू निशाणी 2/11 ला जे दस्त दाखल करण्यांत आले त्यात असे स्पष्ट नमूद आहे की, तक्रारकर्ता याला हा त्रास एक वर्षापासून होता. यावरुन त्यांनी असा युक्तीवाद केला
..7..
ग्रा.त.क्र.140/2014
..7..
की, तक्रारकर्ता याने त्यांच्या मणक्याच्या आजाराबद्दलची बाब ही लपवून ठेवली व त्यामुळे त्याने मेडीक्लेम पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग केला असल्याने प्रतीपूर्ती मिळण्याचा त्यांचा अर्ज हा योग्य कारणावरुन नामंजूर करण्यांत आला. अॅड.श्री.वैद्य यांनी असा युक्तीवाद केला की, मेडीक्लेम पॉलीसी घेतल्यानंतर थोडया कालावधीत तक्रारकर्ता याचे major operation – spinal card चे करण्यांत आले यावरुन हे शाबीत होते की, त्यास पाठीच्या मणक्याचा त्रास हा पूर्वीपासून होता व तो असल्याबाबतची नोंद दस्त निशाणी 2/11 मधे नमूद आहे. परंतू ही महत्वाची बाब तक्रारकर्ता याने लपवून ठेवली. युक्तीवादा दरम्यान विरुध्दपक्षातर्फे हा तक्रार अर्ज या मंचाच्या अधिकारक्षेत्रात कसा येत नाही याबद्दल कोणताही युक्तीवाद करण्यांत आला नाही.
7. दोन्ही विदवान वकीलांचा वर नमूद युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता याने ज्या निकालाचा आधार घेतला तो विचारात घेण्यांत आला. त्या निकालातील बाबी हया तक्रारा अर्जातील नमूद बाबीशी जुळणा-या नाहीत कारण त्या निकालातील जे प्रकरण होते त्यातील तक्रारकर्ता याने त्यास असलेल्या आजाराबद्दल पूर्वी जे वैद्यकीय
..8..
ग्रा.त.क्र.140/2014
..8..
उपचार घेतले होते त्याबद्दल विमा पॉलीसी काढतांना प्रपोझल फॉर्ममधे त्या बाबी नमूद केल्या होत्या. विरुध्दपक्ष यांनी त्यांच्या लेखी जबाबात हे कबूल केले आहे की, तक्रारकर्ता याने 2009 ते 2013 या पाच वर्षाच्या कालावधीत प्रत्येक वर्षी मेडीक्लेम पॉलीसी दुस-या विमा कंपनीची घेतली होती व त्यानंतर 2013-2014 मधे मेडीक्लेम पॉलीसी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून घेतली होती. तक्रारकर्ता याने जे वैद्यकीय उपचार बॉम्बे हॉस्पीटल, मुंबई येथे घेतले त्या बाबी नाकबूल केलेल्या नाही. तसेच तक्रारकर्ता याचे मेडीक्लेम पॉलीसी ही रु.2,00,000/- ची होती ही बाब विरुध्दपक्ष यांनी कबूल केली. तक्रारकर्ता याचा प्रतीपूर्ती मिळण्याचा अर्ज नामंजूर केल्याची बाब विरुध्दपक्ष यांना कबूल आहे.
8. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता याने विरुध्दपक्ष यांच्या विमा पॉलीसीतील अटी व शर्तीचा भंग केला का हे पाहावे लागेल. यासाठी विरुध्दपक्षातर्फे तक्रारकर्ता याने दाखल केलेला निशाणी 2/11 चा दस्त विचारात घेतला.
9. निशाणी 2/11 हे डॉ.अरविंद कुळकर्णी यांनी तक्रारकर्ता याने घेतलेल्या उपचाराबद्दलचा दाखला आहे. त्यात कॉल्म नं.7
..9..
ग्रा.त.क्र.140/2014
..9..
मधे Past Hisotry of the Patient (if any) with the duration of illness. “Mild low back ache x 1year ” याचा आधार घेत विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता याचा प्रतीपूर्ती मिळण्याचा अर्ज नामंजूर केला कारण त्याच्या कथनाप्रमाणे प्रपोझल फॉर्म निशाणी 2/5 मधे तक्रारकर्ता याने या आजाराबद्दलची बाब ही लपवून ठेवली त्यामुळे पॉलीसीच्या exclusion प्रमाणे अर्ज नामंजूर करण्यांत आला व तक्रारकर्ता याच्या केलेल्या वैद्यकीय उपचाराची प्रतीपूर्ती मिळू शकत नाही असे कथन विरुध्दपक्षातर्फे अॅड.श्री.वैद्य यांनी केले.
