रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्रमांक – 104/2008 तक्रार दाखल दिनांक – 15/10/08 निकालपत्र दिनांक- 3/11/2008
श्री. ए.एन.करदेकर, शाखा अधिकारी, कोकण मर्कंटाईल को.ऑप.बँक, शाखा – श्रीवर्धन, ता. श्रीवर्धन, जि. रायगड. ..... तक्रारदार
विरुध्द
सौ. ए.आर.प्रभू, शाखा अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा – श्रीवर्धन, ता. श्रीवर्धन, जि. रायगड. ..... विरुध्दपक्ष उपस्थिती – मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष मा.श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य तक्रारदारांतर्फे – अँड. श्रीराम वाडकर विरुध्दपक्षातर्फे - अँड. मंदार ठोसर -: नि का ल प त्र :- द्वारा मा.सदस्य, श्री.कानिटकर. तक्रारदारांचे कथन थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदार हे कोकण मर्कंटाईल को.ऑप. बँक शाखा श्रीवर्धन या शाखेचे व्यवस्थापक आहेत. तक्रारदारांच्या बँकेस त्यांच्या शाखेमध्ये चालू खाते, बचत खाते, मुदत ठेवी वगैरे व्यवहार करण्याचा परवाना आहे. तसेच खातेदारांनी इतर बँकांवर दिलेले चेक्स् कलेक्शन करण्यासाठी व जमा करण्याच्या सोयीसाठी तक्रारदारांनी त्यांच्या बँकेचे विरुध्दपक्ष बँकेच्या श्रीवर्धन शाखेमध्ये खाते उघडले. आपल्या तक्रारीमध्ये त्यांनी लिहिले आहे की, तक्रारदार बँकेला त्यांच्या सभासदांना कर्ज देणे, ठेवी घेणे वगैरे व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून परवाना मिळाला आहे. 2. तक्रारदार बँकेचे सभासद व ग्राहकांकडून आलेले चेक्स क्लिअरन्स साठी स्टेट बँकेच्या श्रीवर्धन शाखेकडे उघडलेल्या खात्यामध्ये जमा करतात. त्यात पुढे विरुध्दपक्षाच्या बँकेकडून त्यांच्या बँकेला देण्यात आलेल्या सेवेमधील त्रुटीबाबत त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. 3. याकामी मंचाने नि. 6 अन्वये तक्रारदारांना नोटीस काढून सदरची तक्रार हा ग्राहक वाद कसा होतो ? याबाबत खुलासा करण्यास सांगितले. त्यास अनुसरुन तक्रारदारांच्या वकीलांनी दि. 3/11/08 रोजी युक्तीवाद केला व त्यानुसार तक्रारदारांनी नि. 7 अन्वये काही न्यायनिवाडे दाखल केले आहेत ते पुढीलप्रमाणे - 1. 2002 (2) CPR 92 (NC) M/s. Syndicate Bank V/s. Banglore Development Authority. 2. 2003 (3) CPR 167 (State Commission Chandigadh) Punjab National Bank V/s. M/s. Goyal Traders. 3. 2002 (3) CPR (16) (NC) Karnataka State Finance Corporation V/s. Ganesh Flour Mills and another. 4. State Commission Rajasthan, Jaipur, Mahesh Bhandari V/s. Punjab National Bank. 4. तक्रारदारांनी दाखल केलेले वरील न्यायनिवाडे हे या प्रकरणात अजिबात लागू होत नाहीत असे मंचाचे मत आहे. त्यांनी दाखल केलेल्या न्यायनिवाडयांचा विचार करता हे निवाडे बँका व त्यांचे ग्राहक याबाबतचे आहेत. त्यामुळे त्यांचे वाचन करणे या संदर्भात मंचास आवश्यक वाटत नाही. तक्रारदार ही भारतीय रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेली एक सहकारी बँक आहे. म्हणजेच ती एक व्यापारी संस्था आहे. याबाबत ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (1) (d) (ii) हे असे आहे - (d) Consumer means any person who – (i) ....... (ii) [hires or avails of] any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who [hires or avails of] the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payments, when such services are availed of with the approval of the first mentioned person [but does not include a person who avails of such services for any commercial purpose] ; Explanation – For the purpose of this clause, “commercial purpose” does not include use by a person of goods bought and used by him and services availed by him exclusively for the purposes of earning his livelihood, by means of self-employment ;] तक्रारदार बँक ही एक व्यापारी संस्था असल्याने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 (1) (d) (ii) अन्वये ते विरुध्दपक्षाचे ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत असे मंचाचे मत आहे. तसेच त्यांच्या खात्याच्या स्वरुपावरुन तक्रारदार हे मूळ ग्राहकाचे प्रतिनिधी (Agent) म्हणून त्यांचे चेक विरुध्दपक्ष यांचेकडे जमा करतात. यामुळे हा ग्राहकवाद ठरत नाही. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रारदार यांची ही तक्रार या मंचापुढे चालविता येणार नाही असे मंचाचे मत आहे. याबाबत त्यांना विरुध्दपक्षाकडून मिळणा-या त्रुटीपूर्ण सेवेबाबत योग्य त्या आस्थापनेकडे / यंत्रणेकडे ते दाद मागू शकतात परंतु या मंचापुढे त्यांना ही तक्रार दाखल करता येणार नाही. त्यामुळे ती काढून टाकण्याच्या (dismiss) निर्णयाप्रत मंच आले आहे. 5. सबब, आदेश पारीत करण्यात येतो की, - अंतिम आदेश - 1. तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक नसल्याने सदरची तक्रार खर्चासह निकाली काढण्यात येते. 2. या आदेशाची प्रत तक्रारदारांस पाठविण्यात यावी. दिनांक – 3/11/08. ठिकाण – रायगड – अलिबाग.
(बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |