तक्रार क्रमांक – 79/2009 तक्रार दाखल दिनांक – 09/02/2009 निकालपञ दिनांक – 17/04/2010 कालावधी - 01 वर्ष 02 महिने 08दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर जुझर नझारेली माधीया रा.ए-603, विनस रेसिडेन्सी, प्लॉट नं. 86, सेक्टर 14, कोपरखेरने, नवी मुंबई 400 709. .. तक्रारदार विरूध्द श्री. उदय कोकाटे मे.एनर्जी कंझपशन ओपटिमायझर प्रा.लि., 3रा मजला, नवीन केनी बिल्डींग रसिला बार जवळ, सोनारपाडा, कल्याण - शिलपाडा रोड, डोंबिवली(पुर्व) 421201 .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य सौ. भावना पिसाळ - सदस्य उपस्थितीः- त.क स्वतः वि.प तर्फे वकिल ए.एन.नामजोशी आदेश (पारित दिः 17/04/2010) मा. सदस्या सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार जुझर माधीया यांनी श्री.उदय कोकाटे यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्द पक्षकाराकडे त्यांनी खरेदी केलेल्या एनर्जी सेव्हर मशीनचे रु.1,500/- नुकसान भरपाई सकट परत मागितले आहेत.
2. तक्रारकर्ता यांनी 2/10/2008 रोजी विरुध्द पक्षकार कडुन रु.1,500/- किंमतीचे पॉवर सेव्हर (energy economiser) विकत घेतला व चेक नं. 244900 द्वारे किंमत अदा केली व दि.07/10/2008 रोजी तो
.. 2 .. तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्षकाराकडुन घरपोच मिळाला. परंतु सदर पॉवर सेव्हरचा घरामध्ये वापर सुरू झाल्यावर अगोदरच्या रु.1,200/-पर्यंतच्या बीलापेक्षा नव्याने येणारे बील अधिक जादाच आले ते रु.1,850/- पर्यंत आले त्यातील दोष दुरूस्त करुन देण्यासंबंधी अनेकदा तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु विरूध्द पक्षकार यांनी दुर्लक्ष केले म्हणुन सदरचा पॉवर सेव्हर परत घेऊन त्याची दिलेली किंमत परम करण्याची मागणी तक्रारकर्ता यांनी केलेलह आहे.
3. विरुध्द पक्षकार यांनी त्यांची लेखी कैफीयत दि.10/07/2009 रोजी निशाणी 8 वर दाखल केली आहे यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि, तक्रारकर्ता यांनी वापरातील सांगितलेल्या वीजेच्या उपकरणापेक्षा जास्तीची उपकरणे वापरली असतील व त्यामुळे वीजेचा वापरही जादा झाल्यामुळे बील जादा आले असावे. सदर एनर्जी इकोनोमाझरमुळे वीजेची बील चार्जेस कमी होण्यास मदत होते.
4. उभयपक्षकारांची पुरावा कागदपत्रे, शपथपत्रे, लेखी कैफीयत, लेखी युक्तीवाद मंचाने पडताळून पाहीले व पुढील प्रश्न निदर्शनास येतो. प्र.विरुध्द पक्षकार यांच्या सेवेत निष्काळजीपणा व त्रृटी आढळतात का? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांचे कडुन एनर्जी इकोनोमाझर विकत घेतला त्यांची रु.1,500/- किंमत विरुध्द पक्षकार यांना मिळाली होती परंतु सदर एनर्जी इकोनोमाझर घरात वापरल्यावर बील कमी येण्याऐवजी जादा आले. म्हणुन त्यांनी विरुध्द पक्षकार यांना सदर उपकरणातील दोष दुर करण्यास अनेकदा विनंती करुनही विरुध्द पक्षकार यांना दुर्लक्ष केले. मंचाच्या मते सदर उपकरण दोषयुक्त आहे का? याचे परिक्षण करुन कोणतीही दुरूस्ती करण्याचे औदार्य व कर्तव्य विरुध्द पक्षकार यांनी पार पाडलेच नाही. त्यामुळे विरुध्द पक्षकार यांच्या सेवेत निष्काळजीपणा संभवतो व आढळतो. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी सदर दोषयुक्त पॉवर सेव्हर परत करुन त्याची किंमत रु.1,500/- तक्रारकर्ता यास मिळण्याची मागणी हे मंच मान्य करत आहे.
.. 3 .. अंतीम आदेश 1. तक्रार क्र.79/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे व या तक्रारीचा खर्च विरुध्द पक्षकार यांनी रु.200/- (रु. दोनशे फक्त) तक्रारकर्ता यास द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्तायांस विकलेले एनर्जी इकोनोमाझर त्यांच्याकडुन परत घ्यावे व तदनंतर त्याची किमत रु.1,500/- (रु. एक हजार पाचशे फक्त) तक्रारकर्ता यास परत द्यावेत. या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन2 महिन्याच्य आत करावे अन्यथा तदनंतर वरील रकमेवर द.सा.द.शे 10 % व्याज द्यावे लागेल.
3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास मानसिक त्रासाचे रू.100/- (रु. शंभर फक्त) द्यावेत. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही.
दिनांक – 17/04/2010 ठिकान - ठाणे
(सौ.शशिकला श.पाटील ) अध्यक्षा
(सौ. भावना पिसाळ ) (श्री.पी.एन.शिरसाट ) सदस्या सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|