10. निशाणी 2/11 ला जो दाखला दाखल केलेला आहे व त्यातील कॉल्म नंबर 7 मधील नमूद बाबींचा आधार विरुध्दपक्ष यांनी घेतला ते पाहता असे दिसते की, त्यात हे स्पष्टपणे नमूद नाही की, तक्रारकर्ता यास एक वर्षापासून spondylolisthesis चा त्रास होता, Mild low back ache हे त्यात नमूद आहे ते सामान्यतः इतर बाबींवर सुध्दा राहू शकते. याच दस्तातील कॉल्म नंबर 5/6 [a & b ] विचारात घेता असे दिसते की, तक्रारकर्त्यास मणक्याचा त्रास हा 10 दिवसापासून सुरु झालेला होता. विरुध्दपक्ष यांनी असा कोणताही दस्त दाखल केला नाही त्यावरुन ही बाब शाबीत
..10..
ग्रा.त.क्र.140/2014
..10..
होते की, तक्रारकर्ता याने प्रपोझल फॉर्म देण्यापूर्वी त्यास spondylolisthesis चा त्रास होत होता व त्याबद्दल त्याने वैद्यकीय उपचार घेतले होते यावरुन असा निष्कर्ष काढण्यांत येतो की, तक्रारकर्ता याने spondylolisthesis या त्याच्या आजाराबद्दलची बाब ही प्रपोझल फॉर्म भरतांना लपवून ठेवलेली नाही कारण त्यास spondylolisthesis चा त्रास हा बॉम्बे हॉस्पीटलमधे दिनांक 19/09/2013 रोजी भरती होण्याच्या 10 दिवसापूर्वी सुरु झाला होता. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता याने प्रपोझल फॉर्ममधे या आजाराबद्दलचा उल्लेख न करणे हे संयुक्तीक असून त्याने या आजाराबद्दलची बाब त्यावेळी लपवून ठेवली हे विरुध्दपक्ष यांचे कथन स्विकारता येत नाही. विमा पॉलीसी काढल्यानंतर तक्रारकर्ता यास spondylolisthesis चा त्रास हा दोन महिन्यानंतर झाला व याबद्दल त्याने डॉ.कुळकर्णी यांच्याकडून वैद्यकीय उपचार घेतला. विमा पॉलीसीमधील Exclusion यातील (1) चा विचार करता तो या प्रकरणात लागू होत नाही.
11. पॉलीसीच्या exclusion clause मधील 2 चा विचार करता विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता याचा प्रर्तीपूर्ती मिळण्याचा अर्ज ज्या कारणावरुन नामंजूर केला ते कारण योग्य ठरत नाही.
..11..
ग्रा.त.क्र.140/2014
..11..
12. exclusion clause नंबर 2 मधे असे नमूद आहे “Any disease contracted by the insured person during the first 30 days from the commencement date of the policy. This exclusion shall not apply in case of the insured person having been covered under any health insurance policy (Individual or Group Insurance policy) with any of the Indian Insurance companies for a continuous period preceding 12 months without a break.” तक्रारकर्ता याने 2009 पासून प्रत्येक वर्षी मेडीक्लेम पॉलीसी काढली आहे व त्यामुळे याचा फायदा तक्रारकर्ता याला मिळतो.
13. वरील विवेचनावरुन असा निष्कर्ष काढण्यांत येतो की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता याचा मेडीक्लेम पॉलीसी अंतर्गत प्रतीपूर्ती मिळण्याचा दावा अर्ज दिनांक 09/01/2014 च्या निर्णयाप्रामणे जो रद्द केला ते कायदेशीर नाही. त्यामुळे मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यांत येतो.
14. वयोवृध्द व्यक्ती जेव्हा विमा कंपनीकडे मेडीक्लेम पॉलीसी काढते त्यावेळी त्यास अपेक्षा ही असते की, पॉलीसीच्या कालावधीत त्यास जो वैद्यकीय खर्च येईल त्याची पूर्तता विमा
..12..
ग्रा.त.क्र.140/2014
..12..
कंपनीने करावी. यासाठी तरतूद म्हणून तो विमा पॉलीसी काढत असतो व याबद्दल विमा कंपनीही प्रिमियम घेत असते. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता याने जी विमा पॉलीसी विरुध्दपक्षाकडे काढली त्यावेळी त्याची अपेक्षा ही नक्कीच होती की, त्याच्या वयाचा विचार करता त्यास जर मोठया आजाराबद्दल वैद्यकीय उपचारासाठी मोठा खर्च करावा लागला तर विमा कंपनीने विमा पॉलीसी अंतर्गत त्याची भरपाई करुन द्यावी. या प्रकरणात विरुध्दपक्ष यांनी त्याची जबाबदारी ही कायदेशीररित्या पूर्ण करण्याची असतांना ती पूर्ण न करता exclusion clause चा फक्त विचार करुन तक्रारकर्ता याची मागणी नाकारली व त्यांची ही कृती सेवेतील त्रुटी ठरते.
15. तक्रारकर्ता याने निशाणी 2/19 ला त्याला आलेल्या वैद्यकीय खर्च रु.6,36,212/- चे बिल दाखल केले असून हा खर्च कसा आला याबद्दलचे दस्त देखील त्याने दाखल केले. तक्रारकर्ता याची विमा पॉलीसी ही रु.2,00,000/- ची होती व त्यामुळे त्याला आलेल्या एकूण वैद्यकीय खर्चापैकी रु.2,00,000/- पर्यंत प्रतीपूर्ती मिळू शकते. तक्रारकर्ता याला जो खर्च आला तो रु.2,00,000/-
..13..
ग्रा.त.क्र.140/2014
..13..
पेक्षा जास्त आहे. विमा पॉलीसी अंतर्गत रु.2,00,000/- ची पॉलीसी असतांना जास्तीत जास्त रु.1,20,000/- ची प्रतीपूर्ती मिळू शकते. त्यातील नमूद अटी व शर्तीप्रमाणे विमाधारक जर वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात अंतर रुग्ण म्हणून भरती असेल तर त्यास दररोज जास्तीत जास्त रु.4,000/- पर्यंत खोलीचे भाडे मिळू शकते. तक्रारकर्ता हा 11 दिवस बॉम्बे हॉस्पीटल येथे अंतर रुग्ण होता व त्यासाठी त्यांच्याकडून रु.60,000/- हे भाडयासाठी घेतल्याचे बिलात नमूद आहे. अशा परिस्थितीत त्यास रु.60,000/- न मिळता रु.44,000/- विरुध्दपक्षाकडून देय होतात. जास्तीचे रु.16,000/- विमा पॉलीसीची मर्यादा रु.1,20,000/- विचारात घेता तक्रारकर्ता यास वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपूर्ती बद्दल रु.1,04,000/- देय होता व त्यासाठी त्यांनी घेतलेल्या उपचाराबद्दल खर्चाचा दस्त दाखल केला आहे. विरुध्दपक्ष यांनी ही रक्कम तक्रारकर्ता यास मंजूर करणे उचीत झाले असते. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांच्याकडून मेडीक्लेम पॉलीसी अंतर्गत रु.1,04,000/- मिळण्यास पात्र होतो.
16. तक्रारकर्ता हा मेडीक्लेम पॉलीसी अंतर्गत प्रतीपूर्तीची
..14..
ग्रा.त.क्र.140/2014
..14..
रक्कम मिळण्यास पात्र असतांना विरुध्दपक्ष यांनी त्याचा अर्ज हा कोणत्या कायदेशीर व समाधानकारक आधारा शिवाय नामंजूर केला असल्याने या रकमेवर व्याज मिळण्यास तक्रारकर्ता हा पात्र होता. तसेच त्यास झालेल्या मानसिक त्रासाबद्दल विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यास रु.15,000/- नुकसान भरपाई द्यावी असा निष्कर्ष हे मंच काढते यावरुन मुद्दा क्र. 2 ला होकारार्थी उत्तर देण्यांत येते.
17. वरील विवेचनावरुन विरुध्दपक्षातर्फे करण्यांत आलेला युक्तीवाद हा स्विकारण्यांत येत नाही व तक्रार अर्ज हा खालील आदेशप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येतो.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यांत येतो.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीक रित्या तक्रारकर्ता यास मेडीक्लेम पॉलीसी अंतर्गत रु.1,04,000/- त्यावर दिनांक 09/01/2014 पासून
..15..
ग्रा.त.क्र.140/2014
..15..
द.सा.द.शे.9 टक्के व्याज दराने या निकालाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावेत.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीक रित्या तक्रारकर्ता यास मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.15,000/- द्यावे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीक रित्या तक्रारकर्ता यास या तक्रारीचा खर्च रु.3000/- द्यावा.
- विरुध्दपक्ष यांनी स्वतःचा खर्च स्वतः सहन करावा.
- उभय पक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यांत याव्यात.
दि.03/02/2015 (रा.कि.पाटील ) (मा.के.वालचाळे)
सदस्य अध्यक्ष